अजूनकाही
आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनक’, केंद्रीय नाट्य विद्यालयाचे दुसरे संचालक इब्राहिम अल्काझी यांचं परवा दिल्लीत वयाच्या ९५व्या वर्षी निधन झालं. अल्काझी १९६२ ते ७७ अशी सलग १५ वर्षं केंद्रीय नाट्य विद्यालये संचालक होते. अल्काझी १९४८ ते ५१ या काळात लंडनमध्यील ‘रॉयल अॅकडमी ऑफ आर्टस’मध्ये शिकत असताना इंग्रजीत नंतर ख्यातनाम कवी झालेले निस्सिम इझिकेल हे त्यांचे सहकारी होते. त्यांनी ‘The Exact Name’ (१९६५) या कवितासंग्रहामध्ये अल्काझींविषयी एक कविता लिहिली आहे. इझिकेल यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद साहित्य अकादमीनं ‘आधुनिक स्तोत्रं’ (१९९४) या नावाने प्रकाशित केला आहे. प्रदीप गोपाळ देशपांडे यांनी हा संग्रह मराठीमध्ये अनुवादित केला आहे. त्यातील ही एक कविता...
..................................................................................................................................................................
आर्ट लेक्चर ईब्राहिम अल्काझीसाठी
तो करतो सुरुवात तारखांनी अन शेवट स्तुतीनं,
करतो वर्णन एखाद्या तरल प्रसंगाचं, वेधतो लक्ष
एखाद्या तात्पर्याकडं, किंवा हुशारीनं बोलतो
कुठल्या तरी ऐतिहासिक, औपचारिक संकेतकोशावर.
दिवे विझतात. पडद्यावर
त्या उत्कृष्ट कलाकृती पसरतात दूरवर.
कुठल्या नग्नावस्थेतल्या स्त्रिया दिसतात!
कुठले देवदूत कपडे परिधान केलेले
चालतात किंवा तरंगतात कुठल्या गूढ डोंगरांवर किंवा आभाळांवर!
तो सांगतो आम्हाला की रेषा थरथरतात,
रंग खटकतात नाहीतर जुळून येतात –
आमच्या शिक्षणाला खूपच उशीर झालाय.
इथली ही बोधकथा बायबलमध्ये आहे.
ती आख्यायिका ग्रीक साहित्यातली आहे.
आम्ही ऐकतो, ताणतो आमचे डोळे बघण्यासाठी,
ग्रहण करण्यासाठी ती प्राचीन नटवी भाषा.
शेवटची प्रतिमा चांगली समजावून झाल्यानंतर
सरकते झर्रकन. आम्ही टाळ्या वाजवतो अन निघून जातो.
डोळ्याच्या अशिक्षित सवयींना मिळते इथं
एक उसंत छोटीशी
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment