अजूनकाही
‘आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनक’, केंद्रीय नाट्य विद्यालयाचे पहिले संचालक इब्राहिम अल्काझी यांचं परवा दिल्लीत वयाच्या ९५व्या वर्षी निधन झालं. अल्काझी ४०-५०च्या दशकांत मुंबईतल्या इंग्रजी नाट्यक्षेत्रातली एक दिग्गज हस्ती होते. ‘बॉम्बे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूप चे एक प्रवर्तक, ‘थिएटर युनिट बुलेटिन’चे संस्थापक, ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे सलग १५ वर्षं संचालक, ‘आर्ट हेरिटेज गॅलरी’ (दिल्ली)चे सहसंस्थापक, ‘तुघलक’, ‘अंधायुग’, ‘आषाढ का एक दिन’, ‘आधेअधुरे’ अशा अनेक नाटकांचे दिग्दर्शक... पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण पुरस्कारांचे मानकरी, पहिल्या तन्वीर सन्मानाचे मानकरी... अशी विविधांगी ओळख असलेल्या अल्काझींच्या कारकिर्दीची ही व्हिडिओ झलक...
..................................................................................................................................................................
२०१३मध्ये अल्काझी यांनी ‘उत्तुंग जीवन कला योगदान पुरस्कार’ देण्यात आला. अल्काझींच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे जाहीर सोहळा न होता हा पुरस्कार त्यांना घरगुती कार्यक्रमातच देण्यात आला. त्यावेळी त्यांना देण्यात आलेल्या मानपत्राचं वाचन...
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya
..................................................................................................................................................................
नाट्यदिग्दर्शक आणि एनएसडीच्या माजी चेअरपर्सन (२००४-१२) अमल अल्लाना वडील अल्काझींविषयी...
..................................................................................................................................................................
‘राज्यसभा टीव्ही’वर ‘गुफ्तगू’ नावाचा मान्यवरांच्या मुलाखतीचा एक कार्यक्रम असतो. त्यात झालेली अल्काझी यांची ही मुलाखत. यात त्यांनी आपल्या बालपणापासून ते एनएसडीपर्यंतच्या आठवणी सांगितल्या आहेत.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : राममंदिराच्या निर्माणाचं श्रेय इतिहासात कुणाच्या नावावर जमा होईल?
..................................................................................................................................................................
प्रसिद्ध अभिनेते नसरुद्दीन शहा एनएसडीमधल्या एका कार्यक्रमात अल्काझींविषयी...
..................................................................................................................................................................
फेब्रुवारी १९९२मधील अल्काझींची एक मुलाखत
..................................................................................................................................................................
पत्रकार करण थापर यांनी अल्काझी यांची बीबीसीसाठी १५ मे २००२ रोजी घेतलेली एक मुलाखत...
..................................................................................................................................................................
हा व्हिडिओ १९८५ सालचा आहे. यात नसरुद्दीन शहा अल्काझी यांच्या कामाबद्दल, त्यांच्या काम करण्याच्या शैलीबद्दल आणि त्याविषयी असलेल्या आक्षेपांबद्दल बोलले आहेत. नाटक हा मुळात लोकशाहीच्या तत्त्वाने चालणारा उपक्रम नसतो आणि अल्काझी हुकूमशाही प्रवृत्तीचे नव्हते, हे सांगताना नसरुद्दीन शहा यांचा आवाज थोडासा चढला आहे. कारण त्यांच्या गुरूविषयी नाहक शेरेबाजी त्यांना सहन झालेली दिसत नाही.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
नाटक, चित्रकला या क्षेत्रांतल्या अल्काझींच्या समग्र कारकिर्दीची ओळख करून देणाऱ्या छायाचित्र-प्रदर्शनाचा हा व्हिडिओ
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment