मध्यमवर्गीयांनो, तुम्ही कुणाकडे काय मागाल? मागणारे हात तर तुम्हीच तोडलेत!
पडघम - देशकारण
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 04 July 2020
  • पडघम देशकारण रवीश कुमार Ravish Kumar मध्यमवर्ग Middle Class

अमेरिकेत करोनामुळे नोकरी गेलेल्या, बिनपगारी सुट्टीवर पाठवलेल्या आणि पगारकपात झालेल्या पत्रकारांची संख्या ३६००० इतकी आहे. त्यामुळे तिथं प्रत्युत्तरादाखल ‘प्रेस फ्रीडम डिफेन्स फंड’ बनवला जात आहे. ज्यातून या पत्रकारांना मदत केली जाणार आहे. हा फंड ‘दि इंटरसेप्ट’ या माध्यम संस्थेनंच बनवला आहे. या फंडातून पत्रकारांना एक किंवा दोन वेळा १५०० डॉलरची मदत केली जाणार आहे. या फंडाकडे आतापर्यंत १००० निवेदनं आली आहेत.

अमेरिकेने जून महिन्यात १०० कोटी डॉलर्स इतका बेरोजगारी भत्ता दिला आहे. पण तरीही तिथं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, सरकारने बेरोजगारांची संख्या पाहता १४२ कोटी डॉलर्स खर्च करणं गरजेचं होतं.

याबाबतीत भारतीय मध्यमवर्ग चांगला आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा भत्ता नकोय. फक्त व्हॉटसअॅपवर मीम आणि व्हिडिओ हवेत. टीव्हीवर गुलामी.

भारतात एडिटर्स गिल्ड, प्रेस क्लब ऑफ इंडिया, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया या संस्थांनी किती मुक्त, पूर्ण वेळ, कायमस्वरूपी, स्ट्रिंगर, अर्धवेळ पत्रकारांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, कुणाची पगारकपात झालीय, त्यांची काय स्थिती आहे, याचा कमीत कमी सर्व्हे तरी करण्याची गरज आहे. त्यात तांत्रिक कर्मचाऱ्यांचाही समावेश करायला हवा. पत्रकारांची कुटुंबंही फी आणि घरभाडं देऊ शकत नाहीयेत.

अर्थात ही समस्या इतरांचीही आहे. खाजगी नोकरी करणारे सर्वच त्याचा सामना करत आहेत. एका खाजगी शिक्षकानं म्हटलंय की, सरकार सगळ्यांची दखल घेतेय, पण आमची घेत नाहीये. इतकंच नाही तर नव्या आणि तरुणा वकिलांचीही कमाई बंद झालीय. त्यांचीही हालत वाईट आहे. अनेक छोटे छोटे रोजगार करणाऱ्यांची कमाई बंद झालीय. विद्यार्थी म्हणताहेत, आम्ही भाडं देऊ शकत नाही आहोत.

याचा अर्थ असा नाही की, ८० कोटी लोकांना शिधा देणाऱ्या योजनेची खिल्ली उडवली जावी. पण मध्यमवर्ग हेच करतो. या गोष्टींमुळे त्याच्यातली संवेदनशीलता संपलीय. जे खूप गरीब आहेत, त्यांना शिधा तरी मिळतोय. (एरवी तो सडून जातो.) उलट त्यांना अधिक शिधा मिळायला हवा. फक्त पाच किलो तांदूळ आणि एक किलो तूरडाळीनं काय होणार?

..................................................................................................................................................................

लवकरच प्रकाशित होत आहे...

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

हे चुकीचं आहे की, मध्यमवर्गाला काहीच मिळत नाहीये. व्हॉटसअॅप मीम आणि गोदी मीडियाच्या चर्चांतून त्याची पूर्णपणे काळजी घेतली जातेय. त्याला मीमचं ‘मीमपान’ करता यावं, यासाठी त्याच्या मुलांचं शिक्षण आणि नोकऱ्यांविषयी बोलणं बंद झालंय. त्याच्यामध्ये जितक्या धार्मिक आणि बिगरधार्मिक आकांक्षा आहेत, संकुचितता आहेत, त्या सगळ्यांना खाद्य पुरवलं गेलंय. त्यामुळे तो राजकीय पद्धतीनं मानसिक सुख मिळवत राहिला आहे.

प्रत्यक्षात हा मध्यमवर्ग माध्यमं आणि अन्य संस्था नष्ट करणाऱ्या झुंडींच्या बाजूनं उभा राहत आला आहे, तोच आता माध्यमांना शोधतोय. माध्यमांचं खच्चीकरण करताना तो टाळी वाजवत होता. मध्यमवर्गामध्ये थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर त्यानं माध्यमांकडे अजिबात आपल्या व्यथांचं गाऱ्हाणं गाऊ नये. त्यानं फक्त मीमची मागणी करायला हवी. इतर काही नाहीतर नेहरूंना मुसलमान करणारं मीम दिवसातून दोन-तीन वेळा मिळालं तरी त्याला समाधान मिळेल.

प्रामाणिक मध्यमवर्गाला माहीत असायला हवं की, पंतप्रधानांनी त्याचे आभार मानलेत. प्रामाणिक करदात्यांचं अभिनंदन केलंय. असं नाहीये की, तुमच्याकडे लक्ष नाहीये.

अनुवाद - टीम अक्षरनामा

..................................................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख ‘एनडीटीव्ही’च्या पोर्टलवर २ जुलै २०२० रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

ADITYA KORDE

Sat , 04 July 2020

"...मध्यमवर्गामध्ये थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल तर ..." हे असले तारे तोडताना शरम वाटली पाहिजे होती राविशाकुमार ह्याना


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......