अजूनकाही
गेल्या काही दिवसांपासून चीनने भारताच्या गलवान खोऱ्यात केलेल्या घुसखोरीबद्दल देशात जोरदार चर्चा चालू आहे. प्रसारमाध्यमे त्याविषयी बोलताहेत, सर्वसामान्य भारतीयांच्या भावनाही तीव्र झालेल्या आहेत. ‘चायन बॅन’चा नारे दिले जात आहेत. मात्र केंद्र सरकारकडून पुरेसं आणि नेमकं स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही. चीनने भारताचे २० जवान क्रूरपणे मारलेत. काही जवानांना पकडलंही होतं. त्यांची नंतर सुटका करण्यात आली. नेमकी आणि अचूक माहिती ना प्रसारमाध्यमांकडे आणि ना केंद्र सरकारने त्याबाबत सविस्तर खुलासा केला आहे. उलट गलवान खोऱ्यात काहीही हालचाली झालेल्या नाहीत, असा खुलासा केल्यामुळे चीनच्या आगळिकीविषयी वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत. देशाचे जनमानस नेहमीच परकीय आक्रमणांबाबत आक्रमक असते. पण सीमाप्रश्न वा त्यावरील हालचाली शांतपणे समजून घेणे गरजेचे असते.
या पार्श्वभूमीवर ‘अक्षरनामा’चे लेखक आणि चीनचे एक अभ्यासक परिमल माया सुधाकर यांनी केलेली चर्चा दोन भागात.
..................................................................................................................................................................
पहिला भाग - चीनने भारताची खोडी का काढली? त्यामागे चीनचा नेमका काय हेतू आहे?
दुसरा भाग - भारताचं परराष्ट्र धोरण चुकलं का? त्यामागची नेमकी कारणं काय?
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment