जल्लिकट्टूला घेतलं ‘पेटा’ने शिंगावर, तामिळी जनता उतरली रस्त्यावर!
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • ‘जल्लिकट्टू’चे एक प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 21 January 2017
  • पडघम देशकारण jallikattu जल्लिकट्टू Tamil Nadu तामिळनाडू Pongal पोंगल बुल फायटिंग Bullfighting

गेल्या काही दिवसांपासून तामिळनाडूमधील जनता रस्त्यावर उतरली आहे. जल्लिकट्टू या खेळाच्या बंदीविरोधात केवळ सर्वसामान्यच नाहीतर रजनीकांत, ए.आर. रहमान यांच्यासारखे चित्रपटकलावंतही मैदानात उतरले आहेत. जल्लिकट्टू हा तामिळनाडूमधील राज्य खेळाचा दर्जा असलेला प्राचीन खेळ आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी आणल्यापासून तो पुन्हा सुरू करण्यासाठी सातत्याने मागणी केली जात आहे. शेवटी काल केंद्र सरकारने तामिळनाडू सरकारला या खेळाबाबत अध्यादेश काढण्याची परवानगी दिली. त्यानुसार आज तामिळनाडूचे राज्यपाल तसा अध्यादेश काढून या खेळाला परवानगी देतील.

आंदोलनकर्त्यांनी या खेळाच्या विरोधात जनहितयाचिका दाखल करणाऱ्या पेटा (People for the Ethical Treatment of Animals) या संस्थेवरच बंदी आणण्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे पेटाने राज्यापालांच्या अध्यादेशालाही न्यायालयात आव्हान दिलं जाईल असं जाहीर केलं आहे.

पेटाच्या कार्यकर्त्यांनी सर्वांच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहितयाचिकेवर निर्णय देताना न्यायालयाने २०१४मध्ये या खेळावर बंदी घातली होती. त्यानंतर तामिळनाडू सरकारने पुनरावलोकन याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने ती स्वीकारली नाही. गतवर्षी केंद्र सरकारने अध्यादेश काढून या खेळाला परवानगी दिली होती, पण न्यायालयाने त्यावरही स्टे आणला होता. आता सर्वोच्च न्यायालयात या खटल्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यावर न्यायालय लवकरच निर्णय देईल.

तो येईल तेव्हा येईल. तो काय असेल हे आत्ताच सांगता येणार नाही, पण बंदीचा असेल तर पुन्हा तामिळी जनतेमध्ये क्षोभ भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो.

तूर्त या खेळाविषयी थोडक्यात जाणून घेऊ…

‘जल्ली’ हा शब्द सल्ली या शब्दापासून आल्याचे मानले जाते. त्याचा अर्थ होतो, सिक्के. तर ‘कट्टू’ या शब्दाचा अर्थ होतो, बांधलेला.

पोंगलच्या दिवसांत तामिळनाडूमधील प्रत्येक शहर आणि गावामध्ये हा खेळ खेळला जातो. या खेळाला तामिळी आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग मानतात.

हा खेळ चारशे वर्षं जुना असल्याचं सांगितलं जातं. काही लोक हा खेळ २००० वर्षं जुना असल्याचाही दावा करतात. प्राचीन काळी नवऱ्या मुली वराची निवड करण्यासाठी या खेळाचा आधार घेत असंही सांगितलं जातं. त्यामुळे या खेळाचं आयोजन स्वयंवरासारखं केलं जात असे.

हा खेळ पीक काढणी झाल्यानंतर पोंगलच्या काळात आयोजित केला जातो. धष्टपुष्ट वळूच्या शिंगांना लाल कापड बांधलं जातं आणि त्याला भडकावून गर्दीत सोडलं जातं. तरुणांनी त्याची शिंगं पकडून त्याला ताळ्यावर आणून त्याच्या शिंगाला बांधलेलं कापड सोडवायचं असतं. जो तरुण ते सोडवतो त्याला बक्षिस दिलं जातं.

वळूंना भडकावण्यासाठी त्यांना दारू पाजली जाते किंवा त्याच्या डोळ्यात तिखट टाकलं जातं किंवा त्याची शेपटी पिरगाळली जाते. आणि यामुळेच पेटाच्या कार्यकर्त्यांचा या खेळावर आक्षेप आहे.

या खेळाआधी तामिळी लोक आपापल्या गावात आपल्या वळूंना घेऊन या खेळाचा सराव करतात. मातीच्या ढिगाऱ्यावर शिंगे रगडायला लावून वळूकडून खेळाचा सराव करून घेतला जातो. त्याला बळकट खुंट्याला बांधून उचकवले जाते. त्यामुळे तो भडकून आपल्या शिंगांनी समोरच्याला अंगावर घेण्याच्या प्रयत्न करतो.

खेळाच्या सुरुवातीला एकेक करून तीन वळूंना मैदानात सोडलं जातं. ते गावातले सर्वांत वृद्ध वळू असतात. त्यांना कुणीही पकडत नाही. ते गावाची शान असतात. त्यानंतर खेळ सुरू होतो. हा खेळ तीन दिवस चालतो.

काही लोक या खेळाची तुलना स्पेनमधील बुल फायटिंगशी करतात. पण जल्लिकट्टू बुल फायटिंगपेक्षा पूर्णपणे वेगळा खेळ आहे. यात वळूनला मारलं जात नाही किंवा वळूला ताळ्यावर आणण्यासाठी कुठल्याही शस्त्राचा आधार घेतला जात नाही.

जल्लिकट्टू या खेळामध्ये वळूला वंदनीय मानलं जातं, कारण तो शेतीचा आधार असतो. बुल फायटिंगचं तसं नाही. ते वळू शेतीच्या कामासाठी वापरले जात नाहीत, ते फक्त या खेळासाठीच तयार केले जातात.

या खेळासाठी जेलिकट या जातीचेच वळू वापरले जातात. हे वळू स्वभावत:च आक्रमक असतात. ते आपल्या शिंगांनी मारतात.

या खेळात वळूंना ताळ्यावर आणण्यात अनेक तरुण जखमी होतात. काहींच्या जिवावरही बेततं. २०१० ते २०१४ या चार वर्षांत तामिळनाडूमध्ये या खेळात साधारणपणे अकराशेहून अधिक तरुण जखमी झाले होते, तर १७ जणांचा मृत्यू झाला होता.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......