अजूनकाही
२४ मार्च २०२० हा दिवस या वर्षांतला ‘सर्वांत महत्त्वाचा दिवस’ म्हणून गणला जाईल. कदाचित या दशकातला तो ‘सर्वांत महत्त्वाचा दिवस’ही ठरेल. कारण या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केला. तो नंतर वाढवत वाढवत १ जूनपर्यंत गेला. नक्की सांगता येत नाही, पण भारतीयांचं जगणं बंदिस्त करणारा, त्यांचा वावर कडकोट बंदिस्त करणारा दिवस म्हणूनही त्याचं नाव भावी इतिहासात नोंदलं जाईल.
तसाच ३१ मे २०२० हा दिवसही. या दिवशी रेड झोन वगळता इतर ठिकाणचा लॉकडाउन संपून ‘अनलॉक १.०’ सुरू झाला. (हळूहळू ऑफिसेस, बाजारपेठा, मॉल्स सुरू करण्याला हळूहळू परवानगी मिळतेय. अनलॉकनंतरही करोनाची भीती वर्तवली जातेच आहे. पण तो वेगळा आणि स्वतंत्र विषय आहे.)
या दोन महिने एक आठवड्याच्या कालावधीत आपला देश कसा होता, लॉकडाउन होता म्हणजे नेमका काय होता, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या औरसचौरस, खंडप्राय, मध्यममार्गी, निम्म मध्यमवर्गीय देशाने या सक्तीच्या लॉकडाउनमध्ये कसे दिवस व्यतीत केले, याचा शोध घेतला आहे प्रसिद्ध दिग्दर्शक व फिल्ममेकर भारतबाला आणि त्यांच्या टीमने.
२५ मार्चपासून देशभरात तब्बल ११७ ठिकाणी टीम बांधून त्यांनी ‘उठेंगे हम’ हा चार मिनिटे दहा सेकंदांचा विशेष माहितीपट तयार केला आहे. या माहितीपटात १३० कोटी भारतीयांची आणि त्यांच्या भारत या देशाची गोष्ट अगदी थोडक्यात सांगितली आहे.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment