श्वास गुदमरून टाकणारी व्यवस्था आणि प्रतीकं हवीत कशाला, असा प्रश्न इंग्लंडच्या ब्रिस्टॉल शहरवासियांना पडला आणि त्यांनी एडवर्ड कोल्स्टनचा सुमारे १२५ वर्षं जुना पुतळा उखडून समुद्रात बुडवला.
पडघम - विदेशनामा
आर. एस. खनके
  • एडवर्ड कोल्स्टनचा पुतळा उखडतानाची काही छायाचित्रं
  • Thu , 11 June 2020
  • पडघम विदेशनामा एडवर्ड कोल्स्टन Edward Colston ब्रिस्टॉल Bristol इंग्लंड England जॉर्ज फ्लॉयड George Floyd ब्लॅक लाइव्हज मॅटर्स Black Lives Matters वंशवाद Racism

श्वास गुदमरून टाकणारी व्यवस्था आणि प्रतीकं हवीत कशाला, असा प्रश्न इंग्लंडच्या ब्रिस्टॉल शहरवासियांना पडला आणि गुलामांचा व्यापारी, नरसंहारक, साम्राज्यवादी एडवर्ड कोल्स्टनचा सुमारे १२५ वर्षं जुना पुतळा रविवारी म्हणजे ८ जून २०२० रोजी वंशवादविरोधी आंदोलकांनी उखडून समुद्रात बुडवला. जमलेल्या आंदोलकांनी प्रथम पुतळ्यावर अंडी फेकून मारली. त्यानंतर दोरखंडानं उभा पुतळा खाली पाडून घेतला आणि नंतर ब्रिस्टॉल शहरातच असलेल्या बंदरात नेऊन टाकण्यात आला.

या पुतळ्याचा इतिहास काय? आंदोलकांनी तो का पाडला? हे प्रश्न यानिमित्ताने समजून घेणे संयुक्तिक ठरतात. वंशश्रेष्ठत्वाची रग अंगात असलेल्या ब्रिटनमध्ये गुलामीची परंपरा फार जुनी आहे. ब्रिस्टॉल या शहराचा इतिहासही तेच सांगतो. ११व्या शतकापासून या शहरात गुलामांचा व्यापार चालत असे. त्या वेळी आयरिश आणि इंग्लिश गुलामांचा व्यापार या शहरातून चालत होता. नंतर इंग्रजी वसाहती अमेरिकन खंडात वाढू लागल्या, व्यापार करू लागला. त्यासाठी कामगारांची गरज भासू लागली, तेव्हा स्वस्तात मिळणारा गुलाम सर्वांना हवाहवासा वाटू लागला. त्यातून काळ्या आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून आणून या शहरात त्यांची खरेदी-विक्री करण्याचा व्यापार भरभराटीस आला. या व्यापारात मोठा नफा मिळू लागला. त्यामुळे या शहराला ‘गुलामांचे व्यापारी केंद्र’ म्हणून मान्यता मिळाली. गुलामांच्या या व्यापारातून या शहराची भरभराट झाली. आपल्याकडे धुम्रपानात ओढली जाणारी, हिंदी सिनेमातून एके काळी ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणून रुजवलेली ब्रिस्टॉल शिगारेट याच शहरातली.

१६३६ साली या शहरात जन्मलेल्या एडवर्ड कोल्स्टन या ब्रिटिश व्यापाऱ्याचं नाव आफ्रिकी गुलामांच्या व्यापारात आघाडीवर राहिलं. कोल्स्टन १६८० ते १६९२ या कालावधीत ‘रॉयल आफ्रिकन कंपनी’चा डेप्युटी गव्हर्नर होता.

गुलामांच्या व्यापारात ‘रॉयल आफ्रिकन’ कंपनी सर्वांत आघाडीवर होती. १६७२ ते १७२० दरम्यान या कंपनीनं आफ्रिकेतून सुमारे १,५०,००० एवढे लोक गुलाम म्हणून जहाजाद्वारे आणले. त्यांना अमेरिकेत नेऊन सोडलं जात असे. त्यात एकट्या एडवर्डच्या नेतृत्वाखाली या कंपनीनं आपल्या जहाजातून ८४,५०० आफ्रिकी काळ्या लोकांना अमेरिकेत पोचवलं. यामध्ये पुरुषांबरोबर, महिला आणि सहा वर्षांपर्यंतच्या मुलांचाही समावेश असे. ही कंपनी या गुलामांच्या छातीवर ‘RAC’ असा आपल्या आद्याक्षरांचा ब्रॅंडेड शिक्का मारत असे.

आफ्रिकेतून या गुलामांची वाहतूक करताना अमेरिकी किनाऱ्याला जहाज लागेपर्यंत प्रवासादरम्यान सुमारे १९,३०० म्हणजे एक चतुर्थांश लोकांचा जीव गेला होता. त्यात चारपैकी एका बालकाचा मृत्यु झाला होता.

RAC सोडल्यानंतर कोल्स्टनने ‘साऊथ सी’ ही कंपनी (SSC) स्थापन केली. त्याद्वारे गुलामांचा १५,९३१ लोकांना गुलाम म्हणून दक्षिण अमेरिकी देशांत आणून विकले. त्यात प्रत्येकी पाच माणसांमागे एकाचा प्रवासादरम्यान मृत्यु झाला. जहाजात अतिगर्दी, अस्वच्छता आणि रोगराईचे कित्येक गुलाम बळी ठरले.

कोल्स्टन उतारवयात चॅरिटीच्या मागे लागला होता. म्हणजे ‘सौ चुहे खाकर बिल्ली चली हज’ असा हा आयुष्यभर केलेल्या पापक्षालनाचा प्रकार. अनेक संस्थांना आपल्या संपत्तीतून मोठी मदत करू लागला. ब्रिटनच्या परंपरावादी म्हणवल्या जाणाऱ्या टोरी पक्षाचा खासदार म्हणून संसदेतही निवडून गेला. त्याचे विचार परंपरागत वंशश्रेठत्वाचे होते. १७२१मध्ये त्याचा मृत्यु झाला.

आफ्रिकी गुलामांच्या व्यापारातून ब्रिस्टॉल शहराला सधनता आणि श्रीमंती आणून देण्यात कोल्स्टनचा वाटा मोठा होता. त्याच्या स्मरणार्थ या शहरात त्याचा पुतळा उभारलेला होता. या शहरात कोल्स्टनच्या नावानं अनेक स्मृती होत्या आणि अजूनही आहेत. अलीकडच्या काळात वंशवादाविरुद्ध इंग्लंडमध्ये विरोध आणि आंदोलनं होत असताना कोल्स्टनच्या स्मृती काढून टाकण्यास सुरुवात झाली होती.

..................................................................................................................................................................

हेही पाहा, वाचा

जॉर्ज फ्लॉयडची हत्या, अमेरिकेतला वंशवाद आणि आक्रस्ताळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प - कॉ. भीमराव बनसोड

https://www.aksharnama.com/client/article_detail/4320

..................................................................................................................................................................

अमेरिकेतील जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनं संपूर्ण अमेरिका आणि युरोपसोबतच जगभरात ‘Black Lives Matters’ हे आंदोलन पेटलेलं असताना ८ जून रोजी कोल्स्टनचा पुतळा जमीनदोस्त करण्यात आला. विशेष म्हणजे हा पुतळा पाडण्यात काळ्या लोकांपेक्षा गोरे अधिक होते. आंदोलकांनी कायदा हातात घेतला म्हणून प्रशासनाच्या नजरेतून हा गुन्हा ठरत असला तरी इंग्लंडमधलं समाजमन या अमानवी व्यापाराच्या स्मृतीबाबत सहानुभूती ठेवत नाही, हे विशेष आहे.

ज्या परंपरा आणि स्मृती माणसाला माणूस म्हणून जगू देत नाहीत, त्या जतन करण्यात काहीही अर्थ नाही, हेच जणू या घटनेनं दाखवून दिलं आहे. याबाबत जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येच्या निमित्तानं पाश्चिमात्य गोरा समाजदेखील किती प्रगल्भ झालेला आहे आणि आफ्रिकन समाजदेखील आपल्या संवैधानिक अधिकारांबाबत किती सजग आहे, हे पाहणं कौतुकास्पद आहे.

पाश्चिमात्य देशांकडूनच आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्यं घेतली आणि अशा मानवी मूल्यांनी ओतप्रोत भरलेलं संविधान आपल्याप्रती अर्पण करून घेतलं. पण अद्यापही त्याप्रमाणे मानवी मूल्यं जपणारा नागरिक समाज भारत घडवू शकलेला नाही. कारण इथं ज्याचा श्वास गुदमरतो, तो निर्णय प्रक्रियेत अजूनही वाटेकरी नाही.

जॉर्जच्या श्वास गुदमरून मरण्यानं संपूर्ण अमेरिका आणि युरोप समाज ‘मुक्त श्वासा’ची मागणी करत रस्त्यावर आला. त्याला तिथल्या माध्यमांनी उचलून धरलं. तिथल्या सरकारी संस्थांनी आपली कर्त्यव्यं मोलाची मानली.

आपल्या इथं मात्र करोनाच्या टाळेबंदीत ज्या पत्रकारांनी स्थलांतरित कामगारांच्या व्यथा मांडल्या, त्यांना ‘गिधाडं’ म्हणण्यापर्यंत मजल गेली. ही आपल्या लोकशाही कल्याणकारी राज्याची अवनती आहे. एक सॉलिसिटर जनरल सर्वोच्च न्यायालयात ‘देशात रस्त्यावर कुणीही मेलं नाही’, असं धादांत खोटं बोलतो. आणि आमची आजची न्यायव्यवस्था स्थलांतरित कामगारांच्या वनवासाच्या अडीच महिन्यांनंतर ‘त्यांना आता १५ दिवसांत त्यांच्या घरी सोडा’ म्हणतेय. या सूचना देईपर्यंत कामगार आपापल्या मार्गानं हाल-अपेष्टा भोगून घरी पोचले आहेत.

ज्या देशात कामगारांच्या व्यथांचा आवाज पोचायला आणि तो ऐकून त्यावर सूचना यायला अडीच महिने लागतात, त्या देशातील व्यवस्था सामान्यांचा श्वास गुदमरून टाकणारीच आहे, यात शंका नाही.

..................................................................................................................................................................

आर. एस. खनके

sangmadhyam@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......