अजूनकाही
भारतीय हिंदूंमध्ये ‘इस्लामोफोबिया’ निर्माण करण्याचे प्रयत्न तसे खूप जुने आहेत. स्वातंत्र्याआधीपासूनचे. भारत-पाक फाळणीपासून तर त्याला चांगलीच धार आली. स्वातंत्र्योत्तर काळात हा ‘इस्लामोफोबिया’ सतत वाढवण्याचे उद्योग हिंदुत्ववादी संस्था-संघटनांनी आपली जीवितकर्तव्यच मानले आहे. मुस्लिमांनी काही केलं वा नाही केलं तरी त्यांच्याविषयी गरळ ओकण्याचे, त्यांच्याविषयी चीड निर्माण करण्याचे आणि त्यांचा द्वेष करायला लावण्याचे प्रयत्न सातत्याने जाणीवपूर्वक हिंदुत्ववादी संस्था-संघटना करत असतात. करोना व्हायरस ही महामारी जगभर थैमान घालत असताना त्यात हात धुवून न घेतील ते हिंदुत्ववादी कसले! त्यांनी या महामारीचाही उपयोग मुस्लिमांविषयी द्वेष पसरवण्यासाठी केला आहे. म्हणूनच तर ‘टाइम’ या जगप्रसिद्ध साप्ताहिकाच्या पोर्टलवर ३ एप्रिल रोजी ‘It Was Already Dangerous to Be Muslim in India. Then Came the Coronavirus’ हा लेख प्रकाशित झाला आहे. ‘द प्रिंट’ या पोर्टलवर ‘Indians are fighting against coronavirus and BJP IT cell is fighting against Indians’ या नावाचा आणि ‘कॅरॅव्हॅन’ या इंग्रजी मासिकाच्या पोर्टलवर ‘After COVID-19 outbreak at Tablighi Jamaat conference, fake news targeting Muslims abounds’ या नावाचा, असे लेख ४ एप्रिल रोजी प्रकाशित झाले आहेत.
असो. तर गेल्या काही दिवसांत मुस्लिमांविषयी द्वेष पसरवण्यासाठी व्हायरल केल्या गेलेल्या या काही फेक न्यूज. यातल्या काही तुमच्यापर्यंतही नक्कीच आल्या असतील.
१) मुस्लीम माणूस करोना व्हायरस पसरवण्यासाठी फळांवर थुंकतो
काय आहे नेमकी वस्तुस्थिती? ‘अल्ट न्यूज’ आणि ‘द क्विंट’ या दोन पोर्टलनी ती उघड केली आहे. तुम्हीच क्लिक करा आणि जाणून घ्या -
२) मुस्लीम करोना व्हायरस पसरवण्यासाठी भांडी उष्टी करतो
हा व्हिडिओ खरा आहे, पण तो मुद्दामहून करोनाशी जोडला गेला आहे. या व्हिडिओमागची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पहा -
त्याशिवाय हेही पहा
https://thelogicalindian.com/fact-check/muslim-lick-plates-coronavirus-covid-19-pandemic-20429
३) मुस्लीम करोना व्हायरस पसरवण्यासाठी एकत्र शिंकताहेत
कुठली तरी गोष्ट कुठे तरी संदर्भ तोडून वापरायची ही फेक न्यूज पसरवणाऱ्यांची हुकमी पद्धत आहे. इथे नेमका त्याचाच वापर केला गेला आहे. पण ही लबाडी पुढील चार पोर्टल्सनी उघड केली आहे -
https://thelogicalindian.com/fact-check/covid19-muslim-sneeze-delhi-hazrat-nizamuddin-mosque-20436
४) हिंदूंना कराची, पाकिस्तान इथं रेशन नाकारण्यात आलं
आपल्याकडच्या वृत्तवाहिन्या कुठल्या थराला गेल्या आहेत, त्याचा या व्हिडिओवरून अंदाज येतो.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वर्तमानपत्रानेही ही फेक न्यूज छापली. का? कारण आपला पाकिस्तान द्वेष. त्यामुळे पाकिस्तानविषयीचं काहीही असलं तर ते पडताळून कोण पाहणार? ते खरं समजून चालायचं.
पण सत्य लपून राहत नाही म्हणतात. ‘द न्यूज’ या पोर्टलने यामागची वस्तुस्थिती सविस्तर स्पष्ट करून हा सगळा प्रकार कसा बनावट आहे, हे सांगितलं आहे.
५) तबलिगी जमातचा व्यक्ती करोना पसरवण्यासाठी पोलिसांवर थुंकला
ही बातमी फेक असल्याचं ‘बीबीसी हिंदी’ या नामवंत वृत्तसंस्थेने दाखवून दिलं आहे.
https://www.bbc.com/hindi/india-52148620
६) मुस्लिम पोलिसाने हिंदू साधूला मारले
द्वेषच पसरवायचा ठरवला की काय काय शोध लावले जातात. पण त्यांचा पर्दाफाशही होतोच.
७) मुस्लीम कामगार करोना पसरवण्यासाठी हॉटेलमधील अन्नात थुंकतो
काय आहे नेमकी वस्तुस्थिती? ‘द लॉजिकल इंडियन’, ‘अल्ट न्यूज’, ‘द वायर’ आणि ‘द क्विंट’ या चार पोर्टलनी ती उघड केली आहे. तुम्हीच क्लिक करा आणि जाणून घ्या -
https://thelogicalindian.com/fact-check/muslim-spit-restaurant-covid-19-coronavirus-20457
८) परदेशी करोनाबाधित मुस्लिमाला तपासणीपासून वाचवण्यासाठी पाटण्यातील मशिदीत दडवले
दडपून खोटं पसरवणाऱ्यांना सरळ सरळ उघड पाडायचं काम ‘अल्ट न्यूज’ हे पोर्टल रोज करतं. या फेक न्यूजमागचं सत्यही त्यांनी उघड करून ती पसरवणाऱ्यांना ‘एक्सपोज’ केलं आहे. तुम्हीच क्लिक करा आणि जाणून घ्या -
थोडक्यात, संपूर्ण देश करोना विषाणूचा सामना करत आहे. पण याच काळात काही उपद्रवी लोक जाणीवपूर्वक FakeNews, FakeVideo सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवून धार्मिक तेढ निर्माण करत आहेत. अशा काळातही करोनाच्या समस्येला धर्माशी जोडू पहात आहेत. दिल्लीत झालेल्या Tabligi Jamaatच्या कार्यक्रमामुळे त्याला आणखी हवा मिळाली. मुख्य प्रवाहातील News Channel नी त्यात उडी घेतली आणि प्रपोगंडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा वेळी आपल्या धर्मातील चुकीच्या गोष्टी, रूढी-परंपरा, मौलाना-मौलवी यांची वादग्रस्त वक्तव्य, अंधश्रद्धा पसरवणारी भाषणे याचा गंभीर विचार करून त्याला स्पष्ट विरोध करण्याची गरज मुस्लीम समाजाला होती. पण तसे झाले नाही. पुढील काळाततरी धर्माच्या नावावर सुरू असलेल्या आणि मानव जातीला अडचणीत आणणाऱ्या गोष्टींना मुस्लिमांनी विरोध केला पाहिजे. अन्यथा त्यांना कायमच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे रहावे लागेल.
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment