नरेंद्र मोदी लढवणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
संकीर्ण - व्यंगनामा
टीम अक्षरनामा
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी
  • Wed , 01 April 2020
  • संकीर्ण व्यंगनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसरी इनिंग नुकतीच सुरू झाली आहे. या इनिंगमध्येही मोदींची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही, हे परवाच्या ‘जनता कर्फ्यु’मधून दिसून आलंच आहे. मोदींनी हाक द्यावी आणि देशभरातल्या जनतेनं त्यांना साथ द्यावी, असे प्रसंग गेल्या पाच-सहा वर्षांत कैक सांगता येतील. त्यामुळे मोदींच्या दुसऱ्या इनिंगचंही ‘शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!’ असंच वर्णन करावं लागेल.

भारतात मोदींच्या पंतप्रधानपदाची दुसरी इनिंग नुकतीच कुठे सुरू झाली असली तरी आणि अजून त्यांची जवळपास चार वर्षं पूर्ण व्हायची असली तरी अमेरिकी जनतेमध्ये त्यांच्याविषयी मोठ्या प्रमाणावर कुजबूज सुरू झालेली आहे. सूत्रांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार असं कळतं की, अमेरिकी जनतेला त्यांचे ४६वे राष्ट्राध्यक्ष म्हणून मोदीजी हवे आहेत. अमेरिकेत करोना व्हायरसने हाहाकार माजवला आहे. आजघडीला चीनपेक्षाही अमेरिकेची परिस्थिती वाईट आहे.

‘करोना व्हायरस’ला ‘चायना व्हायरस’ म्हणण्यातच भूषण मानणारे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही भीषण परिस्थिती अतिशय गलथानपणे हाताळली आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे ‘ते आणि आम्ही’, ‘आतले आणि बाहेरचे’ हे दावे बिनबुडाचे आहेत असं अमेरिकी जनतेला वाटू लागलं आहे. त्यामुळे तिला ट्रम्प पुन्हा अध्यक्ष म्हणून नको आहेत. त्याऐवजी त्यांना नरेंद्र मोदी त्यांचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून हवे आहेत. याचा दुसरा अर्थ असा आहे की, मोदींनी न्यूयॉर्क शहरातल्या प्रसिद्ध टाइम् स्क्वेअरमध्ये केलेला करिष्म्या अजूनही ओसरलेला नाही. मधल्या काळात अमेरिकेत मोदींची जादू जरा कमी झाली होती, पण तितक्यात करोना तिकडे आला, नेहमीप्रमाणे ट्रम्प यांनी त्याला उडवून लावायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याने चिडून अख्ख्या अमेरिकेलाच वेठीला धरलं आहे. परिणामी अमेरिकी जनमत ट्रम्प यांच्या विरोधात गेलं आहे.

ही ट्रम्प यांनी स्वत:च्या हातांनी स्वत:च्या पायावर मारून घेतलेली कुऱ्हाड आहे. पण या निमित्तानं हा ‘काळा पहाड’ बाजूला झाला हे बरंच झालं, असं बाबुराव अर्नाळकरांनी वर्तवलेलं भविष्य खरं ठरत असल्याचं दिसतं आहे.

लवकरच अमेरिकेत नव्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार आहे. ट्रम्प यांना बराक ओबामा यांच्यासारखी दुसऱ्या इनिंगचीही संधी देण्याचं ठरलं होतं. पण आता करोनाच्या बाबतीत ट्रम्प सपशेल नापास ठरलेले आहेत, तर मोदी मात्र भारतात करोनाला व्यवस्थित हाताळत आहेत. साम-दाम-दंड-भेद ही चतुसूत्री मोदीजी करोनाच्या विरोधातही वापरत असल्यानं तो दिवसेंदिवस नामोहरम होत चालला आहे. ते पाहून अमेरिकी जनतेच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. ‘मोदी२०२१’ या संकेतस्थळानं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष व्हावे, यासाठी एक याचिका तयार केली आहे. तसेच अमेरिकी जनतेला या याचिकेला समर्थन देण्यासाठी आवाहन केलं आहे. या आवाहनाला करोनाग्रस्त परिस्थितीतही अमेरिकी जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत ९७,००० लोकांनी या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

नरेंद्र मोदी यांनी गेली सहा वर्षं भारताचं पंतप्रधानपद अतिशय जबाबदारीनं, सक्षमपणे, नेटानं, खंबीरपणे आणि धिटाईनं सांभाळलं आहे. जी व्यक्ती भारतासारख्या देशाचं पंतप्रधानपद सांभाळू शकते, ती व्यक्ती जगातल्या कुठल्याही देशाचं, त्यातही अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद तर नक्कीच सांभाळू शकते. म्हणून आम्ही हा प्रस्ताव सादर करत आहोत, असं या संकेतस्थळाचं म्हणणं आहे.

मोदीजी यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतो आहे. लवकरच तो लाखाची संख्या पार करेल. त्यामुळे अमेरिकेतल्या काही राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, मोदीजींची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी बहुतेक बिनविरोध निवड होणार! आणि समजा त्यांच्या विरोधात कुणी उभं राहिलंच तर त्याचं डिपॉझिटही जप्त होणार! तसेही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी नेहमीच दहा-बारा उमेदवार उभे असतात. त्यातल्या फार तर दोघांची नावं आपल्यापर्यंत पोहचतात. बाकीचे उमेदवार नेमके कुठे उभे राहिलेले असतात, हे ते पडले तरी समजत नाही! मोदीजी उभे राहणार म्हणजे पहिल्या ते दहाव्या नंबरापर्यंत ते एकटेच असणार. त्यामुळे त्यांच्याशी कुणी टक्कर घेईल असं वाटत नाही, असा अमेरिकेतील बहुतेक राजकीय विश्लेषकांचा दावा आहे. त्यांचं असंही म्हणणं आहे की, एखादा प्रतिस्पर्धी उमेदवार उभा राहिलाच तर एरवी राष्ट्राध्यक्षपदासाठी उभ्या राहिलेल्या ३ ते १० क्रमांकाच्या उमेदवारांचं होतं, तसंच त्याचंही होईल!

या बातमीनं भारतीय जनता मात्र काहीशी चिंतीत होण्याची शक्यता आहे की, मोदीजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तर भारताचं काय होणार? कसं होणार? पण मोदीजी या समस्येवरही कौशल्यानं तोडगा काढतील असा भारतातल्या तसंच अमेरिकेतल्या महामहीम पत्रकारांचा अंदाज आहे. किंबहुना त्यांनी तो काढलाही आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे. मोदीजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर भारताच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देणार नाहीत. तर अमेरिकेमध्ये चार दिवसांचा आठवडा आणि भारतामध्ये तीन दिवसांचा आठवडा करणार आहेत. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार हे चार दिवस अमेरिकेत; तर शुक्रवार, शनिवार आणि रविवार हे तीन दिवस भारतात राहणार आहेत.

मोदीजींवर त्यांच्या गेल्या सहा वर्षांच्या काळात भारतीय इंग्रजीसह हिंदी, मराठी, गुजराती अशा विविध भारतीय भाषांमध्ये पुस्तकं लिहिली गेली. आता ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तिथंही त्यांच्यावर इंग्रजीसह तेथील विविध प्रादेशिक भाषांमध्ये पुस्तकं लिहिली जातील.

तोही त्यांच्यावर एक नवा विक्रम असेल!

ता. क. - हा लेख लिहून पूर्ण होईपर्यंत नवी बातमी आली असून त्यानुसार करोनामुळे अमेरिकेत ४६व्या राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होणार नाही, तर जनता बहुमतानं राष्ट्राध्यक्षाची थेट निवड करणार आहे!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

KRUSHNA KOLHE

Thu , 23 April 2020

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाची निवडणूक लढण्यासाठी अमेरिकेचे नागरीक होणे गरजेचे आहे आणि अमेरिकेत नागरीकत्व फक्त जन्माने प्राप्त होते त्यामुळे नरेंद्र मोदी हे अमेरिकेत निवडणूक लढू शकत नाहीत आणि 3&4 दिवसाचा आठवडा तर कल्पनेच्या बाहेरचे आणि असा लेख लिहिणे म्हणजे अपुरया अभ्यासाची लक्षणं दिसतात किंवा पडलेले स्वप्नाचा लेख लिहिण्याचा सवय


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......