करोना व्हायरसविषयी गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या १० फेक न्यूज
पडघम - माध्यमनामा
टीम अक्षरनामा
  • करोना व्हायरसविषयीच्या फेक न्यूजची छायाचित्रे
  • Mon , 30 March 2020
  • पडघम माध्यमनामा करोना विषाणू Corona virus कोविड-१९ Covid-19 करोना Corona करोना व्हायरस Coronavirus

करोना व्हायरसविषयीच्या रोज देशातल्या आणि जगातल्या वेगवेगळ्या बातम्यांनी काहीसं भीतीदायक वातावरण निर्माण केलं आहे. मानवजातीचे काही स्वयंघोषित रक्षणकर्ते तर रात्रंदिवस कामाला लागले आहेत. त्यांच्या सुपिक मेंदूतून अनेक एपिक कल्पना बाहेर पडत आहेत. फरक एवढाच आहे की, त्यातल्या बऱ्याचशा फेक न्यूज आहेत. व्हॉटसअॅप विद्यापीठ हा अशा फेक न्यूज प्रसाराचा मोठा अड्डा आहे. त्याचबरोबर फेसबुक, ट्विटरवरही या फेक न्यूज मोठ्या प्रमाणावर पसरवल्या जात आहेत. त्यातील काहींचा भांडफोड इंग्रजी वर्तमानपत्रे, पोर्टल्स यांनी केला. ‘अल्ट न्यूज’ हे इंग्रजी पोर्टल तर फेक न्यूजना एक्सपोज करण्याचेच काम करते.

गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या आणि त्यामुळेच त्यांचा भांडाफोड झालेल्या या १० फेक न्यूज

.............................................................................................................................................

१) इटलीमध्ये करोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या इतकी आहेत की, ते पुरण्यासाठी नातेवाईक, मित्र कुणीही यायला तयार नाही

हे छायाचित्र पूर्णपणे खोटं आहे. हे छायाचित्र इटलीतील नसून २०११ साली आलेल्या ‘Contagion’ या चित्रपटातील आहे. या चित्रपटाचा ऑफिशिअल ट्रेलर अजूनही यु-ट्युबवर उपलब्ध आहे. २ मिनिटे २९ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये २ मिनिटे २० सेकंदांनी हे छायाचित्र पाहायला मिळते.

त्याचबरोबर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘अल्ट न्यूज’ यांच्या पोर्टलवरही या फेक छायाचित्राबाबत जाणून घेता येईल.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ - https://timesofindia.indiatimes.com/times-fact-check/news/fake-alert-these-photos-have-nothing-to-do-with-coronavirus-in-italy/articleshow/74793151.cms

‘अल्ट न्यूज’ - https://www.altnews.in/old-unrelated-images-shared-as-mass-deaths-due-to-coronavirus/

.............................................................................................................................................

२) रिलायन्स जिओचे मोबाईलसाठी लाईफटाइम फ्री रिचार्ज फॉर 498

ही फेक न्यूज व्हॉटसअॅपवरून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी तिच्यावर विश्वास ठेवला आणि मॅसेजमध्ये दिलेल्या स्टेपनुसार मोबाईल रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला, पण कुणाचाही झाला नाही. सगळ्या स्टेप पूर्ण केल्या तरी पुन्हा पुन्हा तेच करायला सांगितलं जातं. चार-पाच प्रयत्नानंतर आपण फसवलो गेलोय याची संबंधितांना जाणीव होते. पण या फेक न्यूजचा उद्देश वेगळाच असतो. तो उद्देश तुमच्या मोबाईलमधील संवेदनशील, महत्त्वाची माहिती पळवणे. उदा. तुमचे बँक डिटेल्स, तुमची छायाचित्रे, व्हिडिओ.

पुढील व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याचा उलगडा होईलच. 

.............................................................................................................................................

३) इटली शहरातल्या एका चौकात पडलेले मृतदेह

हे छायाचित्र तर सोशल मीडिया, व्हॉटसअॅप यावर खूपच व्हायरल झालेले आहे. या छायाचित्रासोबत ‘इटलीची अवस्था करोनाने ही अशी केली आहे. तिथे मृत्युमुखी पडलेल्यांना उचलण्यासाठी माणसं मिळायला तयार नाहीत’ किंवा ‘इटलीची अवस्था, रस्त्यावर मरून पडलेली माणसं, आपली अशी गत होऊ द्यायची नसेल तर घराबाहेर पडू नका’ वगैरे वगैरे मजकूर असतो. पण हे छायाचित्र इटलीतील नाही. काहींनी हे छायाचित्र चीनमधील असल्याचंही ठोकून दिलेलं आहे.

वस्तुस्थिती अशी आहे की, हे छायाचित्र ना इटलीतील आहे ना चीनमधील. हे छायाचित्र जर्मनीतील फ्रँकफर्ट या शहरातलं आहे. २४ मार्च २०१४ रोजी या शहरात नाझींच्या छळछावण्यामुळे बळी गेलेल्यांच्या स्मृतीसाठी लोकांनी मृतासारखं जमीन झोपून सहवेदना व्यक्त केली होती. त्या प्रसंगाचं हे छायाचित्र आहे. हा प्रसंग एका कलामहोत्सवाचा भाग होता. रॉयटर या जागतिक वृत्तसंस्थेच्या पोर्टलवर ‘स्टॉक फोटोज’ किंवा अर्काइव्हज विभागात हे छायाचित्र March 24, 2014 या तारखेसह पाहायला मिळतं. 

हेच छायाचित्र दुसऱ्या दिवशी म्हणजे २५ मार्च २०१४ रोजी ‘हिंदुस्थान टाइम्स’मध्ये ‘Top shots of the day’ या शीर्षकाखाली छापून आले. त्याखाली मजकूर आहे - "People lay down in a pedestrian zone as part of an art project in remembrance of the 528 victims of the "Katzback" Nazi concentration camp, in Frankfurt. Reuters." 

https://www.hindustantimes.com/photos/india/march-24-top-shots-of-the-day/photo-2OVDh1bE3DeBENTD6Lp0UJ.html

याशिवाय पुढील पोर्टलवर या छायाचित्राविषयी अजून सविस्तर माहिती मिळेल.

https://www.boomlive.in/fake-news/corpses-strewn-on-chinas-streets-after-outbreak-of-coronavirus-a-factcheck-6730

याशिवाय 

https://www.altnews.in/old-unrelated-images-shared-as-mass-deaths-due-to-coronavirus/

https://newssense.in/2020/03/26/fact-check-no-mass-grave-of-coronavirus-victims-in-italy-but-is-a-scene-from-2007-science-fiction/

https://factcheck.afp.com/2014-photo-people-participating-art-project-frankfurt-germany

या पोर्टलवरही हे छायाचित्र कसं फेक आहे, याची माहिती आहे.

.............................................................................................................................................

४) डॉ. रमेश गुप्ता यांच्या ‘आधुनिक जन्तु विज्ञान’ या पाठ्यपुस्तकामध्ये करोना व्हायरसचा उल्लेख आहे

‘आधुनिक जन्तु विज्ञान’ या इयत्ता बारावीसाठी लिहिलेल्या हिंदी पाठ्यपुस्तकामध्ये करोना व्हायरसचा उल्लेख आणि त्यावरील उपचाराचा दावा करणारे हे छायाचित्र. या छायाचित्रासोबत हा आजार नवा नाही, या आजारावर औषध शोधले गेले आहे आणि aspirin, antihistamines and nasal spray या उपचारांनी बरा होतो, असे तीन दावे केले गेले होते.

‘अल्ट न्यूज’ या इंग्रजी पोर्टलने पुराव्यानिशी दाखवून दिले आहे की, हे तिन्ही दावे खोटे आहेत. सर्वांत महत्त्वाची गोष्ट अशी की, या पुस्तकात ‘कोरोना वाइरस’ असा स्पष्ट उल्लेख असल्यामुळे अनेकांची फसगत होते. या पुस्तकातला या शब्दप्रयोगाचा आणि सध्याच्या करोना व्हायरसचा काही संबंध नाही, याचाही खुलासा ‘अल्ट न्यूज’ने केला आहे.

https://www.altnews.in/no-dr-ramesh-guptas-zoology-book-does-not-mention-a-cure-for-novel-coronavirus/

.............................................................................................................................................

५) वेदान्त हॉस्पिटल समूहाचे चेअरमन व एमडी डॉ. नरेश त्रेहान यांनी राष्ट्रीय आणीबाणीची मागणी केलीय

या फेक न्यूजमधून फक्त खोटी माहितीच पसरवली गेली नाही तर एका डॉक्टरची बदनामीही केली गेली. अर्थात फेक न्यूज बनवणाऱ्यांना अशा गोष्टीची कसली तमा असणार. डॉ. नरेश त्रेहान हे वेदान्स हॉस्पिटल समूहाचे चेअरमन व संचालक आहेत. याचा फायदा घेत अनेकांच्या व्हॉटसअॅपवर मॅसेज फिरू लागले की, डॉ. त्रेहान यांनी असं म्हटलं आहे, लवकरच देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी जाहीर होणार असून लोकांना दूध, किराणा, औषधे आणि पैसे यांचा साठा करावा. हाच मॅसेज थोड्या वेगळ्या शब्दांत फेसबुकवरही व्हायरल केला गेला. शेवटी वेदान्त हॉस्पिटलच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून डॉ. त्रेहान यांनी अशी कुठलीही विधानं केलेली नसून हे पूर्णपणे खोटं आहे, असा खुलासा करण्यात आला.

याबाबतची सविस्तर बातमी ‘वन इंडिया’ आणि ‘द क्विंट’ या दोन पोर्टलवर पुराव्यानिशी वाचायला मिळते.

https://www.oneindia.com/india/fake-no-india-is-not-declaring-a-national-emergency-and-you-dont-need-to-stock-up-3054225.html

https://www.thequint.com/news/webqoof/coronavirus-did-naresh-trehan-say-india-going-to-declare-emergency-fact-check

.............................................................................................................................................

६) १३४ करोना पेशंटवर सात उपचार करणारे डॉक्टर दाम्पत्यही आठव्या दिवशी बाधित. आपण वाचणार नाही हे जाणवताच त्यांनी एकमेकांना किस केले

हे छायाचित्र खरे आहे. पण या छायाचित्रोसाबत “इटली के यह दोनों पती-पत्नी डॉ. है और दोनों ने दिन रात लग कर १३४ मरोजो को बचाया. लेकिन खुद ८ वे दिन कोरोना वायरस से बीमार हो गए अैर अलग अलग कमरे में शिफ्ट कर दिए गए. जब दोनों मिया बीवी डाक्टर को लगा कि हम बच नहीं पाएंगे दोनों हॉस्पिटल के लांज में, खड़े होकर मुहब्बत भरी नज़रो से एक” असा मजकूर देऊन हे छायाचित्र व्हायरल केले गेले.

हे छायाचित्र दोन डॉक्टरांचे आहे, त्यांना करोना झालेला आहे, हे सगळे खोटे आहे. मग हे छायाचित्र कुठले आहे? त्याचा खुलासा करणारं एक ट्विट - A couple kiss at the Barcelona airport, Spain, Thursday, March 12, 2020. President Donald Trump announces strict rules on restricting travel from much of Europe to begin this weekend.

‘रिपब्लिक वर्ल्ड’ या पोर्टलवर या फेक न्यूजचा आणि तिच्या माध्यमातून सोशल मीडियावर केल्या गेलेल्या दाव्यांचा सविस्तर भांडाफोड केलेला आहे.

https://www.republicworld.com/fact-check/coronavirus/fact-check-did-an-italian-doctor-couple-die-of-coronavirus.html

.............................................................................................................................................

७) इस्त्रायली संशोधकांनी करोना व्हायरसविषयी औषध शोधून काढले आहे, पण ते अजून जाहीर केेलेले नाही.

चीनमधील वुहान प्रांतात करोना व्हायरसने हलकल्लोळ माजवला असून लोक मृत्युमुखी पडत आहेत. हा आजार अतिशय झपाट्याने पसरतो. त्यावर कुठलेही औषध नाही, असा बातम्यांचा गदारोळ जानेवारी २०२०च्या मध्यापासून जगभर उमटू लागला. फेब्रुवारीपर्यंत उलटसुलट बातम्यांनी जगभरची वर्तमानपत्रे भरून वाहू लागली. त्या काळात इस्त्रायलमधल्या एका वर्तमानपत्राने ही चुकीची माहिती देणारी बातमी केली.

पुढील वेबसाईटवर या सगळ्या प्रकरणाचा सविस्तर खुलासा वाचायला मिळतो.

https://africacheck.org/fbcheck/israeli-scientists-close-to-developing-covid-19-vaccine-but-no-announcement-or-release-yet/

.............................................................................................................................................

८) करोनाच्या विषाणूचे आयुष्य फक्त बारा तासांचे असते

करोना व्हायरसविषयी अनेक अफवा सोशल मीडियावरून पसरवल्या जात आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २२ मार्च रोजी ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याचे आवाहन भारतीयांना केले, तेव्हा मोदींनी हा दिवस का निवडला, १२ तासांचा कर्फ्यु का, याचं समर्थन करण्यासाठी त्यांच्या आयटी सेलवाल्यांनी, स्वयंघोषित स्तुतिपाठकांनी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर मोहीमच उघडली होती. ही फेक न्यूज त्यापैकीच आहे.

हे पूर्णपणे खोटं असल्याचं ‘दन्यूजमिनिट’ या न्यूज पोर्टलने २१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी दाखवून दिलं.

https://www.thenewsminute.com/article/fact-check-no-life-coronavirus-not-12-hours-120813

‘बूमलाइव्ह’ या पोर्टलने २१ मार्च रोजी संध्याकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनिटांनीच दाखवून दिलं आहे.

https://www.boomlive.in/fact-file/message-claiming-coronavirus-lives-on-a-surface-for-12-hours-is-misleading-7310

’न्यू यॉर्कमधील ‘इकॉनॉमिक टाइम्स’ या प्रसिद्ध वर्तमानपत्राने २६ मार्च २०२० रोजी सविस्तर बातमी प्रकाशित करून हा दावा खोडून काढला आहे.

https://economictimes.indiatimes.com/magazines/panache/how-long-can-coronavirus-live-on-surfaces-or-in-the-air/articleshow/74690737.cms?from=mdr

.............................................................................................................................................

९) लोकांनी बाहेर फिरू नये यासाठी रशियाने रस्त्यांवर ५०० सिंह सोडले

या छायाचित्रासोबत 'Breaking News : Russia unleashed more than 500 lions on its streets to ensure that people are staying indoors during this pandemic outbreak. Vladimir Putin released around 500 lions to make people stay indoors.” असा इंग्रजी मजकूर जोडला गेला. शिवाय छायाचित्राच्या डावीकडे वरच्या कोपऱ्यात ‘Live’ आणि ‘BREAKING NEWS’ अशी मखलाशी केली गेली. त्यामुळे ही बातमी कुठल्यातरी इंग्रजी न्यूज चॅनेलने चालवली आसल्याचा भास निर्माण होतो. मात्र बारकाईने छायाचित्र पाहिले तर लक्षात येते की, या छायाचित्रावर कुठल्याही न्यूज चॅनेलचे नाव नाही, तर एका वेबसाईटचे नाव आहे.

हे छायाचित्र रशियातले नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी असं काहीही केलेलं नाही. ही बातमी कुठल्याही न्यूज चॅनेलने चालवलेली नाही. हे छायाचित्र आफ्रिकेतल्या जोहान्सबर्ग या शहरातल्या एका चौकातील आहे. साल आहे २०१६. ‘बूमलाइव्ह’ या पोर्टलने ही बातमी केली आहे.

https://www.boomlive.in/fake-news/putin-let-loose-lions-to-keep-russians-indoors-bizarre-claim-goes-viral-7320

.............................................................................................................................................

१०) इटलीतील शवपेट्यांचे छायाचित्र

आतापर्यंतच्या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात आले असेलच की, फेक न्यूजसाठी अतिशय प्रभावी, काहीशा प्रक्षोभक छायाचित्राची निवड केली जाते. १००० शब्दांपेक्षा एक छायाचित्र प्रभावी असते असं म्हणतात ते उगाच नाही. या फेक न्यूजमध्येही नेमका हाच प्रकार आहे. हे छायाचित्र आणि “In case you're still not convinced to stay home for you & ur beloved ones... Here's a picture from Italy!” मजकूर, यामुळे पटकन हे खरं आहे की खोटं याचा अंदाज येत नाही. शिवाय आधीच सरकारकडून घराबाहेर पडू नका, त्यामुळे तुम्हाला करोना होऊ शकतो, असं सांगितलं जात असल्याने लोकांच्या मनात बाहेर पडण्याविषयी भीती निर्माण झाली होती. नेमका त्याचाच फायदा उठवत चुकीच्या छायाचित्रासोबत चुकीचा मजकूर जोडून तो व्हायरल केला गेला.

हे छायाचित्र खरं आहे, पण ते करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचं नाही. हे छायाचित्र आहे २०१३मधले. इटालियन सागरी हद्दीत जहाज बुडून त्यात अनेक आफ्रिकन स्थलांतरित बुडून मृत्युमुखी पडले. त्यांच्या या शवपेट्या आहेत. ‘बूमलाइव्ह’ या पोर्टलने या फेक न्यूजची बातमी केली आहे.

https://www.boomlive.in/coronavirus-outbreak/dated-photo-showing-rows-of-coffins-shared-as-coronavirus-hit-italy-7306

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......