करोनापेक्षा त्याविषयीच्या अफवा, बाजारगप्पा आणि खोट्यानाट्या बातम्या, हीच खरी समस्या आहे
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 25 March 2020
  • पडघम देशकारण करोना विषाणू Corona virus करोना Corona करोना व्हायरस Coronavirus फेक न्यूज Fake News

भावा-बहिणींनो, आत्या-मावशींनो, काका-काकूंनो, मित्रांनो-

करोनाविषयी जे काही फॉरवर्ड्स तुम्हाला येत आहेत, ते तुम्ही please, please, please इतरांना फॉरवर्ड करू नका. तुमचा हेतू चांगला असला, तरी ते फॉरवर्ड्स fake असू शकतात. तुम्ही पाठवलेल्या फॉरवर्ड्समुळे लोकांमध्ये नाहक घबराट निर्माण होऊ शकते. कुठल्याही भागात करोनाचा संशयित किंवा रुग्ण सापडला, तरी त्यात घाबरण्यासारखं काही नाही. करोना रुग्ण तपासणीची सुविधा फक्त सरकारी दवाखान्यांमध्ये आहे. तिथे ज्यांची तपासणी पॉझिटिव्ह येते, त्यांना घरी पाठवले जात नाही. गेल्या महिनाभरात जे विदेश प्रवास करून आलेत, त्यांच्यावर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. त्यातील बहुतेकांची तपासणी केलेली आहे. त्यातील ज्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत, त्यांनाही सुरक्षेचा उपाय म्हणून काही दिवस घराबाहेर फिरण्यास बंदी घातलेली आहे. तसे पोलिसांनी त्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आणि शेजाऱ्यांनाही निक्षून सांगितलेले आहे.

लक्षात घ्या, करोना हा आजार शिंकण्या-खोकल्यातून जे थेंब बाहेर पडतात त्यातूनच पसरतो. हा आजार असलेल्या व्यक्तीच्या शिंकण्या-खोकल्यातून उडालेले थेंब आजूबाजूला पसरू शकतात. त्यांना स्पर्श केल्यास ते आपल्याला चिकटू शकतात. त्यामुळे सॅनिटायझरने वारंवार हात धुणे, सातत्याने खोकणाऱ्या-शिंकणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात न राहणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, हा या आजारांपासून आपलं संरक्षण करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

काळजी कशी घ्यायची यासाठी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एक व्हिडिओ बनवला आहे. तो पहावा -

त्याचबरोबर ज्यांना ताप, खोकला किंवा श्वसनास त्रास होतोय असे दिसेल अशा व्यक्तींना तातडीने वैद्यकीय उपचार घ्यायला सांगणे किंवा अशा व्यक्तीची माहिती पोलीस, सरकारची करोनाविषयीची हेल्पलाईन (०२०-२६१२७३९४) यांना कळवणे गरजेचे आहे.

या आजाराची सविस्तर माहिती देणारी पुस्तिका महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने तयार केली आहे. ती (https://arogya.maharashtra.gov.in/pdf/Booklet.pdf…) या लिंकवर जाऊन तुम्हाला पाहता येईल, डाऊनलोड करता येईल. दै. ‘हिंदू’ या वर्तमानपत्राने इंग्रजीमध्येही पुस्तिका बनवली आहे. तीही तुम्हाला (https://creatives.thehindu.com/covid_19_ebook.pdf…) या लिंकवर जाऊन वाटता येईल, डाऊनलोड करता येईल.

मुख्य म्हणजे करोनाची बाधा एका माणसाकडून थेट दुसऱ्या माणसाला होते. त्यामुळे एखाद्या भागात, एखाद्या इमारतीमध्ये एखादा करोनाचा रुग्ण आढळला म्हणून तो परिसर ‘करोनामय’ होत नाही. त्यामुळे कृपा करून तुम्ही पॅनिक होऊ नका आणि इतरांना पॅनिक करू नका.

कुठल्याही करोना रुग्णाची नावे, फोटो वा पत्ते जाहीर करू नका किंवा त्याच्या इमारतीची नावे, फोटो वा पत्ते जाहीर करू नका. असे केल्यास माहिती-तंत्रज्ञान कायद्याखाली तुमच्यावर पोलिसी कारवाई होऊ शकते. कारण असे करणे हा गुन्हा आहे.

आपल्या उत्साहामुळे लोकांचे जीव जाऊ शकतात, त्यांना मारहाण होऊ शकते किंवा त्या कुटुंबाला लोक विनाकारण वाळीत टाकू शकतात. कुणालाही हा आजार होणे, हा दुर्दैवी अपघात आहे. हा आजार झाल्यामुळे ती व्यक्ती गुन्हेगार किंवा टेररिस्ट किंवा सीरिअल किलर ठरत नाही, हे लक्षात घ्या.

आपल्या परिसरात किंवा आपल्या आजूबाजूला करोनाचा रुग्ण आढळून आला, तरी त्यात घाबरण्यासारखं काहीही नाही. हा आजार झालेली व्यक्ती योग्य उपचारांनी बरी होते. भारतात ज्यांना सुरुवातीला करोनाची बाधा झाल्याचे सिद्ध झाले होते, त्यातील काही लोक पूर्णपणे बरे झालेले आहेत. त्यांपैकीच एक असलेले आग्ऱ्यातील अमित कपूर. ते काय म्हणतात ते ऐका -

आपल्या मोबाईलच्या व्हॉटसअ‍ॅपवर करोनाविषयी जी forwarded माहिती (मजकूर किंवा व्हिडिओ दोन्ही प्रकारात) येते आहे, त्यातली बहुतांशी माहिती ही Fake असल्याचे सिद्ध होते आहे. काही रिकामटेकडे लोक हा उद्योग करत आहेत, त्यांना फशी पडू नका.

खबरदारीचा उपाय म्हणून करोनाविषयीची कुठलीही माहिती फॉरवर्ड करू नका.
कुणाही करोना रुग्णाची नावे वा पत्ते फॉरवर्ड करू नका.
व्हॉटसअ‍ॅपवरून येणाऱ्या कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
त्या अफवा इतर व्हॉटसअ‍ॅप ग्रूपवर पाठवू नका.
आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, अफवांना बळी पडू नका.

करोना हा योग्य उपचारांनी बरा होणारा आजार आहे, हे लक्षात घ्या.
करोनापेक्षा त्या विषयीच्या अफवा, बाजारगप्पा आणि खोट्यानाट्या किंवा अनावश्यक बातम्या, हीच खरी समस्या आहे, हे लक्षात घ्या.
त्यामुळे पॅनिक होऊ नका आणि इतरांना पॅनिक करू नका.

आणीबाणीच्या, संकटाच्या काळातच माणसाची, त्याच्या माणूसपणाची खरी पारख होत असते. हाच काळ माणसांच्या कसोटीचा खरा काळ असतो.
त्यामुळे अफवा पसरवू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि त्यांना बळी पडू नका.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dilip Chirmuley

Wed , 25 March 2020

Excellent. You have correctly identified the problem of misinformation. Graduates and students of the Whatsapp university are responsible for spreading incorrect info such as the one about Hantavirus. Tere is no reason to panic because the route through which this virus spreads is different to the Corona virus. Lock downs of cities and towns is one way of stopping the spread and all governments are doing it.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......