अजूनकाही
करोनाच्या महाराष्ट्रातील आणि भारताच्या निरनिराळ्या राज्यातील रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याविषयी लोकांमध्ये काहीशी भीती निर्माण होत आहे. सोशल मीडिया आणि खासकरून व्हॉटसअॅपवर चुकीची माहिती पसरवली जात आहे. ती वाचूनही लोकांमध्ये काही प्रमाणात भीती निर्माण होत आहे. कांद्यापासून गोमुत्रापर्यंत उपाय सुचवले जात आहेत, मात्र असे उपाय सुचवणारे लोक डॉक्टर नाहीत, हे लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे करोना व्हायरसपासून आपला बचाव करायचा असेल तर पहिली गोष्ट म्हणजे अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवा पसरवू नका आणि अफवांना बळी पडू नका.
करोना व्हायरस नेमका काय आहे? हा व्हायरस कशामुळे होतो? त्याची लक्षणे कोणती? त्याच्यापासून बचाव करण्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली माहिती पुढील व्हिडिओंच्या माध्यमातून आपल्याला जाणून घेता येईल.
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांचा हा सर्वाधिक पाहिला जात असलेला, अतिशय महत्त्वाचा आणि करोनाबद्दल जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा व्हिडिओ आहे. यामध्ये त्यांनी कोरोना व्हायरस नक्की कसा आला? कोरोनाबद्दल भीती का आहे? हा आजार बरा होतो का? हा आजार कसा पसरतो? या आजारापासून स्वत:ची काळजी कशी घ्यायची, याची माहिती अतिशय सोप्या भाषेत सांगितली आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास ५० हजार लोकांनी पाहिला आहे.
पुण्याच्या प्रसिद्ध बी. जे. मेडिकल कॉलेजचे कार्यकारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी या व्हिडिओमध्ये करोनाची भीती का बाळगायची नाही आणि त्याचबरोबर काय काळजी घ्यायची, याची सविस्तर माहिती दिली आहे. ‘करोना व्हायरस होऊ नये म्हणून काय कराल?’\!what should do to avoid Corona virus?’ या नावाने हा व्हिडिओ उपलब्ध आहे. ५ मार्च २०२० रोजी हा व्हिडिओ यू-ट्युवर प्रकाशित झाला असून तो आतापर्यंत १२ हजार पाचशे जणांनी पाहिला आहे.
श्वसनरोगतज्त्र डॉ. अल्पा दलाल यांनी करोना व्हायरसच्या संसर्गापासून आपला बचाव करण्यासाठी काय करायला हवं, याविषयी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, वेळोवेळी हात स्वच्छ धुणे हा उपाय या आजाराबाबतची सर्वांत गरजेची आणि महत्त्वाची कृती आहे. लिक्विड सोपने कमीत कमी २० सेकंट हात धुणे, न घाबरणे हाही आपली प्रतिकारशक्ती कायम ठेवण्याचा उत्तम मार्ग आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर रानडे यांनी चिकनमुळे करोना होतो का, याविषयी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलं आहे. त्यांनी असंही सांगितलं आहे की, चीनमध्येही हा आजार पक्ष्यांना किंवा कोंबड्यांना झाल्याचं आत्तापर्यंतच्या माहितीतून समोर आलेलं नाही. त्यामुळे चिकन, अंडी यांच्यापासून कसलाही धोका नाही.
...............................................................................................................................................................
हेही पाहा, वाचा
साथीचे आजार आणि जागतिकीकरण यांचा संबंध आता अधिक गुंतागुंतीचा बनला आहे!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4103
करोनाचा तात्पुरता ‘साईड इफेक्ट’ : पर्यावरणपूरक जीवनशैली
https://www.aksharnama.com/client/article_detail/4100
करोना विषाणूमागे षडयंत्र असणार आणि या संकटाला कोणीतरी जबाबदार असणार, ही जनभावना आहे!
https://www.aksharnama.com/client/article_detail/4099
फक्त ‘साथीच्या रोगाने येणारे मरण’ आपल्याला एकत्रित आणू शकते?
https://www.aksharnama.com/client/article_detail/4107
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment