आजही ‘ती’ पुरुषप्रधान संस्कृती आणि दलित यामुळे दुहेरी घाव सोसतेच आहे. आजही ‘तिच्या’कडे उपभोगाची एक वस्तू म्हणूनच पाहिले जाते.
पडघम - महिला दिन विशेष
अंजली प्रवीण
  • नांगेलीची इंटरनेटवर उपलब्ध असलेली चित्रे
  • Sat , 07 March 2020
  • पडघम महिला दिन विशेष जागतिक महिला दिन International Women's Day मुलाकरम Mulakaram स्तनाचा कर The Breast Tax नांगेली Nangeli भौरी Bhouri दलित वूमन Dalit Women दलित वूमन फाइट Dalit Women Fight

३०० वर्षांपूर्वी केरळ प्रांतात त्रावणकोर राजाचे राज्य होते. या काळात कट्टर स्वरूपाचा जातीवाद होता. दलितांसाठी कठोर कायदे व नियम होते. यातीलच एक म्हणजे ‘मुलाकरम’ (The Breast Tax). येथील प्रदेशाला ‘मुलाच्छिपुरम’ (म्हणजे स्त्रियांचे स्तन असणारा प्रदेश) असे म्हणत. उच्च जातीतील स्त्रिया पूर्ण कपडे घालू शकत होत्या, पण खालच्या जातीतील दलित स्त्रियांना स्तन उघडे ठेवण्याचा आदेश होता. जर त्यांनी स्तनावर कापड घेतले तर त्यांना ‘मुलाकरम’ म्हणजे कर द्यावा लागे. हा मुलाकरम स्तनांचा आकार आणि वजन यावरून ठरवला जाई. राजा कर ठरवण्यासाठी आणि जमा करण्यासाठी प्रत्येक गावात एक व्यक्ती नेमून देई. तो दर महिन्याला आदेशानुसार मुलाकरम गोळा करत असे.

या आदेशामुळे स्त्रियांना रोज अत्याचारी नजरेने होणारे बलात्कार सहन करावे लागत होते. कोणी त्याविरुद्ध जाऊन स्तन झाकले तर मुलाकरम द्यावा लागे किंवा कठोर शिक्षा मिळत असे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे मुलाकरम भरणेही शक्य नसे. आणि राजाविरुद्ध जाण्याचे धैर्यही कोणामध्ये नसे. कारण कोणाला बोलण्याचे स्वातंत्र्यही तेव्हा नव्हते.

या मुलाकरमविरुद्ध विद्रोह करणारी पहिली स्त्री म्हणजे ‘नांगेली’. तिच्या मते जीवन जगण्याचे दोनच मार्ग असतात. एक, म्हणजे जे होत आहे, ते आयुष्यभर सहन करत राहायचे आणि दोन, जो अन्याय होत आहे तो सुधारण्यासाठी स्वतः जबाबदारी घेऊन संघर्ष करायचा. म्हणून तिने स्वतः मुलाकरम न देता छाती कपड्याने झाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला तिचा पती चीरुकंदनचाही पाठिंबा होता. या निर्णयामुळे आपल्याला कठोर शिक्षा होईल, हे माहीत असूनही त्यांनी आपल्या निर्णयावर ठाम राहायचे ठरवले.

दुसऱ्याच दिवशी आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना महिन्याभरात मुलाकरम तयार ठेवण्याची ताकीद देण्यात आली. नांगेलीला माफीदेखील मागायला सांगितली गेली, पण तिने ना माफी मागितली, ना माघार घेतली. एक महिन्यानंतर मुलाकरम गोळा करणारा राजाचा माणूस आला, नांगेलीने झोपडीच्या आत जाऊन गरम विळ्याने स्वतःचे दोन्ही स्तन कापून केळीच्या पानातून त्या अधिकाऱ्याला दिले. स्तनच नसतील तर कर तरी कोणत्या गोष्टीचा असेल?

थोड्या वेळाने होणाऱ्या रक्तप्रवाहाने नांगेलीचा मृत्यू झाला. पण मरताना ती संपूर्ण समाजाला जागं करून गेली. कठोर रूढी-परंपरा आणि नियम यांच्याविरुद्ध तिने आवाज उठवला. तिने एक आवाज उठवला, पण त्यानंतर अनेक आवाज सोबतीला आले.

जेव्हा नांगेलीची चिता जळत असते, तेव्हा चीरकंदनला नांगेलीला दिलेले वचन आठवते. ते म्हणजे ‘तो प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक वेळी सोबत असणार. तिला कायम साथ देणार’. नांगेलीवर असणाऱ्या प्रेमापोटी तोही तिच्या चितेवर उडी घेतो. पुरुष सती जाण्याचे हे पहिले उदाहरण होते!

नांगेलीने उठवलेल्या आवाजानंतर एक आंदोलन उभे राहिले आणि राजाला त्याचे नियम बदलायला लागले. या संघर्षानंतरही दलितांवर होणारे अन्याय सुरूच होते, म्हणून काही लोकांनी ख्रिश्नन धर्मात धर्मांतर केले. आजही नांगेलीच्या कुटुंबियांचे वंशज आहेत. त्यांनीही कालांतराने ख्रिश्चन धर्मात धर्मांतर केले. हल्लीच अमोल पगारे यांनी नांगेलीच्या शौर्यकथेवर  ‘Mulakaram –The Breast Tax’ हा अप्रतिम लघुपट बनवला आहे.

२०१६ मध्ये ‘भौरी’ या नावाचा एक चित्रपट आला होता. एका गावात नवविवाहित स्त्रीला पहिल्यांदा तिथल्या ठाकूरसोबत रात्र काढावी लागते, अशी पद्धत होती. तेथील काही उच्चवर्णीय डॉक्टर, दुकानदार, खाणीचे मालक वगैरे गावातील दलित स्त्रियांकडे उपभोगाची गोष्ट म्हणून बघत असत. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी दलित स्त्रियांना दररोज शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागते. सर्व गाव यामुळे पीडित असते. त्या अत्याचाराविरुद्ध भौरी व तिचा पती धनुआ आवाज उठवतात. त्यात त्यांचा भयावह पद्धतीने अंत होतो. या चित्रपटातील भौरी काल्पनिक होती, पण त्यात दाखवलेल्या अत्याचाराच्या बातम्या आजही वर्तमानपत्रांत अधूनमधून छापून येतात.  

अशा अनेक विरांगना वेगवेगळ्या रूपात आपल्याकडे आहेत. जसा जमिनीखाली दडलेला लाव्हा एक दिवस जामीन फोडून उसळी मारतो, तशी पिढ्यानपिढ्या अन्याय सहन करत राहणारी व्यक्तीही आपला आविष्कार दाखवतेच. कधी ती बालपणापासूनच लैंगिक अत्याचाराला बळी पडलेली फूलनदेवीच्या रूपात दिसते, तर कधी राजस्थानमधील भवरी देवीच्या रूपाने, (भवरी देवी सामाजिक प्रश्नावर काम करत होती, म्हणून तिच्यावर गँगरेप होऊन त्यात तिचा दुर्दैवी अंत होतो.), तर कधी बुंदेलखंडमधील गुलाब गँगच्या स्वरूपात.

 ‘#DalitWomenFight’ (२०१८) हा All India Dalit Mahil Adhikar Manch यांनी बनवलेला लघुपट आहे. यात हरियानात जातीवर आधारित होणारे लैंगिक अत्याचार-बलात्कार याबद्दल मुलाखती आहेत. ज्यात त्यांच्यावर गँगरेप होऊन हत्या झाली आणि त्यांना अजूनही न्यायालयात न्याय मिळालेला नाही. एकतर तक्रारच दाखल झाली नाही किंवा आरोपींना अटकच झाली नाही किंवा पुराव्याअभावी निर्दोष सुटका झाली.

Endcasteनेही २०१२ मध्ये ‘Dalit Women’ (We are not untouchable – End Caste Discrimination now) हा लघुपट बनवला आहे. त्यात दलित स्त्रियांवर त्या दलित आहेत आणि स्त्री आहेत म्हणून होणाऱ्या दुहेरी शोषणाचा प्रश्न मांडला आहे. जबरदस्तीने वेश्याव्यवसायात ढकलणे, देवदासी बनवणे, मजुरी कामासोबतच लैंगिक अत्याचार करत राहणे, यांचाही त्यात समावेश आहे.

NCRBच्या अहवालानुसार भारतात दररोज चार दलित स्त्रियांवर बलात्कार होतो. यातील सर्वाधिक बलात्कार उच्चवर्णीयांकडून झालेले दिसून येतात.

राजे गेले, भारताला स्वातंत्र्य मिळाले. समानतेचा मूलभूत अधिकारही मिळाला. पण दलितांवर होणारे अत्याचार आजही दिसून येतात. न्यायालयात न्याय मागायला गेलो तर उन्नाव पीडितेसारखी भर रस्त्यात जाळून हत्या होते. कधी कठुआ, कधी बदुआ गँगरेप आणि हत्यासारख्या केसेस समोर येतात, ज्यात पोलीस, राज्यकर्तेच शोषण करणारे निघतात. आजही अनेक ठिकाणी कामाच्या ठिकाणी मजूर स्त्रीचे होणारे लैंगिक शोषण भयानक प्रमाणावर आहे. खाप पंचायतीकडून होणारे शोषणही सुरूच आहे. दलित आधीच असह्य अत्याचाराचे बळी असतात. त्यात दलित स्त्री म्हणून होणाऱ्या दुहेरी शोषणाचा काच भोगावा लागतो. आपला देश बदलला असे म्हटले जाते, त्याच्या प्रगतीची कीर्ती गायली जाते, पण कट्टर जात-धर्माचे बुरसटलेले विचार मात्र बदललेले नाहीत.

काळ बदलला असला तरी आजही धर्म व जात पातळीवर स्त्रियांचा उपयोग प्यादा म्हणूनच होत राहिला आहे. आजही ती पुरुषप्रधान संस्कृती आणि दलित यामुळे दुहेरी घाव सोसतेच आहे. आजही तिच्याकडे उपभोगाची एक वस्तू म्हणूनच पाहिले जाते.

.............................................................................................................................................

लेखिका अंजली प्रवीण नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दिल्ली यांच्या नागपूर सेन्ट्रल जेलमध्ये सुरू असलेल्या उपक्रमात ‘सोशल वर्कर फेलो’ म्हणून कार्यरत आहेत. 

amkar.anju@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......