मोदी सरकार पुरस्कृत नवे शब्द किंवा नवा शब्दकोश
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 02 March 2020
  • पडघम देशकारण मोदी सरकार नमोरुग्ण मोदी फोबिया

मोदी सरकार केंद्रात सत्तेत आल्यापासून हे सरकार, त्याचे मंत्री, समर्थक, पाठिराखे आणि विरोधक यांनी या सरकारचा नवा शब्दकोश घडवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मोदी सरकारची अजून एक नवी ओळख जगाला होत आहे.

संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर महाराष्ट्र सरकारने ‘पदनामकोश’ तयार केला होता. तो नव्या शब्दांच्या निर्मितीचा तसा चांगला प्रयत्न होता. त्यातील काही शब्द आता समाजमान्य झाले आहेत. 

अशाच एक शब्दकोश १९७०मध्ये केंद्रीय माहिती व सूचना प्रसारण मंत्रालयाने प्रकाशित केला होता. त्या शब्दकोशाचे नाव होते - ‘आकाशवाणी शब्दकोश’. या कोशात आकाशवाणीत आधीच्या १० वर्षांपासून वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा समावेश होता. ‘इंग्रजी-हिंदी’मध्ये असलेला हा शब्दकोश अतिशय उपयुक्त, मोलाचा आणि महत्त्वाचा आहे.

या चालीवर मोदी सरकारनेही आता नवा शब्दकोश बनवावा. आपल्या माहिती व सूचना प्रसारण मंत्रालयातर्फे ‘मोदी सरकार पुरस्कृत नवे शब्द किंवा नवा शब्दकोश’ हा कोश बनवायला सुरुवात करावी. या कोशात ज्या शब्दांचा समावेश होऊ शकेल, असे काही शब्द खाली दिले आहेत. याशिवाय यात इतरही अनेक शब्दांचा समावेश करता येईल. त्यासाठी मोदी सरकारमधले मंत्री, या सरकारचे समर्थक, या सरकारने विकत घेतलेले पत्रकार, या सरकारला स्वत:हून विकले गेलेले कलाकार, बुद्धिजीवी यांची मदत घेता येईल. त्यातल्या त्यात जे फुरोगामी सोयीचे वाटतील त्यांचाही समावेश करता येऊ शकतो.

‘अक्षरनामा’च्या वाचकांनाही यात आपापल्या परीने शब्दांची भर घालता येईल…

.............................................................................................................................................

१) पुरोगामी दहशतवाद : आपली जे उपेक्षा करतात, त्यांना तुच्छ लेखण्यासाठी वापरले जाणारे विशेषण.

२) गाय : हिंदू संस्कृतीनुसार जिच्या पोटात एकेकाळी ३३ कोटी देव राहत होते, आता मात्र केवळ मृत्यू राहतो असा प्राणी.

३) कागदी क्रांती : पुरस्कार परत करून सरकारच्या ध्येयधोरणांचा निषेध करणाऱ्यांसाठी वापरला जाणारा मानहानीकारक शब्द.

४) नमोरुग्ण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी ‘ब्र’ ऐकून न घेणाऱ्यांसाठी वापरले जाणारे प्रेमाचे संबोधन.

५) अॅवार्डवापसी गँग : ज्यांच्या सविनय विरोधावर प्रतिवाद करता येत नाही, अशांना तुच्छ लेखण्यासाठी वापरला जाणारा सरकारी शब्द.

६) जहाल भाजपविरोधक : आपल्याला विरोध करणाऱ्यांविषयी केंद्र सरकारने दिलेली पदवी.

७) पाकिस्तान : असे ठिकाण जिथे गोमांस खाणाऱ्यांना, सरकारविरोधात बोलणाऱ्यांना पाठवण्याची सोय केली जाते.

८) मोदी फोबिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सतत बोलणाऱ्यांच्या लक्षणांचे गुणवर्णन.

९) मोदी टोडीज : फुरफुरणाऱ्या, खरारा करणाऱ्या लोकांसाठी वापरला जाणारा शब्द.

१०) अच्छे दिन : असे दिवस ज्याचे स्वप्न दाखवत सर्वसामान्यांना भिकेला लावले जाते.

११) पुरस्कार वापसी : भाजपच्या ‘घरवापशी’च्या विरोधातली चळवळ.

१२) अपघात : जाणीवपूर्वक केलेल्या खूनासाठी वापरला जाणारा सरकारी शब्द.

१३) डिजिटल इंडिया : ज्यांच्याकडे स्वस्त मांस विकत घेण्यासाठी पैसे नाहीत, ज्यांना डाळी घेणे परवडत नाही, त्यांना देशोधडीला लावण्याची केंद्र सरकारची कल्पक योजना.

१४) स्मार्ट सिटी : जी शहरे गलिच्छ आहेत, त्यांचे स्मार्ट वर्णन करणारे सरकारी विशेषण.

१५) मेक इन इंडिया : अशी योजना ज्याचा फक्त परदेशात गेल्यावर उल्लेख करायचा असतो आणि देशात आल्यावर तिला खीळ बसेल असे वर्तन करायचे असते.

१६) शाई : जिचा वापर एकेकाळी लिहिण्यासाठी केला जात होता, आता इतरांचे तोंड रंगवण्यासाठी केला जातो.

१७) गो मांस : जे जवळ बाळगले की, मुत्यूची वर्षानुवर्षे वाट पाहात तिष्ठावे लागत नाही.

१८) आरक्षण : असा चेंडू जो सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनर्विचारासाठी आणि भाजप सरकारने मतांसाठी टोलवायचा.

१९) फॅसिझम : भाजप सरकारच्या कारवायांचे मोजमाप करण्यासाठीचे एक फुरोगामी मापक.

२०) सूट-बूट की सरकार : असा शब्द ज्याचा सतत वापर केला की, देशाचा पंतप्रधान ते कपडे घालणेच जवळपास बंद करतो.

२१) हिंदू पाकिस्तान : असा देश जिथे बहुसंख्याक हिंदू अल्पसंख्याक मुस्लिमांना टार्गेट करतात.

२२) सबका साथ सबका विकास : निवडक लोकांच्या निवडक हिताच्या योजनांसाठी वापरला जाणारा वाक्प्रचार.

२३) अर्बन नक्षल (शहरी नक्षलवादी) : ज्यांचा विरोध सहन होत नाही आणि न्यायालयात सिद्धही करता येत नाही, अशा व्यक्तींना ‘अर्बन नक्षल’ ठरवून त्यांच्याविषयी समाज, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यांत संभ्रम निर्माण करण्याची मोदी सरकारची नवी शक्कल.

२४) देशहित किंवा राष्ट्रहित : ज्या विषयावर पंतप्रधान मोदींना टीका नको आणि चर्चाही नको असते, असे निर्णय ते ‘राष्ट्रहितासाठी’ घेतात. उदा. नोटबंदी, सीएए, एनआरसी, कलम ३७० रद्द करणे, जम्मू-काश्मीरचे तुकडे करणे

२५) तुकडे तुकडे गँग : आपण समाजात माजवत असलेल्या दुहीला नागडं करण्याचं काम जे लोक वा लोकांचे समूह करतात, त्यांच्यासाठी मोदी सरकारने चलनात आणलेली नवी शिवी. पण मोदी सरकारच्या म्हणण्यानुसार देशात या नावाचा कोणताही गट अस्तित्वात नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

२६) देशद्रोही : जो कुणी मोदी सरकारच्या विरोधात बोलतो किंवा या सरकारच्या धोरणांवर टीका करतो, त्याचा उद्धार करण्यासाठी वापरला जाणारा शब्द

२७) जमात-ए-पुरोगामी : जहाल, उघड किंवा छुप्या हिंदुत्ववाद्यांवर टीका केली की, त्यांच्याकडून मुद्देसूद प्रतिवाद होण्याऐवजी ज्या शब्दांत उद्धार केला जातो, तो हा शब्द. ‘जमात-ए-इस्लाम’ या नावाशी साधर्म्य असलेला हा शब्द जाणीवपूर्वकच वापरला जातो. त्यातून मुस्लिमांबाबतची द्वेषभावना आणि टीकाकारांना त्यांची जागा, अशा दोन्ही गोष्टी सूचित केल्या जातात.

२८) शुद्ध हलकटपणा : अतिशय सभ्य, संयत, मुद्देसूद भाषेत केलेल्या टीकेचा समाचार घेण्यासाठी वापरला जाणारा शब्दप्रयोग

२९) गोदी मीडिया : सत्ताधारी पक्षाच्या मांडीवर बसून देशहिताचा गमजा करणारी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि ऑनलाईन पोर्टल्स

३०) खांग्रेसी पत्रकार : मोदी सरकारवर टीका करणाऱ्या पत्रकार वा लेखकांसाठी मोदी सरकारच्या समर्थकांकडून, स्तुतिपाठकांकडून, चेल्याचमच्यांकडून वापरलं जाणारं एक विशेषण

३१) गोली मारो : ‘आम्हाला मत द्या आणि केजरीवालांना पाडा’, असं सांगण्याची दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची भाजपची घोषणा

३२) भारत-पाकिस्तान मॅच : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी मोदीभक्तांनी वापरलेले विशेषण

३३) द्विराष्ट्रवाद : भारताला ‘हिंदू पाकिस्तान’ करण्यासाठी भाजप, संघ, मोदी सरकार यांच्याकडून पुरस्कृत केली जाणारी वर्षांनुवर्षाची पण अलीकडे तेजीत आलेली संकल्पना

३४) करोना व्हायरस : असा आजार ज्याने थैमान माजवले चीनमध्ये, पण मीम्स, विनोद, किस्से, कथा, कहाण्या यांद्वारे चर्चा होतेय भारतात

३५) नेहरू : भारताचे पहिले पंतप्रधान, ज्यांचा विद्यमान पंतप्रधान सतत उद्धार करून आपली लबाडी, अपयश, वैगुण्य आणि द्वेषभावना झाकण्यासाठी वापर करतात.

३६) पटेल : नेहरूंवर कमी दाखवण्यासाठी मोदी, मोदीटोडीज ज्यांचं कौतुक करत असतात असा गुजरातमधला सच्चा काँग्रेसी नेता

३७) म. गांधी : भारतातला एकमेव असा महात्मा ज्याचा हिंदुत्ववादी सोयीनुसार वापर करतात. वेळ मारून न्यायची असेल तर स्तुती, वेळ साधायची असेल तर टीका आणि वेळ भटकायची असेल तर हेतूपुरस्सर टीका किंवा गांधींच्या खुन्याचं समर्थन वा जयजयकार.

३८) वैचारिक अस्पृश्यता : ‘पुरोगामी दहशतवाद’ या शब्दासारखा भाजपवादी, हिंदुत्ववादी स्वत:चे हितसंबंध धोक्यात येतात तेव्हा वापरतात त्यापैकी एक शब्द

३९) माँ-बेटे की सरकार : पंतप्रधानांनी युपीए-१व २साठी वापरलेला वाक्प्रचार

४०) अब की बार बाप-बेटे की सरकार : ‘अब की बार मोदी सरकार’ या भाजपच्या घोषणेचं महाराष्ट्रातल्या भाजपच्याच नेत्यांनी केलेलं नवं व्हर्जन, महाराष्ट्रातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या सरकारविषयी वापरलेला वाक्प्रचार

४१) हिटलरशाही : केंद्र सरकारच्या धोरणे रेटून नेण्याच्या प्रवृत्तीविषयी वापरला जाणारा शब्द, खासकरून हा शब्द वृत्तवाहिन्यांवरील डिबेट शोमध्ये वारंवार वापरला जातो.

४२) हिटलर : सुरुवातीला हा शब्द पंतप्रधान मोदींसाठी वापरला जायचा, आताशा तो गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी वापरला जातो.

४३) हुकूमशाही : विरोधकांकडून केंद्र सरकारच्या जुलमी धोरणांसाठी वारंवार वापरला जाणारा शब्द

४४) फ्री काश्मीर : अर्थ, भावार्थ समजून न घेताच ‘गोदी मीडिया’ने बदनाम केलेला एक शब्द

४५) संरक्षणप्रमुख : कामापेक्षा राजकीय वा वादग्रस्त विधाने करण्यासाठी नेमलेली व्यक्ती

४६) उपराष्ट्रपती : आडून आडून केंद्र सरकारचा धोरणांचा पुरस्कार करणारे लेख लिहिण्यासाठी नेमलेली व्यक्ती

४७) फेक न्यूज : मोदी सरकार आणि त्याचे समर्थक हे सत्य म्हणून पसरवतात, पण १०० टक्के खोटी असलेली बातमी

४८) ज्येष्ठ मार्गदर्शक : कुणालाही मार्गदर्शन करता येत नाही किंवा कुणी घेत नाही, अशी व्यक्ती. उदा. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी

४९) सर्जिकल स्ट्राईक  : आपल्या सामान्य कारवाईचे ‘बढ़ा-चढ़ा के’ वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा सरकारी शब्द

५०) एनआरसी : पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांग्लादेश या तीन देशांतील अल्पसंख्य मुस्लिमेतरांना भारताचे नागरिकत्व देणारा आणि भारतातील मुस्लिमांना असुरक्षित करणारा नवा धर्मद्वेषी कायदा

५१) प्रेस्टिट्यूट (Prestitute) : मोदी सरकारने Prostitute या शब्दापासून तयार केलेला एक हिणकस शब्द. आपल्यावर टीका करणाऱ्या पत्रकारांसाठी मोदी सरकारने हा शब्द तयार केला, तेव्हा यातून या सरकारची संस्कृती, इयत्ता कळते. कारण Prostituteचा अर्थ होतो a person, in particular a woman, who engages in sexual activity for payment. गेल्या सहा वर्षांत या सरकारने इतके पत्रकार, माध्यमसमूह विकत घेतले आहेत की, हा शब्द आता अशा पत्रकारांसाठीच वापरला जायला हवा. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 04 March 2020

४५ व्या क्रमांकात सैन्यप्रमुखांना का गोवण्यात आलंय? अशी किती वादग्रस्त विधानं त्यांनी केलीयेत? १३६ कोटी जनतेचं संरक्षण करणाऱ्या सैन्याच्या प्रमुखाचा अनमान होतो आहे. १३६ कोटी भारतीयांनी ही यादी का म्हणून स्वीकारायची?
-गामा पैलवान


Gamma Pailvan

Tue , 03 March 2020

१०० कोटी हिंदूंना पूजनीय असलेल्या गोमातेचा अपमान होतो आहे. ही यादी हिंदूंनी का म्हणून स्वीकारावी?
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......