टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अभिजित खांडेकर, संसद, पतंजली, सनातन, वेंकय्या नायडू आणि राहुल गांधी
  • Tue , 10 January 2017
  • विनोदनामा टपल्या राहुल गांधी Rahul Gandhi इंद्रजित खांडेकर Indrajit Khandekar संसद Parliament पतंजली Patanjali सनातन संस्था Sanatan Sanstha वेंकय्या नायडू Venkaiah Naidu

१. मूल्याधारित शिक्षणातून विद्यार्थ्यांना ‘देव निर्माता आहे’ हे शिकवण्याचा प्रकार संविधानाच्या तरतुदीचे उल्लंघन करणारा ठरतो काय, अशी विचारणा पंतप्रधान कार्यालयाने मनुष्यबळ विकास खात्याला केली आहे. सेवाग्रामच्या महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेतील न्यायवैद्यक औषध केंद्राचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी याविषयी सविस्तर अहवाल सादर करून माहितीच्या अधिकाराअंतर्गत थेट पंतप्रधान कार्यालयास विचारणा केली होती.

यावर विद्यमान मनुष्यबळ विकास खात्याकडून अपेक्षित दिलगिरी येणेप्रमाणे : साक्षात पंतप्रधान महोदय भूतलावर असताना सर्व गोष्टींचा निर्माता परमेश्वर आहे, असे सांगण्याची अक्षम्य आगळीक काही शाळांमध्ये सुरू आहे. त्याची गंभीरपणे दखल घेऊन ताबडतोब योग्य ती दुरुस्ती करून घेतली जाईल, याची खात्री बाळगून एकडाव माफी करावी.

…………………………………….

२. सनातन संस्थेत साधकांना छिन्नमनस्कता व इतर मानसिक रोगावरची औषधे दिली जात होती : पानसरे-दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीच्या पत्नीच्या जबानीतून खुलासा

यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? डोक्यावर परिणाम झालेला नसेल आणि व्यक्तिमत्त्व दुभंग-त्रिभंगलेलं नसेल, तर कोण जाईल अशा आश्रमांमध्ये?

…………………………………….

३. पतंजली आयुर्वेद कंपनीचा उत्तराधिकारी कोणी व्यापारी असणार नाही. संन्यासी पुरुष आणि महिलाच हा विशाल कारभार सांभाळतील : रामदेव बाबा

हेही विधान पतंजली कंपनीच्या एकंदर जाहिरातबाजीला साजेसंच आहे. आधी मुळात संन्यासी ही कल्पनाच त्यांनी मोडीत काढलेली आहे. घटकाभर त्यांना संन्यासी मानलं तरी ते कंपनीच्या माध्यमातून व्यापारच करणार आहेत, म्हणजे फारफारतर व्यापारी संन्यासी म्हणता येईल त्यांना. काही दिवसांनी बाबा संसारी संन्यासी अशीही एक वेगळी ब्रँच काढतील बहुतेक.

…………………………………….

४. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नोटाबंदीवरून सुरू असलेल्या गोंधळात सत्ताधारी आणि विरोधकांत कशाच्याही बाबतीत एकमत झालं नाही. मात्र, सोमवारी ईद ए मिलादची सुटी घ्यायची का, या विषयावर मात्र 'सुटी घ्यायची' यावर शून्य मिनिटांत सर्वपक्षीय एकमत झालं.

सदनाची पातळी इतकी शाळकरी असल्यावर तिथे फार गंभीर चर्चांची अपेक्षा ठेवण्यात मतलब काय? सदन सुटल्यानंतर सदस्य 'शाळा सुटली, पाटी फुटली' म्हणून ओरडत बाहेर येतात का, हे एकदा पाहिलं पाहिजे.

…………………………………….

५. नोटाबंदीचा निर्णय हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून मला याबाबत संसदेत बोलायंच आहे. मी तिथं सर्व बोलणार आहे. संसदेत मला बोलण्याची परवानगी दिल्यास राजकीय भूकंप झाल्याशिवाय राहणार नाही. : राहुल गांधी

अहो, मग आपल्या खासदारांना आरडाओरडा बंद करायला सांगा. संसदेचं कामकाज चालूद्यात आणि हवा तेवढा वेळ बोला मनात जे काही असेल ते. तुम्ही राजकीय भूकंप घडवून आणू शकलात, तर बिचाऱ्या देवांचीही सुटका होईल… काँग्रेसजनांनी कधीपासून पाण्यात बुडवून ठेवलंय त्यांना.

……………………………………

५. काँग्रेसच्या सत्ताकाळात लाखो लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, हे ते विसरत आहेत. त्यांना आम्हाला उपदेश करण्याचा अधिकार काय? : वेंकय्या नायडू

अण्णा, तुमच्या सत्ताकाळात जवानांच्या शवपेट्यांचाही भ्रष्टाचार झाला. तुम्ही लष्करावर बोलणं सोडलंत का?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......