कैफी आझमी : धर्मांधतेविरुद्धचा एल्गार!
ग्रंथनामा - आगामी
लक्ष्मीकांत देशमुख
  • ‘कैफी आझमी - जीवन आणि शायरी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 14 January 2020
  • ग्रंथनामा आगामी कैफी आझमी - जीवन आणि शायरी Kaifi Azmi लक्ष्मीकांत देशमुख Laxmikant Deshmukh

आज १४ जानेवारी २०२० रोजी महान उर्दू शायर कैफी आझमी यांच्या जन्मशताब्दीची सांगता होत आहे. माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा ‘कैफी आझमी - जीवन आणि शायरी’ हा चरित्रग्रंथ लोकवाङ्मयतर्फे आज प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

भारतासाठी धर्मांधता व सांप्रदायिकता हे आजचं मोठं संकट आहे, हे कलावंत कैफीनी ओळखलं होतं. कारण उर्दू शायरीची एक उदारमतवादी सेक्युलर विचारधारेची परंपरा आहे, तिचा संदर्भ देत कैफींनी लिहिलेल्या काही कवितांचा (‘सोमनाथ’, ‘सांप’, ‘बहुरूपनी’ इ.) विचार करताना आज संकोचलेली परंपरा नेमकेपणानं ‘नए मनुष्य का खोजी कवी’ या लेखात जितेंद्र श्रीवास्तव यांनी अशी सांगितली आहे.

“साम्प्रदायिकता समकालीन भारत का एक बडा संकट है । पिछले पन्द्रह-सत्रह वर्षों में इसने मनुष्य को मनुष्य से अलगा दिया है । प्रेमचन्द ने साम्प्रदायिकता पर चोट करते हुये उसे कोढ बताया था । साम्प्रदायिकता मध्ययुग की हो या वर्तमान युग की वह कोढ ही होती है और कोढ का इलाज होना चाहिये । एक कवि यह इलाज अपने ढंग से करता है । वह उन मनुष्यों की खोज करता है, जो इस रोग को पहचान सकें और इसके इलाज में भी समर्थ हों, क्योंकि साम्प्रदायिकता जितनी सतह पर दिखती है, उससे कई गुना अधिक वह भीतर होती है और अलग-अलग रंगों-ढंगों में अपने को व्यक्त करती है। यदि तनिक भी चूक हुई तो मामला बिगड जायेगा । कैफी आजमी कविता रूपी औजार से अपना काम करते है । वैसे यह परम्परा उर्दू में वली दकनी से चली आ रही है । वली गुजरात की धर्मनिरपेक्षता पर बहुत गर्व करते थे । यह कितना दुःखद है कि वही गुजरात धर्मान्धता की आग में झुलस गया । वली का स्वप्न था कि ‘क्यो न होवे इश्क सूँ आबाद सब हिन्दुस्ताँ।’ काश! ऐसा होता ।

उर्दू के महाकवि मीर ने भी अपने ढंग से ‘सोमनाथ’ को अपनी कविता का विषय बनाया है । नजीर, फैज, फिराक, इकबाल और सरदार जाफरी के वहाँ भी यह स्वर साफ-साफ सुनाई देता है । नये शायरों में पाकिस्तान के अहमद फराज ओर आफजाल अहमद की कविता में धार्मिक कट्टरता के विरूद्ध स्वर सुनाई देता है । निदा फाजली भी अपनी नज्मों, गजलों और दोहों के माध्यम से यही काम कर रहे है । कैफी आजमी ने भी अपनी कविताओं के माध्यम से यह किया है ।”

खरं तर धर्म हा श्रद्धेचा विषय आहे व त्यावर प्रहार करणं अनुचित मानलं जातं. पण धर्मश्रद्धेच्या नावानं घृणा निर्माण करणं आणि आपला धर्म व धर्मियांना इतर धर्म व धर्मीयांपेक्षा श्रेष्ठ मानणं व त्यासाठी दंगा, लढाई व खुनखराबा करणं या व अशा हिंसक घटनांनी जगाच्या इतिहासाची किती तरी पानं लाल झालेली आहेत. त्यानं कैफी व्यथित होतात, हैराण होतात आणि तीव्र चीड त्यांच्या मनात निर्माण होते. त्यातुन मग ‘लखनऊ तो नहीं’ ही नज्म लिहिली जाते.

१९७३ साली आलेल्या अर्धांगवायुच्या झटक्यानंतर दोन वर्षांनी पुन्हा उत्साहानं पार्टीच्या कामासाठी व मुशायऱ्यांसाठी कैफी पुन्हा देशभर व्हीलचेअरची पर्वा न करता हिंडू लागले होते. आणि आपल्या जन्मगावी मिजवाँला पण त्यांचं वास्तव्य वाढलं होतं. १९७८ साली ते मिजवाँहून लखनऊला काही कामासाठी आले असता हॉटेलच्या पायऱ्या चढताना ते घसरून पडले व फ्रॅक्चर झालं. त्यामुळे त्यांना लखनऊच्या हॉस्पिटलमध्ये तीन महिने रहावं लागलं होतं. त्याच काळात लखनऊला शिया व सुन्नी मुस्लीमात दंगल पेटली होती आणि दुकानं व मालाची लुटालुट झाली होती. काही माणसं पण मारली गेली होती. तेव्हा ट्रॅक्शन लावलेलं असताना बेडवर पडल्यापडल्या त्यांनी एक नज्म लिहिली ‘लखनऊ तो नहीं’ ती अशी आहे.

अजा में बहते थे आँसू यहाँ लहू तो नहीं,

ये कोई और जगह होगी लखनऊ तो नहीं ।

यहाँ तो चलती है छुरयाँ जबान से पहले,

ये मीर ‘अनीस’ का, आतश की गुफ्तगू तो नहीं ।

टपक रहा है जो जख्मों से दोनो फिरको के

बगौर देखो ये इस्लाम का लहू तो नहीं ।

तुम इसका रख लो कोई और नाम मौजूँ-सा

किया है खून से जो तूमने वो वजू तो नहीं ।

जगात इस्लामिक देशात सुन्नी व शिया पंथीयांचे केवळ वादच नाहीत, तर इराण-इराकमध्ये त्यावरून युद्धही झाली आहेत. कैफी स्वतः शिया तर शौकत सुन्नी होती. जावई जावेद अख्तर ही सुन्नीच. त्यामुळे त्यांच्या घरात शिया-सुन्नींचा प्रेममय संगम झाला होता. त्यामुळे लखनऊसारख्या सुसंस्कृत शहरात शिया-सुन्नीमध्ये दंगा-फसाद होणं कैफींना शुद्ध वेडेपणा वाटतो, तो अन-इस्लामिक वाटतो. इस्लामी माणूस नमाज अदा करण्यापूर्वी हातपाय धुवून देहशुद्धी करतो, त्याला ‘वजू’ म्हणतात. तुम्ही रक्तानं वजू करीत आहात. एक प्रकारे इस्लामला काळिमा फासत आहात असं कैफी दोन्ही पंथास बजावून सांगतात. कवि ‘मीर’ व ‘अतिश’ यांच्या गोड उर्दू जीभेत बोलण्याऐवजी कठोर बोलून हा त्या लखनऊचा महान शायरांचा तुम्ही अपमान करत आहात, ही त्यांची स्पष्टोक्ती किती निडर व डोळ्यात अंजन घालणारी आहे.

पुन्हा जगभर धर्माच्या नावाने भय पैदा करण्याचे सातत्याने प्रयत्न होत आहेत. त्यामागे केवळ राजकारण व सत्ताकारण असतं. भयाच्या वातावरणात नव्या नव्या संघटना-नवे संप्रदाय तयार होत आहेत. परंतु त्या मागे इतर धर्माच्या घृणेचे विचार कार्यरत असतात. ते जगापुढे नवे-नवे मुखवटे चढवून बहुरूपी बनुन येत असतात. अशा बहुरूप्यांच्या भुलावणीला सामान्य साधाभोळा सश्रद्ध माणूस बळी पडतो व त्यांना आपला मसिहा, आपला तारणहार मानू लागतो. कैफी आझमींनी ‘बहुरूपनी’ या त्यांचा अत्यंत गाजलेल्या कवितेत या मुखवट्यामागे दडलेल्या खतरनाक राजकारण्यांच्या चेहऱ्याचा पर्दाफाश थेटपणे वेचक शब्दांत केला आहे, तो वाचताना वाचक थरारून जातो.

कैफींनं स्त्रीलिंगी प्रतिक ‘बहुरूपनी’अनेक रूप असणारी ती असं प्रतिक वापरून भयाचा वापर करून सांप्रदायिकता वाढवण्याचं राजकारण करत धर्मा-धर्मात वैरभाव कसा वाढवला जातो व त्यामुळे माणुसकी कशी हताश होते याचं परिणामकारक दर्शन घवल आहे. कवितेची सुरुवात अशी होते

एक गर्दन पे सैकड़ों चेहरे

और हर चेहरे पर हजारों दाग

और हर दाग बन्द दरवाजा

रौशनी इनसे आ नहीं सकती

रौशनी इनसे जा नहीं सकती

‘बहुरूपीनी’ अनेक भाषा बोलत कसं माणसांच्या मनात धर्माच्या नावाने विष कालवले ते कवितेत पुढे असं येतं,

वैसे ये हर जबान बोलती है

जख्म खिडकी की तरह खोलती है

और कहती है झाँककर दिल में

तेरा मजहब, तिरा अजीम खुदा

तेरी तहजीब के हसीन सनम

सबको खतरे ने आज घेरा है

बाद उनके जहाँ अँधेरा है

सर्द हो जाता है लहू मेरा

बन्द हो जाती हैं खुली आँखें

ऐसा लगता है जैसे दुनिया में

सभी दुश्मन हैं कोई दोस्त नहीं

मुझको जिन्दा निगल रही हैं जमीं

कविता बरीच दीर्घ आहे, पण त्याचा शेवटचा भाग अंगावर भीतीचा काटा आणतो. कारण कैफींनी धर्माचा नावाने घृणास्पद राजनीती कशी केली जाते, हे स्पष्ट व सरळ शब्दात कडाडल्याप्रमाणे सांगितलं आहे -

इसने मुझको अलग बुला के कहा

आज की जिन्दगी का नाम है खौफ

खौप ही वो जमीन है जिसमें

फिरके उगते है, फिरके पलते हैं

धारे सागर से कटके चलते है

खौफ जब तक दिलों में बाकी है

सिर्फ चेहरा बदलते रहना है

सिर्फ लह्जा बदलते रहना है

कोई मुझ को मिटा नहीं सकता

जश्न-ए-आदम मना नहीं सकता

आज २०१९ सालामध्ये धर्माच्या रक्षणासाठी ठेका घेतल्याच्या अविर्भावात झुंडशाहीने मुस्लीम व दलितांचे बळी घेताना पाहिलं की, चाळीस वर्षांपूर्वीची कैफींची ‘बहुरूपनी’ कविता आजही प्रासंगिक वाटते. त्यासाठी कवीचं कौतुक करावं की, ही भयाची राजनीती संपत नाही म्हणून खेद मानावा कळत नाही. पण कैफी स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या दुखऱ्या नसेवर नेमकं बोट ठेवतात व जखमा ताज्या करत संप्रदायवादामुळे होणाऱ्या मानवी वेदना किती तीव्र व असह्य आहेत हे दाखवून देतात. आपल्यापुढे आपला कुरूप व क्रूर असलेला धर्मांध चेहरा दाखवतात. तो पाहून शहारावं, स्वतःचा कृत्याची घृणा करावी व या मानसिकतेतून बाहेर पडण्यासाठी विवेक जागृत करत बदलावं यासाठी ही कविता उपयुक्त आहे.

लखनऊ ते अयोध्या-फैजाबाद सद्भावना यात्रेत कैफी आपल्या संवादातून व ‘सोमनाथ’ व ‘बहुरूपनी’सारख्या कविता ऐकवत लोकांच्या मनातली धर्मांधता कमी व्हावी आणि पुन्हा एकदा कौमी एकता सुदृढ व्हावी यासाठी संवाद करत होते.  

बाराबंकीला कैफींनी आपल्या धीरगंभीर व परिणामकारक आवाजात जनसभेला संबोधित करताना सांगितलं -

‘‘हम कलाकारोंको पैदल चाले का शौक नही है, मग इस उत्तर प्रदेशमे और पुरे देशमे अमन और चैन के लिए यह मसला सुलझाना जरूरी है. सरकार और फिरकापरस्त (संप्रदायवादी) ताकते वोट की खातीर इसे उलझाये रखना चाहते है. हम इसे बिना खून बहाये, शांती से, महोबतसे, बातचीत के जरिये और जल्दीसे जल्दी हल करना चाहते है की, आप हर गाँव, हर कस्बे, हर शहर में फिरकावारना झगडों को रोके और हिंदू परिषदवाले ईट ताने पहुंचे तो उनका स्वागत ईंटसे करे-क्यों कि ये भाई-भाई को लढाना चाहते है और मुलक को बाटना चाहते है, मेरे साथ मिलके कहो – फिरकापरस्ती मुर्दाबाद!”

यावेळी व नंतरही कैफींनी हे आवाहन करताना आपली ‘साप’ ही कविता ऐकवली असणार. कारण त्यात त्यांचं आवाहन होतं-सांप्रदायिकता तेव्हा संपेल, जेव्हा धर्माच्या नावाने ओळखले न जाता आपण निखळ माणुस म्हणून स्वतःला समजू. कैफींचा या संदर्भातला खालील शेर लोकप्रिय आहे -

‘बस्ती में अपने हिंदू मुसलमाँ जो बस गये

इन्साँ की शक्ल देखने को हम तरस गये’

या यात्रेत ते माणूस शोधत होते आणि उपस्थितांना धर्मांधतेचा साप दाखवत होते. साप ही धर्मांधतेची प्रतिमा केवढी प्रभावी आणि परिणामकारक आहे -

ये साँप आज जो फन उठाये

मिरे रास्ते में खडा है

पडा था कदम चाँद पर मेरा जिस दिन

उसी दिन इसे मार डाला था मैंने

उखाडे थे सब दाँत कुचला था सर भी

मरोडी थी दुम तोड दी थी कमर भी

मगर चाँद से झुक के देखा जो मैंने

तो दुम इसवर्ग हिलने लगी थी

ये कुछ रेंगने भी लगा था

येथे चंद्रावर माणसाचं पाऊल पडल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच माणसानं कमालीची वैज्ञानिक प्रगती केली आहे. कैफींचा विश्वास होता की, जसे विज्ञान अधिक विकसित होईल, माणसांचा वैज्ञानिक दृष्टिकोन सुदृढ होत जाईल, तेव्हा धर्म व संप्रदायवादाच्या समस्या संपुष्टात येतील. पण असं झालं नाही. चंद्रावर माणसाचं पाऊल पडलं तरी धर्मांधता संपली नाही. कारण तिला मंदिर-मस्जिद-चर्च पोसतं, वाढवतं, पुष्ट करतं, हे कैफींनी त्यांच्या थेट रोखठोक शैलीमध्ये भेदकपणे वर्णिलं आहे -

ये कुछ रेंगता कुछ घिसटता हुआ

पुराने शिवाले की जानिब चला

जहाँ दूध इसको पिलाया गया

पढे पण्डितों ने कई मंतर ऐसे

ये कमबख्त फिर से जिलाया गया

शिवाले से निकला वो फुंकारता

रग-ए-अर्ज पर डंक सा मारता

बढा मैं कि इक बार फिर सर कुचल दूँ

इसे भारी कदमों से अपने कुचल दूँ

करीब एक वीरान मस्जिद थी,

मस्जिद में ये जा छुपा

जहाँ इस को पेट्रोल से गुस्ल देकर

हसीन एक ताबीज गर्दन में डाला गया

हुआ जितना सदियों में इंसाँ बलंद

ये कुछ उस से ऊँचा उछाला गया

उछल के ये गिरजा की दहलीज पर जा गिरा

जहाँ इस को सोने की कंचुल पहनाई गई

सलीब एक चाँदी की सीने पे उसके सजाई गई

मंदिर, मस्जिद व चर्चनं त्याला पोसल्यावर, व पुष्ट केल्यावर व पुन्हा पुन्हा आपली (धर्माची) भीती माणसाच्या काय मनात कायम रहावी म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यावर काय होणार?

दिया जिसने दुनिया को पैगाम-ए-अम्न

उसी के हयात-आफ्री नाम पर

इसे जंगबाजी सिखाई गई

बमों का गुलूबन्द गर्दन में डाला

और इस धज से मैदाँ में इस को निकाला

पडा इसका धरती पे साया

तो धरती की रफतार रूकने लगी

अँधेरा अँधेरा जमीं से

फलक तक अँधेरा

जबीं चाँद तारों की झुकने लगी

वैज्ञानिक प्रगती वेगानं होत असताना असे धर्मांध सर्परूपी लोक, गट, पंथ व धर्मसमूह का वाढत आहेत? का बेधडकपणे आपलं घृणा-विद्वेषाचं जहर लोकांना अमृत म्हणून पाजीत आहेत? त्याचं उत्तर कैफीनं असं दिलं आहे-

हुई जब से साइन्स जर की मुतीअ

जो था इल्म का एतिबार उठ गया

और इस साँप को जिंदगी मिल गई

किती नेमकेपणानं समस्येचं मूळ काय आहे हे कैफींनं सांगितलं आहे. पुन्हा शायर हा भविष्यवेधी फरिश्ता आहे म्हणून तो केवळ रोगाचं कारणचं सांगून थांबत नाही तर त्याचा इलाजही सांगतो -

ये हिन्दू नहीं हैं मुसलमाँ नहीं

ये दोनों का मग्ज और खूँ चाटता है

बने जब ये हिन्दू मुसलमान इंसाँ

उसी दिन ये कमबख्त मर जायगा

कैफींची ही कविता थेट मनाला भिडणारी व रोखठोक आहे. त्यातील चंद्ररूपी वैज्ञानिक प्रगतीचं रूपक, विज्ञानानं पैशाचा दास होण्याची वास्तविकता आणि धर्म सोडुन माणूस होण्याचा उपदेश यामुळे नज्म लोकगीत सदृश्य आणि उदात्ततेचा स्पर्श झाला असल्यामुळे संतकुळीची रचना झाली आहे.

लखनऊ ते अयोध्या सांस्कृतिक यात्रेत कैफींनी जेंव्हा ही कविता जनसभेमध्ये आपल्या नाट्यपूर्ण शैलीत व घनगंभीर आवाजात ऐकवली असेल तेव्हा लोकांचा विवेक नक्कीच जागा झाला असणार व संभ्रम गळून पडला असणार!

या सांस्कृतिक यात्रेच्या पहिल्याच दिवशी जनसमुदायाचा कौमी एकतेसाठी मिळणारा प्रतिसाद आणि संप्रदायाविरूद्ध लढण्याचा निर्धार पाहून कैफींतला शायर जागा झाला आणि त्यांनी एक नज्म लिहिली, त्याच्या पहिल्या चार ओळी यात्रेचं मग नारा-घोषवाक्य बनलं. ती छोटी नज्म अशी आहे,

‘यारो ! यूँ न चूप रहो

फिरकापरस्तोंसे कहो

हमने खाई है कसम

या तुम नही, या हम नही !

यारो ! सितम न सहो

खोलो जबाँ चूप न रहो

फिरकापरस्तोंसे कहो

करते रहो मश्क सितम

हमने भी खाई है कसम

या तुम नही या हम नही

हो तुम हिसार अंदर हिसार

और अपनी सफ में इंतेशार

एक दिल लगी है जीत-हार

हमको भी होने दो बहम

फिर तुम नही या हम नही !’

अशी ही लखनऊ ते अयोध्या-फैजाबादची सांस्कृतिक यात्रा. त्यात कैफी शौकतसह कौमी एकतेच्या बांधीलकेतनं वाढत्या वयातील आजारपण सहन करीत व अपंगत्वाची पर्वा न करता व्हीलचेअरवरून सामील झाले. पुढे साडेतीन वर्षांनी ६ डिसेंबर १९९२ला बाबरी मशिद पाडली गेली व २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्या विवादित जागी राममंदिर उभारण्याची परवानगी दिली. मग का त्यांचा प्रयास व्यर्थ गेला? अशा तात्कालिक फलप्राप्तीच्या निकषावर चळवळीचं यशापयश ठरवायचं नसतं. अशा चळवळीतून समाजमनात लक्षात पण येणार नाही, अशा सूक्ष्म गतीनं बदल होत असतो. खुद्द कैफींनीच म्हटलं आहे की, बदल कदाचित आपल्या जीवनात घडून आलेला आपण पाहू शकणार नाही. पण जे परिवर्तन आपणास समाज जीवनात घडवून आणायचं आहे, त्यावर विचारपूर्वक मानलेली निष्ठा हवी आणि त्या बळावर काम करत रहाणं एवढंच आपल्या हाती असतं. खरा परिवर्तनवादी कार्यकर्ता हा कधीच निराश होत नाही. कैफी पण असेच आयुष्यभर ‘इटरनल ऑप्टीमिस्ट’ राहिले.

.............................................................................................................................................

लेखक लक्ष्मीकांत देशमुख ९१व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

laxmikant05@yahoo.co.in

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......