अजूनकाही
आजपासून उस्मानाबाद इथं ९३ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. सकाळी नऊच्या सुमारास सुरू झालेली भव्य ग्रंथदिंडी उस्मानाबादकरांसाठी काहीशा बोचऱ्या थंडीत ऊब आणणारी ठरली. तब्बल १५ वर्षांनी उस्मानाबादमध्ये सहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे उस्मानाबादकरांचा उत्साह ग्रंथदिंडीमध्ये पाहायला मिळत होता.
उस्मानाबादमधील तेर हे गाव संत गोरोबा यांचं जन्मगाव. त्यामुळे सहित्य संमेलनस्थळाचं 'संत गोरोबाकाका सहित्यनगरी' असं नामकरण केलं आहे.
ग्रंथदिंडीमध्ये संत गोरोबाकाका यांचा पुतळा लक्ष वेधून घेत होता
संत गोरोबाकाका यांच्या पुतळ्यासमोर बाल वारकरी हरिनामाचा गजर करत होते
त्याचबरोबर संत गोरोबाकाका यांच्या नावाची गाडी आणि देखावेही होते
संत गोरोबाकाका याच्या मातीच्या गोळ्यातून मडकी घडवणार्या चाकाची हलती प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती
शालेय मुलं आणि मोठे यांचा उत्साह ओसंडत होता
मुली आणि महिला यांची संख्या लक्षणीय होती
फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे या संमेलनाचे अध्यक्ष असल्याने त्यांचं जन्मगाव, वसई इथून आलेले अनेक ख्रिस्ती बांधव ग्रंथदिंडीमध्येही सह्भागी झाले होते
बाबा रामदेव यांनी ग्रंथदिंडीमध्येही आपली जाहिरात करण्याची संधी सोडली नाही. यातून आपण मराठी माणसं कधी बोध घेणार?
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Tue , 14 January 2020
फ्रान्सिस दिब्रिटो यांची प्रकृती अचानक का बिघडली या ग्रंथदिंडीच्या वेळेस? हिंदू धर्मग्रंथ डोक्यावर घ्यावे लागतील म्हणून तर नाही?
-गामा पैलवान