२०१६ - बेस्ट ऑफ अक्षरनामा
संकीर्ण - पुनर्वाचन
टीम अक्षरनामा
  • बेस्ट ऑफ अक्षरनामा
  • Sun , 08 January 2017
  • पुनर्वाचन Rereading बेस्ट ऑफ अक्षरनामा Best of Aksharnama

२२ ऑक्टोबर रोजी ‘अक्षरनामा’ सुरू झाले. गेल्या अडीच महिन्यात ‘अक्षरनामा’वर ३५०हून अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. सदरे, कला-संस्कृती, ग्रंथनामा, चालू घडामोडी, मुलाखती, फोटोएसे अशा विविध प्रकारातील हे लेखन आहे. इतक्या लेखांतून सर्वाधिक वाचल्या गेलेल्या, चर्चेचा विषय ठरलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण असा २५ लेखांची ही पुनर्भेट. यात शेवटचे दोन लेख जानेवारी २०१७मधील आहेत. ते मुद्दाम घेतले आहेत. कुठल्याही वर्तमानपत्रांमध्ये अडीच महिन्याच्या कालावधीत इतके लेख प्रकाशित झाले नसतील. तुलना करायचा उद्देश नाही. असो. वाचकांनीही त्यांना आवडलेले लेख आम्हाला आवर्जुन कळवावेत. सोबत ‘अक्षरनामा’कडून सुटलेले विषयही कळवावेत. त्याचा आम्हाला नवीन वर्षांत उपयोग होईल.

- संपादक

Sat, 22 October 2016

अपूर्णतेचा शाप (भाग १) - डॉ. दीपक पवार

अपूर्णतेचा शाप (भाग २) - डॉ. दीपक पवार

अपूर्णतेचा शाप (भाग ३) - डॉ. दीपक पवार

शरद पवारांची ही राजकीय आत्मकथा असल्यानं ती त्यांना पूर्णांशानं समजून घ्यायला फारशी उपयुक्त ठरत नाही. शिवाय पवारांनी केवळ त्यांच्या राजकारणाबद्दल लिहिलं असलं तरी त्यातही त्यांनी अनेक ठिकाणी हात आखडता घेतला आहे. पण तरीही त्यांची ही आत्मकथा अनेक दृष्टीनं मोलाची आहे. म्हणून तिची सविस्तर दखल घेणारं हे तीन भागातलं सविस्तर परीक्षण......

.........................................................................

Sat, 22 October 2016

मालिकांच्या यशाचं रहस्य आणि आपण - सायली राजाध्यक्ष

मालिकेतली पात्रं स्थिरस्थावर करणं, नंतर त्यातल्या मुख्य पात्रांनी प्रेमात पडणं, त्या प्रेमाची मजा, मग त्यात काही कारणानं येणारं वितुष्ट, ते आणणारी विघ्नसंतोषी पात्रं, मग ते वितुष्ट दूर होणं, कदाचित त्यांचं लग्न, लग्नानंतरच्या समस्या असं सगळं झालं नाही तर मालिकेत रंगत कशी येणार? पण रोज आपण मालिका पाहताना आपल्याला त्या शेवटचा दिस गोड व्हायचीच आस असते. मालिकांमध्ये प्रेक्षकांचं इतकं गुंतून जाणं हेच मालिकांच्या यशा...

.........................................................................

Sun, 23 October 2016

काढुनी डोळ्यावरचा चष्मा, पहा मराठ्यांचा करिष्मा!  - अमेय तिरोडकर

मराठा आंदोलन हे एका जात समूहाचं आंदोलन आहे. त्याच्यामध्ये जातीवर्चस्वाचं राजकारण करू पाहणारे घटक घुसलेत. जातीवर्चस्व म्हणजे जातीव्यवस्था मजबूत होण्याचाच प्रकार. अशा वेळी जातिव्यवस्थेला ज्यांचा तत्वत्त: पाठिंबा आहे त्या संघालाच याचा अल्टिमेट फायदा होण्याची शक्यता अधिक. त्यातच आक्रमक असणाऱ्या या समाजातला तरुण एका मोठ्या सामाजिक संघर्षाच्या कडेलोटावर उभा आहे. नेमके त्याच वेळी इथले पारंपरिक पुरोगामी या जमावाल...

......................................................................... 

Thu, 03 November 2016

...देश पोरका झाला! - मुकेश माचकर

चर्चेच्या मूळ तत्त्वालाच हरताळ फासणारा आक्रमक आवेग हीच अर्णबची ओळख राहिली आहे. समोरच्याला बोलू दिलं आणि तो आपल्या आकलनाच्या टेम्प्लेटबाहेरचं काही बोलला तर उत्तर काय द्यायचं, अशी पंचाईत. अशी लाइव्ह पंचाईत झाली आणि आपण खोटे ठरलो, तर जो सगळ्यात मोठ्या आवाजात ओरडतोय तो ब्रम्हदेव असं मानणाऱ्या चाहत्यांसमोर आपली काय इज्जत राहील, अशी त्याला भीती वाटत असावी. त्यामुळे मुदलात समोरच्याला बोलूच द्यायचं नाही, हेच धोरण. विषय ...

......................................................................... 

Thu, 10 November 2016

मोदींची अर्धीमुर्धी साफसफाई - महेश सरलष्कर

पंतप्रधान मोदींचा नोटा रद्दीकरणाचा निर्णय म्हणजे काळ्या पैशाला आळा घालण्याच्या मोहिमेतील अर्धीमुर्धीच साफसफाई म्हणावी लागेल. कालांतराने पुन्हा काळ्या पैशांची भरघोस निर्मिती होऊ शकेल आणि हे पैसे देशी बाजारात खेळवले जाईल. हवाला मार्फत देशाबाहेरही नेले जातील. पूर्वीचाच खेळ नव्याने सुरू होईल. त्यामुळे काळ्यापैशाविरोधाच्या लढाईत खूप पल्ला मारल्याचा आव आणण्याचं कारण नाही....

......................................................................... 

Fri, 11 November 2016

एक पाऊल पुढे, दोन पावलं मागे - संपादक, अक्षरनामा

ट्रम्प यांच्या वर्णद्वेषी, स्त्रीविरोधी आणि स्थलांतरिताना लक्ष्य करणाऱ्या राजकारणामुळे अल्पसंख्याक, स्त्रिया, युवा आणि स्थलांतरित वर्ग आज भयभीत आहे. गेल्या अनेक दशकांत संघर्ष करून मिळवलेल्या सामाजिक बदलांची माघार तर होणार नाही ना अशी चिंता अनेकांना भेडसावत आहे. ओबामांना विजयी करून एक पाऊल पुढे आलेला अमेरिकी समाज आज जणू दोन पावलं मागे गेला आहे. ...

.........................................................................

 Fri, 11 November 2016

ट्रम्प ही सबंध जगावरच आलेली आपत्ती आहे’ : सुनील देशमुख - टीम अक्षरनामा

 मूळचे सांगलीचे असलेले सुनील देशमुख गेली ४० वर्षं अमेरिकेत राहत आहेत. वॉल स्ट्रीटवर त्यांनी कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये एक यशस्वी उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. महाराष्ट्रात पुरोगामी सामाजिक कार्याला मदत करणारा उद्योजक, महाराष्ट्र फाउंडेशनचे अध्यक्ष असलेल्या देशमुखांची ही अमेरिकेच्या ४५व्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमित्ताने परखड मुलाखत....

.........................................................................

Sat , 12 November 2016

'टाटापणा'चा संघर्ष - महेश सरलष्कर

टाटासमूहातील संघर्षाची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक गुंतागुंतीची होत चालली आहे. टाटा समूहातील काही कंपन्यांनी सायरस मिस्त्री यांची बाजू उचलून धरली आहे. विविध कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून मिस्त्रींना हटवण्यासाठी संचालक मंडळात बहुमत लागेल. एलआयसीसारख्या संस्थात्मक कंपन्यांनी टाटांची बाजू घेतली तर मिस्त्रींची कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून गच्छंती सोपी होईल. ...

......................................................................... 

Tue, 15 November 2016

मोदी सरकारचा फसलेला साहसवाद - अभय टिळक

५००-१०००च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय साहसी नक्कीच आहे. पण कुठलंही साहस बेबुनियादी असेल किंवा राज्यकर्त्यांच्या अशा निर्णयाला प्रशासकीय सुधारणा, प्रशासकीय व्यवस्थांचं सक्षमीकरण आणि पर्यायी व्यवस्था राबवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सगळ्या व्यवस्थात्मक सुधारणा यांची जोड नसेल तर चांगल्या हेतूनं केलेली एखादी सुधारणा कशी फसू शकते, त्याचंही हे उदाहरण आहे. ...

.........................................................................

Mon, 21 November 2016

“आपल्याला काय वाचायचंय याची निवड मुलं स्वत:च करू शकतात” : माधुरी पुरंदरे मुलाखत - अमृता पटवर्धन, मराठी अनुवाद - चैताली भोगले

यंदापासून टाटा साहित्य महोत्सवाने जीवनगौरव पुरस्कारासोबत बालसाहित्यातील योगदानासाठी पुरस्कार सुरू केला. या पहिल्याच पुरस्काराच्या मानकरी ठरल्या मराठीतील प्रसिद्ध लेखिका माधुरी पुरंदरे. काल मुंबईत त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यानिमित्ताने घेतलेली त्यांची मुलाखत अनुवादित स्वरूपात... खास ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी... ...

......................................................................... 

Fri, 25 November 2016

सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा (भाग १) - सुशील धसकटे

Sat, 26 November 2016

सत्याला सत्य म्हणून आणि असत्याला असत्य म्हणून जाणा (भाग २) - सुशील धसकटे

पुढील आठवड्यापासून नागपूरला विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यानिमित्ताने नागपुरात होणाऱ्या मराठा मोर्चाची जय्यत तयारी मुंबईमध्ये सुरू झाली आहे. मुंबईतही महामोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात सामील होऊन मोर्चेकरांची बाजू समजून घेऊन लिहिलेला लेख...... आम्हांला जातीचा वगैरे ‘पुरोगामी न्यूनगंड...गिल्ट’ अजिबात नाही. त्यामुळे आम्ही ना ‘ब्राह्मणी’ झालो, ना ‘दलित’...राहिलो ते कुणबी! म्हणूनच आम्हांला समाजात मिरवण्यासाठी सो कॉल्ड बेगडी, बूर्ज्वा भूमिकेची वगैरे मुळीच गरज नाही. भगवान गौतम बुद्धांनी ‘सत्याला सत्य म्हणून जाणा आणि असत्याला असत्य म्हणून जाणा’ असं म्हटलेलं आहे. या वचनाला धरून ‘जे आहे ते आहेच, नाही ते नाहीच’, अशी खाशी देशी भूमिका आहे....

......................................................................... 

Wed , 30 November 2016

स्पर्धा परीक्षांच्या बाजारातली सुगी! - सतीश देशपांडे

एक विद्यार्थी वर्षभरासाठी किमान ऐंशी हजार ते एक लाख रुपये पुण्यासारख्या शहरात खर्च करतो. याचा अर्थ अडीच लाख गुणिले एक लाख, हा आकडा काही अब्ज रुपयांच्या घरात जातो. सबंध महाराष्ट्राचा आणि देशभराचा विचार करता विविध स्पर्धा परीक्षांसाठीचा बाजार महाप्रचंड आहे. ज्यावेळी आयटी क्षेत्र जोरात होते, त्यावेळी या बाजारात मंदी होती. २००८ पासून (आर्थिक मंदीनंतर) तेजी सुरू आहे. उद्या मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण झाले, तिथे नोकऱ्या ...

.........................................................................  

Thu , 08 December 2016

 ‘मूल दत्तक घेणे’, हा खरेतर मूर्खपणा नाही, पण ‘तयारी नसताना मूल दत्तक घेणे’, हा ठार मूर्खपणा आहे! - आदित्य कोरडे

आमच्या आयुष्यात मिहीका आल्यापासून ‘ती आमची जैविक मुलगी नाही’, हे जणू आम्ही विसरूनच गेलो आहोत. म्हणजे पहिल्या रात्री सासूबाईंनी जुन्या साडीची झोळी करून त्यात तिला झोपवायला सांगितले, म्हणून आम्ही तिला झोळीत घातले, तेव्हा तिने रडून हलकल्लोळ केला. शेवटी तिला झोळीतून काढून दोघांच्या मध्ये घेतले, तेव्हा ती तिच्या नव्या आईच्या कुशीत शिरून एकदम शांतपणे झोपली, जणू जन्मल्यापासून ती आईच्या कुशीतच झोपत आली असावी! ...

.........................................................................  

Fri, 09 December 2016

लाल चिखल - भास्कर चंदनशिव

मागच्या पंधरवड्यात नोटबंदीमुळे पडलेल्या भावाला कंटाळून नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी २० लाख टोमॅटो रस्त्यावर टाकून दिले, तर काल-परवा छत्तीसगडमधील शेतकऱ्यांनी अशीच कितीतरी टन टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. ५० पैसे किलो या भावानेही व्यापारी ते खरेदी करायला तयार नव्हते. नंतर त्यावरून रोडरोलर फिरवला गेला. टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्याची व्यथा मांडणारी ही मराठीतील एक दमदार कथा...पुनर्मुद्रित स्वरूपात ...

.........................................................................  

Mon, 12 December 2016

मनमोकळेपणावर मनमोकळं - अवधूत परळकर

मोकळेपणानं बोलण्याची नुसती तीव्र इच्छा असून चालत नाही, तर आपला मोकळेपणा मानवणारा, सोसणारा आणि आवडणारा श्रोता भेटावा लागतो. मोकळेपणा स्वीकारण्याची, त्याचं स्वागत करण्याची क्षमता देशातल्या सामाजिक, राजकीय वातावरणात असावी लागते. आहे का तशी व्यवस्था आपल्या देशात? संसदेपासून ते कुटुंबापर्यंत संवाद होताना दिसत नाही... नुसतीच आदळआपट, आरोप-प्रत्यारोप आणि दोषारोप...संवाद नाहीच!...

.........................................................................  

Tue, 13 December 2016

कल्लूळाचं पाणी ढवळीलंच पाहिजे - शर्मिष्ठा भोसले

बहुतेक स्त्रिया ही ‘स्त्री’ असण्याची, ते स्त्रीत्व पारंपरिक निकषांनीच वागवण्याची आयडेंटिटी निमूटपणे सहन करतात. त्यालाच नियती आणि नाइलाज मानतात. काही जणींना त्यांच्या सोसण्याचं मूळ उमगतं. ते त्या बोलूनही दाखवतात. त्या सोसण्याशी विद्रोह करताना पुन्हा नव्या हिंसेला सामोऱ्या जातात. स्त्री वा पुरुष म्हणून एकमेकांबाबतचे अनुभव खुलेपणाने परस्परांशी बोलता येतील का? ‘माणूस’ म्हणून उभं राहता येईल का?...

......................................................................... 

Thu, 15 December 2016

ब्राह्मण तरुणांचं आहे हे असं आहे, त्याला कोण काय करणार? - आदित्य कोरडे

मला भेटलेले बहुसंख्य ब्राह्मण तरुण असेच काहीसे विचार करणारे आहेत. हे फार भयावह आहे. मन उद्विग्न करणारं आहे. या देशात आमची पाळंमुळं नाहीत हे त्याचे उद्गार मला जास्त अस्वस्थ करून गेले. पण आहे हे असं आहे, त्याला कोण काय करणार? समाजातला एखादा वर्ग स्वतःला असं इतरापासून, या देशाच्या संस्कृती, इतिहासापासून तुटल्यासारखा/ दुरावल्यासारखा मानू लागला तर ते निश्चितच उद्वेगजनक आहे....

.........................................................................  

Thu, 15 December 2016

बौद्धांनी त्यांच्या मनातून शिवाजी महाराजांचा फोटो डिलीट करावा का? - कीर्तिकुमार शिंदे​

महाराष्ट्रातल्या मराठा किंवा इतर समाजाच्या लोकांच्या कोणत्याही घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला जात नाही, पण अनेक बौद्धांच्या घरात, इतकंच नव्हे, तर बौद्ध विहारांमध्येही शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचे फोटो दिसतील. ही फॅक्ट कोणताही महाराष्ट्रीय माणूस नाकारू शकत नाही. जर खरंच काही किंवा अगदी एकाही बौद्धाने त्याच्या विहारातला-घरातला शिवाजी महाराजांचा फोटो काढून टाकला तर...?...

......................................................................... 

Tue, 20 December 2016

फॅसिझम हा संसदीय लोकशाहीचा शत्रू असतो! - नरहर कुरुंदकर

फॅसिझम इतिहास, परंपरा, राष्ट्र, वैभव या सगळ्यांच्या घोषणा करीत असतो. असल्या प्रकारचे आधार फॅसिझमला लागतातच. कारण कोणते तरी भ्रम पक्केपणी मनात रुजवल्याशिवाय आत्महत्या करणारे पिसाट श्रद्धाळू मन जन्माला घालता येत नाही. शुद्धीवर असणारी माणसे गुलामगिरी संपवून स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करणार. पूर्वी रणांगणावर सैन्याला दारू पाजली जात असे. नव्या जगात तशीच धुंदी आणणारे तत्त्वज्ञान पाजण्याचा प्रयत्न होतो....

......................................................................... 

Thu, 22 December 2016

मला असे प्रश्न पडले म्हणजे माझं देशावर प्रेम नाही का? - अमिता दरेकर

मला अर्थशास्त्र वगैरे कळत नाही फारसं. त्यामुळे प्रश्नही तसे भाबडेच पडतात. ‘फालतू विचार करत असतेस. तुझं आडनाव ‘विचारे’ ठेवायला हवं,’ असं आई खूप वर्षांपासून म्हणतेय! आजवर छोट्या व्यावसायिकांचं जे नुकसान झालं, ते भरून निघेल का? बँक कर्मचाऱ्यांना या जास्तीच्या कामाचा वेगळ्या भत्ता मिळणार का? असे प्रश्न पडले म्हणजे माझं देशावर प्रेम नाही का? देशातला भ्रष्टाचार थांबावा, काळा पैसा असू नये, हे स्वप्न मलाही बघायला आवडतं, पण...

.........................................................................  

Mon, 26 December 2016

“कथा’ हा अभावग्रस्त माणसांनी तगवलेला वाङ्मयप्रकार आहे” : आसाराम लोमटे मुलाखत - राम जगताप

एकमेकांना ‘गोष्टी’ सांगून जगण्याचं बळ मिळवण्याचा प्रयत्न माणसांनी केलेला आहे. वास्तविक, त्यांनी तर कथेकडे पाठ फिरवायला पाहिजे होती. ‘रिकाम्या ‘गोष्टी’त काय पडलंय आपल्यासाठी!’, असं त्यांनी म्हणायला पाहिजे होतं, पण तसं घडत नाही. ‘नाही रे’ वर्गातून खूप मोठ्या प्रमाणावर ‘गोष्टी’ तयार झाल्याचं आपल्याला दिसतं. तांडे, वस्ती, वाड्या या सगळ्या ठिकाणची माणसं भलेही अभावात जगत असतील, पण त्यांनी ‘गोष्ट’ टिकवली; तगवली....

.........................................................................  

Wed, 28 December 2016

२०१६ या वर्षाने हतबल केलं असं असं की... - नितिन भरत वाघ

२०१६ या वर्षानं जितकं हतबल केलं, तितकं कोणत्याच वर्षाने केलं नाही. सर्वसामान्यांपासून ते उच्च स्थानावर असणाऱ्या सर्व लोकांपर्यत या वर्षानं थेट प्रश्न उभे केले आहेत. या वर्षाची नोंद कायम इतिहासात घेतली जाईल, इतकी व्यवस्था या वर्षाने निश्चितच केली आहे. मध्यपूर्वेतील परिस्थितीत आणि आज आपल्या अवतीभवती जे काही चाललंय, त्यात काय वेगळं आहे? तिथं जी स्थिती आहे तशीच कमी-अधिक आपल्या देशातही आहे....

.........................................................................  

Sat, 31 December 2016

‘दंगल’ फेमिनिस्ट सिनेमा का नाही? - यश एनएस

महावीरच्या 'मदतीने' गीता २०१० च्या कॉमनवेल्थ गेम्सच्या फायनलपर्यंत पोचते. तिथं पोचता पोचता मध्ये ती एका नायजेरिअन कुस्तीपटूला हरवते. दोन्ही वेळेस 'दंगल' पाहताना सिनेमागृहातील काही प्रेक्षक त्या आफ्रिकी मुलीच्या रंग-रूपावरून तिची चेष्टा करून जोरात हसले. भारताच्या मातीत फेमिनिझमची मुळं किती खोल रुजतील याची शंका वाटते. चित्रपटातल्या सततच्या वर्षावामुळे फायनल मॅचपर्यंत वातावरण पूर्ण देशप्रेमानं व्यापलेलं असतं...

.........................................................................  

Tue, 03 January 2017

दोन चाकांवरून दोन टोकांपर्यंतची माणसं वाचणारी माणूसवेडी मुलगी! - सुनील इंदुवामन ठाकरे

स्नेहल घराबाहेर पडते फक्त माणसं वाचायला. मानवी प्रवृत्तींमधील अभिजात निरागस सौंदर्य टिपायला. बस, कार, रेल्वे, विमान वगैरे साधनं असली की, माणसांना फक्त खिडकीतून पाहता येतं. मात्र मोपेड घेऊन लांब भटकंतीवर निघालं की, मानवतेच्या सताड उघड्या प्रवेशदारातून थेट माणुसकीच्या गाभाऱ्यापर्यंत जाता येतं, हा स्नेहलचा अनुभव आहे. 'दोन चाकांवरून दोन टोकांवरचा' हा तिचा सफरनामा कौतुकास्पद आहे!...

.........................................................................  

Fri, 06 January 2017

फोगाट नावाची अफाट यशोगाथा - सानिया भालेराव

बलाली गावाच्या वेशीवर स्वागत करण्यासाठी उभारलेल्या कमानीवर लिहिण्यात आलेल्या गौरवोद्गारांना बघून एका माणसाच्या अखंड जिद्दीमुळे या खेड्यातल्या लोकांच्या दृष्टिकोनामध्ये आणि मागासलेल्या विचारांमध्ये कसा बदल झाला हे वाखाणण्याजोगं आहे. त्या कमानीवर लिहिलं आहे- “आंतरराष्ट्रीय महिला पेहेलवान गीता, बबिता, विनेश आणि रितू फोगाट यांच्या बलाली गावात आपलं स्वागत आहे.” ज्यांचं अस्तित्वच या जगातून पुसून टाकावं अशा मत...

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......