डॉ. श्रीराम लागू - ‘athlete philosopher’ असलेला कलावंत!
संकीर्ण - श्रद्धांजली
टीम अक्षरनामा
  • डॉ. श्रीराम लागू : जन्म - १६ नोव्हेंबर १९२७, सातारा; मृत्यू १७ डिसेंबर २०१९, पुणे
  • Wed , 18 December 2019
  • संकीर्ण श्रद्धांजली डॉ. श्रीराम लागू Shreeram Lagoo नटसम्राट Natsamrat

प्रख्यात रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांचे काल रात्री पुण्यात वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. डॉ. श्रीराम लागू एक प्रख्यात रंगकर्मी, चित्रपट अभिनेते आणि बुद्धिप्रामाण्यवादी म्हणून ओळखले जातात. त्याचबरोबर सामाजिक संघटना, चळवळीमध्येही त्यांनी हिरिरीने सहभाग, पुढाकार घेतला. आपल्याला पटलेल्या, योग्य वाटलेल्या भूमिका त्यांनी ठोसपणे मांडल्या. त्यांविषयी कुणाचीही भीडभाड न बाळगता किंवा कसलीही भीती न बाळगता ते आयुष्यभर परखडपणे बोलत राहिले. नाटक-चित्रपट या सर्जनशील क्षेत्रांत राहूनही डॉ. लागू माणसाकडे बुद्धिप्रामाण्यवादी दृष्टीने पाहत. माणसाने सतत उत्क्रांत होत राहिले पाहिजे, प्रगत होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे म्हणत. त्यासाठी त्याने बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी झाले पाहिजे असे सांगत. त्यासाठीच ते ‘परमेश्वराला रिटायर’ करायलाही सांगत. कारण ‘तोपर्यंत आपण समाज म्हणून उभे राहू शकणार नाही’ असे त्यांना वाटे. ते प्रत्येक गोष्टीकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहत. त्यामुळे त्यांची भूमिका बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी राहून त्यात एक प्रकारची सुसंगती राहिली. कलावंताने ‘athlete philosopher’ असले पाहिजे असे डॉ. लागू नेहमी म्हणत. ते स्वत: तसेच होते. त्यानुसारच जगले, वागले.

डॉ. लागूंच्या आयुष्याची, कारकिर्दीची ही एक चलत्-चित्रांच्या माध्यमांतली झलक

२०१५ साली डॉ. लागूंची ‘बालचित्रवाणी’वर एक छोटशी मुलाखत झाली होती. या मुलाखतीमध्ये डॉ. लागूंनी त्यांच्या पहिल्या नाटकाचा अनुभव सांगितला आहे. वयाच्या ८८व्या वर्षी आयुष्याकडे मागे वळून पाहताना आणि खासकरून मुलांसाठी मुलाखत देताना डॉ. लागू जे बोलले आहेत, ते मोठ्यांच्याही जाणीवेमध्ये भर घालणारे आहे.

डॉ. लागूंनी मराठी-हिंदी सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केल्यानंतरची ही एक मुलाखत. डॉ. लागू ‘द किंग ऑफ थिएटर’ म्हणून ओळखले जात. त्या नाटकाविषयी डॉ. लागूंचे बोल या मुलाखतीमधून जाणून घेता येतात. शिवाय चित्रपटांविषयीही त्यांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे.

डॉ. लागूंच्या काही अजरामर भूमिकांपैकी एक म्हणजे ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पा बेलवलकर. त्याविषयीचा हा व्हिडिओ. डॉ. लागूंच्या अभिनयाची ताकद समजून घेण्यासाठी वा त्याचा पुनर्प्रत्यय घेण्यासाठी हा पाहावाच असा व्हिडिओ आहे.

‘परमेश्वराला रिटायर करा’ असा खणखणीत इशारा देणाऱ्या डॉ. लागूंनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’साठी अनेक वर्षं काम केले. या चळवळीला ग्लॅमर मिळवून दिले. आपल्या बुद्धिप्रामाण्यवादी व विवेकवादी भूमिकेनुसार या चळवळीचा प्रचार-प्रसार केला. या चळवळीच्या एका कार्यक्रमासाठी अंधश्रद्धेविषयी डॉ. लागूंनी केलेले हे छोटेसे भाषण.

डॉ. लागूंना त्यांच्या नाटक-चित्रपटांतील कारकिर्दीबद्दल, त्यांच्या भूमिकांबद्दल अनेक मानसन्मानांनी, पुरस्कारांनी गौरवण्यात आले. २०१३ साली त्यांना त्यांच्या नाटक-चित्रपट क्षेत्रातील योगदानासाठी जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रभात कंपनीच्या सौजन्याने सुरू झालेला हा पहिलाच पुरस्कार डॉ. लागूंना देण्यात आला. हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच त्याचे मोलही मोठे आहे. या कार्यक्रमाला डॉ. लागू उपस्थित राहिले, पण वयोमानामुळे काही बोलू शकले नाहीत. त्यांच्याविषयी डॉ. जब्बार पटेल, दीपा श्रीराम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

.............................................................................................................................................

डॉ. श्रीराम लागू यांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्राच्या आणि ‘रूपवेध’ या लेखसंग्रहाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/search/?

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......