अजित पवारांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!
पडघम - राज्यकारण
प्रवीण बर्दापूरकर 
  • देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि अजित पवार
  • Sat , 23 November 2019
  • पडघम राज्यकारण देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis भगतसिंग कोश्यारी Bhagat Singh Koshyari अजित पवार Ajit Pawar शरद पवार Sharad Pawar राष्ट्रवादी काँग्रेस NCP शिवसेना Shivsena उद्धव ठाकरे Uddhav Thackeray भाजप BJP

आम्हाला शिकवलेली राजकीय पत्रकार आणि भाष्यकारानं पाळावयाची पथ्ये-

- राजकारणात दोन अधिक दोन चार असं कधीच नसतं आणि अंतिम ध्येय सत्ता संपादन असतं. त्यामुळे एखादी राजकीय घटना किंवा कृती पूर्ण होईपर्यंत भाष्य करू नये, भाकितं व्यक्त करू नयेत, भविष्य वर्तवू नये, तर फक्त बातमी द्यावी.

- त्याचा किमान काही नेत्यांशी थेट संपर्क असावा म्हणजे नेमकी माहिती मिळते, मात्र मिळणारी प्रत्येक माहिती बातमी नसते.

- शरद पवार जे बोलतात, ते करत नाहीत आणि जे बोलत नाहीत, ते सर्वांत आधी करतात.

- शिवाय दिवाळी संपल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेला माझा संवाद जशाचा तसा देतो, कारण तो एसएमएसद्वारे झालेला आहे आणि अजून डिलीट केलेला नाही –

प्रश्न- तुमच्या म्हणण्याप्रमाणे राज्यात भाजप सरकार येणार कधी? This is strictly between you and me.

देवेंद्र फडणवीस – May take a month.   

प्रश्न- बाप रे! इतका दुरावा निर्माण झालेला आहे?

देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नाच्या उत्तरादाखल ओठ बंद असलेल्या दोन प्रतिमा पाठवल्या!

अनेकांचे गैरसमज झाले तरी ही पथ्ये आणि हा संवाद यामुळे सरकार स्थापन झाल्याशिवाय कोणतंही भाष्य न करण्याचं टाळलं, त्यामुळे मी तोंडघशी पडलो नाही.

आज सकाळी भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री आणि अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. या दोघांनी रात्रीतून बहुमताचा दावा केला, तो राज्यपालांनी मान्य केला, राष्ट्रपती राजवट उठवली गेली आणि शपथविधीही पार पडला... हे सगळं इतक्या वेगात आणि एका रात्रीत घडलं की, ते एक स्वप्न वाटावं. हा वेग भारतीय क्रिकेट संघातील सध्या सुरू असलेल्या बांगला देश विरुद्धच्या कसोटी सामन्यात ५ गडी बाद करणाऱ्या वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्या गोलंदाजीच्या वेगाला लाजवणारा आणि म्हणूनच आश्चर्यचकित करणारा ठरला! महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला हा मोठा भूकंप आहे आणि त्याचे पडसाद दीर्घकाळ उमटत राहणार आहेत.

वर उल्लेख केलेल्या पथ्यांचा विचार केला तर पहिली बाब म्हणजे हे सरकार स्थापन होण्याबाबतच्या बातम्यांच्या संदर्भात माध्यमे चक्क तोंडावर आपटली आहेत आणि एकूणच माध्यमांच्या विश्वासार्हतेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पहिलं म्हणजे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना चाणक्य/शिल्पकार ठरवण्याची माध्यमांची ‘old man in hurry for… सारखी घाई (पुन्हा एकदा) अंगलट आलेली आहे.

दुसरं म्हणजे नेमकी बातमी शोधण्यापेक्षा तथाकथित सूत्रांच्या हवाल्यानं नको पतंगबाजी करण्यात, भाकितं करण्यात आणि भविष्य वर्तवण्यात विशेषत: प्रकाश वृत्तवाहिन्या गुंतल्या आणि तोंडघशी पडल्या, पण यातून कोणताही धडा ही माध्यमं घेणार नाहीत आणि यापुढेही त्यांचं वागणं असंच पिसाटल्यासारखं सुरू राहणार, असाच आजवरचा अनुभव आहे.

शरद पवार राजकारणी म्हणून बेभरवशाचे आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. अजित पवार यांच्या बंडानं सर्वांत मोठी नामुष्की शरद पवार यांच्याच वाट्याला आलेली आहे. राष्ट्रवादीच्या गोटात काही तरी वेगळं शिजतं आहे, याचा वास घेण्यात माध्यमंही साफ अयशस्वी ठरली. आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे, असं ते जेव्हा म्हणाले तेव्हाच मनात पाल चुकचुकली की, ‘दया, कुछ तो गडबड हैं’. मग शरद पवार यांनी राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला तरी धोरण मात्र आस्ते कदम ठेवलं. पवार यांच्या सरकार स्थापन करण्याच्या संदर्भातल्या हालचाली आणि वक्तव्ये परस्परविरोधी होती (ती ‘पवारभक्त पत्रकारां’ना नेहमीप्रमाणे ‘चाणक्य नीती’ वाटली आणि दररोज पवारभक्तीची एक तरी कमेंट टाकल्याशिवाय त्यांचा घास घशात उतरेनासा झाला!)  

‘सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही’ असं ट्विट शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार यांनी हे ट्विट केलंय ते सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी (या वेळेबाबत पवार भक्त वेगवेगळी स्पष्टीकरणं देतील आणि वाद घालतीलच!) आणि नव्या सरकारचा शपथविधी झाला सकाळी ८ वाजता! या ट्विटमध्ये ‘बिटवीन द लाईन्स’ वाचण्यासारखं काही आहे. नूतन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या कृतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही हे खरं, पण शरद पवार यांना हा निर्णय माहिती असण्याबाबत मात्र ‘सूचक मौन’ पाळण्यात आलेलं आहे. ट्विटची वेळ आणि हे सूचक मौन लक्षात घेता अजित पवार यांच्या या निर्णयाबाबत शरद पवार अनभिज्ञ होते किंवा आहेत, असं मुळीच म्हणता येणार नाही.

यावरून शरद पवार यांनी १९७८साली काँग्रेसचे वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्याच्या कृतीची आठवण झाली. त्यावेळी शरद पवार यांचे राजकीय गुरू आणि गॉडफादर यशवंतराव चव्हाण यांचाही वसंतदादा सरकार पडण्याच्या कृतीला पाठिंबा नव्हता, पण शरद पवार यांच्या वसंतदादा पाटील यांचं सरकार कृतीबद्दल यशवंतराव अनभिज्ञ मात्र मुळीच नव्हते. अगदी तसंच यावेळी घडलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ते सरकार पाडण्याची कृती शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या ‘पाठीत खंजीर खुपसला’ म्हणून गाजली होती. अजित पवार यांच्या भाजपला पाठिंबा देण्याच्या या २०१९ मधील कृतीलाही ‘काकाच्या पाठीत पुतण्यानं खंजीर खुपसला’ असं संबोधता येईल. मात्र त्यासंदर्भात काका अनभिज्ञ होते असं मात्र मुळीच म्हणता येणार नाही. अजित पवार यांच्या या कृतीनं खंजीर खुपसण्याचं एक आवर्तन पूर्ण झालेलं आहे, असंही तर म्हणता येईल. शिवाय खंजीर म्हणजे, आमदारांच्या सह्यांचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेसनंच अजित पवार यांच्या हाती सोपवलेलं होतं, हेही विसरता येणार नाही. आणखी एक म्हणजे, वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडण्याच्या म्हणजे शरद पवार यांच्या त्या कृतीचं जे समर्थन करतात, त्यांनी अजित पवार यांच्या कृतीला विरोध करणं हा निव्वळ दुटप्पीपणा आहे.

अजित पवार यांच्या निर्णयातून अनेक पेच निर्माण होणार आहेत. दूरगामी परिणाम होणार आहेत. विधानसभेवर विजयी झालेले जे सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटले आहेत, त्यांच्याबाबत पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या अनुषंगानं कीस काढला जाणार आहे, कोर्ट-कचेऱ्या होणार आहेत आणि त्यात बराच वेळ जाणार आहे. नवीन सरकारलाही स्थैर्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागणार आहे. या सरकारचा खरा कस विधानसभेचा अध्यक्ष निवडताना लागणार आहे. विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात जर भाजप आणि अजित पवार गट यशस्वी झाला तर मग मात्र पहिली लढाई जिंकून मैदान बऱ्याच अंशी साफ होईल. अन्यथा ३० नोव्हेंबरनंतर हे सरकार अस्तित्वात नसेल हे नक्की.

राज्यात सरकार स्थापनेच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मनसुब्यांना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुरुंग लावलेला आहे, एवढेच या घटनेचे परिणाम सीमित नाहीत. या निर्णयामुळे हे तीनही पक्ष आणि त्यांच्या नेत्यांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’ झालेला आहे. हे नेते सत्ता मिळवण्यासाठी किती उतावीळ झालेले आहेत हेच समोर आलेलं आहे. त्यातही शिवसेनेची अवस्था तर ‘गाढव गेलं आणि ब्रम्हचर्यही गेलं’ अशी झालेली आहे. आजवरच्या राजकीय जीवनात शिवसेनेची इतकी नामुष्की आणि पीछेहाट कधीच झालेली नव्हती. भाजपची साथ सोडण्याचा निर्णय हा केवळ हट्ट आहे, त्यात समंजसपणा नाही. आधी आपली ताकद वाढवावी आणि मगच युती तोडावी मात्र काँग्रेससोबत जाऊ नये, अशी भूमिका सेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांची असल्याचं त्यांच्याशी बोलताना जाणवलं होतं. पण संजय राऊत नावाचा ‘एचएमव्ही’ वारू वेगात दौडत निघालेला होता. वेगावर नियंत्रण नाही ठेवलं की, अपघात होतो हेच या वारूनं दाखवून दिलंय.   

सरकार स्थापनेबाबत दोन आठवड्यापूर्वीच्या लेखात म्हटलं होतं, राजकारण्यांच्या या वागण्याचं मुळीच आश्चर्य नाहीये कारण सर्वपक्षीय राजकारणी केवळ सत्तेचाच विचार करतात आणि ती मिळवण्यासाठी राजकीय विचार, तत्त्व, निष्ठा, साधनशुचिता, नैतिकता खुंटीला टांगून कोलांटउड्या मारत असतात. लोकशाही वाचवणं, धर्मांध शक्तीला विरोध, अमुक तमुकच्या हितासाठी, निवडणुकीतील आश्वासने ही धूळफेक असते, असा गेल्या ४० वर्षांच्या पत्रकारितेत असंख्य वेळा आलेला अनुभव आहे.

भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार गटाचं वागणं काय किंवा शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणं काय, त्या म्हणण्याचं समर्थन करणारं आहे. सरकार स्थापनेचा जो काही खेळ एका रात्रीतून झाला, त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेले आहेत. ते या केंद्रस्थानी राहतात की बहुमताची लढाई हरतात, हे ३० नोव्हेंबर नंतरच स्पष्ट होणार आहे.

.............................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Vishal Rathod

Wed , 27 November 2019

बर्दापुरकर सर,पवारभक्त आणि भाजपभक्त मी नाही,परंतु लेखाच्या अनुषंगाने म्हणायचे झाले तर तुम्ही वर्तवलेली 30 नोव्हेंबर ची वाट सुद्धा पवारांनी पाहिली नाही.आज 26 लाच मा.मुख्यमंत्री यांनी राजीनामा देऊन झालाय.तुम्हीसुद्धा घाई केली की काय!! आतमध्ये काहीही झालेलं असो,साध्य हे सत्तासंपादनेचं होतं,ज्यामध्ये सध्या तरी भाजपविरोधी आघाडीला यश आलेलं दिसतंय. बाकी राऊत लोकांना स्पष्टवक्ता आणि शिवसेनेच्या घुसमटीला छेदणारा मनुष्य म्हणून भिडत चाललाय(इंटरनेट च्या मिम्स आणि पोस्ट्स च्यानुसार तसेच कट्टयावरच्या गप्पांनुसार). धन्यवाद


Gamma Pailvan

Sun , 24 November 2019

चुकलो. वेळ ०९२७ हवी होती.
-गामा पैलवान


Gamma Pailvan

Sun , 24 November 2019

नमस्कार प्रवीण बर्दापूरकर,

तुम्ही जे ट्विट म्हणताय ते हे आहे : https://twitter.com/PawarSpeaks/status/1198087830573965312
मात्र याची वेळ सकाळी ०८२७ ही आहे. बहुधा जुनं ट्विट साहेबांनी उडवून उशिराच्या वेळेस नवं केलेलं दिसतंय. असो. मात्र

...सकाळी साडेसहा-पावणेसातला एका सहकाऱ्याने टेलिफोन करून कळवले की आम्हाला इथे राजभवनला आणले गेले आहे.

हे सांगायला काका विसरले नाहीत. ज्याने त्याने आपापला बोध घ्यावा.

आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......