तिच्या सौंदर्याविषयी जगात आदर तयार झाला आहे, त्याला हॉलिवुडमध्ये ‘लुपिता इफेक्ट’ म्हटलं जात आहे!
कला-संस्कृती - चलत्-चित्र
माधवी वागेश्वरी
  • लुपिता आणि ओप्रा विनफ्रे
  • Sat , 16 November 2019
  • कला-संस्कृती Kala-Sanskruti चलत्-चित्र लुपिता नियंगो Lupita Nyong'o ओप्रा विनफ्रे Oprah Winfrey

Dear Lord, why do I look like midnight

When my mother looks like dawn

Please make me as fair as the parents I’m from

I want to be beautiful, not just to pretend

I want to have daylight

I want to have friends

If you here me, my lord, and would like to comply

May I wake up as bright as the Sun in the sky, Amen

लहानपणी रोज म्हटलेली ही प्रार्थना पुन्हा वाचून दाखवताना लुपिता नियंगोचे डोळे भरून येतात.  कोण ही लुपिता? ‘टेल्व्ह इयर्स ऑफ स्लेव्ह’ या सिनेमासाठी ऑस्कर मिळवणारी पहिली आफ्रिकन अमेरिकन अभिनेत्री. ‘स्टार वॉर’, ‘ब्लॅक पँथर’, ‘अस’ या सिनेमांमधून तिच्या केवळ गुणवत्तेची नाही तर तिच्या सौंदर्याविषयी जगात आदर तयार झाला आहे. याला आज हॉलिवुडमध्ये ‘लुपिता इफेक्ट’ म्ह’लं जात आहे.

लुपिता मागच्या महिन्यात ओप्रा विनफ्रे यांच्या ‘स्पॉटलाईट’ या कार्यक्रमात येऊन गेली. अनेक विषयांवर त्या दोघींनी मनसोक्त गप्पा मारल्या.

या कार्यक्रमात ओप्रा यांनी लुपिताला ‘सुलवे’ नावाच्या पुस्तकातली ‘ती’ प्रार्थना वाचायला सांगितली. लुपितानं लहान मुला-मुलींसाठी ‘सुलवे’ (Sulwe) या छोट्या काळ्या मुलीची गोष्ट लिहिली आहे. सुपरहिरो सिनेमाची सर्व पद्धतीची मिथकं तोडून ‘ब्लॉक बस्टर’ ठरलेल्या ‘ब्लॅक पँथर’चं काम संपवल्यावर लुपितानं हे पुस्तक लिहिण्याचा निर्णय घेतला. हे पुस्तक ‘न्यूयॉर्क टाईम्स बेस्ट सेलर’ ठरलं आहे.

ही गोष्ट आहे छोट्याश्या सुलवेची, जी आपल्या आंतरिक सौंदर्याचा शोध घेते. वंशभेद, वर्णभेद यांसारख्या अतिशय विखारी विषयाला यात लुपितानं हात घातला आहे. खरं तर हे पुस्तक म्हणजे ओप्रा विनफ्रे म्हटल्याप्रमाणे लुपितानं तिच्यातल्या छोट्या लुपिताला लिहिलेलं ‘लव्ह लेटर’ आहे.

जगानं ठरवलेल्या सौंदर्याच्या फुटफुट्टीनुसार ‘ब्युटीफुल’ होण्यापेक्षा ‘मिनिंगफुल’ असणं आयुष्यात किती महत्त्वाचं आहे, या विचारापर्यंत लुपिता कशी पोहोचली यावर ओप्रा विनफ्रे यांनी तिला बोलतं केलं. जेव्हा तुम्ही जग सांगतं त्याप्रमाणे सुंदर नसता, तेव्हा तुम्ही तुमच्या इतर गोष्टींकडे लक्ष पुरवू शकता. केवळ दिसण्यापेक्षा असण्याकडे काय काय आहे, आपल्यातली कौशल्यं विकसित करू शकता.  आणि हे खरंच आहे आपल्याकडे अति सुंदर असणाऱ्या मुलींना असा प्रॉब्लेम असतो की, त्यांचं दिसणं इतकं महत्त्वाचं होतं की, त्यांना बुद्धी आहे, स्वत:चं मत आहे, याकडे जास्त कोणी लक्ष देत नाही.

पहिल्याच सिनेमाला मिळालेलं सहाय्यक अभिनेत्रीचं ऑस्कर, ‘पीपल’-‘व्हॅनिटी फेअर’सारख्या जगद्विख्यात फॅशन मॅगझिनच्या मुखपृष्ठावर तिचे झळकलेले फोटो, लँकम पॅरिससारख्या ब्रँडची झालेली ती पहिली आफ्रिकन अँबेसेडर, येऊ घातलेले मोठ्या बजेटचे आणि उत्तम आशयाचे सिनेमे... तरीही आजसुद्धा लुपिता तिच्यातला न्यूनगंडावर मात करते आहे.

गव्हाळ किंवा गोऱ्या रंगाच्या जवळपास जाणारी बहीण जन्माला आल्यानंतर तिच्यामध्ये तयार झालेल्या असुरक्षिततेबद्दल ती या मुलाखतीमध्ये खुलेपणानं बोलली आहे.

‘टेल्व्ह इयर्स ऑफ स्लेव्ह’ या सिनेमात गुलामीत अतिशय वेदनामय आयुष्य जगलेली पेट्सी तिनं साकारली होती. “पेट्सीच्या अतीव वेदनेतून माझ्या आनंदाचा क्षण तयार झाला आहे.” पेट्सीला सलाम करत तिनं ऑस्कर हातात घेतलं होतं. “तुम्ही कुठून येता, कसे येता, हे महत्त्वाचं नाही. तुमच्या स्वप्नांना नेहमीच मूल्य असतं.” असं ती म्हणाली होती.

२०१७ साली ‘मी टू’ चळवळ सुरू झाली. तेव्हा लुपितानं ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये एक लेख लिहून तिलाही हार्वे वाईनस्टीनमुळे कसं ‘अनसेफ’ वाटलं याविषयी लिहिलं होतं. तिच्या या निर्भयतेमुळे ती जास्त सुंदर दिसते!

आपल्याकडेही अलीकडेच नंदिता दास यांनी ‘इंडिया गॉट कलर’ नावाचा एक स्पेशल म्युझिक व्हिडिओ तयार केला होता. राधिका आपटे, विक्रांत मेसी, रत्ना पाठक शहा, गुल पनाग, अमृता सुभाष, स्वरा भास्कर, दिव्या दत्ता असे किती तरी गुणी कलाकार त्यात सहभागी झाले होते. २०१३ पासून नंदिता दास ‘डार्क इज ब्युटीफुल’ हे कॅम्पेन राबवत आहेत. त्वचेच्या रंगावरून आपल्या समाजातही भेदाभेद केला जातो, गोऱ्या रंगाचा हव्यास इतका जबरदस्त आहे की, कुठलाही रंग सुंदरच असतो या समजुतीकडे जाण्यास आपण आजही समाज म्हणून तयार नाही. टीव्ही मालिकेत आणि सिनेमात गोऱ्या मुलीला काम करून दाखवता येतं, पण सावल्या आणि पूर्ण काळ्या असलेल्या मुलीला तशी हिंमत होत नाही. त्वचेचे वेगवेगळे रंग, त्यांचे पोत हे सर्व बघण्याची नजर मिळवणं फार गरजेचं होऊन बसलं आहे

२०१४ साली ऑस्कर मिळण्याअगोदर लुपिताला ‘इसेन्स मॅगझिन ब्लॅक वूमन इन हॉलिवुड ब्रेकथ्रू परफॉरमन्स’ हा सन्मान मिळाला होता. तेव्हा तिनं केलेलं भाषण खूप व्हायरल झालं होतं. रंगावरून केलेला जाणारा भेदभाव याविषयी ती या भाषणात बोलली होती.

त्यात ती म्हणते, “शेवटी तुम्ही कसे दिसता यावर अवलंबून राहून तुम्ही जगू शकत नाही. स्वत:बद्दल करुणा तयार होणं आपल्या भवतालाबद्दल करुणा तयार होणं हे आणि केवळ मूलभूत सौंदर्य आहे. असं सौंदर्य ज्यानं तुम्ही प्रगल्भ होता.”

हा लुपिता इफेक्ट फार महत्त्वाचा आहे. अशी माणसं फार महत्त्वाची असतात, जी आपल्याला स्वत:कडे बघण्याच्या दृष्टिकोनाचा फेरविचार करायला लावतात. वेळोवेळी परंपरांनी सांगितलेल्या सगळ्या धारणांना हादरे देणं आवश्यक असतं.

जात्यातून पीठ नीट येण्यासाठी जात्याची खुंटी हलवून पक्की करावी लागते. त्यामुळे आपण आतून हादरलो, एवढ्या-तेवढ्या कारणानं अहंकार दुखावला तर अशा वेळी लुपिता ज्या करुणेबद्दल बोलते आहे, त्याचा सराव सगळ्यांनीच सुरू करणं आवश्यक आहे.

.............................................................................................................................................

लुपिता यांची ओप्रा विनफ्रे यांनी घेतलेली मुलाखत

.............................................................................................................................................

लेखिका माधवी वागेश्वरी चित्रपट क्षेत्रात कार्यरत आहेत. 

madhavi.wageshwari@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 21 November 2019

आयशप्पत परत तेच वर्णद्भेद आणि वंशद्वेषाचं नेहमीचं तुणतुणं वाजवलंय. कंटाळा कसा येत नाही. नेहमी गोऱ्यांनी कल्याणवर अत्याचार केले म्हणून कंठशोष केला जातो. पण बॉबव्ही ची आकडेवारी कधी तपासलीये? बॉबव्ही म्हणजे BobV म्हणजे Black-on-Black Violence. काळू लोकांचे मुडदे गोऱ्यांनी किती पाडलेत आणि काळ्यांनी किती पाडलेत याची थोडी आकडेवारी इथे मिळेल : https://en.wikipedia.org/wiki/Race_and_crime_in_the_United_States#Homicide सांगायचा मुद्दा काये की अमेरिका हा एकसंध समाज नसून आपापले वांशिक गट आपापल्या वांशिक गटात रत असतात.

बाकी, वरवरच्या शारीरिक सौंदर्याला फुकट डोक्यावर चढवून ठेवायची गरज नाही. एका स्त्रीचा संघर्षमय प्रवास म्हणून लुपिताचं आत्मचरित्र वाचायला आवडेल. मात्र त्यात वर्णभेद, वंशभेद वगैरे पुचाट पाणी नको.

-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

सिनेमा हे संदीप वांगा रेड्डीचं माध्यम आहे आणि त्याला ते टिपिकल ‘मर्दानगी’ दाखवण्यासाठी वापरायचंच आहे, तर त्याला कोण काय करणार? वाफ सगळ्यांचीच निवते… आपण धीर धरायला हवा…

संदीप वांगा रेड्डीच्या ‘अ‍ॅनिमल’मधला विजय त्याने स्वत:वरच बेतलाय आणि विजयचा बाप बलबीर त्याने टीकाकारांवर बेतलाय की काय? त्यांचं दुर्लक्ष त्याला सहन होत नाही, त्यांच्यावर प्रेम मात्र अफाट आहे, त्यांच्या नजरेत प्रेम, आदर दिसावा, यासाठी तो कोणत्याही थराला जायला तयार आहे. रेड्डीसारख्या कुशल संकलकानं हा ‘समीक्षकांवरच्या, टीकाकारांवरच्या अतीव प्रेमापोटी त्यांना अर्पण केलेला’ भाग काढून टाकला असता, तर .......