‘शिवाजी कोण होता?’प्रमाणे ‘असा होता टिपू सुलतान’ घराघरात पोहचवायला हवे!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शीतल चव्हाण
  • ‘असा होता टिपू सुलतान’चं मुखपृष्ठ
  • Fri , 15 November 2019
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस असा होता टिपू सुलतान Asa Hota Tipu Sultan सरफराज अहमद Sarfraj Ahamad

इतिहासाचं आणि महापुरुषांच्या चरित्राचं विकृतीकरण करून धार्मिक ध्रुवीकरण करत भावनेचं राजकारण केलं जात आहे. अशा काळात सरफराज अहमद यांचं टिपू सुलतानाचा खरा इतिहास मांडून सांस्कृतिक दहशतवादाला सुरुंग लावणारं ‘असा होता टिपू सुलतान’ हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालं, ही मोठी आनंदाची बाब आहे. छत्रपती शिवरायांना ‘मुसलमानांविरुद्ध लढणारा हिंदू राजा’ अशा प्रतिमेत अडकवून त्यांची रयतेच्या कल्याणकारी स्वराज्याची व्यापक संकल्पना झाकली गेली. तद्वतच टिपूलाही हिंदूद्वेष्टा, माथेफिरू अन मूलतत्त्ववादी ठरवून बदनाम केलं गेलं.

टिपूचं मूळ धर्मसहिष्णू, अभ्यासू, इंग्रजी वसाहतवादाचे भयानक परिणाम ओळखून त्याला भारतातून हुसकावून लावण्यासाठी पराक्रमाची पराकाष्टा करणारं, शोषणावर आधारित इंग्रजी व्यापार व उत्पादनपद्धतीला पर्याय म्हणून सहकारी - समाजवादी तत्त्वावर आधारित अन तंत्रज्ञानाची जोड असलेली नवी उत्पादन व्यववस्था आणणारं, शिक्षण - शेती अन उद्योगधंदे याबाबत कमालीची दूरदृष्टी असणारं, जगातील अनेक प्रकारच्या प्रशासकीय व्यवस्थेचा अभ्यास करून लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था उभी करणारं, शेती क्षेत्राला मुबलक सिंचन व्यवस्था पुरवून शेती क्षेत्राला पूरक व्यवसाय/ व्यापाराला चालना देणारं व्यक्तिमत्त्व झाकून ठेवण्यात आलं.

ज्या इंग्रजांविरुद्ध लढण्यात टिपूनं हौतात्म्य पत्करलं, त्या इंग्रजांच्या निगराणीत लिहिलेला चुकीचा इतिहास संदर्भ म्हणून वापरत तथाकथित इतिहासकारांनी टिपूला चुकीच्या पद्धतीनं रंगवण्यात आपल्या लेखण्या कशा झिजवल्या आणि खरा टिपू कोण अन कसा होता, हे भक्कम पुराव्यानिशी मांडण्यात सरफराज यशस्वी झाले आहेत. 

इतिहास म्हणजे फक्त भुतकाळातील घटनांचा लेखाजोखा म्हणून वाचायचा नसतो, तर इतिहासाचा अभ्यास करून समाजाच्या बदलाचे नियम, सामाजिक बदलांमागील प्रेरणा समजून घ्यायच्या असतात, हे सांगणारा कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धान्त प्रसिद्ध आहे. ‘आजवरच्या इतिहासकारांनी जग कसे आहे याचेच नुसते वर्णन केले, पण प्रश्न आहे तो जग बदलण्याचा!’ असंही मार्क्स म्हणतो. सरफराज यांच्या पुस्तकात इंग्रजांच्या वसाहतवादामुळे भारताच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक विश्वात झालेले बदल अधोरेखित केले आहेत आणि या बदलांमुळे होणारा दुष्परिणाम टाळण्यासाठी टिपू सर्व आघाड्यांवर पर्यायी मार्ग तयार करतो याचं विवेचन केलं आहे. म्हणूनच इंग्रजांची त्या वेळची वसाहतवादी प्रवृत्ती खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकिकरण, वित्तीय भांडवलशाही या नव-साम्राज्यवादी रूपात आज सर्वसामान्यांसमोर हैदोस घालत असतानाच्या काळात टिपूचा इतिहास, हा या शक्तीविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारा आणि मार्गदर्शक आहे. 

भांडवली व्यवस्था ही अचानक आलेली नाही. सरंजामशाहीच्या पोटात बदलती उत्पादन पद्धती आणि बदलते उत्पादन सबंध याचा परिपाक म्हणून ती जन्माला आली आणि वाढीस लागत लागत आजच्या गुंतागुंतीच्या स्वरूपापर्यंत पोहचली. ज्याप्रमाणे सरंजामशाहीच्या पोटात भांडवशाहीचा उदय झाला, तद्वतच भांडवलशाहीतले अंतर्विरोध टोकाला जाऊन भांडवलशाहीच्या पोटातच नव्या व्यवस्थेच्या उदयाची अपरिहार्यता निर्माण होते. हे सगळे बदल आपसूक होत नाही, तर ते घडवून आणण्यासाठी श्रमिक वर्गाला इतिहासाचा मागोवा घेत, त्यातून प्रेरणा घेत मार्गक्रमण करावं लागतं. ही प्रेरणा जुन्या राजेशाही व्यवस्थेतूनही मिळू शकते. या प्रेरणेचे स्त्रोत छत्रपती शिवाजी आणि टिपू सुलतानही असू शकतात, हे यानिमित्तानं लक्षात घ्यायला हवं. राजेशातील महापुरुषांच्या इतिहासाला पुन्हा आणि खऱ्या अर्थानं प्रकाशित करून प्रेरणा निर्माण करणाऱ्या लिखाणाचं स्वागत व्हावयास हवं. 

सरफराज यांच्या लिखाणाचं अजून एक वैशिष्ट्य असं की, त्यांच्या प्रत्येक मांडणीमागे भक्कम पुरावे आणि संदर्भ आहेत. टिपू हा मुसलमान होता आणि म्हणून वाईट होता हा एकच संदर्भ (!) घेऊन टिपूची बदनामी करणाऱ्या उतावळ्या अन् प्रचारकी लोकांचा खोटारडेपणा सरफराज जागोजागी उघड करतात.

टिपू, निझाम आणि पेशवे या भारतातल्या सत्तांनी एकत्र येऊन इंग्रजी वसाहतवादाविरुद्ध लढावं असं ठरलेलं असताना टिपूला विश्वासात न घेता ‘सालबाईचा तह’ करून इंग्रजांना मदत करणारे पेशवे देशद्रोही नाहीत का? मंदिर अन देवी - देवतांच्या मूर्त्या फोडणारे मुस्लीम राज्यकर्ते हिंदू धर्मद्वेष्टे, तर मग श्रृंगेरीच्या मठावर हल्ला करून तिथल्या सरस्वतीची मूर्ती फोडणारे सांगलीकर पटवर्धन धर्मद्रोही नाहीत का? सांगलीकर पटवर्धनांनी फोडलेल्या त्याच श्रृंगेरीच्या मठाच्या दुरुस्तीसाठी मदत करणारा टिपू हिंदूद्वेष्टा कसा? तब्बल १००हून अधिक मंदिरांना जमिनी, देणग्या अन् दिवाबत्तीसाठी पैसा देणारा टिपू धर्मांध अन माथेफिरू कसा? आपल्या पदग्रहणाच्या वेळीच ‘इकरारनामा’ मांडून त्यात प्रजेत धर्म व वंशभेद करणार नाही, असं सांगणारा टिपू नंतर प्रजेला खुश करण्यासाठी धर्मसहिष्णुतेचं सोंग घेणारा कसा? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं पुराव्यासह देत सरफराज यांनी खोटा इतिहास रचणाऱ्यांच्या कानशिलात लगावली आहे. 

टिपू सुलतानचा खोटा इतिहास खोडून काढत खरी आणि वास्तविक मांडणी करण्याबरोबरच सरफराज यांनी टिपूबाबत माहीत नसलेल्या अनेक घटना प्रकाशात आणल्या आहेत. टिपूने देशातला पहिला साखर कारखाना उभारला, ‘फौजी अखबार’ या नावानं देशातलं पहिलं वृत्तपत्र चालू केलं, जेकोबियन क्लब गणराज्याची स्थापना करून आपला स्वतंत्र ध्वज फडकावला, जनगणना करून शिक्षण सक्तीचं केलं, विद्यापीठाची स्थापना केली, जखमी सैन्याला दवापाणी करण्यासाठी व्यक्तिगत लक्ष युनानी आणि आयुर्वेदिक आरोग्य सुविधा पुरवली, प्रशासनात लोकभाषेचा वापर केला, स्वतंत्र ग्रंथालय उभारून अनेक विषयावर पुस्तकं लिहिली - प्रकाशित केली,  नवीन तंत्रज्ञानाचा वापर असणारे अनेक कारखाने उभारले, धरण बांधून त्यातल्या पाण्यावर शेतीचं उत्पादन वाढवणाऱ्या शेतकऱ्यांना करात सवलत दिली, बॅंका उभारल्या, लोकांकडून भाग भांडवल जमा करून उद्योग उभारले अन छोट्या गुंतवणूकदारांना जास्त नफा दिला, सरकारी उच्च पदावर नेमणुका करताना धर्म अन वंशावरून भेदभाव केला नाही, इतर धर्माचे पंडित, स्वामी यांचा आदर केला, स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली, मनुष्यहानी नको म्हणून शत्रू सैन्याला सोडून द्यावं असे हुकूम दिले.

टिपूबाबतच्या अशा अनेक नवीन बाबी सरफराज पुराव्यानिशी समोर आणतात. हे सगळं करताना कुठलाही अभिनिवेश सरफराज आणत नाहीत किंवा अतिशयोक्ती करत नाहीत. ख्रिश्चन पादऱ्यांच्या धर्म प्रचारावर टिपूनं निर्बंध आणले, हे मान्य करतात अन् त्यामागचे राजकीय कारणही समजावून सांगतात. 

टिपूनं सक्तीनं धर्मांतर घडवून आणलं हा दावा कसा तथ्यहीन आहे, हेही समजावून देतात. एका विशिष्ट समाजाला अन् त्या समाजातील महापुरुषांना बदनाम करण्याचा काही शक्तींचा डाव सरफराज या तरुण लेखकाला अस्वस्थ करतो. पण या अस्वस्थतेला सरफराज विधायक वळण देतात आणि अभ्यासावर, संशोधनावर, संदर्भ अन पुराव्यावर आधारीत इतिहासाची नव्यानं मांडणी करतात. आपल्या समाजातील महापुरुषाला बदनामीतून मुक्त करण्यासाठीच नाही तर त्यांच्या इतिहासातून प्रेरणा घेत आजच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लिहितात ही फार कौतुकाची बाब आहे. 

शोषक विरुद्ध शोषित हाच मानव जातीच्या इतिहासातील खरा संघर्ष असताना सर्वसामान्य लोकांमध्ये जात, धर्म, पंथ अन वंश या कृतिम विभागणीद्वारे फूट पाडणाऱ्या शक्तींना नेस्तनाबूत करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा खरा इतिहास आजही मार्गदर्शक आणि रिलेव्हंट आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता’ हे छोटेखानी पुस्तक लिहून शिवाजीमहाराज घराघरात पोचवले. त्याच पद्धतीनं सरफराज यांचं ‘असा होता टिपू सुलतान’ हे पुस्तकही सर्वदूर पोहचावं. पिळवणूक करणाऱ्या व्यवस्थेला अन पिळवणुकीमुळे निर्माण झालेल्या असंतोषाला धार्मिक-जातीय वळण देत दाबू पाहणाऱ्या शक्तींना मुळासकट उपटून फेकण्यासाठी हा इतिहास प्रेरणादायी ठरो!

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 21 November 2019

शीतल चव्हाण,

टिपूने हिंदूंच्या कत्तली केल्या हे आम्हांस माहितीये. त्याला फुकटचा डोक्यावर चढवून ठेवायला हिंदू मेल्या आईचं दूध प्यालेले नाहीत. हिंदू लिंगायत महिलांचे स्तन छाटणारा टिपू म्हणे धर्मसहिष्णु. फार छान. जे कळायला पाहिजे ते कळलं आम्हांस.

आपला नम्र,
-गामा पैलवान


Sandesh Bhagat

Sat , 16 November 2019

पूस्तक मार्केट मध्ये आलं आहे का ? कुठे मिळेल


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......