अजूनकाही
२१ ऑक्टोबर २०१९ रोजी पार पडलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाचे आकडे नुकतेच उपलब्ध झाले आहेत. राज्यात एकूण ६०.६२ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. याशिवाय मतदारसंघनिहाय आकडेदेखील उपलब्ध झाले आहेत.
या आकडेवारीचा अभ्यास केल्यानंतर काय दिसतं?
मतदारसंघनिहाय मतदानाच्या टक्केवारीचा नकाशा
फक्त ७० टक्क्यांपेक्षा जास्त आणि ४५ टक्क्यांपेक्षा कमी मतदान झालेल्या जागांवरच मतदारसंघाचे नाव व टक्केवारी दाखवली आहे.
वरील नकाशामध्ये शहरी भाग अतिशय लहान दिसतात. त्यामुळे त्यांचा एकूण परिणाम दर्शवण्यासाठी खालील नकाशा कामी येईल. या नकाशात प्रत्येक मतदारसंघ समान आकाराचा दिसावा अशी रचना केलेली आहे. या नकाशाच्या आधारे आपण शहरी भागातील (मुंबई-पुणे-नागपूर) पडत्या टक्केवारीचा वेध अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.
या नकाशातील सर्वांत अधिक मतदान झालेले दहा मतदारसंघ पुढील कोष्टकात पाहता येतील.
या नकाशातील सर्वांत कमी मतदान झालेले दहा मतदारसंघ पुढील कोष्टकात पाहता येतील.
याच प्रकारचा नकाशा २०१९च्या लोकसभा निवडणुकीतील मतदारसंघनिहाय मतदान टक्केवारीचाही काढता येतो.
याच माहितीचा शहरी भागातील मतदानाचा परिणाम अधिक स्पष्ट करणारा नकाशा.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तुलना करता खालील ५ जागांवर मतदानात सर्वांत अधिक घट झाली आहे. या घटलेल्या टक्केवारीची कारणे चुरशीचा अभाव, लोकांचा भ्रमनिरास इत्यादी असू शकतात.
तर खालील ५ जागांवर मतदानात सर्वांत अधिक वाढ झालेली आहे. या वाढलेल्या टक्केवारीची कारणे वाढलेली चुरस ३ किंवा अधिक तुल्यबळ उमेदवार इत्यादी असू शकतात.
निकालाच्या दिवशी अशा मतदारसंघातील स्थिती पाहणं रोचक असेल. उद्या पाहू या नेमकं काय होतं ते!
............................................................................................................................................................
लेखक ऋग्वेद शेणई हे ‘ProNeta Constultants’चे संचालक आहेत.
rigved.shenai@proneta.in
............................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment