अमेरिकेत चार लाख भारतीयांपैकी ५० हजार मोदींच्या सभेसाठी आणि हरियाणात ४८५८ क्लर्कच्या जागांसाठी १० लाख उमेदवार... बहुत ना इन्साफी है!
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
कॉ. भीमराव बनसोड 
  • अमेरिकेतील कार्यक्रमात मोदी-ट्रम्प आणि हरियणात क्लर्कच्या परीक्षेसाठी निघालेले तरुण
  • Thu , 03 October 2019
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प इम्रान खान हरयाणा

आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिकेचा दौरा करून परत आले आहेत. आल्यानंतर त्यांनी आपले जोरदार स्वागत करवून घेतले. प्रत्येक गोष्टीचा मोठा गवगवा करणे, ही त्यांच्या आत्ममग्नतेतून आलेली वृत्ती आहे. अन्यथा त्यांच्या आधीच्या पंतप्रधानांनी अमेरिकेसह इतरही विदेश दौरे केले नाहीत असे नाही. पण मोदींना त्याचा डामडौल करण्याची हौस आहे.

पंतप्रधान मोदींनी यावेळी एका कामात दोन कामे केली. म्हणजे गेले होते युनायटेड नेशनमध्ये पर्यावरणासंबंधाने भारताची भूमिका मांडण्यासाठी, पण गेलेच आहेत तर तेथे नजीकच्या काळात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा बिगूलही त्यांनी वाजवून टाकला. तेथील अध्यक्षपदाचे एक उमेदवार आहेत, विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. या दोघांनी मिळून भारताच्याच खर्चाने तेथे ‘हाउडी मोदी’ नावाचा कार्यक्रम घेतला. राहुल गांधी यांच्या मते या कार्यक्रमाचा एकूण खर्च आला १.४५ लाख कोटी रुपये. पण पैशाची चिंता करण्याचे कारण नाही. कारण मोदींनी नुकतेच आरबीआय बँकेतून १.७६ (१ लाख ७६ हजार कोटी रुपये) काढले आहेत. ते पैसे अशा विदेश दौऱ्यांसाठी व तिकडील कार्यक्रमासाठी पुरेसे आहेत.

कार्यक्रमाला एकूण ५० हजार भक्तगण होते असे म्हणतात. ते संपूर्ण अमेरिकेतून आले होते. ते स्वखर्चाने आले होते की, भारतात होणाऱ्या प्रचंड सभेसाठी लोकांना जसे, चहा-पाणी, नाष्टा-जेवण, प्रवास खर्च व दिवसभराची मजुरी द्यावी लागते, त्या पद्धतीने आणले होते, याचा उलगडा अजून झाला नाही. पण हे भारतीय गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत कामधंदे व नोकरीनिमित्त राहत असल्यामुळे त्यांनी खाणेपिणे व प्रवासाइतकी माया तर निश्चितच जमा केली असेल, असे आपण गृहीत धरू.

पण या संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च तेथील अमेरिकनांनीच केला असे भाजपवाल्यांकडून सांगण्यात येते. एरवीही ते भाजपच्या येथील निवडणूक खर्चासाठी तिकडून निधी पाठवत असतातच. त्यावरूनही आपणाला याची कल्पना येऊ शकते. अमेरिकेत असलेल्या एकूण चार लाख भारतीयांपैकी हे ५० हजार बरेच असले तरी त्याच दरम्यान भारतातील एकट्या हरियाणात झालेल्या ४८५८ क्लर्कच्या जागांसाठी १५ लाखांपेक्षा जास्त अर्ज व १० लाखांपेक्षा जास्त उमेदवार मुलाखतीसाठी राज्यभरातील विविध केंद्रावर गेले होते. त्या १० लाख उमेदवारांच्या मानाने या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांची संख्या कमीच होती, असे म्हणावे लागेल.

पण ते काहीही असले तरी एकूण कार्यक्रम मात्र जंगी झाला हे नक्की. एकतर हे ५० हजार म्हणजे अमेरिकेतील चार लाख भारतीय मतदारांचे प्रतिनिधीत्व करत होते. एकूण अमेरिकनांच्या एक टक्के एवढी ही मतदार संख्या आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या दृष्टीने येणाऱ्या निवडणुकीसाठी ती महत्त्वाची उपलब्धी होती. भारतीय निवडणुकीतील भक्तगणांच्या ‘अब की बार, मोदी सरकार’ या घोषणेप्रमाणेच मोदींनीही तेथे ‘अब की बार, ट्रम्प सरकार’ अशी घोषणा ठोकून दिली.

एक प्रकारे तेथील ट्रम्प यांच्या निवडणुक प्रचाराचा नारळच त्यांनी फोडून टाकला. त्यामुळे ट्रम्पही उपकृत झाले. तेथून पुढे होणाऱ्या मोदी यांच्या भाषणाला एकप्रकारे त्यांची मूक संमतीच होती, असे त्यांच्या अविर्भावावरून वाटत होते. याचा मोदी फायदा न घेते तर ते मोदी कसले? त्यांनी तेथेच काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या मुद्याला उपस्थितांची संमती घेतली. उपस्थित म्हणजे कोण? तर काश्मीरमध्येच नव्हे तर भारतातही न राहणारे अमेरिकन भारतीय. त्या सर्वांनी या कलमाला मोठ्या उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला.

हे कलम हटवण्याची प्रतिक्रिया तीव्र होईल या जाणीवेने काश्मीरला आज तुरुंगाचे स्वरूप आणले गेले. तेथील लोकांना घराच्या बाहेर पडता येत नाही व बाहेरच्यांना त्यांच्याकडे जाता येत नाही. घराच्या खिडकीतूनही जरी त्यांनी बाहेर डोकावले तर त्यांना नखशिखांत सशस्त्र असलेला जवान दिसतो.

औषधाविना तेथील रुग्णांचे हाल होत आहेत. शाळा बंद पडल्या आहेत. रात्रीच्या वेळी सशस्त्र जवान त्यांच्या घरात घुसून तरुणांना पकडून आणत आहेत. त्यांनी तेथे काय धुडगूस घातला आहे, त्याच्या विस्तारात येथे जात नाही. पण तेथील संपूर्ण जनजीवन ठप्प झाले आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पण ‘हलवायाच्या घरावर तुळशीपत्र’ ठेवायला कोणाचे काय जाते! आपलं बरं चाललं ना, बस्स झालं, अशी वृत्ती या अनिवासी भारतीयांची झालेली दिसते. भारतातील भारतीयांप्रमाणेच अमेरिकेतील अनिवासी भारतीयांनी या कलमाला पाठिंबा देऊन टाकला.

भारतात न राहणाऱ्या पण भारतात राहणाऱ्या भारतीयांची काळजी वाहण्यासाठीच जणू तेथे आलेल्यांच्या मनातील प्रश्न, आपल्या आत्मशक्तीने ओळखणाऱ्या मोदींनी उपस्थितांना उद्देशून म्हटले- ‘तुम्ही विचारत असाल की, ‘हाऊडी मोदी?’. भारतात कसे काय चालले आहे? तर भारतात सर्व काही ठीक चालू आहे.’ हे एकच वाक्य त्यांनी पाठ केलेल्या चार-पाच भाषेतून उच्चारले. साद घालण्यासाठीच आलेल्या उपस्थितांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्या बिचाऱ्यांना काय माहीत की, क्लार्कच्या मुलाखतीसाठी गेलेल्या तरुणांची हरियाणातील रेल्वे व बसेसमध्ये इतकी गर्दी होती की, त्या सर्व ओसंडून वाहत होत्या. बसायलाच नव्हे तर उभे राहायलाही जागा नसल्यामुळे रेल्वे व बसेसच्या टपावर बसून त्या बेकारांनी प्रवास केला. यात चार-पाच तरुणांचा अपघात होऊन मृत्यू झाला. काही परीक्षा केंद्रावर १४४ कलम लावावे लागले. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना काही ठिकाणी लाठीचार्ज करावा लागला. ही आकडेवारी व वृत्तांत रवीश कुमार यांचा आहे.

याच दरम्यान उत्तर प्रदेशमधील एक लॉ कॉलेजची बलात्कारित विद्यार्थिनी तुरुंगात असून तिच्यावर बलात्कार करणारा स्वामी चिन्मयानंद (हे भाजपचे माजी केंद्रीय मंत्री) मात्र वातानुकुलित दवाखान्यात आहेत. उन्नावमधील बलात्कारितेचा जबाब एम्समध्ये घ्यावा लागला असून तिचे वडील, काका व इतर आप्तेष्टांचा कायमचाच काटा काढण्यात आला आहे. मध्य प्रदेशमध्ये शौचालय नसल्याने उघड्यावर शौच कराव्या लागलेल्या दोन अल्पवयीन अस्पृश्य मुलांना जीवंत मारून टाकण्यात आले.

अशा प्रकारे विविध निमित्ताने रस्त्यावर मारून टाकण्याच्या घटना भारतात नित्यनेमाने घडत आहेत. पीएम बँकेची दिवाळखोरी जाहीर करून तेथील सर्व आर्थिक व्यवहार रिझर्व्ह बँकेने ठप्प केले आहेत. त्यामुळे तेथील खातेदार रडकुंडीला आले. आता लक्ष्मीविकास बँकेचेही तेच हाल सुरू आहेत. देशात बेकारीबरोबरच महागाईने कहर केला असून भारतातील कांद्याने पन्नाशी पार केली आहे, तर पेट्रोल ८०च्या वर गेले आहे. यासारख्या कशाचीच या अनिवासी भारतीयांना गंधवार्ता नसेल असे नाही. पण अमेरिकेत आपले व भारतातील आपल्या नातेवाईकांचे बरे चालले ना! मग फालतू बाबीत लक्ष घालण्याचे कारण काय? हा साधा विचार त्यांनी केला असावा.

आणि मोदींचे काय? ते तर भारतात असून नसल्यासारखेच आहेत. ‘राजाला दिवाळी’ म्हणतात त्यासारखा त्यांचा कारभार आहे. एकूण त्यांचंही बरंच चाललं आहे. अधूनमधून आशीर्वादासाठी आईला भेटायला जावं लागतं इतकंच. पत्नीला भेटायची गरज नाही, कारण त्या न मागताच आशीर्वाद देऊन टाकतात. असो. एकंदरीत मोदींचा अमेरिका दौरा भक्त गणंगासाठी चांगलाच राहिला.

मोदींचा अमेरिका दौरा चालू असतांनाच तिकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही त्याच दौऱ्यावर गेले. कारण त्यांनाही तेथे युनायटेड नेशन्सला पर्यावरणाच्या विषयावर संबोधित करायचे होते. जाताना ते व्हाया सौदी अरेबिया गेले. तेथे त्यांचे मित्र राजपुत्र क्राउन प्रिन्स मोहम्मद बीन सलमान यांना भेटले. इस्लामिक देशाचा आपला एक मित्र एका खटारा विमानाने न्यूयॉर्कला जात आहे हे त्यांना बरे वाटले नाही, म्हणून मित्रत्वापोटी त्यांनी आपले खाजगी विमान इम्रान खान यांना त्या प्रवासापुरते दिले. त्यांच्याकडे तेलाचा बक्कळ पैसा आहे. पण त्यांच्याही दोन मोठ्या तेल उत्पादक केंद्रावर येमेनच्या हुती विद्रोह्यांनी ड्रोन हमले करून त्यांची बरीच हानी केली आहे. हे हमले त्यांचा पारंपारिक शत्रू इराणने केले असे त्यांचे व त्यांचा मित्र अमेरिकेचे मत आहे. अशा वादात पुढे चालून त्यांना सर्वच मित्रांचे मित्रत्व घट्ट करायचे आहे. ही त्यांचीही गरज आहे.

इम्रान खान यांनी युनोच्या सभेत स्वाभाविकपणेच काश्मीरचा विषय काढला. आपल्या भाषणात त्यांनी खाडीतील काश्मिरी जनतेची सद्य परिस्थिती कशी आहे, याचे वर्णन करून त्यांच्यापूर्वी भाषण केलेले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे फॅसिस्ट विचारसरणी असलेल्या संघाचे आजीवन सभासद आहेत हे सांगितले. ते कसे हिटलर, मुसोलिनी यांच्या फॅसिस्ट विचारसरणीला आदर्श मानतात, मुस्लीम आणि ख्रिश्चनांबद्दल देशात कसा द्वेष पसरवतात, २००२मध्ये ते मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये कशा मुस्लिमांच्या कत्तली घडवून आणल्या होत्या, त्यामुळे त्यांना अमेरिकेने पुढील काळात कसा व्हिसा नाकारला होता इत्यादी बऱ्याच बाबी त्यांनी आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात सांगितल्या. त्यांना प्रतिसादही बरा मिळाला.

त्याचबरोबर आम्ही भारताशी चर्चा करायला तयार आहोत पण तेच चर्चेचा मार्ग धुडकावून लावतात. निवडणुकापुरते त्यांनी बालाकोटचा हल्ला केला असेल असे आम्ही समजत होतो, पण ते तसे नाही हे आत्ता आमच्या लक्षात आले. या हल्ल्यामुळे आमचे फारसे नुकसान झाले नाही, १०-१५ झाडे पाडून आमच्या पर्यावरणाचे मात्र त्यांनी नुकसान केले. पण आम्ही तेथे पुन्हा झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करत आहोत असेही सांगायला ते विसरले नाहीत. त्यांचे हे भाषण अथवा त्यातील हे मुद्दे भारतातील मुख्य मीडियाने दाखवले नसले तरी बीबीसीने मात्र दाखवले आहे व त्यांचे संपूर्ण भाषणही युट्युबवर उपलब्ध आहे.

युनोतील भाषणापूर्वी इम्रान खान अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही भेटले. ट्रम्प यांनीही ‘मोदी कालच्या सभेत जरा जादाच बोलले’ अशी खंत इम्रान खान यांच्याकडे व्यक्त केली. कारण ते उपस्थित असलेल्या ‘हाऊडी मोदी’च्या सभेत मोदींनी पाकिस्तानचे नाव न घेता ‘ज्यांना आपला स्वतःचा देष चालवता येत नाही, ते देश काश्मीरवरून भारताला विरोध करत आहेत’ असे म्हटले होते. ट्रम्प यांना त्याचा खरोखरच पश्चाताप झाला होता की, त्यांच्यातील व्यवहार ज्ञान तसे बोलत होते हे एखादा मानसोपचार तज्ज्ञच सांगू शकेल. पण ते तसे बोलले हे मात्र खरे. कारण त्यांना या दोन्ही देशांना सांभाळायचे आहे. पाकिस्तानची अफगाणिस्तान वगैरे प्रश्नी मदत होईल, असे त्यांना वाटते तर दुसरीकडे भारताची मोठी बाजारपेठ त्यांना दिसते. चीनबरोबर चालू असलेल्या सध्याच्या व्यापार युद्धात भारताची मदत होऊ शकेल, असा भरवसा त्यांना वाटतो. म्हणून त्यांना अशी कसरत करावी लागते.

एकूणच प्रचंड असा इव्हेंट घडवून आणलेल्या मोदींच्या या अमेरिकन दौऱ्याचा भारताला काय फायदा झाला? भारताला फायदेशीर असे काही करारमदार तेथे झालेत काय? याची कोणतीही वाच्यता मोदींनी दौऱ्यानंतरच्या आपल्या जंगी स्वागत समारंभातही केली नाही. याप्रमाणे ‘कहां गये थे? तो कहीं नहीं. क्या लाये? तो कुछ नही.’ अशीच त्यांच्या या दौऱ्याची फलश्रुती झालेली दिसते.

.............................................................................................................................................

रवीश कुमारच्या ‘द फ्री व्हॉइस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. 

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Tue , 08 October 2019

नुसती जळजळ !


कॉम्रेड भीमराव, तुमची बरीच जळजळ झालेली दिसतेय. ती थांबली की जरा इथे पहा : https://en.wikipedia.org/wiki/List_of_rallies_for_the_2016_Donald_Trump_presidential_campaign#General_election_season


ही किनई २०१६ सालच्या ट्रंपतात्यांच्या निवडणूक अभियानाची आकडेवारीची तालिका आहे. तिच्यात उपस्थितीचे आकडेही आहेत. ते जरा पाहून घ्या. सर्वोच्च आकडा २८,००० (अक्षरी अठ्ठावीस हजार) आहे. फ्लोरिडातल्या टांपा मध्ये अभियान होतं तेव्हाचा. आता मोदींच्या वेळेस उपस्थिती बघा. तब्बल ५०,००० (अक्षरी पन्नास हजार) आहे. काही आगापिछा लागतोय का? मोदींनी एकहाती एव्हढी गर्दी खेचली आहे.

आणि सभेचा खर्च १.४५ लाख कोटी रुपये होता ही माहिती कुठून काढली तुम्ही? जरा विश्वासार्ह आकडे टाकंत चला.

तुम्ही म्हणता की मोदींनी केलंच काय तिथे जाऊन. तुमचा मोदीद्वेषाचा चष्मा बाजूल काढलात तर तुम्हाला एक बातमी दिसेल. गुपित वगैरे काही नाहीये. उघड घटना आहे. मोदींसोबत गेलेले परराष्ट्र मंत्री सुब्रह्मण्यम जयशंकर म्हणतात की :

रशियाकडून काय खरेदी करावं आणि करू नये हे तिसऱ्या देशानं सांगू नये: एस. जयंशंकर


मला एक सांगा, अशी भाषा गेल्या पन्नास वर्षांत प्रत्यक्ष अमेरिकेत जाऊन कोणी अमेरिकेस ऐकवली आहे काय?
आणि तुम्ही विचारताय की मोदींनी केलंच काय तिथे जाऊन. मी म्हणतो झक मारली असेल, पण अशी जबरदस्त मारलीये की तुमची बोलती बंद पडलीये.

आपला नम्र,
गामा पैलवान


Shashank

Mon , 07 October 2019

sagli banva banvi chalu ahe...


Vivek Date

Sun , 06 October 2019

According to the 2010 United States Census, the Asian Indian population in the United States grew from almost 1,678,765 in 2000 (0.6% of U.S. population) to 2,843,391 in 2010 (0.9% of U.S. population), a growth rate of 69.37%, one of the fastest growing ethnic groups in the United States. The 50,000 who attended Na Mo rally is Houston is less than 2% of that number. The TV and print media in the USA gave no coverage to that event, at best couple of articles were written. Most of those who attended are US citizens and do not vote in India. Those who are still citizens of India have interest in Indian Politics and that is fine. Most Indian Americans have taken zero interest in NaMo Houstan rally. Trump attended hoping some votes for him if he is nominee in the next election in US and that is now in doubt. NaMo talking of US elections at the rally in support of Trump is a stupid thing to do. He can not infuluence vote of Indian Americans in US elections. The whole event was non-event.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......