जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन शांतता आणि सलोख्याच्या मार्गाने पूर्वपदावर आणावे
पडघम - देशकारण
गणेश देवी आणि इतर
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जम्मू-काश्मीरचा नकाशा
  • Mon , 30 September 2019
  • पडघम देशकारण नरेंद्र मोदी Narendra Modi जम्मू-काश्मीर Jammu and Kashmir लडाख Ladakh

प्रति

श्री. नरेंद्र मोदी

पंतप्रधान, भारत सरकार

माननीय महोदय,

सहिष्णुता आणि सलोखा ही आपल्या महान राष्ट्राची वैशिष्ट्ये आहेत. राष्ट्र उभारणीची निरंतर प्रक्रिया ही राष्ट्रातील जनतेच्या भावनिक अनुबंधावर अवलंबून असते. नागरी स्वातंत्र्याशिवाय व्यक्ती आणि समाजाची प्रगती शक्य नाही, हे इतिहासाने सिद्ध केले आहे.

सध्या जम्मू-काश्मीरमधील जनता जीवनावश्यक गरजा आणि नागरी स्वातंत्र्यापासून वंचित असल्याने अत्यंत हलाखीच्या आणि तणावग्रस्त स्थितीमध्ये आहे. तेथील लहान मुलांच्या मनावरही विपरीत परिणाम झाला आहे. तेथील स्थानिक नेत्यांना स्थानबद्ध किंवा अटक केलेली असून त्यांचा जनतेशी संपर्क तोडण्यात आला आहे. नेतृत्वहीन समाज हे अराजकाला आमंत्रण असते.

आम्ही आपल्याला आवाहन करतो की, जम्मू-काश्मीरमध्ये नागरी स्वातंत्र्याची पुनर्स्थापना करून समाजातील सर्व घटकांशी सहानुभूतीने संवाद सुरू करावा. शांतता आणि सलोख्याच्या मार्गाने जम्मू-काश्मीरमधील दैनंदिन जीवन पूर्वपदावर आणावे. तसेच ५ ऑगस्ट २०१९ पासून अटकेत आणि स्थानबद्ध असलेले राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेची सुटका करावी. स्वतंत्र निरीक्षक आणि माध्यमातील व्यक्तींना मुक्त संचारास परवानगी देऊन जम्मू-काश्मीरमधील कारभारात पारदर्शीपणा आणावा.

कळावे

आपला नम्र

मी भारताचा नागरिक

डॉ. गणेश देवी, निमंत्रक, दक्षिणायन; राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवादल

डॉ. जी जी पारीख, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक

डॉ. सुगन बरंठ, सेवाग्राम कलेक्टिव्ह

आशिष नंदी, समाजशास्त्रज्ञ, लेखक

मलिका साराभाई, प्रसिद्ध नृत्यांगना

प्रकाश शहा

रामदास भटकळ, प्रकाशक, लेखक

फैजल खान, राष्ट्रीय संयोजक, खुदाई खिदमदगार

अरविंद अंजुम

संजीव साने, स्वराज्य अभियान, महाराष्ट्र

.............................................................................................................................................

या अर्जाला पाठिंबा देण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा - 

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdK4V

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 02 October 2019

अरे वा! पत्राचा आव तर असं की जणू काश्मिरात मोठ्ठी दुर्घटनाच घडलीये. काश्मिरी जनतेला भ्रष्ट नेत्यांची (मुफ्ती, अब्दुल्ला पितापुत्र, गुलाम नबी आझाद वगैरे यांची ) कसलीही काळजी पडली नाहीये, हे खरं दुखणं आहे. काश्मिरी हिंदू कापले गेले, त्यांच्या आयाबहिणी नासवल्या गेल्या, ते नेसत्या कपड्यांवर परागंदा झाले, तेव्हा कोणी असली पत्रंबित्रं लिहिल्याचं ऐकिवात नाही. मग आज असं काय घडलं की तथाकथित विचारवंतांना जनतेचा पुळका आला?

-गामा पैलवान


Sachin Shinde

Mon , 30 September 2019

Khup Chan he aaj hone garjeche aahe ani mazihi ashich bhavana aahe


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......