सत्ताधीशांपुढे संयतपणे पण धैर्यशीलतेने सत्य मांडणारी पत्रकारिताच लोकशाहीसाठी महत्त्वाची असते!
पडघम - माध्यमनामा
रॅमन मॅगसेसे पुरस्कार समिती
  • रवीश कुमार
  • Mon , 05 August 2019
  • पडघम माध्यमनामा रवीश कुमार Ravish Kumar रॅमन मॅगसेसे पुरस्कार Ramon Magsaysay Award एनडीटीव्ही इंडिया NDTV India

यंदाच्या रॅमन मॅगसेसे या ‘आशियातील नोबेल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एनडीटीव्हीचे वरिष्ठ कार्यकारी संपादक रवीश कुमार यांची निवड झाली आहे. त्यांची निवड करताना पुरस्कार निवड समितीने जे सन्मानपत्र जाहीर केले, ते हे. मराठी अनुवाद - मुग्धा कर्णिक

.............................................................................................................................................

भारत, जगातील सर्वांत मोठी लोकशाही. या देशात गेल्या काही वर्षांत स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचा अवकाश संकोच पावत गेला आहे. या मागे अनेक कारणे आहेत. माध्यमांची एकंदर संरचना बदलत्या माहिती तंत्रज्ञानामुळे बदलत गेली. मते आणि वृत्तांकन यांचे बाजारीकरण वाढत गेले. सरकारी नियंत्रण वाढत गेले आणि सर्वांत चिंताजनक बाब म्हणजे वाढत्या धार्मिक, वांशिक आणि राष्ट्रवादी मूलतत्त्ववादामुळे एकाधिकारशाहीला लोकप्रियता लाभत गेली. आणि परिणामतः दुही, असहिष्णुता आणि हिंसाचाराचे सहज आचरण वाढत गेले.

हा सारा धोका वाढत चाललेला असताना टेलिव्हिजन पत्रकार रवीश कुमार यांचा आवाज महत्त्वपूर्ण आहे. उत्तर भारतातील हिंदी भाषक बिहार राज्यातील जित्वारपूर या गावात लहानाचे मोठे झालेल्या रवीश यांनी इतिहास आणि नागरी घडामोडींच्या अभ्यासात रस घेतला आणि या विषयांत दिल्ली विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९६ मध्ये त्यांनी न्यू दिल्ली टेलिव्हिजन नेटवर्क (एनडीटीव्ही) या भारतातील प्रसिद्ध टीव्ही नेटवर्कमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. क्षेत्रीय वार्ताहर म्हणून सुरुवात करून त्यांची प्रगती होत गेली. भारतातील ४२ कोटी २० लक्ष प्रादेशिक भाषकांसाठी एनडीटीव्हीची ‘एनडीटीव्ही इंडिया’ ही चोवीस तासाची हिंदी वृत्तवाहिनी सुरू झाल्यानंतर त्यांना त्यांचा स्वतःचा असा ‘प्राईम टाईम’ हा खास कार्यक्रम करायची संधी देण्यात आली. आजघडीला, ‘एनडीटीव्ही इंडिया’चे ज्येष्ठ कार्यकारी संपादक असलेले रवीश कुमार हे भारतातील सर्वाधिक प्रभावी टीव्ही पत्रकार आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मात्र, त्यांचे विशेष महत्त्व त्यांनी केलेल्या पत्रकारितेच्या स्वरूपामुळे ठरत गेले. माध्यमांच्या जगातील वातावरण सरकारी हस्तक्षेपामुळे, युद्धखोरीला डोक्यावर घेणाऱ्या पक्षीय भूमिकेमुळे, ट्रोल्स आणि खोट्या बातम्या पेरणाऱ्यांमुळे, बाजारू स्पर्धेसाठी केवळ निवडक व्यक्तिमत्त्वांवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रवाहामुळे आणि लोकांचे लक्ष वेधण्यासाठी स्वस्तातले सनसनाटीकरण करण्यामुळे, पीत पत्रकारितेमुळे धोक्यात आलेले असताना, रविश कुमार यांनी व्यावसायिक मूल्ये संयतपणे, संतुलित रीतीने, वास्तवावर आधारित वृत्तांकन करण्यावर सातत्याने भर दिला आणि तसे ते सातत्याने बोलून दाखवत राहिले. त्यांच्या ‘प्राईम टाईम’ या ‘एनडीटीव्ही इंडिया’वरील कार्यक्रमात सामाजिक प्रश्नांची दखल घेतली जाते आणि त्या प्रश्नांवर सखोल संशोधन करून, चर्चा करून मग त्यावर विसाहून अधिक भागांत कार्यक्रम सादर केला जातो.

हा कार्यक्रम फारशी दखल न घेतल्या गेलेल्या सामान्य लोकांच्या वास्तव जीवनावर आधारित असतो- त्या लोकांत गटारांत उतरून सफाई करणारे कामगार आहेत, सायकल रिक्षा ओढणारे कष्टकरी आहेत, सरकारी कर्मचारी आहेत आणि विस्थापित शेतकरीही आहेत, अनुदान न मिळालेल्या शाळांचे प्रश्न आहेत आणि अकार्यक्षम रेलव्यवस्थेचेही प्रश्न आहेत. रवीश अगदी सहजपणे गरिबांशी संवाद साधतात, विपुल प्रवास करतात आणि त्यांच्या श्रोतृवर्गाशी संपर्कात राहण्यासाठी समाजमाध्यमांवरही असतात. त्यातून मिळालेल्या माहितीतून आपल्या कार्यक्रमाची बीजे गोळा करतात. लोकजीवनात घट्ट पाय रोवलेली पत्रकारिता करण्यासाठी प्रयत्नशील असलेले रवीश आपल्या न्यूजरूमला ‘लोकांची न्यूजरूम’ म्हणतात.

रवीश नाटकीपणा करत नाहीत असे नाही, योग्य तो परिणाम साधेल असे वाटले तर तेही नाट्याचा आधार घेतात. उदाहरणार्थ २०१६मध्ये त्यांनी टीव्ही वृत्तांकनातील विकृतीचे दर्शन घडवण्यासाठी आपला कार्यक्रम नाट्यपूर्ण रीतीने सादर केला. या कार्यक्रमात रवीश पडद्यावर आले आणि संतप्त आवाजांच्या नाटकी गदारोळाच्या अंधाऱ्या जगात टीव्ही वृत्त कार्यक्रम हरवल्याचे प्रेक्षकांना सांगितले. मग पडदा काळा झाला आणि पुढील एक तासभर त्या पडद्यामागून खऱ्याखुऱ्या टीव्ही कार्यक्रमांतील आवाजी गोंधळाचे, विषारी धमक्या, उन्मादी आक्रोश, शत्रूच्या रक्तासाठी तहानलेल्या गर्दीचे खिंकाळणे यांचे तुकडे ऐकू येत राहिले. रवीश नेहमीच त्रयस्थपणे मर्म पोहोचेल याची खबरदारी घेतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना रवीश संयतपणे, धारदारपणे आणि संपूर्ण माहिती घेऊनच बोलतात. ते आपल्या निमंत्रित पाहुण्यांवर दादागिरी करत नाहीत, त्यांना त्यांचे विचार मांडू देतात. पण उच्चपदस्थांना जाब विचारण्यास किंवा माध्यमांवर टीका करण्यास, देशातील बौद्धिक अवकाशाची परिस्थिती कथन करण्यास ते कचरत नाहीत. यामुळेच त्यांना सातत्याने विविध प्रकारांतल्या पिसाळलेल्या पक्षपाती लोकांकडून त्रास दिला जातो, धमक्या दिल्या जातात. या सर्व त्रासांतून, धोक्यांचा सामना करत रवीश यांनी, माध्यमांनी सामाजिक जबाबदारीचे पालन करावे, संतुलित चर्चेचा अवकाश वाढवावा आपल्या तत्त्वांपासून जराही न ढळता आपले वर्तन ठेवले आहे. लोकांची सेवा हे आपल्या कामाचे केंद्र असावे या पंथाच्या पत्रकारितेशी त्यांची निष्ठा अबाधित राहिली. एक पत्रकार म्हणून आपली निष्ठा कशावर आहे, हे रवीश अतिशय सोप्या शब्दांत मांडतात, “आपण लोकांचा आवाज बनलो असू, तरच आपण पत्रकार आहोत.”

२०१९च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारासाठी रवीश कुमार यांची निवड करताना, त्यांच्या या सर्वोच्च प्रतीच्या व्यावसायिक निष्ठेला, नैतिक मूल्यनिष्ठेला, सत्याच्या बाजूने उभे राहण्याच्या त्यांच्या नैतिक धैर्याला, नीतीनिष्ठा आणि स्वतंत्र वृत्तीला याशिवाय मूक अशा अन्यायग्रस्तांना एक स्पष्ट आणि आदरयुक्त आवाज देणे महत्त्वाचे आहे. या त्यांच्या ठाम विश्वासाला, सत्ताधीशांपुढे संयतपणे पण धैर्यशीलतेने सत्य मांडणारी पत्रकारिताच लोकशाहीची उदात्त ध्येये प्रत्यक्षात आणण्यासाठी महत्त्वाची असते, या विश्वासालाच विश्वस्त मंडळाने पुरस्काररूपे मान्यता दिली आहे.

.............................................................................................................................................

रवीश कुमारच्या ‘द फ्री व्हॉइस’ या पुस्तकाच्या मराठी अनुवादाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4527/The-free-voice

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......