वाचलीच पाहिजेत अशी एकवीस पुस्तकं
ग्रंथनामा - बुक ऑफ द वीक
टीम अक्षरनामा
  • पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 05 July 2019
  • ग्रंथनामा Grathnama बुक ऑफ द वीक Book of the Week

देशभक्ती म्हणजे राष्ट्रवाद नव्हे, उन्मादी वा असहिष्णू कट्टरवाद तर नव्हेच नव्हे. - रामचंद्र गुहा

एखादी भाषा वा धर्मश्रद्धा यांच्यावरील निष्ठा आणि देशाविषयीचे प्रेम यांची सांगड तोडू पाहणे ही महात्मा गांधींची अद्वितीय प्रतिभा; तर इतर संस्कृती आणि देश यांचे उघड कौतुक करतानाच, आपल्या देशावरही प्रेम करता येते, हे दाखवून देणे ही रवींद्रनाथ टागोरांची अद्वितीय प्रतिभा. पाकिस्तान आाणि इस्त्रायल अशा दोन टोकाच्या देशांत, नागरिकत्व हे समान धर्मश्रद्धा, समान भाषा आणि समान शत्रू यांच्या स्वीकारावर ठरते.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3289

...............................................................................................................................................................

‘मोदीपर्व’ : ‘आयडिया ऑफ इंडिया’ला धक्का पोचवणारी वर्षे - सतीश देशपांडे

केवळ सत्तेच्या भोवतालचे सर्वच नव्हे, पण जास्तीत जास्त पैलू हाताळण्याचं काम पवारांनी केलं आहे. त्यांचं वेगळेपण म्हणजे, ते कुणा एकाची बाजू घेऊन दुसऱ्यावर नाहक टीका करत नाहीत. ते दोन्ही बाजू समजून घेऊन त्याची समीक्षा करतात. संदर्भांसह असणारं हे पुस्तक योग्य वेळी वाचकांच्या हाती आलं आहे. गेली पाच वर्षांत देश कोणत्या मार्गानं जात होता, राजकीय घडामोडींमागची पार्श्वभूमी काय असते, याचं आकलन या पुस्तकातून होतं.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3290

...............................................................................................................................................................

जॉर्ज ऑरवेलच्या कादंबरीचे नाव आहे – ‘1984’! आणि खऱ्याखुऱ्या १९८४ साली त्या नरकपुरीने सबंध भारतीय जीवनाभोवती आपले पाश आवळले!! 

- तीस्ता सेटलवाड

१९८४च्या ‘मे’ महिन्यात मुंबईजवळच्या भिवंडीत हिंसाचाराचा जो कहर झाला होता, तो मात्र लोकांच्या स्मरणातून पुसल्यासारखाच झाला आहे. माझ्याबाबतीत म्हणायचे तर थेट दंगलीत वावरण्याचा माझा पहिलावहिला प्रसंग तो हाच! ह्यानेच केली माझी जडणघडण. पुढे मला काय करायचे आहे त्याचा प्राधान्यक्रम मला त्या अनुभवाने ठरवून दिला. आज मी जिथे व जशी आहे त्या प्रवासाची सुरुवात तिथूनच झाली.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3366

...............................................................................................................................................................

जणू काही रवीश कुमार महाराष्ट्रीयन आहेत आणि मूळ पुस्तक त्यांनी मराठीतच लिहिलं आहे!

- दीपा देशमुख

रवीश कुमार हे भारताचे ज्येष्ठ पत्रकार तर आहेतच, पण त्याचबरोबर निर्भीड पण तटस्थ अशी पत्रकारिता हे त्यांचं खास वैशिष्ट्य! वैयक्तिक नफा किंवा तोटा यांचा जराही विचार न करता, कुठलेही पूर्वग्रह न बाळगता, जनसामान्यांचं हित पाहणारी आणि सत्यकथन करणारी अशी त्यांची पत्रकारिता आहे. त्यांना ऐकणं हा जेवढा आनंददायी अनुभव आहे, त्याचबरोबर त्यांचं लिखाण वाचणं हाही अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा अनुभव आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3241

...............................................................................................................................................................

नेते निवडणूक जिंकतात तेव्हा ईव्हीएम ‘चांगले’ असते आणि हरतात तेव्हा ‘वाईट’ असते!

- आलोक शुक्ल

ईव्हीएमविषयीची चर्चा, निवडणुकीच्या भविष्याप्रमाणे राजकीय पक्ष आणि व्यक्तींच्या बदलणाऱ्या भूमिका यांच्या उल्लेखाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. यावरूनच ईव्हीएमबाबतचा संधिसाधू विरोध लक्षात येतो. भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाने त्यांच्या निवडणुकीतील अपयशाचे खापर कधी ना कधी ईव्हीएमवर फोडलेले आहे. पण त्यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय ईव्हीएमला कधीही दिलेले नाही.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3267

...............................................................................................................................................................

अतिशय गांभीर्याने आणि पोटतिडकीने लिहिलेल्या वाचनीय दीर्घकथांचा संग्रह

- वंदना बोकील कुलकर्णी

शिंत्रे यांच्या कथारचना हे एक बांधकाम आहे. चुस्तपणे व एका निश्चित उद्देशाने होणारे. पण म्हणून ते कृत्रिम नाही. कथाबीजाचं स्फुरण हे प्रतिभेचं काम आहे, परंतु त्यानंतरची उभारणीवरचना अभ्यासातून आणि अभ्यासातून आणि संशोधनातून सिद्ध झालेली आहे. त्यामध्ये गुंतलेला माणूस लेखकाला महत्त्वाचा वाटतो. या माणसानं त्याच्या अंतिम कल्याणाकडे बघावं अशी तळमळ त्यामागे आहे. पर्यावरणाचा विचार हा लेखकाचा निदीध्यास आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3211

...............................................................................................................................................................

शेतीच्या प्रश्नावर ‘राजकारण’ झाले पाहिजे, हा प्रश्न राजकीय अजेंड्यावर अग्रस्थानी असायला पाहिजे!

- रमेश जाधव  

शेतीचा प्रश्न सोडवायचा तर समाजाच्या धारणा आणि राजकीय व्यवस्थेचा प्रतिसाद बदलला पाहिजे. त्याकामी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते. माध्यमांचे काम सरकारच्या सुरात सूर मिळवण्याचे नसते, तर सत्याचा शोध घेण्याचे असते. कोणताही पक्ष सत्तेवर असला तरी पत्रकारांनी कायम विरोधी पक्षाच्या भूमिकेत असायला पाहिजे, या मताचा मी आहे. सरकारचा छुपा अजेन्डा एक्सपोज करणे हेच पत्रकारांकडून अपेक्षित आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3212

...............................................................................................................................................................

नाहीतर, कदाचित मी क्रिकेटपटू म्हणून यशस्वी होऊच शकलो नसतो!

- संजय मांजरेकर

“हे पुस्तक माझ्याविषयी आहे. माझ्या क्रिकेटच्या कारकीर्दीविषयी, माझ्या आयुष्याविषयी. माझं यश आणि अपयश याविषयी. माझं सामर्थ्य आणि माझी दुर्बलता याविषयी. एक खेळाडू म्हणून माझ्या कारकीर्दीपासून तरुण, नवोदित खेळाडूंनी काही धडे घ्यावेत असंही मला वाटतं. एक बाप आपल्या मुलाला म्हणाला होता त्याप्रमाणे, ‘माझ्या आयुष्यात मी वीस चुका केल्या; तू नवीन वीस चुका कर.’

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3213

...............................................................................................................................................................

महाराष्ट्रातील १९४७ नंतरच्या जगात जगणाऱ्या बाईच्या आयुष्याचा संपूर्ण पटच येथे उलगडत जातो

- दीपक कसाळे

या कादंबरीत एकीकडे स्त्री जात म्हणजे नेमके काय याचा वेध घेतला आहे, तर दुसरीकडे जाती जातीच्या विभेदनामध्ये स्त्री जातीचे काय होते, याचाही छडा लावण्याचा प्रयत्न केला आहे. फुले, आंबेडकर, मुक्ता साळवे, ताराबाई शिंदे ही स्थानिक चौकट घेतानाच या कादंबरीच्या मागे ‘सेकंड सेक्स’ नावाचा ग्रंथ लिहिणाऱ्या आणि स्त्रीवादाला सैद्धांतिक पाया देणाऱ्या फ्रेंच विचारवंताचाही आधार आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3215

...............................................................................................................................................................

तू संगीत तोंडाने आवाज करून का काढलेस? - रिचर्ड फाईनमन

मला रेडिओ ऐकायला फार आवडत असे. मी एक लहानसा सेट एका दुकानातून विकत आणला. रात्री झोपताना बिछान्यात रेडिओे ऐकत निद्राधीन होत असे. कधी कधी माझे आई-वडील रात्री उशिरापर्यंत बाहेर जात, तेव्हा ते खोलीत गुपचूप येऊन माझ्या कानातला इअरफोन काढत असत आणि रात्री झोपेपर्यंत माझ्या कानातून काय काय आत जाते आहे, रात्रभर झोपेत असताना डोक्यात काय काय घोळते आहे, याबद्दल काळजी करत असतात.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3234

...............................................................................................................................................................

हे पुस्तक वाचल्यानंतर समस्याच माहीत नाहीत, असे तरी वाचक म्हणणार नाहीत

- डॉ. गुरुदास नूलकर

तंत्रज्ञानामुळे मानवी हस्तक्षेपाचा वेग इतका आहे, की झपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीला हजारो प्रजाती अनुकूलन करूच शकणार नाहीत. निसर्गात त्यांचे अस्तित्व हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहे याचा आज अंदाज करता येणार नाही. पण असे झाले, तर अन्नसाखळीतील बदलांनी परिसंस्थांची उत्पादनक्षमता घटेल आणि अखेरीस मानवी अस्तित्वाला धोका संभवेल. या पुस्तकातून वाचकांना निसर्गाला साजेशी भूमिका घेण्याची स्फूर्ती मिळेल.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3235

...............................................................................................................................................................

सत्यशोधक चळवळ, ही आधुनिक भारतातील पहिली परिवर्तनवादी लोकचळवळ होती!

- अरुण शिंदे

“आधुनिक काळात महात्मा फुल्यांनी भारताच्या सांस्कृतिक पर्यावरणात आणि इतिहासात आमूलाग्र बदल घडवले. त्यांच्या प्रेरणेतून महाराष्ट्रात इतर अनेक क्षेत्रांप्रमाणेच एक सत्यशोधकीय पत्रकारिताही बहरली. डॉ. शिंदे यांनी या पत्रकारितेचा चिकित्सक अभ्यास वाचकांना सादर करताना साठहून अधिक नियतकालिकांचा आढावा आपल्या या ग्रंथात घेतला आहे. माझ्या माहितीनुसार असा विस्तृत ग्रंथ मराठीत प्रथमच येत आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3271

...............................................................................................................................................................

अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन नेमक्या कोणत्या विचारांचे आहेत?

- अतुल देऊळगावकर

हा प्रश्न कायमच विचारला जातो. नोबेल मिळेपर्यंत कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य त्यांना भांडवलशाहीचे समर्थक समजत. तर उजवे त्यांना मार्क्सवादी मानत असत. वास्तविक सेन यांना कुठल्याही साचेबद्ध विचारसरणीत टाकता येणार नाही. उदार मानवतावादी विचारांचे ते पाईक आहेत. जात, धर्म, हे भेद त्यांना मान्य नाहीत. गरिबी हा मानवजातीचा शत्रू आहे, ही त्यांची धारणा आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3291

...............................................................................................................................................................

‘निद्रानाशाची रोजनिशी’ : स्वप्नांचा, संकल्पनांचा, माणूसपणाचा पाठलाग करणारी आत्मशोधाची कविता  

- भास्कर ढोके

‘निद्रनाशाची रोजनिशी’ मधील कविता स्वतंत्रपने वेगवेगळी अनुभूति देणार्‍या असल्या तरी त्यात एक सातत्य आहे. आत्ममग्नता हा तिचा विशेष आहे. यातील प्रत्येक कविता एक स्वतंत्र अनुभूती असली तरी त्यातून जगण्याविषयीचे सलग चिंतन आणि महत्त्वाचे म्हणजे ताटवापर्यंत पोहचण्याची धडपड दिसते आणि म्हणूनच आत्ममग्न असूनही ती कविता प्रातिनिधिक होते.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3338

...............................................................................................................................................................

सत्याग्रही समाजवादाचा जावडेकरांचा विचार आजही महत्त्वाचा आणि उपयुक्त आहे!

- राजेश्वरी देशपांडे

सत्याग्रही समाजवादाचा जावडेकरांचा विचार आज महत्त्वाचा आणि उपयुक्त ठरतो, तो त्यातील तत्त्ववैचारिक आशयामुळे. राष्ट्रवादी राजकारणासंबंधी भाष्य करतानाच या राजकारणाचा आशय ओलांडून मानवमुक्तीच्या दिशेने वाटचाल करणारे एक घवघवीत, देशी (आणि तरीही वैश्विक) तत्त्वज्ञान देण्याचा प्रयास जावडेकरांनी आपल्या आयुष्यात केला. त्यांचा हा प्रयास आधुनिक भारतीय राजकीय विचारांना दिलेले एक अतुलनीय योगदान आहे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3340

...............................................................................................................................................................

महर्षि शिंदे यांच्या ‘बहुजनवादा’चा स्वीकार आपल्या राजकीय पक्षांनी केवळ मतांच्या राजकारणापुरताच केला!

- सुहास कुलकर्णी

शिंदे ज्या काळात कार्यरत होते, त्या काळात बहुजन वर्गाचे हितसंबंध हे राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीशी सुसंगत नाहीत, असे मानले जात असे. मात्र, शिंद्यांनी महात्मा फुले व महात्मा गांधी यांच्या विचारांचे ऐक्य घडवून ‘बहुजन-शेतकर्‍यांसाठी राष्ट्रीय स्वातंत्र्य’ ही बाब पुढे आणली. त्यातूनच स्वातंत्र्यपूर्व काळात या वंचित वर्गाची काँग्रेसशी व स्वातंत्र्योत्तर काळात या वर्गाची भारतीय लोकशाहीशी नाळ जोडली गेली.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3341

...............................................................................................................................................................

गोळीने विचार मारता येतात का? - राहुल माने

आर्थिक विकासाने सर्व प्रश्न आपोआप सुटतील असे वाटणारा जो मोठा वर्ग या समाजात तयार झाला आहे; त्याला केवळ झोडपत बसण्यापेक्षा आपण त्या वर्गाला आर्थिक विकासाबरोबरच सामाजिक न्याय लोकशाहीसाठी महत्त्वाची गोष्ट आहे, हे सांगणे सुरू केले पाहिजे. धार्मिक कट्टरवाद आणि हिंसा या आर्थिक विकासासाठी मारक आहेत हे त्या वर्गाला पटवून दिले पाहिजे.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3342

...............................................................................................................................................................

एक कुल्ला बाहेर काढून गाडी जशी चालवता येते, तसा अर्ध्या भुकेवर घराचा गाडा ओढता येतो!

- महेंद्र कदम

कुणाचा बाप मेलेला, कुणाचा भाऊ शिकतोय. कुणाला आई नाही, कुणाच्या बापाची नोकरी गेलीय. कुणाचा बाप व्यसनी, कुणाची बहीण लग्नाचीय. कुणाची खर्चाळ, कजाग बायको, तर कुणाची बायको पळून गेलेली. कुणाचं लग्न होत नाही. कुणाला रहायला घर नाही. कोण झोपडपट्टीत राहतोय. कुणाच्या पोरी लग्नाला आल्यात. सगळ्या जाती-धर्माचं एक कडबोळं म्हणजे हा वाहनतळ.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3362

...............................................................................................................................................................

इतर धर्मीयांनी वाचायलाच हवे आणि मुस्लिमांनी पारायण करायला हवे असे पुस्तक!

- संजीवनी खेर

आजच्या काळातच नव्हे तर नेहमीच अशा पुस्तकाची गरज होती. केवळ इस्लामबद्दलचे गैरसमज दूर करायला नाही, तर इस्लाम समजून घ्यायला या पुस्तकाचा फार मोठा हातभार लागणार आहे. ज्यांनी या धर्माबद्दल बरीवाईट अशी काहीही मते तयार केलेली नाहीत, अशांनी हे पुस्तक वाचणे अत्यावश्यक आहे. या पुस्तकातील विचार समजून घेण्याअगोदर वाचकाला आकर्षित करते, ती लेखकाची मराठी भाषेवरील हुकूमत आणि त्याचा वापर.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3363

...............................................................................................................................................................

भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट, वालचंद टेरेस आणि छबिलदास मुलांची शाळा

- माधव वझे

‘प्रायोगिक रंगभूमीचा हा मौखिक इतिहास आहे’ असे म्हणताना मुळातच ती रंगभूमी प्रायोगिक होती किंवा नव्हती - असा ग्रंथाच्या प्रमेयालाच अडचणीत आणणारा प्रश्न या ग्रंथामध्ये कुठेकुठे उपस्थित केला गेला आहे. प्रायोगिक रंगभूमीचा मौखिक इतिहास आम्ही सिद्ध करतो आहोत, याचा अर्थच मुळी ती रंगभूमी प्रायोगिक होती हे गृहित धरलेले आहे, असे संपादक शांता गोखले त्यांच्या प्रस्तावनेमध्ये नि:संदिग्धपणे म्हणत नाहीत.

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3389

...............................................................................................................................................................

लाल श्याम शाह यांचा वारसा चालवण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारतासाठी आणि प्रेरणा मिळवण्यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे!

- रामचंद्र गुहा

इतिहासकार रामचंद्र गुहा म्हणतात, “लाल श्याम शाह यांचे चरित्र वाचून मला खूप आनंद झाला. ठाकूर आदिवासींच्या एका असाधारण नायकाची कहाणी या पुस्तकातून सांगतात. लाल श्याम शाह यांना गोंडवाना प्रदेशात चांगल्या प्रकारे ओळखले जात होते. पण त्यांनी केलेले काम आणि त्यांनी घालून दिलेली उदाहरणे मात्र भारतभरात परिचित झाले पाहिजे. त्यामुळे त्यांचा आदर्श पूर्ण देशात सगळ्यांसमोर ठेवला जाऊ शकतो.”

सविस्तर लेखासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3409

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......