अ‍ॅड. आंबेडकरांच्या निधड्या आणि लढावू भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील ४१ लाखांवर लोकांना शंका नाही!
संकीर्ण - वाद-संवाद
रेखा ठाकूर
  • अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी आणि प्रज्वला तट्टे यांच्या लेखाचं छायाचित्र
  • Mon , 17 June 2019
  • पडघम राज्यकारण प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi भाजप BJP संघ RSS काँग्रेस Congress

प्रज्वला तट्टे यांच्या लेखाचा उद्देश (पुरोगामी महाराष्ट्राची साथ मिळूनही वंचित बहुजन आघाडी सत्तेपासून वंचितच!, १५ जून, अक्षरनामा) वंचितच्या राजकारणाचे विश्लेषण करणे हा आहे की, काँग्रेस-राष्ट्रवादीला अडचण ठरलेल्या वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केलेल्या मुद्द्यांबद्दल आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेबद्दल संभ्रम निर्माण करणे हा आहे, असा प्रश्न पडला.  लोकसभा निवडणुकीत वंबआवर भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोप करणारी काँग्रेस विधानसभेत युती व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे, यातला विरोधाभास उघड आहे. वंबआला बदनाम करण्याची काँग्रेसची आणि तिच्या प्रज्वला तट्टेंसारख्या पाठिराख्यांची केविलवाणी धडपड काय दर्शवते? पराभवातून काही शिकण्याऐवजी वंबआला बदनाम करण्याचे डावपेच काँग्रेसच्या फायद्याचे नाहीत. गंमत म्हणजे काँग्रेसचेच कार्यकर्ते राष्ट्रवादीने भाजपला मदत केली आहे, असे आरोप करत आहेत आणि राष्ट्रवादीला भाजपची ‘बी टीम’ म्हणत आहेत. खरे तर कोणत्याही विचाराची बांधीलकी नसलेले सहजपणे एकमेकांच्या पक्षात ये-जा करणाऱ्यांची आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना यांची आपसात सत्ता वाटून घेण्याची आणि बहुजन वंचितांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मिलिभगत आहे. या चारही पक्षांना नाकारणारा जो मतदार आहे, त्याने वंबआला मतदान केले. त्यामुळे या मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस संपले, याची काँग्रेसने व प्रज्वला तट्टे यांच्यासारख्यांनी नोंद घ्यावी.

काँग्रेसने महाराष्ट्रात राष्ट्रवादी वगळता कुठल्याच प्रादेशिक पक्षाशी कोणत्याही राज्यात युती केली नाही. युती करायची नाही व मित्रपक्षांना शेवटपर्यंत झुलवत ठेवायचे, असे काँग्रेसचे धोरण होते. त्यामुळे कधीतरी एकदा मायावतींबद्दलच्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला दिलेल्या उत्तराचा संदर्भ देऊन मायावतींना रोखले गेले, हा निष्कर्ष म्हणजे वडाची साल पिंपळाला असा प्रकार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधी मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने दिलेल्या वागणुकीमुळे मायावतींनी काँग्रेसबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे खापर अ‍ॅड. आंबेडकरांवर फोडण्याचा खोडसाळपणा प्रज्वला तट्टे करत आहेत. त्यापेक्षा त्यांनी प्रामाणिकपणे काँग्रेसच्या धोरणात्मक भूमिका तपासून सुधारणा केल्या तर ते अधिक उपयुक्त ठरेल.

मुस्लीम समाज, मुस्लीम समाजधुरिण आणि नेत्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न अ‍ॅड. आंबेडकर करत आहेत. आपल्या देशात आज एक प्रकारचा क्रायसिस निर्माण झाल्याचे दिसून येते आहे. विचारधारेशी बांधीलकी न ठेवता आयाराम-गयाराम व खरेदी-विक्रीचे सत्ताकारण सुरू आहे. त्यामुळेच स्वतःला सेक्युलर म्हणवणाऱ्या काँग्रेसचा विरोधी पक्षनेता भाजपवासी होतो! आणि अशाच प्रकारे अनेक नेते सर्रास सत्तेच्या मोहात भाजपकडे जात आहेत. भाजप व संघ परिवाराच्या धर्मांध राजकारणाचा पराभव करायचा असेल तर विचारावर बांधीलकी असलेले राजकारण करावे लागेल. या देशात धर्मनिरपेक्षतेचे समर्थन करणाऱ्यांचे, भाजपच्या धर्मांध विद्वेषी राजकारणाचा विरोध करणाऱ्यांचे जनमत संघघित करणे आणि ते मतपेटीतून दाखवून देणे आवश्यक आहे. त्यामुळे निवडणुकीत भाजपचा पराभव करू शकणाऱ्यांना मतं देण्याची रणनीती फसवी आहे. आम्ही निवडणुकीतल्या यशाचा विचार न करता विचारधारेला मत देऊ, असा निर्णय करणे आवश्यक आहे. वंबआला महाराष्ट्रातील ज्या ४१ लाख मतदारांनी मतं दिली, ते सेक्युलर मतदार आहेत. आणि सेक्युलर मतदारांसोबत मुस्लिमांनी स्वत:ला जोडून घेतलं पाहिजे, असे गंभीर मुद्दे अ‍ॅड. आंबेडकरांनी समोर ठेवले आहेत.

अ‍ॅड. आंबेडकरांना इथल्या दलितेतरांनी पाठिंबा दिला नाही, हे प्रज्वला तट्टे यांचे विधान फार खोडसाळ आहे. तसे असते तर वंबआला  ४१ लाख मतं मिळालीच नसती. मायावतींनी दोन वेळा भाजपच्या मदतीने मुख्यमंत्रीपद मिळवले, त्या प्रकारे मुख्यमंत्री होण्याचे अ‍ॅड. आंबेडकरांचे स्वप्नही नाही. उत्तर प्रदेशच्या राजकारणात काँग्रेसला संपवण्याच्या कामी समाजवाद्यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी व बहुजन चळवळीचाही मोठा सहभाग होता. महाराष्ट्रातील समाजवाद्यांच्या ब्राह्मण नेतृत्वाने काँग्रेसला जिवंत ठेवण्याचे काम केले आहे.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4851/Paul-Allen---Idea-Man

...............................................................................................................................................................

भारिप बहुजन महासंघाच्या जिंकण्याच्या स्थितीत असलेल्या उमेदवारांना पाडण्यासाठी ९५च्या विधानसभा निवडणुकीत बंडखोर निवडून आणण्याचे काम काँग्रेसने केले. नंतर युती सरकार स्थापन करण्यासाठी संख्याबळ कमी होते म्हणून त्या काँग्रेसच्या बंडखोर अपक्षांना युतीकडे पाठवण्याचे कामही काँग्रेसनेच केले. काँग्रेसला भारिप बहुजन महासंघापेक्षा भाजप-सेना युती जवळची वाटत होती. दलित-ओबीसींनी उभ्या केलेल्या बहुजनांच्या स्वायत्त राजकारणाचा धोका अधिक होता आणि त्यामुळे ते भारिप बहुजन महासंघाची चळवळ सॅबोटेज करण्याची काँग्रेसची रणनीती होती. यामध्ये युती सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांना पाठवण्यापासून ते सत्ता, पैसा आणि इतर अमिषे देऊन बहुजन महासंघाचे आमदार फोडण्यापर्यंत काँग्रेसने डावपेच केले. स्वतःच्या सरंजामदारीला आणि घराणेशाही पुढे काँग्रेसला सेक्युलॅरिझम कमी महत्त्वाचा वाटत होता आणि वाटतो.

बहुजन महासंघ काँग्रेसच्या डावपेचांवर मात करण्यात यशस्वी ठरला नाही, ही त्रुटी आहे, परंतु या साऱ्याचे खलनायक अ‍ॅड. आंबेडकरांना ठरवण्याचा जो खटाटोप जोरदारपणे चालू झाला आहे, त्यामागे काँग्रेसचे जुनेच बहुजनविरोधी डावपेच आहेत.

प्रज्वला तट्टे यांनी अ‍ॅड. आंबेडकरांना सोडून गेलेल्यांची नीलम गोऱ्हेंपासून ते डॉ. सुभाष पटनाईक यांच्यापर्यंत सोळा नावांची यादी दिली आहे. पण त्यात अनेक महत्त्वाच्या  सहकाऱ्यांची नावे नाहीत. यापैकी माधवराव पिसाळ हे आजही अ‍ॅड. आंबेडकरांबरोबर आहेत आणि वंबआच्या परभणीतील प्रचार सभेचे ते अध्यक्ष होते. त्या सोळापैकी पाच जण आज हयात नाहीत. तर माधवराव नाईक पराभवाने खचल्यामुळे काही काळ दूर गेले असले तरी परत अ‍ॅड. आंबेडकरांसोबत आले. 

निळूभाऊ फुले आणि राम नगरकर कोणत्याही वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे आलेले नव्हते. पण इतरांचे तसे नव्हते. ते राजकारणात स्वतःची महत्त्वाकांक्षा आणि उद्दिष्टे घेऊन आलेले होते. त्यातील काही फक्त निवडणुकीतील उमेदवार म्हणून आलेले होते. त्यात काही गैर आहे असे नाही. परंतु वैचारिक मतभेदामुळे अथवा गैरव्यवहारामुळे यातल्या एकानेही साथ सोडलेली नाही. स्वतःची वैयक्तिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी पक्ष व संघटना सोयीची नाही, असे समजल्यावर सत्तेवर असलेल्या पक्षांकडे वळलेले काहीजण आहेत, तर काही जण फक्त निवडणुकीपुरते आलेले होते आणि हरल्यावर राजकारणापासून दूर गेले. 

“पहिल्या निवडणुकीत उमेदवाराचा आपण ‘निवडणूक जिंकू शकतो’ असा आत्मविश्वास वाढतो. आपण जास्तीत जास्त किती जागा घेऊ शकतो याचा अंदाज येतो. परंतु दुसऱ्या निवडणुकीत अ‍ॅड. आंबेडकरांचं काहीतरी सेटिंग लक्षात येतं आणि विश्वासघात झाल्याची जाणीव होते. मग ते पक्ष सोडतात.” प्रज्वला तट्टेंचे हे धडधडीत बदनामी करणारे खोटे विधान आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे वंबआला बदनाम करून संभ्रम पसरवण्यासाठी असे क्षुद्र डावपेच चालू आहेत. अशा कारणास्तव पक्ष सोडलेल्यांची नावे प्रज्वला तट्टे यांनी जाहीर करावीत.  

भिडे-एकबोटे-पेशवाई विरुद्धची लढाई ही संघ परिवाराविरुद्धच्या प्रदीर्घ व व्यापक संघर्षाचा भाग आहे. संघ परिवाराशी संघर्ष करण्यासाठी जे निष्कलंक व स्वाभिमानी नेतृत्व हवे आहे, ते अ‍ॅड. आंबेडकरच देऊ शकतात. फडणवीस आणि मोदी घोटाळ्यात आणि भ्रष्टाचारात लडबडलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना ब्लॅकमेलिंग करून दबावात आणण्याचे डावपेच खेळत आहेत. अ‍ॅड. आंबेडकरांच्या निधड्या आणि लढावू भूमिकेबद्दल महाराष्ट्रातील ४१ लाखांवर लोकांना शंका नाही. आणि म्हणून त्यांनी उमेदवार जिंकून येणार की नाही, याची पर्वा न करता वंबआला मतदान केले आहे. संघ परिवाराविरुद्धच्या प्रदीर्घ लढाईत धर्मनिरपेक्षतेची भूमिका घेतलेल्या या जनमताच्या आधारेच पुढची लढाई उभी राहणार आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......