मन तडपत 'रफी' गीत बिन
कला-संस्कृती - हिंदी सिनेमा
कलिम अजीम
  • मोहम्मद रफी यांची एक भावमुद्रा
  • Sat , 24 December 2016
  • हिंदी सिनेमा Hindi Cinema मोहम्मद रफी Mohammed Rafi शाहीद रफी Shahid Rafi लता मंगेशकर Lata Mangeshkar आशा भोसले Asha Bhosle

मोहम्मद रफींना आपण गायनासाठी ओळखतो,  पण ते केवळ गायक नसून उत्तम बॅडमिंटनपटूही होते. आपल्या दैंनादिन जीवनात वेळ मिळेल तेव्हा ते बॅडमिंटन खेळायचे. आज रफींचा जन्मदिन. त्यानिमित्त काही सुखद आठवणींना उजाळा... रफींचे ज्येष्ठ चिरंजीव शाहीद रफी यांच्या संवादामधून मोहम्मद रफींना जाणून घेण्याचा प्रयत्न...

 
रफींबद्दल असं म्हटलं जायचं की गाण्याचं कागद त्यांच्या पुढे सरकवायचा आणि नजर फिरवताच सूर तयार.. ही रफीसाहेंबाची विशेष शैली होती.. तसंच नायक बघून ते गाण्याचा सूर आणि मूड तयार करायचे... हाच मूड त्यांचा घरी आल्यावरही असायचा. रफींच्या कुटुंबातला प्रत्येक जण आजही त्यांच्या आठवणींनं भावूक होतो. एफएम असो वा रेडिओ तसंच टीव्ही असाही एकही तास रफींनी गायलेल्या गीताशिवाय जात नाही. त्यामुळे कुटुंबाला आजही रफी घरातच वावरत असल्याचा भास होतो. रफींचे ज्येष्ठ चिरंजीव बाबांची आठवणी सांगताना खुपच भावूक होतात. शाहीद रफी म्हणतात, “बाबा आमच्यात नाहीत असं अजुनही आम्हाला वाटत नाही. ते सदैव कुटुंबासोबत असतात. बाबांचं मधाळ आवाज दिवसभरातून किमान चार-पाच वेळा तरी आम्ही ऐकतो. त्यामुळे बाबा सतत आमच्यात आहेत असंच आम्ही समजतो. कधी हॉटेलमध्ये कधी सिग्नलला, कधी लोकलमध्ये कधी टैक्सीत सतत बाबांची गाणी वाजत असतात. त्यामुळे आम्हाला बरं वाटतं, तर कधी हेवा वाटून विचार येतो बाबा आपल्यात असायला हवे होते.”

शाहीद रफींच्या आठवणीमध्ये रमतात शोकेसमध्ये बॅट दाखवत म्हणतात 'बाबा घरी आले थोडासा वेळ असला की, लगेच बॅडमिंटन खेळायचे. आजही बाबांचे हातांचे ठसे त्यांवर जाणवत असल्याचं शाहीद म्हणतात. रफींचं दुसरं आवडतं छंद म्हणजे कपड्यांचा. चांगलं राहणीमान आणि टापटीप कपडे त्यांना खूप आवडायचे. चांगलं राहण्यासंबधी वारंवार अनेक सूचना दिल्याचं शाहीद म्हणतात. फावल्या वेळेत बाबांसोबत आम्ही मनसोक्त हिंडायचो.. असंही शाहीद सांगतात.. रफींना सुट्टीचा दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवायला आवडायचा. तसंच त्यांना नातवंडासोबत खेळायलाही खूप आवडायचं.

अमृतसरमधील कोटला गावात १९२४ साली मोहम्मद रफींचा जन्म झाला. बीबीसीला दिलेल्या इंटरव्यूमध्ये रफी म्हणतात कि, “मी बारा वर्षाचा असताना मला गाण्याची आवड निर्माण झाली. गल्लीत येणारे एक फकीर गाणं गाऊन खैरात मागायचे. त्या फकीरांचा आवाज मला खूप आवडायचा. त्यामुळे मी त्यांच्या मागोमाग फिरायचो. हा माझ्या नित्यक्रमाचा भाग झाला होता. यानंतर मला गायनाचं अरक्षश: वेड लावलं.”  लहान रफींचं गायनाचं वेड त्यांचा बाबांना आवडायचं नाही, परिणामी बाबांचा अनेक वेळा रफींना मारदेखील बसला. तरीही रफींनी लपून-छपून गायनाचा छंद जोपासला. सुरवातीला के. एल. सहगल यांना रफी खूप ऐकायचे. असं म्हटलं जातं की, एकदा रफी बरंच अंतर कापून शहरात सहगल यांच्या गायनाच्या कार्यक्रमाला  गेले होते. बराच काळ उलटला तरी सहगल आले नाही. रसिक प्रेक्षकांमध्ये अस्वस्थता वाढली. आरडा-ओरडा सुरू झाला. प्रेक्षकांना शांत करण्यासाठी रफी स्टेजवर चढले अन् माईक हातात घेऊन गाऊ लागले. छोट्या रफींचे सूर कानावर पडताच गोंगाट करणारा जमाव एकदम शांत झाला. या एका गाण्यांवरुन मोहम्मद रफींचा गीत गायनाचा प्रवास सुरू झाला.

रफींनी १९४१ साली ‘गुलबलोच’ या पंजाबी सिनेमासाठी पहिलं गीत गायन केलं. रफी १९४४ साली मुंबईत आले. संगीतकार ए. आर कारदार यांनी त्याच वर्षी रफींना ‘गांव की गोरी’साठी पहिल्यांदा पार्श्वगायनाची संधी दिली. मात्र, त्यांना प्रसिद्धी १९४६ साली आलेल्या ‘अनमोल घडी’ या सिनेमातून प्रसिद्धी मिळाली. या सिनेमातलं 'तेरा खिलौना टूट गया' या गाण्यानं रफींना मोठी प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ‘शहीद’, ‘मेला’, ‘दुलारी’ या चित्रपटांची गाणी लोकप्रिय झाली. त्यानंतर आलेल्या नौशाद यांच्याच 'बैजू बावरा' या चित्रपटातील गाण्यानं त्यांना मुख्य गायक म्हणून प्रसिद्धी दिली.

ओ. पी. नय्यर, रवी, एस.डी. बर्मन, नौशाद, मदन मोदन, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल या संगीतकार जोडींचे मोहम्मद रफी हे परमनंट गायक ठरले. या त्रयींनी भारतीय सिनेसृष्टीला अनेक ओठावर रुळणारे गीतं दिली आहेत. त्यांच्याबद्दल सांगितलं जातं की, रफी सिनेमांची कथा आवार्जून ऐकायचे. नायकाचा मिजाज लक्षात घेता ते नेहमी गायचे. त्यामुळेच पडद्यावर प्रत्यक्ष नायकच गातो की, काय असा भास व्हायचा. देव आनंद, शम्मी कपूर, भारतभूषण, धर्मेंद्र, दिलीप कुमार, राजेंद्र कुमार, जॉय मुखर्जी, विश्वजीत, राजेश खन्ना, शशी कपूर यांना तर रफींचा आवाज हा आपलाच आवाज वाटायचा. याव्यतिरीक्त चित्रपट सृष्टीतील अनेक नायकांसाठी रफींनी अनेक गीतं गायली आहेत. ज्यात भगवानदादा पासून ते थेट नव्वदीतला कॉमेडी नायक गोविंदापर्यंत अनेकांना रफींनी आवाज दिलाय. यासह वेगळ्या धाटणीचे अनेक गाणीही रफींनी गायली आहेत.

अनेक विनोदी गाणेही मोहम्मद रफींनी गायली आहेत. महमूद, जॉनी वॉकर, किशोर कुमार यांच्या विशिष्ट आवाजासाठी त्यांच्याच शैलीत रफींनी गाणी गायली आहेत. सत्तरच्या दशकात तर रफींची प्रसिद्धी इतकी वाढली की, चित्रपट संगीत, भावगीत असो वा भक्तिगीत असे सर्वच क्षेत्रं रफींच्या आवाजानं व्यापली होती. रफींनी गायलेली भजनही तेवढेच लोकप्रीय आहेत. ‘मन तरपत हरी दरशन को आज’, ‘जय रघुनंदन जय सियाराम’, ‘सुख के सब साथी’ अशी अनेक भजनं कोणीही विसरू शकणार नाही.

भारतातले राष्ट्रीय सण असो वा लग्न ते मोहम्मद रफींच्या चार गाण्यांशिवाय पूर्णच होत नाहीये. १९६४ साली आलेल्या ‘हकीकत’ या सिनेमातलं मदन मोहन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘कर चले हम फिदा...’ असो वा याच साली आलेलं फिल्म ‘लीडर’मधली संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलंल ‘अपनी आझादी को हम हरगीज मिटा सकते नही’ ही दोन गाणी आजही तेवढीच लोकप्रि आहेत. या गाण्यांशिवाय २६ जानेवारी असो वा १५ ऑगस्ट यांचा आनंद साजराच होऊ शकत नाही. ही गाणी या दोन्ही दिवशी देशभरात वाजवली व गायली जातात. तसंच संगीतकार रवी यांनी संगीतब्ध केलेली दोन गाण्याशिवाय भारतातलं कोणतंच लग्न लागत नाही. पहिलं म्हणजे १९७७ साली आलेला ‘आदमी सडक का’ या सिनेमातलं ‘आज मेरे यार की शादी है’ तर दुसरं १९६८ साली आलेला बी. आर. चोपडा यांचा सिनेमा ‘निलकमल’मधील ‘बाबूल की दुवाए लेती जा’ ही दोन गाणी भारतातील सर्वधर्मीय लग्न सोहळ्यात वाजवली जातात. या दोन गाण्यांची प्रसिद्धी शेजारी राष्ट्र बांगलादेश आणि पाकिस्तानमध्येही आहे. तिथंही ही गाणी लग्नात वाजवली जातात. 

‘बाबूल..’बद्दल  रफी यांचा मुलगा शाहीद रफींबद्दल अविस्मरणीय प्रसंग सांगतात, “हमारी बडी बाजी से अब्बू के बहुत लगाव और प्यार था. बाजी के विदाई समय अब्बू बडे उदास थें. बाजी के जाने के बाद अब्बू बहुत देर अकेले बैठे रहे. इसके दो दिन बाद ही निलकमल की रेकॉर्डींग थी. और अब्बू ने वह बेशकिमती गाना गाया.” या गाण्याबद्दल रफी बीबीसीच्या एका मुलाखतीत म्हणतात, “हे गाणं मी गायलं खरं, पण ज्यावेळी निलकमल पाहिला. गाणं आणि बिदाईचा प्रसंग बघून मी खूप भावनिक झालो आणि मला रडू कोसळलं.. मुलगी बिदा झाली त्यावेळी मी रडलो नाही पण, हे गाणं पडद्यावर बघून मी खूप रडलो.”

मोहम्मद रफींबद्दल रियाजसुद्धा कमी करत. हातात गीताचा कागद हातात आला की, ते दोनदा नजर फिरवायचे आणि गाणं सुरू करायचे. यावेळी संगीतकारांना सूर किंवा धूनही सांगायची गरज नसायची. कागद हातात घेताच रफी गायनाला सुरवात करायचे. मोहम्मद रफी यांनी हिंदी, उर्दू, पंजाबी, मराठी, इंग्रजी, अरबी आणि तेलुगू भाषांमधून अनेक गाणी गायली आहेत. एकूण ३५-३६ वर्षांच्या सिने प्रवासात रफींनी २६ हजारपेक्षा जास्त गाणी गायली आहेत. मोहम्मद रफी व्यवहारात मितभाषी होते. त्यांचं आणि लता मंगेशकरांचं गाण्यांच्या रॉयल्टीवरून मोठा वाद झाला होता. रफी रॉयल्टीच्या विरोधात होते. गाण्याचे पैसे निर्माते देतात मग रॉयल्टी का घ्यायची अशी रफींची भूमिका होती. लता दिदी मात्र उलट विचाराच्या होत्या. तसंच आशा भोसले यांच्यासोबत रफींचे अनेकदा वाद झाले. हे वाद मात्र स्टुडिओ माईकवर आल्यास शमायचा. याव्यतिरिक्त रफींचा कुठलाही, कुणाहीसोबत वाद झाल्याची नोंद आढळत नाही. रफींना हरफनमौला गायक म्हटलं जायचं. असा मधाळ आवाजाच्या गायकाचा आज स्मृतिदिन. सिनेसंगीतातील महान अशा गायकाला पुन्हा एकदा मानाचा मुजरा.

kalimazim2@gmail.com

लेखक महाराष्ट्र१ न्यूज चैनलमध्ये बुलेटीन प्रोड्यूसर आहेत.

Post Comment

Anu S

Fri , 25 August 2017

Chhan lekh .............pan vakyatalya chuka khup khatakalya.. khatana ghasat khup khade yawe ase watale :( वेड --त्यांचा-- बाबांना आवडायचं नाही रफींचं दुसरं --आवडतं --छंद म्हणजे कपड्यांचा यांनी --संगीतब्ध केलेली-- दोन गाण्याशिवाय एका --गाण्यांवरुन-- मोहम्मद रफींचा की --गाण्याचं--- कागद त्यांच्या पुढे सरकवायचा मोहम्मद --रफींबद्दल-- रियाजसुद्धा कमी करत अनेक विनोदी --गाणेही-- मोहम्मद रफींनी गायली आहेत. ही दोन गाणी आजही तेवढीच --लोकप्रि-- आहेत. यासह वेगळ्या --धाटणीचे-- अनेक गाणीही रफींनी तसंच संगीतकार रवी यांनी संगीतब्ध --केलेली--- दोन गाण्याशिवाय


Anu S

Fri , 25 August 2017

Chhan lekh .............pan vakyatalya chuka khup khatakalya.. khatana ghasat khup khade yawe ase watale :( वेड --त्यांचा-- बाबांना आवडायचं नाही रफींचं दुसरं --आवडतं --छंद म्हणजे कपड्यांचा यांनी --संगीतब्ध केलेली-- दोन गाण्याशिवाय एका --गाण्यांवरुन-- मोहम्मद रफींचा की --गाण्याचं--- कागद त्यांच्या पुढे सरकवायचा "मोहम्मद --रफींबद्दल-- रियाजसुद्धा कमी करत" अनेक विनोदी --गाणेही-- मोहम्मद रफींनी गायली आहेत. ही दोन गाणी आजही तेवढीच --लोकप्रि-- आहेत. यासह वेगळ्या --धाटणीचे-- अनेक गाणीही रफींनी तसंच संगीतकार रवी यांनी संगीतब्ध --केलेली--- दोन गाण्याशिवाय


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख