काँग्रेसच्या पराभवाची १० सर्वांत मोठी आणि प्रमुख कारणे. त्यामुळे राहुल गांधी सातत्याने निवडणूक हरत आहेत.
पडघम - देशकारण
नवल किशोर कुमार
  • राहुल गांधी
  • Wed , 29 May 2019
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Soniya Gandhi नेहरू Nehru नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP

काँग्रेसच्या पराभवाची ही दहा प्रमुख कारणे

१. स्वत:ला नेत्याच्या रूपात प्रस्थापित करण्यात राहुल गांधी अपयशी ठरले

अलीकडेच सोनिया गांधींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षाचे पद राहुल गांधींकडे सोपवून त्यांना नेत्याच्या रूपात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न नक्की केला आहे. परंतु राहुल गांधी संपूर्ण निवडणुकीत सामान्य जनतेशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करण्यात अयशस्वी ठरले. अगदी इथपर्यंत की, निवडणूक रॅलींमध्येही ते लोकांना हे पटवून देण्यात अयशस्वी ठरले की, ते देशाला एक मजबूत सरकार देऊ शकतात. तर दुसरीकडे भाजपकडून निवडणुकीची धुरा सांभाळणारे नरेंद्र मोदी देशातील जनतेला हे पटवून देण्यात यशस्वी झाले होते की, त्यांचा धोरणे मजबूत असतील आणि देश त्यांच्या हातीच सुरक्षित राहील.

२. ‘चौकीदार…’ प्रकरणात राहुल गांधींना मात मिळाली

‘चौकीदार चोर है’ हा नारा देऊन राहुल गांधींनी इतके यश जरूर मिळवले होते की, लोकांनी राफेल प्रकरणात नरेंद्र मोदी सरकारला कटघऱ्यात उभे केलेतं. पण नरेंद्र मोदींनी ‘मैं भी चौकीदार’ हे अभियान चालवून राहुल गांधींचे यश हिरावून घेतले. मोदींच्या अभियानाला त्यांच्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पुढे नेले. त्याचा परिणाम असा झाला की, राहुल गांधींचा ‘चौकीदार चोर है’चा आवाज दबला गेला. इतकेच नाही तर त्यांच्या या नाऱ्याला सर्वोच्च न्यायालयात मिळालेले आव्हान आणि न्यायालयाच्या समजेने उरलीसुरली कसरही भरून निघाली.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4809/Golda-_-Ek-Ashant-Vadal

.............................................................................................................................................

३. मुद्दे उचलण्याऐवजी काँग्रेस मोदींच्या मागे लागत राहिली

काँग्रेसच्या पराभवामागे एक मोठे कारण हेही आहे की, ती नरेंद्र मोदींना घेरण्यासाठी मुद्दे शोधत राहिली. पक्षाने एकानंतर एक मुद्दा लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. म्हणजे, पहिल्यांदा नोटबंदी, नंतर जीएसटी आणि त्यानंतर राफेल प्रकरण. काँग्रेसने शेतकरी आणि बेरोजगारीचाही प्रश्न उचलून धरला. पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी त्यांच्या सर्व मुद्द्यांना वाऱ्यावर उडवून लावले. त्यामुळे अशी परिस्थिती झाली की, जेव्हा राहुल गांधींनी ‘न्याय’ योजनेनुसार प्रत्येक गरिबाला प्रतिवर्षी ७०,००० रुपये देण्याचे आश्वासन दिले, तेव्हा लोक त्याला ‘जुमला’च समजले. जसे की, २०१४मध्ये नरेंद्र मोदी सर्वांच्या खात्यात १५-१५ लाख रुपये देण्याचे आश्वासन दिले होते आणि नंतर अमित शहांनी त्याला ‘राजकीय जुमला’ म्हटले होते.

खरे म्हणजे, काँग्रेसची अडचण ही झाली आहे की, ती नरेंद्र मोदी यांच्या पुढेच जाऊ शकलेली नाही. काँग्रेसचे नेते सतत या शोधात राहिले की, नरेंद्र मोदी एखादी गडबड करतील आणि ते ती लोकांपुढे घेऊन जातील. पण अनेक प्रयत्न करूनही काँग्रेसचे नेते नरेंद्र मोदींच्या मागेच धापा टाकत राहिले.

४. काँग्रेसमधील कलह

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत ज्या प्रकारे काँग्रेसचा पराभव झाला आहे, त्यामागे काँग्रेसच्या नेत्यांमधील अंतर्गत कलह हे एक प्रमुख कारण आहे. खासकरून ज्या राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत, तेथील नेत्यांसोबत ज्या प्रकारचा समन्वय असायला हवा होता, तो राहुल गांधी निर्माण करू शकले नाहीत. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्यासारखा सक्षम मुख्यमंत्री असूनही काँग्रेस भाजपपेक्षा मागे राहिली. हेच छत्तीसगडमध्ये पाहायला मिळाले. तेथील मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ना स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांचे सहकार्य मिळाले, ना श्रेष्ठींचं.

तिकडे राजस्थानमध्येही मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्येही समन्वयाची उणीव स्पष्टपणे दिसत होती. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर पुन्हा एकदा जमिनीवर उतरून काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद करण्यात अपयशी ठरले.

५. उत्तर प्रदेशमध्ये बिघडलेले समीकरण

काँग्रेसला ज्या राज्याकडून सर्वाधिक अपेक्षा होती, त्यात उत्तर प्रदेश पहिल्या स्थानावर होते. सुरुवातीला असे वाटत होते की, सपा-बसपा यांच्यासोबत काँग्रेस आघाडी करण्यात यशस्वी होईल आणि गैरभाजप मतांमध्ये फूट पडणार नाही. पण अखिलेश यादव-मायावती यांनी काँग्रेसच्या इराद्यावर पाणी ओतले. तरीही पश्चिम उत्तर प्रदेशाची जबाबदारी प्रियांका गांधींकडे देऊन काँग्रेसने काही चांगले करण्याचा जरूर प्रयत्न केला, पण या प्रदेशातही काँग्रेसला गैरभाजप मतांमधील फूट रोखण्यात यश आले नाही.

६. बिहार-बंगालमध्ये काँग्रेस चर्चाहीन राहिली

एकेकाळी काँग्रेसचा गढ मानला जाणारा पश्चिम बंगाल या वेळी पूर्णपणे बदलेला पाहायला मिळाला. या वेळी काँग्रेसची अशी स्थिती होती की, ती कुठेच पाहायला मिळाली नाही. संपूर्ण निवडणूक फक्त ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान होती. बंगालमध्ये काँग्रेसकडे एकापेक्षा एक बुजुर्ग नेते आहेत.

हेच बिहारमध्येही पाहायला मिळाले. तिथे राजदसोबत काँग्रेसने आघाडी केली खरी, पण तिथे काँग्रेस निवडणूक लढवतेय, हे लोकांना सांगण्यात काँग्रेसलाच अपयश आले. तरुण नेत्याच्या रूपात तेजस्वी यादवने मात्र आपली चांगली प्रतिमा बनवली. बिहारमध्ये काँग्रेसची अडचण ही होती की, राहुल गांधींचे एक सल्लागार शकील अहमद यांनी बंडखोरी करून मधुबनीमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. तिथे मतांमध्ये फूट पडली.

७. दक्षिणेत राहुल गांधींची जादू चालली नाही

या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींनी दक्षिण भारतावर लक्ष केंद्रित केले होते. ते कर्नाटक विधानसभेत मिळालेल्या यशामुळे उत्साहीत झालेले होते. त्यामुळेच त्यांनी केरळमधील वायनाड येथूनही निवडणूक लढवली. उघडपणे त्यांच्या निशाणावर भाजप होता, ज्याने दक्षिणेत रामायणातल्या अंगदसारखे आपले हात-पाय पसरले आहेत. पण केरळमधील साबरीमला मंदिर प्रकरणात भाजपने या मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला विरोध करून तेथील हिंदूंवरील आपली पकड कायम ठेवली. काँग्रेस मात्र याबाबत कुठलीच स्पष्ट भूमिका घेऊ शकली नाही. काँग्रेसने या प्रकरणापासून स्वत:ला लांबच ठेवले, असे म्हणण्यात कुठलीही अतिशयोक्ती होणार नाही. याच प्रकारे कर्नाटकमध्येही लिंगायतांच्या प्रकरणात काँग्रेस स्पष्टपणे भूमिका घेऊ शकली नाही.

८. उच्चवर्णीयांचा भाजपकडे ओढा

काँग्रेसच्या पराभवाचे हेही एक महत्त्वाचे कारण आहे की, जातीय समीकरणात आता ती फिट बसत नाही. काँग्रेसचा प्रभाव दलित, आदिवासी आणि ओबीसी आदी जातींमध्ये आधीपासूनच कमी राहिलेला आहे. उच्चवर्णीयांमध्येच काँग्रेसचा जास्त प्रभाव राहिला आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की, या उच्चवर्णीयांनी भाजपला आपला पक्ष म्हणून जवळ केले आहे.

९. ‘उदार हिंदू’ होणे महागात पडले

मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी स्वत:ला ‘हिंदू’ म्हणून प्रस्थापित करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंड्याचा सामना करण्यासाठी आपले जाणवेही दाखवले, पण त्यात त्यांना यश आले नाही. खरे म्हणजे ‘हिंदू’ असण्याचे प्रमाण देताना राहुल गांधींना याचा विसर पडला की, काँग्रेसची प्रतिमा धर्मनिरपेक्ष पक्षाची राहिली आहे. जी पंडित नेहरूंनी बनवली होती. ‘हिंदू’ म्हणून सिद्ध करण्याऐवजी त्यांनी कदाचित असे सांगितले असते की, काँग्रेस धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवते आणि भाजप मुद्द्यांपासून पळ काढतो आहे, तर कदाचित चित्र काही वेगळे दिसले असते. जानवेधारी राहुल गांधींच्या प्रतिमेमुळे काँग्रेसची प्रतिमा खराब झाली.

१०. राहुल गांधी मुद्द्यांना स्वत:च्या बाजूने वळवण्यात अयशस्वी झाले

नोटबंदी, जीएसटीसारख्या सामान्य जनतेशी जोडलेल्या सर्वाधिक कळीच्या प्रश्नांना त्या जनतेपर्यंत घेऊन जाण्यातच काँग्रेसला यश आले नाही. त्या तुलनेत भाजपने हे प्रश्न स्वत:च्या बाजूने वळवले. एकंदरीत टायमिंग, वाईट व्यवस्थापन आणि वेळेवर चेहरा समोर न आणणे, यांमुळे काँग्रेसचा पराभव झाला.

मराठी अनुवाद - टीम अक्षरनामा

.............................................................................................................................................

हा मूळ हिंदी लेख दै. ‘अमर उजाला’मध्ये २३ मे २०१९ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी पहा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Dilip Chirmuley

Wed , 29 May 2019

NDA got 45% vote, BJP 38%. 55% voted against Modi and BJP. Will you respect this mandate, Modiji? Nikhil Wgale has made this comment. When experienced journalists like make comments like this it shows that they have not understood what first past the post means. Also Wagle does not understand that BJP's opponents have no united mandate except to defeat ModI. Therefore they have no mandate which ModI has to accept.


Dilip Chirmuley

Wed , 29 May 2019

२०१४मध्ये नरेंद्र मोदीनि सर्वांच्या खात्यात १५-१५ लाख रुपये देण्याचे आश्वासन कधीच दिले नव्हते. भाजपच्या विरोधकाना व पत्रकाराना हे कधीच पटले नाही म्हणून ते सर्व मोदीना फेकू म्हणू लागले तसेच राफाल व अंबानीवरून मोदीना चोर ठरवले यावर पण लोकांचा विश्वास बसला नाही. कारण राफालच्या सीईओनी कॉंग्रेसचे मुद्दे टीव्ही वरच्या त्यांच्या एका मुलाखतीत खोडून काढले होते. कॉंग्रेस त्यांचे पत्रकार मित्र यांना मोदी हरणार आहेत हि खात्री होती म्हणून त्यांनी वासुस्थ्तीकडे लक्ष दिले नाही. म्हणून कोन्ग्रेस पार्टी हरली. असे मला वाटते. .


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......