‘एक्झिट पोल’ अनेकदा ‘खोटे’ ठरूनही ‘खोटे’ ठरण्यासाठी केले जातात!
पडघम - देशकारण
रवीश कुमार
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 21 May 2019
  • पडघम देशकारण रवीश कुमार Ravish Kumar एक्झिट पोल Exit Poll मोदी लाट Modi Wave

अखेर ‘मोदी लाट’ सापडली! तीन महिन्यांपासून वृत्तवाहिन्या आणि असंख्य पत्रकार गावागावांत ‘मोदी लाट’ शोधत होते. सांगत होते की, दिसत नाही. ती दिसली नाही, तेव्हा ‘अंडर करंट’ शोधू लागले. शेवटी त्यांना ‘मोदी लाट’ सापडली! ‘एक्झिट पोल’चे आभार!! धुवाँधार ‘मोदी लाट’ आहे असे एक्झिट पोलचे सांगत आहेत. सर्व सर्व्हेंनुसार भाजपचे मोठ्या बहुमतानं सरकार येत आहे. हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे की, तुम्ही एक्झिट पोलवर विश्वास ठेवता की नाही? हे नक्की आहे की, २३ तारखेपर्यंत तुम्ही टीव्हीवर इतर काहीही पाहू शकणार नाही. ही तक्रार तेव्हाच करा, जेव्हा २३ तारखेच्या आधी तुम्ही टीव्हीवर बरंच काही पाहू शकत होता. फक्त दोन गोष्टी सांगू शकतो. एक व्हॉटसअॅप विद्यापीठातली आहे आणि दुसरी ऑस्ट्रेलियातली. व्हॉटसअॅप विद्यापीठातली हा सल्ला आवडला की, टीव्हीचा आवाज कमी ठेवा, मित्र किंवा नातेवाईकांच्या जवळपास रहा, ढगळ सुती कपडे घाला, कुलर किंवा एसी चालू ठेवा, खोल श्वास घ्या, मध्ये मध्ये हसत रहा. संसार मोहमाया आहे, याची आठवण काढत रहा.

आज एक्झिट पोलचा (२० मे) पहिला दिवस आहे. आतापासूनच घाबरून गेलात तर कसं व्हायचं! आता निकालाच्या दिवसापर्यंत तुम्हाला याचा सामना करावा लागणार आहे. लक्षात घ्या, आतापर्यंत तुम्ही असे किती एक्झिट पोल पाहिले आहेत, त्यांना सामोरं गेला आहात. ते चुकीचे ठरल्यावरही पुन्हा एकदा ते पाहण्याची हिंमत गोळी केली आहे. या आधारावर मी एक्झिट पोलविषयी एक थिअरी बनवली आहे. पेटेंट घेतलेलं नाही आणि नोबेलही मिळालेलं नाही. एक्झिट पोल जगातलं असं पहिलं वैज्ञानिक काम आहे, जे खोटं ठरूनही खोटं ठरण्यासाठी केलं जातं.

अजून एक थिअरी पुढे आली आहे. ती अशी आहे की, एक्झिट पोलमधलं संख्याबळ चुकीचं असू शकतं, पण ट्रेंड बरोबर असतो. सगळे पोल चुकीचे नसतात, काही बरोबरही असतात. या वेळच्या सर्व पोलमध्ये भाजप सरकारच पुन्हा येत आहे. तेव्हा चुकीचा पोल कुठला असेल, हे २३ मेला कळेल. वृत्तवाहिन्या एक्झिट पोलविषयी खूप गंभीर आहेत. ऑस्ट्रेलियामध्येही लोक गंभीर होते. तिथं निवडणुकीच्या आधी जेवढे काही ‘ओपिनियन पोल’ झाले, त्यातील ५०हून अधिक चुकीचे ठरले. एक्झिट पोल नाही, प्री-पोल्स चुकीचे ठरले!

पण याचा परिणाम असा झाला की, पोल पाहून लेबर पार्टीने उत्सव साजरा केला की, ते जिंकले आहेत. जेव्हा निकाल लागला, तेव्हा उत्सव साजरा करण्याची संधी लिबरल पार्टीला मिळाली! पण यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. सर्व्हे आणि एक्झिट पोल सगळीकडेच चुकीचे ठरतात. अमेरिका, ब्रिटन यांसारख्या देशात एकाच दिवशी मतदान होतं आणि त्याच दिवशी निकाल जाहीर होतो. तिथं एक्झिट पोल केला जात नाही. कारण मतदान आणि निकाल यांच्यामध्ये खूपच कमी कालावधी असतो. त्यामुळे तिथं मतदानाआधी झालेल्या पोलवरून वृत्तवाहिन्यांमध्ये वेळ काढला जातो.

...............................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4874/Deshbhakt-ani-andhbhakt

...............................................................................................................................................................

भारत हा एक गुंतागुंतीचा देश आहे. जागांची संख्याही खूप आहे. काही वेळा निवडणूक आयोगही एक कारण होतो, पण ते कुठल्या सर्व्हेमध्ये दिसत नाही. आयोगाशिवाय कुठला पोल कसा खरा असू शकतो? तुम्ही एक्झिट पोलच्या चुकीच्या अंदाजामुळे अजिबात घाबरून जाऊ नका. स्टार्ट अप कंपन्यांच्या जोरावर एक्झिट पोलचा व्यवसाय स्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. मी पाहिलंय की, अनेक निवडणुकांमध्ये सर्व्हे कंपन्यांचे सर्व्हे चुकीचे निघालेले आहे. पण पुढच्या निवडणुकीत त्या सर्वांना काम मिळालं. एवढा मोठा व्यवसाय आहे की, त्यात एकदा चुकीचं ठरल्यानंतरही पुन्हा एकदा चुकीचं ठरण्याची संधी मिळते. कितीतरी एक्झिट पोल आहेत. आम्ही करत नाही, पण सर्वांचे अंदाज सांगतो. २०१४मध्ये भाजपला एकट्याला २८२ जागा मिळाल्या होत्या, तर एनडीएला ३३६.

सुदर्शन न्यूज, रिपब्लिक-सी व्होटर, रिपब्लिक-जन की बात, सुवर्णा न्यूज २४\७, साक्षी टीव्ही, न्यूज नेशन या सर्वांचे एक्झिट पोल एकीकडे आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचा ‘३०० जागा मिळत आहेत. आरामात सरकार येत आहे’ हा दावा एकीकडे. उत्तर प्रदेशबद्दल अमित शहांनी सांगितलं होतं की, ७३ पेक्षा एक जागा कमी मिळणार नाही, उलट एखादी जास्तच येईल. लक्षात ठेवा २०१४मध्ये अमित शहा प्रभारी होते. तेव्हा ७२ जागा मिळाल्या होत्या.

२०१५मध्ये अमित शहांनी बिहारसाठी १८५चं उद्दिष्ट ठेवलं होतं. भाजपला ९९ जागा (८६ जागा कमी) मिळाल्या. २०१६मध्ये बंगाल विधानसभेसाठी १५०चं उद्दिष्ट होतं, फक्त तीन जागा (१४७ जागा कमी) मिळाल्या. २०१७मध्ये उत्तर प्रदेश विधानसभेसाठी २०३ जागांचं लक्ष्य होतं. ३२५ जागा (१२२ जागा अधिक) मिळाल्या. २०१७मध्ये गुजरात विधानसभेसाठी १५० जागांचं लक्ष्य होतं. भाजपला ९९ जागा (५१ जागा कमी) मिळाल्या. २०१७मध्ये हिमाचल प्रदेशसाठी ५०पेक्षा जास्त जागांचं लक्ष्य होतं. ४४ जागा (सहा जागा कमी) मिळाल्या. २०१८मध्ये कर्नाटक विधानसभेसाठी १५० जागांचं लक्ष्य होतं. १०४ जागा (४६ जागा कमी) मिळाल्या.

तुम्ही ‘सायलेंट व्होटर’विषयी बरंच काही ऐकलं असेल. ‘सायलेंट व्होटर’ म्हणजे काय? हा घाबरलेला मतदार असतो की, त्याची स्वत:ची रणनीती असते? जगभर संस्थात्मक पातळीवर यावर अनेक दशकांपासून संशोधन होत आलं आहे. आपण कधी ‘सायलेंट व्होटर’ला जाणून घेऊ शकू? हाच तो ‘सायलेंट व्होटर’ सगळे आडाखे मोडीत काढतो. बिहारचे लालू प्रसाद यादव याला ‘मतपेटीतून निघालेला जीन’ म्हणतात. इंग्रजीत याला ‘pluralistic ignorance’च्या माध्यमातून समजून घेतलं जाऊ शकतं. म्हणजे लोकांचं वर्तन सार्वजनिक स्वरूपात किंवा जमावामध्ये त्याच्यासारखं असतं, पण एकटा असताना तो त्याच्या बरोबर उलटा विचार करतो. याविषयी एक पुस्तक आहे, तुम्ही ते वाचू शकता. Cristina Bicchieri यांचं ‘The Grammar of Society’. अजून एक पुस्तक आहे - Timur Kuran यांचं ‘Private Lies, Public Truths’. यात पूर्व युरोपातल्या कम्युनिस्ट सरकारांच्या पतनांचा अभ्यास केला गेला आहे. सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर पूर्व युरोपातल्या अनेक देशांतली कम्युनिस्ट सरकारं भराभर कोसळली. कुणालाही अंदाज आला नाही. कारण जनता सार्वजनिक स्वरूपात सरकारचं समर्थन करत होती, पण खाजगी पातळीवर विरोध करत होतो.

ही दोन्ही पुस्तकं मी वाचली नाहीत. पण माझा मित्र वत्सलनं सांगितलं की, ‘सायलेंट व्होटर’विषयी प्रेक्षकांना सांगितलं गेलं पाहिजे. जेव्हा लोकांना सार्वजनिक बोलण्याचं स्वातंत्र्य नसतं, भीती असते, तेव्हा ते चूप राहतात.

ही दोन्ही पुस्तकं हुकूमशाही सरकारांविषयीची आहेत. भारतात लोकशाही आहे. पण भारतासारख्या स्वतंत्र देशात ‘सायलेंट व्होटर’कडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जाऊ शकतं? त्याला कसं समजावून घेतलं जाऊ शकतं?

स्वैर अनुवाद - टीम अक्षरनामा. 

...............................................................................................................................................................

रवीश कुमार यांचा मूळ हिंदी लेख २० मे २०१९ एनडीटीव्हीच्या बेवसाईटवर प्रकाशित झाला आहे. तो पाहण्यासाठी क्लिक करा -

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Praveen Mehetre

Wed , 22 May 2019

IIनमो नमःII (रोज १०८वेळा म्हणावे) आदरणीय सु:प्रभात स्मरणीय नम्र जी, गामा जी, पैलवान जी, आपला मी नम्र अटल भक्त आहे.(अर्थात खाली माझ्या मातापिता ने दिलेले कायदेशीर सांप्रत धारण केलेले नाव आहे)! आपण लोक शाही देशात राहतो,म्हणून हिंदू हृदयसम्राट यांनी ठोकशाही ची बाराखडी आम्हा स शिकवली! प्रबोधनकार ते नव प्रबोधनकार अनुभवले!असो! गांधींच्या बेकायदेशीर वारसांनी गांधी बाबास वेठीस धरले, गांधी बाबास हे आवडले नसते!) पुन्हा असो! मुद्दा असा की, आपल्या प्रतिक्रिया वाचून आमचे अंतर बाह्य पुनरुत्थान होते आहे. कृपया आता आपण व्यास मुनी यांनी जे जे विषय उष्टे केले व जे जे केले नाही ते ते या संबंधी मूलगामी लेख लिहावे ही विनंती(नमो दूरदर्शन लुप्त झाले). बाकी अक्षर ना मा संपादक साहेब अती सहिष्णु व अती उदारमतवादी आहेत,नक्कीच आहेत! मला ही सांभाळून घेतील ! कली युग नव्हे तर नवशक कर्ता अमरेंद्र-नरेंद्र बाहुबलीयुग चिरायू राहो ! आता माझेच सरकार सिझन (हंगाम)-२ ये वो! आपलाच अती नम्र भक्त - प्रवीण रंगनाथ मेहेत्रे ता.क.- माझा माकडाचा माणूस झाला यावर विश्वास नाही पण माणसाचे माकड होऊ शकते यावर प्रचंड विश्वास आहे.(ख्रिस्त वासी डार्विन यांच्याकडे क्षमा याचना)


Gamma Pailvan

Wed , 22 May 2019

रवीशकुमार, तुम्ही ज्या पूर्व युरोपातली साम्यवादी राजवटी म्हणताय ते चिमुकले देश आहेत. भारतासारख्या अवाढव्य देशात लोक खुलेआम सरकारचा विरोध करतात. खाजगीत एक आणि सार्वजनिक जीवनात भलतं ठेवण्याची गरज भासंत नाही. मोदींवर सोडा, प्रत्यक्ष ऐन आणीबाणीत इंदिरा गांधींवर जाहीर टीका व्हायची. भारतीय लोकं आपण समजतो त्यापेक्षा बरेच जास्त बिनधास्त आहेत. तर सांगण्याचा मुद्दा काय की उत्तरचाचण्या बरोबर असायला काहीच हरकत नाही. म्हणजे मोदीच येणार. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......