राजेरजवाड्यांवरचा अनाठायी खर्च आता कशासाठी करायचा?
पडघम - विदेशनामा
कॉ. भीमराव बनसोड
  • जपानमधील राजघराणं, मलेशियाचा राजा सुलतान मोहम्मद वी, इंग्लंडचा राजपुत्र व त्याची पत्नी आणि मोहम्मद वी व त्यांची रशियन पत्नी
  • Tue , 14 May 2019
  • पडघम विदेशनामा राजघराणे Royal Family राजा King

मागच्या एप्रिल महिन्यात १२६ वा सम्राट म्हणून वंशपरंपरेने राजा नारोहितो जपानच्या राजगादीवर  विराजमान झाले. त्यांना जपानच्या शाही खजिन्याची किल्ली देण्यात आली. मोठ्या थाटात त्यांचा राज्याभिषेक झाला आणि जपानमध्ये नवीन युगाची सुरुवात झाल्याची घोषणा करण्यात आली.

थायलंड येथील राजाचा चौथा विवाह झाला. मलेशियाचे राजे सुलतान मोहम्मद वी या राजाचे प्रेम मिस रशियावर होते. त्यांना तिच्याशी विवाह करायचा होता. या प्रेमसंबंधाचा बराच बाऊ झाल्याने त्यांनी राजत्याग केला. म्हणून त्यांच्या जागी त्यांचा भाऊ राजपदी विराजमान झाला. त्यांना चारचाकी गाड्यांच्या स्पोर्टचा बराच शौक होता.

इंग्लंडच्या राजघराण्यात एका राजपुत्राचा जन्म झाला.

या सर्व राजविवाहांची व राज्याभिषेकांची रसभरीत वर्णने जगभरच्या प्रसारमाध्यमांनी केली आहेत.

अधूनमधून जगाच्या इतर देशातील राजघराण्यांचे असे प्रकार चालूच असतात.

थायलंडच्या राजाचे प्रेम त्यांच्या महिला अंगरक्षकावर होते. त्यांनी तिच्याशी विवाह केला. यापूर्वी त्यांचे आणखी तीन राण्यांवर प्रेम होते. त्यांच्यापासून त्यांना सात अपत्ये झाली. पण या तिघींशीही प्रेमभंग झाल्याने त्यांना हे चौथे प्रेम व विवाह करावा लागला. ते स्वत: ६६ वर्षांचे असून त्यांची ही चौथी राणी ४४ वर्षांची आहे. तेथील प्रथेनुसार होणाऱ्या राणीला राजमहालाच्या मुख्य दरवाजापासून राजा बसलेल्या सिंहासना (गादी) पर्यंत सापासारखे सरपटत जाऊन त्याच्या पायावर डोके ठेवावे लागते. मग तिला राणीपद मिळते. तसे आता तिला राणीपद मिळाले आहे. राजा तर हा आधीपासून होताच.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4861/Kon-hote-sindhu-loka

.............................................................................................................................................

जगातील पहिली औद्योगिक क्रांती झालेला आणि त्यामुळे लवकरच साम्राज्यवादी स्वरूप घेतलेल्या इंग्लंडमधील भांडवलदार वर्गाने तेथील राजघराण्याशी जुळवून घेतले. इंग्रजांनी फक्त भारतातच व तेही राजेरजवाड्यांनी १८५७ ला बंड केल्यानंतरच जुळवून घेतले, हा आपल्यातील गोड गैरसमज आहे. इंग्लंडसह जगभरच सरंजामशाहीशी, त्याचे आधार असलेल्या राजेरजवाड्यांशी, त्याची मूल्ये असलेल्या धर्मादी संस्थांशी, भारतात जातीव्यवस्थेशी या सत्ताधारी, भांडवलदार वर्गाने आपले मेतकूट चांगलेच जमवले आहे. त्याचा ते स्वत:ची सत्ता कायम टिकवण्यासाठी मोठ्या कौशल्याने वापर करत आहेत.

वर उल्लेख केलेल्या देशातील राजघराण्यांच्या विवाहादी सोहळे हे त्याचेच द्योतक आहेत. यातही काळानुरूप त्यांनी किंचितसा बदल केला आहे. उदा. नेदरलँड (१९८३), थायलंड (१९७४), इंग्लंड (२०११) सालात बदल केला. त्यापूर्वी केवळ पुरुषांनाच राजगादीवर बसण्याचा हक्क होता. तो या देशातून वर दिलेल्या साली कायद्यात दुरुस्ती करून महिलांनाही राजगादीवर बसण्याचा अधिकार देण्यात आला. पण मोरोक्को, ओमान, सौदी अरबिया व जपानमध्ये फक्त पुरुषच राजगादीवर हक्क सांगू शकतो. तेथे अशा बदलाची तरतूद अजूनही करण्यात आलेली नाही. असो.

मार्च अखेर व एप्रिलच्या सुरुवातीला मी सिंगापूर, मलेशिया व थायलंडला गेलो होतो. आपल्या देशातील विविध शहरांत ज्याप्रमाणे राजकीय पुढाऱ्यांची छायाचित्रं असलेले मोठमोठे फ्लेक्स ठिकठिकाणी दिसतात, तसे मला या देशांतील कोणत्याही शहरांतून दिसले नाहीत. पण मलेशिया व थायलंडमध्ये मात्र चौकाचौकांत फ्रेम केलेली छायाचित्रं दिसायची. गाईडला त्याबद्दल विचारले असता, ते आमचे राजे आहेत असे तिने सांगितले. मलेशियातील गाईडचे नाव कनघा होते. तिने सांगितले की, या राजाची निवड देशातील ९ प्रांतातील ९ रॉयल फॅमिली त्यांच्यामधूनच कोणातरी एकाला राजा म्हणून निवडत असतात. या राजघराण्यांचा संपूर्ण खर्च सरकार करते. त्यांचा राजप्रासाद आम्ही बाहेरूनच पाहिला, कारण तो आतून पाहण्यास बंदी आहे. वर्षातून एकदाच रमजान ईदच्या दिवशी तो इतरांना पाहण्यास मोकळीक असते. राजप्रासादाच्या बाहेर लाल आणि हिरवा दिवा लावलेला असतो. त्यावरून राजा राजप्रासादात आहे की नाही हे समजते.

येथे प्रश्न असा आहे की, कालबाह्य झालेली अशी राजघराणी टिकवून ठेवण्याची गरज काय? त्यांना त्या देशातील राजकारणात फारसे संवैधानिक अधिकार नाहीत. ते देऊन नाहक बला ओढवून घेण्याचीही गरज नाही. ते केवळ नामधारी वा शोभेच्या बाबी आहेत. समाजविकासात अथवा देशाच्या प्रगतीमध्ये त्यांचे काही योगदान नाही. अशा परिस्थितीत तेथील राजपुत्र, राजकन्यांचे विवाह सोहळे, राज्याभिषेक, राजपुत्र-राजकन्यांचा जन्म, वेगवेगळ्या ॠतूंतील त्यांच्या वेगवेगळ्या महालांची देखभाल व दुरुस्ती, त्यांचे जगभरचे दौरे, शाही भोजनावळी इत्यादींचा भरमसाठ खर्च कोण करते? तर ज्या त्या देशातील सरकार यांच्या खर्चाची तरतूद करते. सरकार हा खर्च करते म्हणजे सर्वसामान्य जनतेने दिलेल्या करातूनच हा खर्च केला जातो.

हा अनाठायी खर्च आता कशासाठी करायचा? सर्वसामान्य जनतेवर यांच्या खर्चाचा बोजा का म्हणून टाकायचा? सरंजामी काळात समाजाला लागलेल्या या जळवा आजच्या भांडवली काळातही तशाच चालू ठेवणे समाजहिताचे नाही. म्हणूनच भारतातील तमाम राजेरजवाड्यांचे स्वातंत्र्यकाळात बांधून दिलेले तनखे १९७४ साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बंद करून टाकले. हा त्यांचा एक क्रांतिकारी निर्णय होता. असाच निर्णय राजेशाहीच्या गमजा चालू असलेल्या देशांनी घेण्याची गरज आहे.

.............................................................................................................................................

लेखक कॉ. भीमराव बनसोड मार्क्सवादी कार्यकर्ते आहेत. त्यांनी २५-३० वर्षे ट्रेड युनियनमध्ये काम केले आहे.

bhimraobansod@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Vivek Date

Wed , 15 May 2019

who are we to comment on the choice of other nations/societies to maintain their royalties and spend THEIR money on that account. What Indira Gandhi did by abolition privy purses was plain wrong. It was a kind of contract of the sovereign nation of India with the royalties in return for their merging with republic of India.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......