युक्रेनच्या मतदारांनी एका ‘कॉमेडियन’ला चक्क ‘अध्यक्षपदी’ बसवले!
पडघम - विदेशनामा
सुधीर अग्रवाल
  • युक्रेनचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेंन्स्की
  • Thu , 25 April 2019
  • पडघम विदेशनामा व्लादिमीर झेलेंन्स्की Volodymyr Zelenskiy Ukraine युक्रेन

मतदारांना आकर्षित करणे ही एक कला असल्याचे एका कॉमेडियनने सिद्ध केले आहे! तो नगरसेवक, आमदार किंवा खासदार नव्हे तर चक्क राष्ट्राध्यक्षपदी निवडून आला आहे. ही सत्य घटना युक्रेन या देशात घडली! एक कॉमेडियन चक्क अध्यक्षपदी निवडून आला आहे. व्लादिमीर झेलेंन्स्की (Volodymyr Zelensky) असे या विनोदी अभिनेत्याचे नाव. या अभिनेत्याला राजकारणाचा अनुभव नाही, अनुभव असेल तर तो टीव्हीच्या पडद्यावरील कार्यक्रमात साकारलेल्या अध्यक्षांच्या भूमिकेचा. आणि योगागोग हा की, पडद्यावरची ही भूमिका वास्तवात उतरलीदेखील.

युक्रेनच्या मतदारांनी या विनोदी नटाला चक्क अध्यक्ष पदावर नेऊन बसवले. अद्याप निकाल जाहीर व्हायचा असला तरी, मतदानोत्तर चाचण्यांमध्ये झेंलेन्सकी यांना बहुमत मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. युक्रेनमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत झेलेंन्स्की यांनी एकूण मतांपैकी तब्बल ७३.१९ टक्के मते मिळवली आहेत. त्यांचे सर्वांत जवळचे प्रतिस्पर्धी आणि मावळते राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांनी फक्त २४.४८ टक्के मते मिळवली आहेत.

गेल्या काही वर्षांत युक्रेनमध्ये ‘सर्व्हेंट ऑफ द पीपल’ नावाचे नाटक खूप लोकप्रिय झाले. त्याच नाटकामध्ये झेलेंन्स्की यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यात त्यांनी एका शिक्षकाची भूमिका साकारली होती. हा शिक्षक सरकारच्या भ्रष्ट कारभारावर सोशल मीडियावर आपली भूमिका मांडतो. त्याची ही पोस्ट देशभर इतकी व्हायरल होते की, तो अपघाताने चक्क राष्ट्राध्यक्षपदावर निवडून येतो.

झेलेंन्स्की यांनी साकारलेली राष्ट्राध्यक्षाची भूमिका लोकांना खूप आवडली. देशवासियांना हसायला लावणाऱ्या झेलेंन्स्की यांनी गंमत म्हणून राजकारणात नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. नाटकात ज्या नावाने त्यांचा राजकीय पक्ष होता, त्याच नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना करून निवडणुकीचा प्रचार सुरू केला. ही आयडिया तुफान यशस्वी ठरली. देशात पुन्हा शांतता प्रस्थापित करणे आणि फुटीरतावादी, तसेच रशिया समर्थकांसोबत शांतता चर्चा करणे, हे आपले प्राधान्य राहणार असे झेलेंन्स्की यांनी सांगितले आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

पण पडद्यावरची भूमिका आणि वास्तवातील यात महदंतर असते. ते जनतेच्या अपेक्षाला किती खरे उतरतील, हा प्रश्न आता कळीचा राहील. ‘मतदारांनी केलेला मोठा विनोद’ अशी टिपणी विरोधक करत आहेत. तसा तो विनोद असेलही. पण मतदारांनाचा क्षोभ त्यातून व्यक्त झाला आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. जसे भारतात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मोदी लाटे’त एरवी जे निवडून आले नसते, तेही निवडून आले!

२०१४ मध्ये युक्रेनने राजकीय भूकंप अनुभवला. रशिया समर्थक राष्ट्राध्यक्ष विक्टर यानुकोविच यांची सत्ता युरोपियन संघ आणि अमेरिकेने उलथून लावली. यानंतर रशियाने गुप्तहेरांच्या मदतीने विक्टर यांना सुखरूप रशियात बोलावून शरण दिली. त्या वेळी झालेल्या रशियाच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अब्जाधीश चॉकटेल व्यापारी पेट्रो पोरोशेंको निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीचे निकाल पाहता पेट्रो पोरोशेंको यांनी आपला पराभव मान्य केला आहे.

सोवियत संघराज्याच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या देशांपैकी जिथे अजूनही स्थिरता प्रस्थापित झाली नाही, असे जे देश आहेत त्यापैकी युक्रेन एक. पूर्व युक्रेनमध्ये रशियन बंडखोरांनी शस्त्रे हाती घेतली आहेत. २०१४ पासून सुरू असलेल्या संघर्षाला विराम मिळण्याची चिन्हे नाहीत. भ्रष्टाचार, जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यांनी लोक ग्रासले आहेत. या समस्या हाताळण्यासाठी तडफ विद्यमान अध्यक्ष पोरोशेंको यांनी दाखवली नाही. त्यांच्याविषयीच्या वैफल्यातून झालेले हे मतदान आहे.

पण परिस्थिती सावरण्याची क्षमता आणि राजकीय परिपक्वता ४१ वर्षीय झेंलेन्सकी यांच्याकडे आहे काय? विशेषतः व्लादिमिर पुतीन यांच्यासारख्या अत्यंत धूर्त रशियन अध्यक्षाशी देशाचे हित सांभाळून वाटाघाटी करण्याची क्षमता आहे काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. पण काहीही होवो, युक्रेनच्या मतदारांनी विनोदी नटाला प्रत्यक्ष अध्यक्षपदी बसवले. पडद्यावरची भूमिका प्रत्यक्षात उतरली, हे मात्र खरे!

.............................................................................................................................................

लेखक सुधीर अग्रवाल प्राध्यापक आहेत.

drsudhiragrawal239@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शारीर प्रेम न करता शार्लट आणि शॉचे प्रेम ४५ वर्षे टिकले आणि दोघांनीही असंख्य अफेअर्स करूनही सार्त्र आणि सीमोनचे प्रेम ५४ वर्षे टिकले! (पूर्वार्ध)

किटीवर निरतिशय प्रेम असताना लेव्हिन आनाचे पोर्ट्रेट बघून हादरून गेला. तिला बघितल्यावर, तिची अमर्याद ग्रेस त्याला हलवून गेली. आनाला कुठले तरी सत्य स्पर्शून गेले आहे, हे त्याला जाणवले. आनाबद्दल त्याच्या मनात भावना तयार व्हायला लागल्या. त्याला एकदम किटीची आठवण आली. त्याला गिल्टी वाटू लागले. ही सौंदर्याची ताकद! शारीरिक आणि भावनिक आणि तात्त्विक सौंदर्य समोर आले की, काहीतरी विलक्षण घडू लागते.......

प्रश्न कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो तोंडावर आपटतात की काय याचा नाही. प्रश्न आहे, आपण आणि आपली लोकशाही सतत दात पाडून घेणार की काय, हा...

३० जानेवारीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने, उलट कॅनडाच भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केला आहे. पण याचे आपल्या माध्यमांना काय? त्यांनी अपमाहिती मोहिमेबद्दल जे म्हटले गेले, ते हत्याप्रकरणाशी जोडून टाकले. त्यांच्या बातम्यांचे मथळे पाहता कोणासही असे वाटावे की, या अहवालाने ट्रुडोंचे तोंड फोडले. भारताला निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र मिळाले. प्रोपगंडा चालतो तो असा. अर्धसत्ये आणि अपमाहितीवर.......