राज ठाकरे नावाचं ‘तुफान आलंया!’
पडघम - राज्यकारण
टीम अक्षरनामा
  • राज ठाकरे यांच्या लेखांचा कोलाज
  • Wed , 24 April 2019
  • पडघम राज्यकारण राज ठाकरे Raj Thackeray मनसे MNS नरेंद्र मोदी Narendra Modi काँग्रेस Congres भाजप BJP राष्ट्रवादी काँग्रेस NCP

किमान महाराष्ट्रात तरी लोकसभा निवडणुकीवर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेने’चे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी सुरू केलेल्या घणाघाती प्रचाराची गडद छाया दाटून आलेली आहे आणि ‘राज का ‘राज’ आखिर है क्या?’ या प्रश्नाच्या  उत्तराचा शोध प्रत्येक जण त्याच्या कुवतीप्रमाणं घेत आहे. दोन अधिक दोन म्हणजे चार असं काही जसं कोणत्याही आजाराचं निश्चित सूत्र नसतं, तसंच राजकारणाचंही असतं, हेच राज ठाकरे यांच्या या प्रचाराच्या ‘आऊट सोर्सिंग फंड्या’नं दाखवून दिलेलं आहे. देशात सर्वत्र नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत होत असताना महाराष्ट्रावर मात्र ‘राज छाया’ पसरलेली आहे आणि लढाई राज ठाकरे विरुद्ध सेना-भाजप युती अशी झालेली आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसांत ‘अक्षरनामा’वर प्रकाशित झालेले हे लेख...

.............................................................................................................................................

राज ठाकरेंच्या सभा ‘लढाई’पूर्वीची ‘अंगडाई’ ठरणार?, ‘वंबआ’ची ‘तेलही गेले नि तूपही गेले’ अशी गत होणार?प्रज्वला तट्टे

राज ठाकरेंच्या गुढीपाडव्या निमित्ताने शिवाजी पार्कवर झालेल्या भाषणाने इतिहास घडवला! हे भाषण सुरू होते, त्या वेळेला ‘रामायण’, ‘महाभारत’ आणि ‘बुनियाद’ या टीव्ही मालिकांचे दिवस आठवले! या मालिकांचे दूरदर्शनवर प्रक्षेपण सुरू असताना गल्लीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जाणाऱ्या व्यक्तीच्या कानावर फक्त तोच एक आवाज यायचा. राज ठाकरेंचे भाषण सुरू असतानाही अख्ख्या महाराष्ट्रात त्या थेट प्रक्षेपणाच्या काळात फक्त त्यांचाच आवाज ऐकायला येत होता.

संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3175

.............................................................................................................................................

राज ठाकरेंच्या तोफा आणि माध्यमांची ‘मोदी बचाव’ चौकीदारी!संजय पवार

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला पाच दिवस उरलेले असताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दसऱ्याचं निमित्त साधून स्वत:चा पक्ष न लढवत असलेल्या निवडणूक प्रचाराची सुरुवात केली. देशातील सर्वांत पहिला मोदी स्तुतीपाठक आणि २०१४ला युतीविरोधात उमेदवार उभे करूनही मोदींच्या पंतप्रधानकीला पाठिंबा देणारे ते देशातले एकमेव नेते होते!

आज २०१९ साली ते देशातले सर्वांत कडवे व नंबर दोनचे विरोधक आहेत मोदींचे! नंबर एकवर आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी. त्यांचा काँग्रेस पक्ष देशातला सर्वांत जुना राष्ट्रीय पक्ष आहे, तर महाराष्ट्राबाहेरच्या राजकारणात, सत्ताकारणात राज ठाकरेंना रस नाही. त्या अर्थाने ते प्रादेशिक नेते. असे ते तांत्रिकदृष्ट्या नंबर दोनवर आहेत. पण त्यांच्या विरोधाची पद्धत पाहिली तर ते नंबर एकचे कडवे विरोधक ठरतात.

संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3179

.............................................................................................................................................

‘राज ठाकरे पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस!’ जयदेव डोळे

महाराष्ट्रात अशा वेळी ‘राज ठाकरे पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस’ सुरू झाली, ही नक्कीच आशादायी, स्वागतार्ह आणि अनिवार्य अशी गोष्ट झाली! त्यांच्या भाषणात बातमी, अग्रलेख, व्यंगचित्र, भाष्य, दृश्यात्मक पुरावे, संवाद आणि निवेदन, निरीक्षण, प्रत्यक्ष भेट आणि निष्कर्षही असतो. म्हणजे ‘ट्राय’च्या नव्या नियमांनुसार कोणत्याही वाहिनीचे प्रक्षेपण आम्ही पाहिले तरी त्यांत जे मिळणार नाही, ते ठाकरे यांच्या प्रसारणात आम्हाला मिळते!

पत्रकारांनी कॅमेरापर्सनला घेऊन जे दाखवायचे, ते आता चक्क एक राजकीय पुढारी करू लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या घोषणांची पोकळ स्थिती, सरकारी कार्यक्रमांचा बोजवारा, अशा अनेक गोष्टी पत्रकारांनी दाखवायच्या असतात. त्यांनी हे काम करणे कधीचेच सोडून दिल्याने राज ठाकरे यांना आपली स्वत:ची एक ‘वार्ता-विश्लेषण सेवा’ सुरू करावी लागली आहे.

राज ठाकरे तसे एक चांगले वक्ते आहेत. त्यांचे निवडणूक प्रचारातील आगमन हीसुद्धा उत्साहवर्धक बाब होय. सध्या प्रचारसभा म्हणजे निव्वळ निरुत्साहाचा अन नाउमेदीचा नमुना! प्रचारसभांमधून वक्त्यांचे भाषिक कौशल्य दिसते. मुद्द्यांची नेमकी मांडणी, श्रोत्यांना किस्से, विनोद, तत्त्वज्ञान, स्वानुभव, इतिहास, राजकारण, विचार इ. सांगत सांगत प्रचार होत असतो. परंतु सारेच पक्ष एकतर पाणचट व वाह्यात भाषा वापरणाऱ्यांची ‘होळी’ झाले आहेत. वाचन नाही की अभ्यास आणि चिंतन नाही की श्रवण!

संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3182

.............................................................................................................................................

राज ठाकरेंचं तुफान निखिल वागळे

महाराष्ट्रातली यंदाची लोकसभा निवडणूक रंगतदार करण्याचं संपूर्ण श्रेय राज ठाकरेंना दिलं पाहिजे. त्यांचा पक्ष एकही जागा लढवत नसताना त्यांनी आपल्या भाषणांनी राज्यभरात एक जबरदस्त तुफान निर्माण केलं आहे. १९७७पासून आजपर्यंत लोकसभा, विधानसभा आणि सर्व छोट्या-मोठ्या निवडणुकांचा मी साक्षीदार आहे. पण ज्यांचा एकही उमेदवार रिंगणात नाही, अशा पक्षाच्या नेत्यानं मैदान गाजवल्याची एकही घटना मला आठवत नाही.

एका दृष्टीनं राज ठाकरेंचा सध्याचा अवतार हा त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अभूतपूर्व म्हटला पाहिजे. ते उत्तम वक्ते तर पूर्वीपासूनच आहेत, पण या वेळी त्यांच्या वक्तृत्वात मुद्देसूदपणा आणि अभ्यासू वृत्ती दिसते आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आजवर कधीही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा दिला नव्हता. आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव हे त्यांचं लक्ष्य आहे, पण त्यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मत द्यायला ते सांगत आहेत. मोदी-शहा जायला हवेत, त्यासाठी राहुल गांधी पंतप्रधान झाले तरी हरकत काय, हा त्यांचा आपल्या सभेला येणाऱ्या लाखो श्रोत्यांना थेट संदेश आहे. 

संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3209

.............................................................................................................................................

राज ठाकरेंच्या छायेत... - प्रवीण बर्दापूरकर

देशात सर्वत्र नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत होत असताना महाराष्ट्रावर मात्र ‘राज छाया’ पसरलेली आहे आणि लढाई राज ठाकरे विरुद्ध सेना-भाजप युती अशी झालेली आहे. परिणामी महाराष्ट्रात सेना-भाजप युती ३२ ते ३५ च्या दरम्यान जागा मिळवेल, असे जे अंदाज माध्यमतज्ज्ञ आणि विविध पाहण्यांतून समोर आलेले होते, त्याला छेद जातो की काय अशी हवा निर्माण झालेली आहे. उदाहरणच द्यायचं तर ‘निसटत्या का होईना बहुमतानं सुशीलकुमार जिंकतील’, ‘अशोक चव्हाण जागा काढतीलच’ , ‘कमी मार्जिननं का असेना नितीन गडकरी जिंकतीलच’ आणि ‘बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम मुंडे हरल्या तर आश्चर्य वाटायला नको’... अशा चर्चांना आता पेव फुटलं आहे.

यात तथ्य किती, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात जाण्यात काहीच मतलब नाही. कारण मतदारांनी कौल दिलेला आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. मुद्दा आहे महाराष्ट्राची हवा बदलू लागलेली आहे आणि त्याचं श्रेय राज्यात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला नाही, तर ते राज ठाकरे यांना आहे. त्यासाठी त्यांना केवळ १०-१२ जाहीर सभा घेतल्या आहेत. अशा सभा जर त्यांनी पहिल्या टप्प्याआधीच विदर्भ-मराठवाड्यातही घेतल्या असत्या आणि सध्या घेत आलेल्या सभांची संख्या किमान दुपटीनं वाढवली असती तर चित्र आणखी वेगळं दिसलं असतं, यात शंकाच नाही.

संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3219

.............................................................................................................................................

राज ठाकरेंसारखं सत्य इतरांना का बोलता येत नाही?परिमल माया सुधाकर

राज ठाकरे तुफान सुटले आहेत. त्यांच्या प्रत्येक सभेनंतर नव्या सभांसाठीच्या मागणीत वाढ होते आहे. सामाजिक माध्यमांमध्ये त्यांच्या भाषणातील दाखलेच्या दाखले, क्लिप्सच्या क्लिप्स धुमाकूळ घालत आहेत. भाजप-शिवसेना युतीला त्यांचा प्रतिवाद करणे कठीणच नाहीतर अशक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल हरिसालच्या मुद्द्यावर सावरासावर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांची जी फटफजिती झाली, ती महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कधीही कुणाचीही झाली नव्हती! हरिसालच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी भाजप-सेनेच्या  किल्लेदाराला नागडेच केले नाही, तर त्याचे कपडेच अरबी समुद्रात फेकून दिले. किल्लेदाराची ही अवस्था तर ज्याला राज ठाकरेंनी ‘लावारीस सेना’ म्हटले, त्या भाजप-सेनेच्या कार्यकर्त्यांबद्दल काय बोलावे? पण, निर्लज्जम सदा सुखंची प्रचिती देणाऱ्या ट्रोल्सने राज ठाकरेंचा नाद सोडला आहे असेही नाही! मोदी काळातील वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीनुसार ट्रोल्सनी राज ठाकरेंनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी प्रती-प्रश्न विचारण्याचा सपाटा लावला आहे. यातच राज ठाकरे उपस्थित करत असलेल्या प्रश्नांना भाजप-सेनेकडे उत्तर नाही, कुठलेही स्पष्टीकरण नाही हे कळून चुकते आहे.

संपूर्ण लेखासाठी पहा - https://www.aksharnama.com/client/article_detail/3220

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......