चालता-बोलता मनुष्यरूपी रोबोट बनवण्याऐवजी बुद्धिमान भारतीय नागरिक कसा बनवता येईल?
पडघम - देशकारण
रजनीकांत मोहन पालवे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 24 April 2019
  • पडघम देशकारण शिक्षण Education तक्षशिला विद्यापीठ Takshashila University नालंदा विद्यापीठ Nalanda University मॅकॉले Macaulay

आज आपली शिक्षण व्यवस्था अतिशय गंभीर वळणावर उभी आहे. शिक्षण देण्याच्या भाऊगर्दीत बुद्धिमत्ता देण्यात या व्यवस्थेला अपयश येताना दिसून येत आहे. शिक्षणाचे जे बाजारीकरण सुरू आहे, त्यावर उपाय शोधण्याचा सरकार-प्रशासन प्रयत्न करेलच, परंतु  सामान्य नागरिक म्हणून आपण यातून कसा मार्ग काढू यावर सामूहिक चर्चा होणे तितकेच गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला या व्यवस्थेच्या जन्मापासूनच्या प्रवासाकडे जावे लागेल. कदाचित या प्रवासातूनच आपल्याला काही शिकता येईल आणि आणि अपेक्षित बदलाच्या नांदीची सुरुवात करता येईल.

भारतीय शिक्षण व्यवस्थेच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न केल्यास आपल्याला द्रविड, आर्यन, मंगोलियन आणि सायशियन या राज्यकर्त्यांच्या इतिहासात डोकवावे लागेल. या चारपैकी द्रविड आणि आर्यन साम्राज्यात लोकाभिमुख कार्य झाले होते. द्रविड कारभार प्रामुख्याने बांधकाम आणि संगीत यावर आधारित होता, तर आर्यन राज्यकारभार आध्यात्मिक व नैतिक कल्पनेवर आधारित होता.

आपल्या देशावर आर्यन संस्कृतीचा पगडा जास्त काळ टिकला. त्यासोबतच आपली भौगोलिक परिस्थिती इतर देशाच्या तुलनेत चांगली होती. त्यामुळे युरोपियन आणि इतर तत्सम देशांसारखा जगण्यासाठीचा (खाद्य शोधणे) संघर्ष आपल्या नशिबी कमीच आला. म्हणूनच आपण वेळेचा सदुपयोग आणि आर्यन संस्कृती यामुळे आपण ध्यानधारणा आणि तत्त्वज्ञान या क्षेत्रात पारंगत झालो. आणि तिथून आपल्या शिक्षण व्यवस्थेची पायाभरणी सुरू झाली.

सुरुवातीच्या काळात गुरुकुल आणि पाठशाळा पद्धतीत आचार्य (शिक्षक)-शिष्य (विद्यार्थी) ही अनमोल परंपरा रूढ झाली. वेदिक शिक्षणाचे दूरगामी फायदे दिसू लागल्यामुळे दुसऱ्या देशातील समाजदेखील याकडे आकर्षित होऊ लागला. त्याचीच फलनिष्पती म्हणून आर्यभट्ट आणि चाणक्य यांसारखे हिरे आपण जगाला देऊ शकलो.

तदनंतर बौद्ध आणि जैन शिक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात प्रचलित झाली. त्याचाच परिपाक म्हणून जगातील पहिले भव्यदिव्य, साहित्य संपदेने विपुल असे ‘नालंदा विद्यापीठ’ आपण जगाला समर्पित करू शकलो. त्यासोबतच बौद्धी शिक्षण व्यवस्थेचा उत्कृष्ट परिणाम म्हणून ‘तक्षशिला विद्यापीठ’ नावाजले गेले. नंतरच्या मुस्लिम शासकांच्या काळात व्यावसायिक शिक्षणाची सुरुवात झाली. परंतु दुर्देवाने मुस्लिम शासकांच्या काळातच नालंदा आणि तक्षशिला उद्ध्वस्त करण्यात आली.

१८०० च्या काळात भारतीय शिक्षणव्यवस्था ब्रिटिश पुरस्कृत वसाहती शिक्षणाच्या नावाखाली ब्रिटिश मिशनरींच्या एका छुप्या अजेंड्याकडे खेचली गेली आणि तिथूनच आपल्या देशाचा बौद्धिक ऱ्हास सुरू झाला. जुन्या व्यवस्थेत शिष्य-गुरूला आजीवन सेवारूपी गुरुदक्षिणा द्यायचा, पण ब्रिटिश काळापासून शिक्षकांना पैसेरूपी पगार देऊन शिक्षकांना वळचणीला बांधण्याची पद्धत सुरू झाली. नंतर इंग्रजी माध्यमाच्या शाळा मुंबई, चेन्नई, कोलकाता या शहरात सुरू करण्याचा सपाटा लावला गेला. विभागनिहाय विद्यापीठे काढून त्याची पाळेमुळे आणखी घट्ट केली गेली. शिक्षणातूनच सरकारी नोकरी असा नवा दंडकदेखील इथूनच सुरू झाला.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4795/Spasht-Bolayacha-Tar

.............................................................................................................................................

ब्रिटिश राजवटीने भारतीय शिक्षण व्यवस्थेत कमालीचा बदल केला, पण त्यात काही अनिष्ट परंपरांनी जन्म घेतला. जसे की, संपूर्ण शिक्षण सहस्त्र वर्षे जुन्या मायबोलीऐवजी इंग्रजीतून, फी नुसार शाळांची वर्गवारी करून गरिबी-श्रीमंतीमध्ये भिंत उभी केली गेली, शाळेवर खाजगी मंडळांचे नियंत्रण आणले गेले वगैरे.

या अनिष्ट प्रथांमुळेच आज आपली शिक्षण व्यवस्था एका भयानक अवस्थेतून मार्गक्रमण करत आहे. स्वातंत्रपूर्व काळात औद्योगिक गरजांवर आधारित मनुष्यबळाची संख्या वाढवण्यासाठी पार्टटाईम शिक्षणाचा प्रकार सुरू झाला. जितक्या प्रमाणात पार्टटाईम विद्यार्थी तितक्या प्रमाणात, रोजगार नसल्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ होत गेली.

आज आपली शिक्षण पद्धती निश्चितच समाधानकारक आहे, परंतु ती तितकीच मर्यादितही आहे. या शिक्षणातून चांगले नोकर जरूर मिळतील, परंतु एक बुद्धिमान, ध्येयवेडा, कुटुंबासह देशाला प्रगतीपथावर नेणारा वर्ग खचितच देऊ शकू. या संपूर्ण उलट्या प्रवासात व्यवस्थेत होणाऱ्या बदलासोबत पालकांची बदलत गेलेली मानसिकताही कारणीभूत आहे. संसार-नोकरी/व्यवसाय या रहाटगाड्यात गुंतून मुलांच्या परिपूर्ण विकासाकडे दुर्लक्ष करून सारी भिस्त शिक्षण व्यवस्थेवरती ठेवल्यामुळेच ही वेळ आली आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरणार नाही.

अर्थात जागरूक पालक वर्ग याला नक्कीच अपवाद आहे. सध्याच्या व्यवस्थेत काही चांगल्या बाबी नक्की आहेत. म्हणूनच देश-आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीयांना भरपूर मागणी आहे. आपला विद्यार्थी जागतिक पातळीवरती भारताचा झेंडा दिमाखात मिरवत आहे, परंतु लोकसंख्येच्या प्रमाणात बुद्धिमत्तेची मोजदाद करावयाची वेळ आल्यास ती खेददायक असेल.

काही वर्षापूर्वीचे स्वामी विवेकानंदांचे विचार आजही लागू होतात की, “आपली शिक्षण व्यवस्था मुळात चुकीची आहे. ज्यामध्ये विचार कसा करावा हे न बिंबवता घोकंमपट्टी आधारित शिक्षणाने मेंदूवर ताबा घेतला आहे.”  

भविष्यात आपल्याला चालता-बोलता मनुष्यरूपी रोबोट बनवण्याऐवजी बुद्धिमान भारतीय नागरिक कसा बनवता येईल, यावर पर्याय शोधला पाहिजे. वाढती लोकसंख्या, वाढते संगणकीकरण आणि घटत जाणारे रोजगार यावर कालबद्ध पर्याय काढण्यासाठी सरकार-प्रशासन यांनी संयुक्त पातळीवर जोरदार प्रयत्न करणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यासाठी सरकारी पातळीवरून उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्तता करणे, ब्रिटिशकालीन अनिष्ट प्रथा बंद करणे, इंग्रजीचा अट्टहास न करता मायबोलीतून शिकवले गेले तर स्व:अध्ययन सोपे जाईल, फी शाळेत न भरता थेट सरकारकडे जमा करण्याची यंत्रणा उभी करणे, लघु-मध्यम तसेच शेतीपूरक उद्योगांचा अभ्यासक्रमात समावेश करणे, नोकरीतर पर्यायांची ओळख करून देणे, योगा, ध्यानधारणासोबत खेळाचा कुठलाही एक प्रकार बंधनकारक करून मुलांच्या कल्पकतेवर आधारित विषयांची बांधणी करणे, अशा गोष्टी व्यवस्थेत आणून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासोबत त्याला जबाबदार नागरिक करण्याची खूणगाठ बांधली पाहिजे.

भूतकाळात आपली शिक्षण व्यवस्था किती महान होती, यावर चर्चा करण्यापेक्षा भूतकाळातील चांगल्या गोष्टींचे अनुकरण वर्तमानकाळात केल्यास आपला भविष्यकाळ नक्कीच सुंदर व समृद्ध होईल. जास्तीत जास्त लोकांच्या समूहांपर्यंत शिक्षण आणि बुद्धिमत्ता पोहोचल्यास भारत जगात बलशाली राष्ट्र म्हणून पुढे येईल यात तीळमात्र शंका राहणार नाही.

.............................................................................................................................................

लेखक रजनीकांत मोहन पालवे मराठवाडा मित्रमंडळ तंत्रनिकेतन, पिंपरी चिंचवड इथे अधिव्याख्याता आहेत.

palwerm@mmpolytechnic.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Dhananjay Bhosale

Wed , 24 April 2019

अभ्यासपूर्ण विश्लेषण.....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......