दुसऱ्या धर्माबद्दल, दुसऱ्या जातीबद्दल, दुसऱ्या माणसांबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत ते ओळखूया
पडघम - साहित्यिक
जयंत पवार, राजीव नाईक
  • प्रातिनिधिक चित्र
  • Tue , 09 April 2019
  • पडघम साहित्यिक निवडणूक Election

मराठीतील तीन पिढ्यांतील लेखक तसेच काही प्रकाशक व संपादक अशा एकूण १०७ व्यक्तींच्या सहमतीने हे निवेदन तयार करण्यात आलेले आहे. यात ज्ञानपीठ विजेते, सरस्वती सन्मान विजेते, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, राज्य पुरस्कार विजेते लेखक-प्रकाशक यांचा समावेश आहे.

.............................................................................................................................................

आपल्याला आपल्या लोकशाही राज्यघटनेने दिलेल्या आचार, विचार, आहार, विहार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भारत देशाचे नागरिक म्हणून आम्हाला नेहमीच आदर वाटत आलेला आहे. त्यामुळेच या स्वातंत्र्यावर जेव्हा हल्ले झाले, त्याची गळचेपी करण्याचे प्रयत्न झाले, तेव्हा आम्ही त्याचा निषेध केलेला आहे, मग ते कुठलेही सरकार असो. पण गेल्या पाच वर्षांत सातत्याने माणसांच्या नागरी स्वातंत्र्यावर, व्यक्त होण्यावर हल्ले होत आहेत आणि त्यांच्या निष्ठांवर संशय घेवून त्यांना राष्ट्रद्रोही ठरवले जात आहे, त्यांच्या मनात भीतीची भावना निर्माण केली जात आहे. या वाढत्या समाजविघातक प्रवृत्तीचा केवळ निषेध करून भागणार नाही, तर ठोस कृती करून तिचा निपटारा करण्याची आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. अशी कृती करण्याची संधी आपल्याला सार्वत्रिक निवडणुकांच्या रूपाने राज्यघटनेने उपलब्ध करून दिलेली आहे. ही संधी आता आपल्या दाराशी आलेली आहे. येत्या काही दिवसांतच होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान करून भारताच्या सार्वभौम लोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडण्याची जबाबदारी आपल्यावर आलेली आहे.

आम्हाला हे ठाऊक आहे की, आपले मत कुणाला द्यायचे वा द्यायचे नाही, हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्या अधिकाराचा आदर राखून आम्ही मराठी लेखक सर्व सुजाण नागरिकांना असे आवाहन करतो की, आपण आपला मतदानाचा अधिकार जबाबदारीने वापरूया. आपल्या मनात दुसऱ्या धर्माबद्दल, दुसऱ्या जातीबद्दल, दुसऱ्या माणसांबद्दल द्वेष निर्माण करणाऱ्या शक्ती कोणत्या आहेत ते ओळखूया, अशा द्वेषभावनांना पोसणारे आणि हिंसक कृत्ये करून समाजात दहशत माजवणाऱ्या टोळ्यांना अभय देणारे राजकारणी कोण आहेत ते ओळखूया, जनतेच्या जीवनमरणाच्या प्रश्नांना बगल देऊन राष्ट्रवादाचा फुगा फुगवण्यामागचे राजकारण जाणून घेऊया, आणि अशा शक्तींना येत्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देवूया. ती वेळ आता आलेली आहे. आपली लोकशाही आणि तिने दिलेले स्वातंत्र्य शेवटी आपल्यालाच जपायचे आहे, त्याची बूज राखायची आहे. कारण त्यातच आपले आणि समाजाचे स्वास्थ्य दडलेले आहे.

- भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार, जयंत पवार, राजीव नाईक, येशू पाटील, प्रदीप चंपानेरकर, प्रशांत बागड, अरुण खोपकर, रंगनाथ पठारे, चंद्रकांत पाटील, शफाअत खान, रामदास भटकळ, लैला भटकळ, शांता गोखले, हरिश्चंद्र थोरात, श्याम मनोहर, रत्नाकर मतकरी, सतीश आळेकर, अवधूत डोंगरे, नीरजा, रणधीर शिंदे, प्रज्ञा दया पवार, वसंत आबाजी डहाके, प्रभा गणोरकर, हेमंत दिवटे, नितीन रिंढे, मंगेश नारायणराव काळे, प्रवीण दशरथ बांदेकर, संध्या नरे पवार, हरी नरके, संजय पवार, अरुणा सबाने, माया पंडित, अशोक राणे, महेश केळुसकर, अशोक मुळ्ये, सतीश तांबे, सतीश काळसेकर, आसाराम लोमटे, किरण गुरव, मुकुंद टाकसाळे, गणेश विसपुते, वसंत पाटणकर, मिलिंद मालशे, नागनाथ कोत्तापल्ले, विजय चोरमारे, उदय रोटे, संतोष पद्माकर पवार, अविनाश गायकवाड, महेंद्र भवरे, मंगेश बनसोड, श्यामल गरुड, मोनिका गजेंद्रगडकर, कल्पना दुधाळ, प्रेमानंद गज्वी, अजय कांडर, श्रीधर नांदेडकर, अशोक बागवे, अरुण शेवते, संध्या गोखले, मिलिंद चंपानेरकर, दत्ता पाटील, प्राजक्त देशमुख, सुमती लांडे, धर्मकीर्ती सुमंत, मकरंद साठे, आशुतोष पोतदार, अतुल पेठे, रवींद्र लाखे, मनस्विनी लता रवींद्र, ओंकार गोवर्धन, दा. गो. काळे, रमेश इंगळे उत्रादकर, किरण यज्ञोपवीत, प्रतिमा जोशी, मुकुंद कुळे, संतोष शेणई, गणेश मतकरी, विजय तांबे, प्रणव सखदेव, गणेश कनाटे, प्रशांत पवार, शेखर देशमुख, राजन बावडेकर, बलवंत जेऊरकर, फेलिक्स डिसोझा, अजित अभंग, सुनील अवचार, मोहन शिरसाट, सुदाम राठोड, शुभांगी थोरात, दिलीप जगताप, बालाजी सुतार, रफिक सूरज, चंद्रकांत बाबर, शिवाजी गायकवाड, अनुजा जगताप, नीता कुलकर्णी, अविनाश कदम, युगंधर देशपांडे, हेमंत कर्णिक, स्वप्नील शेळके, प्रसाद कुमठेकर, आशिष पाथरे, सत्यपालसिंग आधारसिंग रजपूत, अतुल कहाते.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Thu , 11 April 2019

मी निवेदनाशी साधारणत: सहमत आहे. बाबरी नावाची कोणतीही मशीद नसतांना तिच्या नावाने ऊर बडवणाऱ्या पक्षाला आजिबात मत देऊ नये. तसंच अयोध्येत जुन्या राममंदिराचे अवशेष सापडले आहेत. अशा गैरइस्लामी ठिकाणी मशीद बांधणे हा इस्लामचा घोर अवमान आहे. मुस्लिमांच्या धर्मभावनांशी आचरट खेळ करणाऱ्या राजकीय पक्षांना आपण साऱ्या मतदारांनी सत्तेपासून कटाक्षाने दूर ठेवायला पाहिजे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......