टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • अर्णब गोस्वामी, रावसाहेब दानवे, चंद्राबाबू नायडू, पेटीएम आणि धसई गाव
  • Mon , 19 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या अर्णब गोस्वामी Arnab Goswami कॅशलेस वसाहेब दानवे Raosaheb Danve नोटबंदी Demonetisation चंद्राबाबू नायडू Chandrababu Naiduपेटीएम Paytm

१. ‘टाइम्स नाऊ’ वृत्तवाहिनीचे माजी मुख्य संपादक अर्णब गोस्वामी लवकरच ‘रिपब्लिक’ नावाने नव्या इनिंग्जला सुरुवात करणार आहेत. ‘माझ्या नव्या वाहिनीचे नाव ‘रिपब्लिक’ असेल. मी यासाठी भारतीयांकडे पाठिंब्याचे आवाहन करतो,’ असे गोस्वामी यांनी म्हटले आहे.

अर्णबला सत्ताधाऱ्यांची पाठराखण करता करता त्यांच्या सवयीही जडलेल्या दिसतायत. असंही तो सगळं काही (अंघोळ, भांग पाडणे, पेन्सिल नाचवणे वगैरे सगळं काही) देशाच्या वतीनेच करायचा. म्हणूनच आपल्या व्यवसायाला सगळ्या भारतीयांनी 'पाठिंबा' द्यावा, असं आवाहन केलंय त्याने. अरे बाबा, तू ज्या भाषेत बोलतोस टीव्हीवर ती भाषा (इंग्रजी आणि उद्दामपणाची) या देशात फारच थोड्यांना अवगत आहे. बाकीच्यांसाठी ध्वनीप्रदूषणात भर, यापलीकडे काय अर्थ असणार तुझ्या वाहिनीचा?

……………………………………….

२. नोटाबंदी सुरू झाल्यानंतर सगळ्यात आधी राज्यातली वाइन शॉप्स आणि तिथले मद्यपी खरेदीदार कॅशलेस व्यवहार करू लागले. वाइन शॉपवर कार्ड स्वाईप करून व्यवहार होऊ लागले. दारूची तहान कॅशलेस व्यवहारांच्या तहानेत परिवर्तित झाली. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मात्र अशी निकड, अशी तहान दिसत नाही. ही मानसिकता असेल, तर देशात डिजिटल क्रांती कशी होणार? : आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू

सर्व सरकारी अधिकाऱ्यांना ऑन ड्युटी पेयपानाची मुभा दिली किंवा त्यांच्यावर ती सक्तीच केली, तर देश लवकर कॅशलेस होईल काय? नाहीतरी सरकारचे बरेच निर्णय कसल्या तरी तारेत घेतल्यासारखेच वाटतात सर्वसामान्य माणसांना. निदान आता तसं थेट म्हणायची सोय तरी होईल.

……………………………………….

३. नोटांबदीमुळे लोकांना सहन करावा लागणारा त्रास कमी करण्यासाठी मोदी सरकारने पेटीएमची मदत घेतली. नोटाबंदीनंतरच्या दुसऱ्याच दिवशी पेटीएमच्या जाहिरातींमध्ये मोदींचे छायाचिदेखील झळकले. मात्र आता या अॅपद्वारे पेमेंट करताना अनेक अडचणी येत आहेत. इंटरनेटच्या सहाय्याने पेटीएम सेवेचा वापर करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने कॅशलेस इंडियासोबतच डिजिटल इंडियाचादेखील फज्जा उडताना दिसत आहे.

कोण आहे रे तिकडे? या बातमीदाराला पाकिस्तानला धाडा. राजाचा लाडका पोपट मेला आहे, असं म्हणायचं नसतं; तो शवासनात गेला आहे, असं सांगायचं असतं, नाहीतर आपल्यावर शवासनात जाण्याची वेळ येऊ शकते, इतका साधा नियम माहिती नाहीये त्याला!

……………………………………….

४. मतदानाच्या आधी लक्ष्मी घरात येते. त्या लक्ष्मीचे स्वागत करा. निवडणुकीची आधीची रात्र खूप महत्त्वाची असते. तुम्हाला अचानक लक्ष्मीदर्शन होईल. अशा अचानक आलेल्या लक्ष्मीचे स्वागत करा. ती परत करू नका. पण मतदानाचा निर्णय पक्का करा. :  भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे

निवडणुकीआधी लक्ष्मी येते घरा, तिचे स्वागत करा, हाच निवडणुका जिंकण्याचा मंत्र खरा. पण, दानवेसाहेब, हे जरा माननीय मुख्यमंत्रीसाहेबांना सांगा, जमल्यास पंतप्रधानांना सांगा; त्यांची अशी गैरसमजूत झालीये की, त्यांनी काळा पैसा खणून काढण्याच्या नावाखाली लोकांवर लादलेली नोटाबंदीची गैरसोयच लोकांना खूप भावली आहे आणि तिला प्रतिसाद म्हणून निवडणुकांमध्ये भाजपला बऱ्यापैकी यश मिळतं आहे.

……………………………………….

५. मुरबाड तालुक्यातील धसई हे गाव देशातील पहिले रोखरहित गाव असल्याचा गवगवा सरकारी पातळीवरून करण्यात आला असला, तरी या गावातील बहुतांश व्यवहार अजूनही रोखीनेच होत असल्याचे दिसते. रोखरहित व्यवहारांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत व्यवस्थेचा अभाव, दुबळी बँकिंग यंत्रणा तसेच नागरिकांमधील या व्यवहारांबाबतची अनास्था यामुळे ‘कॅशलेस धसई’ फक्त प्रचार आणि घोषणांतच असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेथील ग्रामस्थ दैनंदिन खर्चासाठी दररोज लाखो रुपये गावातील बँकेतून काढत असून, डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्याचा आग्रह धरणाऱ्यांची संख्यादेखील सुमारे पाच ते दहा टक्केच असल्याचे दिसते आहे.

एकदा सरकारने आणि परिवारातल्या संघटनांनी एखादी गोष्ट अशी अशी आहे, असं सांगितल्यानंतर वर्तमानपत्राच्या वार्ताहरांनी तिची खातरजमा करण्याचा अगोचरपणा करावाच कशाला? सरकारच्या कोणत्याही निर्णयाविरुद्ध बोलणं किंवा त्यातले दोष दाखवणं हा द्वेष आणि देशद्रोह आहे, याची कल्पना नाही का या वर्तमानपत्राला?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......