‘पंचायतराज’ व्यवस्था सबळ करणाऱ्या ‘पंचायत भारती’चा वर्षारंभ विशेषांक ‘अक्षरनामा’च्या माध्यमातून
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • ‘पंचायत भारती’ या मासिकाचा वर्षारंभ अंक, मार्च २०१९
  • Wed , 27 March 2019
  • संपादकीय अक्षरनामा पंचायत भारती Panchayat Bharti

१९९३ साली झालेल्या ७३ व्या घटनादुरुस्तीने पंचायतराज व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणले. घटनादुरुस्तीला अनुलक्षून महाराष्ट्रातील कायद्यातही बदल करण्यात आले. कायद्यात झालेल्या या आकस्मिक बदलामुळे महिला आणि आवाज हरवून बसलेल्या वंचित गटांकडे अधिकारपदाची धुरा आली. ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी कायदा कामकाजाची माहिती लोक आणि लोकप्रतिनिधी यांना सतत मिळावी यासाठी ‘पंचायत भारती’ पाक्षिकाचे प्रकाशन सुरू झाले. समाज परिवर्तनाचे माध्यम असणारी विकेंद्रित सहभागी लोकशाहीची पंचायतराज व्यवस्था सबळ करणे आणि मनुष्यबळासह सर्वच नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे हा ‘पंचायत भारती’चा प्रमुख हेतू आहे.

गेली २४ वर्षे आपल्या उद्देशानुसार आणि उद्दिष्टानुसार ‘पंचायत भारती’ या पाक्षिकाचे प्रकाशन होत राहिले. या पाक्षिकाने याच म्हणजे मार्च महिन्यात २५व्या वर्षांत पर्दापण केले आहे. हा पहिला वर्षारंभ विशेषांक छापील स्वरूपात प्रकाशित न करता, तो ‘अक्षरनामा’च्या माध्यमातून ऑनलाईन उपलब्ध करून दिला जात आहे. ‘पंचायत भारती’ आणि ‘अक्षरनामा’चा हा संयुक्त उपक्रम वाचकांना आवडेल, अशी आहे.

लेखांचा अनुक्रम

१) महात्मा गांधी आणि पंचक्रोशी ते पंचखंड - विजय दिवाण
https://www.aksharnama.com/client/article_detail/3131
२) सिंगा वेस्ता पाडवी नावाच्या एका नर्मदा विस्थापिताची कहाणी - लतिका राजपूत
https://www.aksharnama.com/client/article_detail/3132
३) ‘सोरी मोठी हिनी, तिना लगीन करीन टाकू’ - अलका गाडगीळ
https://www.aksharnama.com/client/article_detail/3133
४) तेरेखोल नदी यात्रा - उगमापासून संगमापर्यंत - हरिहर वाटवे
https://www.aksharnama.com/client/article_detail/3134
५) पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतरची माझ्या अल्पवयीन भारतीय नागरिकांची देशभक्ती - रजिया सुलताना
https://www.aksharnama.com/client/article_detail/3135

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

भारतीय जनतेने ‘एनडीए आघाडी’ला सत्ता दिली, पण तिचा हर्षोन्माद व्हावा, अशी दिली नाही आणि ‘इंडिया आघाडी’ला विरोधी पक्षात बसवले, पण हर्षोन्माद व्हावा, इतकी मोठी आघाडी दिली!

२०२४ची लोकसभा निवडणूक ही १९७७नंतरची सर्वांत महत्त्वाची निवडणूक आहे, असे प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी काही दिवसांपूर्वी लिहिले होते. ते ‘रायटिंग ऑन वॉल’ होते, हेही भारतीय जनतेने मोदींना स्पष्टपणे बजावले आहे. ते मोदी कितपत गांभीर्याने घेतात किंवा नाही, हे येत्या काही दिवसांत समजेलच. मोदी आणि भाजपनेते ‘चार सौ पार’चा जयघोष करत राहिले, पण भाजपला अपेक्षित बहुमतही मिळालेले नाही, हेही नसे थोडके.......