‘The Verdict’ : एका निवडणूक-अभ्यासकाचं पुस्तक
पडघम - माध्यमनामा
रवीश कुमार
  • डॉ. प्रणॉय रॉय आणि त्यांच्या ‘The Verdict’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 13 March 2019
  • पडघम माध्यमनामा डॉ. प्रणॉय रॉय Prannoy Roy दोराब सोपारीवाला Dorab R. Sopariwala द व्हर्डिक्ट The Verdict रविशकुमार Ravish kumar

रवीश कुमार यांच्या छोटेखानी लेखाचा मेधा कुळकर्णी यांनी केलेला स्वैर अनुवाद.

...............................................................................................................................................................

निवडणूक आली की, डॉ. प्रणॉय रॉय ती अभ्यासायला निघतात. ते निवडणूक कव्हर करायला नाही, शिकायला जातात. कित्येक वर्षं बघतोय, ते निवडणुकीदरम्यान दिल्लीहून निघतात आणि ठिकठिकाणी फिरून परततात. मी विचार करतो, यांच्या अंतर्यामी किती निवडणुका असतील! ते या आतल्या निवडणुकांना कसे सांभाळून ठेवत असतील? ते या विषयावर पुस्तक कधी लिहितील?

आपण कुठूनही फिरून आलो तरी, अगदी चौकात कुणी भेटलं की, त्याला सांगत सुटतो. पण डॉ. रॉय तसे नाहीत. ते लायब्ररीत बसून तास न् तास अभ्यास केल्यानंतर मान खाली घालून घरी जाणार्‍या एखाद्या विद्यार्थ्यासारखे गप्प असतात.

डॉ. रॉय टीव्हीवरदेखील कमीत कमी बोलतात. स्वतःजवळची माहिती दुसर्‍याच्या माथी मारत नाहीत. न्यूजरूममध्ये आमच्यापुढे स्वतःची शेखी मिरवायला आपलं ज्ञान वापरत नाहीत. खरं तर, आमच्याकडूनच ऎकतात आणि गप्प राहतात. तसं बोलणं कमीच होतं. ते जराही जाणवू देत नाहीत की, बच्चू, मी या कामातला उस्ताद आहे!

ते बाहेर जातात आणि जनतेचा आवाज ऎकून परततात. तसंच ते न्यूजरूममध्ये येतात आणि आमचं बोलणं ऎकून निघून जातात. दीर्घ काळ दम धरून या विद्यार्थ्यानं निवडणुकीवर पुस्तक लिहिलंय. पुस्तकाचं शीर्षक संक्षिप्त, त्यांच्या शैलीला साजेसं – ‘The Verdict’.

या पुस्तकात त्यांचा अनुभव आहे. त्यांनी घेतलेला शोध आहे. त्यांच्यासोबत आणखी एक नाव आहे – दोराब सोपारीवाला. दोराब ऎकतात आणि बोलतातदेखील. कुणी काही विचारलं की, समाजावून सांगायला लागतात. डॉ. रॉय दिल्लीला परतले की स्वतःला बंद करून घेतात. त्यांच्या खोलीत एक फळा आहे. त्यावर शिक्षकाप्रमाणे लिहीत सुटतात. कुणाला शिकवायला नाही. तर स्वतःलाच समजवायला आणि सांगायला.

२०१४ च्या निवडणुकीत वाराणसीजवळ भर उन्हाळ्यात मी डॉ. रॉयना पाहिलं होतं. गमछा लपेटून, भर उन्हात लोकांत मस्त रमलेले. आम्ही दोघं काही वेळासाठी भेटलो, हाय-हॅलो झालं आणि नंतर आपापल्या कामाच्या दिशेनं निघून गेलो. मी पुढे जाऊन थोडा वेळ त्यांच्याकडे बघत राहिलो. चॅनलचे खुद्द संस्थापक फिल्डमध्ये रिपोर्ट करताहेत आणि तुम्ही त्यांना भेटून चालू पडता. हे एनडीटीव्हीत होऊ शकतं. इथं कोणाचं मोठेपण इतरांच्या कामाच्या आड येत नाही.  वाराणसी परिसरात जाळत्या उन्हात भोजपुरी भाषक लोकांशी गप्पा मारणार्‍या त्यांना बघून वाटलं की, त्यांना लोकांचं बोलणं समजतंय की नाही? भाषेतून नाही, तरी भावभावनांतून ते लोकांचं म्हणणं नक्कीच समजून घेत होते. ते स्वतःचं मत लोकांकडून ऎकण्यासाठी फिल्डमध्ये जात नाहीत. तर, लोकमत ऎकण्यासाठी, समजून घेण्यासाठी जातात. निवडणुकांच्या निमित्तानं त्यांनी भारत कित्येकदा पालथा घातला आहे. प्रत्येक निवडणुकीत ते नवख्या विद्यार्थ्यासारखं दप्तर लावून, तयार होऊन निघतात. आधीच्या निवडणुकांमधून मिळालेल्या ज्ञानाचा अहंकार त्यांच्यात नसतो. म्हणूनच म्हटलं की, निवडणूक विद्यार्थ्यानं लिहिलेलं पुस्तक आलं आहे.

निवडणूक विश्लेषण परंपरेचा पाया रचला असला तरी, डॉ. प्रणॉय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांना मी ‘निवडणुकांचे प्रकांडपंडित’ असलं बिरूद नाही लावणार. कारण या दोन पंडितांनी स्वतःचं विद्यार्थीपण कधीही सोडलं नाही. अभ्यासानं त्यांचं समाधान झालेलं नाही. त्यांचं पुस्तक पेंग्विननं प्रकाशित केलं आहे. किंमत ५९९ रुपये. पुस्तक इंग्रजीत आहे. सगळीकडे उपलब्ध आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट इथंही.

हे पुस्तक त्यांचे अनुभव जाणून घ्यायला वाचाच. पण, त्यांच्या भाषेसाठीही वाचा. डॉ. रॉय न्यूजरूममध्ये बसत असत, एडिट करत असत, तेव्हा स्वतःच्या भाषेची मोहर उमटवून जात. कितीही क्लिष्ट लिहिलेलं त्यांना दाखवा, ते काटछाट करून तो मजकूर सरळ सुबोध करून टाकत असत. अगदी व्हिज्युअल्सला अनुसरून. म्हणूनच, अँकर म्हणून त्यांना कधीही तारस्वरात बोलावं लागलं नाही. टीव्हीवरची चित्रंच स्वतः बोलत असत. आणि त्यांच्या मागून डॉ. रॉय मृदू स्वरात बोलत. आज त्यांच्या शिष्यवर्गानं वेगवेगळ्या चॅनल्सवर जाऊन बोलण्याची ही परंपरा उदध्वस्त करून टाकली आहे. ते व्हिज्युअल्स आणि भाषा यांचे शत्रू झाले आहेत.

डॉ. रॉय यांचं इंग्लिश अगदी साधंसुधं आहे. त्यांची वाक्य लहानलहान असतात. भाषा सोपी आणि समृद्ध कशी असू शकते, ते या पुस्तकातून कळेल. ज्या व्यक्तीनं भारतात इंग्लिश टीव्ही पत्रकारितेचा पाया घातला, त्याची भाषा कशी आहे, त्याचं इंग्लिश कसं आहे, हे समजून घेण्याची नामी संधी या पुस्तकानं दिली आहे. मला वाटतं की, डॉ. रॉय यांचं इंग्रजी ‘इंग्रजी’ असत नाही. म्हणजे, त्यात इंग्रजीचा अहंकार नसतो.

आत्ता ‘प्राइम टाइम’च्या तयारीत डोकं घालून बसलो होतो. इतक्यात टेबलवर त्यांचं पुस्तक आलं. आता, डॉ. रॉय यांनी दोन-चार दिवसांची रजा द्यावी, म्हणजे पुस्तक पूर्ण वाचून त्यावर लिहून काढेन.

(रवीश कुमार यांची मूळ हिंदी पोस्ट १२ मार्च १९ रोजी रात्री ९.३० ला प्रसिद्ध झाली आहे.)

...............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

............................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

............................................................................................................................................................

Post Comment

Gamma Pailvan

Wed , 13 March 2019

प्रणय जेम्स रॉय खरोखरीच निवडणुकीतल्या जनमताचा मागोवा घेण्यातले तत्ज्ञ आहेत. सर्वात पहिल्यांदा १९८० साली इंदिरा गांधी जनता पक्षाचा पराभव करून प्रचंड मताधिक्याने निवडून येतील असं भाकीत केलं होतं. जे खरं ठरलं. त्यांचा अभ्यास पक्का असला तरी माध्यमांतले मुखंड त्यांना बोलू देत नाहीत. कारण की तथाकथित उदारमतवादाच्या विरोधात जनमानस असलेलं मुखंडांना खपंत नाही. तरीही श्री. प्रणय जेम्स रॉय आपलं काम चिकाटीने चालू ठेवतात याबद्दल त्यांचा आदर्श वाखाणण्यासारखा आहे. -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......