मराठीची ट्रॅजेडी
पडघम - सांस्कृतिक
अरुण साधू
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 27 February 2019
  • पडघम सांस्कृतिक मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी मराठी लिपी देवनागरी लिपी कुसुमाग्रज

कन्टेम्पररी मराठी भाषेची पिटीएबल कंडिशन होण्याची फायनल रिस्पॉन्सिबिलिटी जरी अर्बन मिडल क्लासवर प्लेस करायची असली तरी मराठीवर ज्यांचं अॅक्च्युअल लिव्हिंग डिपेण्ड असतं ते रूरल इंटलेक्च्युअल्स आणि पॉलिटिशन्सदेखील स्टिक्चर्समधून एस्केप होऊ शकत नाहीत. आपल्या अर्बन इंटलेक्च्युअल्सचा दीड पाय आधीच इंग्रजीत गेला आहे. त्यांची ड्रीम्स अमेरिकन आहेत, त्यांचं थिंकिंग आणि रीडिंग इंग्रजीतून होतं आणि इन् फॅक्ट त्यांचं मेजॉरिटी कॉन्व्हर्सेशन इंग्रजीतून होतं, एव्हन घरातलंदेखील. बऱ्याच फॅमिलीमध्ये पॅरेन्टस तर एकमेकांशी इंग्रजीत बोलतातच, पण मुलं जर इंग्लिश मीडियमध्ये असतील तर एटी पर्सेन्ट कॉन्व्हर्सेशन स्ट्रेट इंग्लिशमधून होतं. ज्यांची मुलं अमेरिकेत सेटल् झाली आहेत ते इथेच मेन्टली ऑलरेडी अमेरिकनाइज्ड झालेले असतात.

तेव्हा मेट्रोपोलिटन सिटीज सोडाच, इव्हन डिस्ट्रिक्ट प्लेसेसच्या मिडल क्लास हाऊस होल्डमध्ये फंक्शनल यूजमध्ये असणाऱ्या भाषेचा ग्रांथिक मराठीशी किंवा लोकल बोली मराठीशी फक्त व्हर्बस, प्रोनाऊन्स, प्रॉपरनाऊन्स आणि कंजनक्शनपुरता संबंध असतो. म्हणून आपण मराठीत बोलतो असं म्हणायचं. अॅडव्हर्बस् आणि अॅडजेक्टिव्हस् तर बायमिस्टेक एखादं सॉलिटरी आलं तर इनफ. अशी आपल्या मिडल क्लास बुद्धिमंतांची लँग्वेज परवर्ट झाली आहे.

रूरल एरियातील लोअर मिडल क्लासनेदेखील आपण मराठी टिकवून ठेवली आहे याची डिंग मारू नये. आपल्या इंटलेक्च्युअल्सचं इमिटेशन करत त्याच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये इंग्लिश वर्डसचं मिक्चर होऊ लागलं आहे. डिफरन्स असतो तो फक्त डिग्रीचा. आय मिन, म्हणजे अर्बन मिडल क्लास होममधील कॉन्व्हर्सेशनमध्ये एटी पर्सेन्ट इंग्लिश वर्डस् असतील तर तालुका प्लेसच्या एखाद्या लेक्चररच्या किंवा बँक ऑफिसरच्या बंगल्यात सिक्स्टी पर्सेन्ट किंवा फिफ्टी पर्सेन्ट. स्टाईल तीच. भाषेची स्टॅण्डर्ड स्टाईल किंवा कोअर या भाषेतले इंटलेक्च्युअल्स, ओपिनियन मेकर्स, इकॉनॉमिक पॉवर होल्डर्स शेप करतात. कारण लोअर मिडल क्लासेसमधील लोक आपल्या इकॉनॉमिक अॅडव्हान्समेन्टसाठी त्यांचंच इमिटेशन करत असतात. त्यामुळे लोअर क्लासेसच्या व्होक्याबलरीमध्येदेखील ग्रॅज्युअली एकेक इंग्लिश शब्द एन्टर करू लागतो. प्रथम इमिटेशन, नंतर आपल्याच लोकांमध्ये सुपरियॉरिटी एस्टॅब्लिश करण्यासाठी, लोकांना इम्प्रेस करण्यासाठी आणि नंतर त्या शब्दांची किंवा फ्रेजेसच्या कंटिन्युअस यूजमुळे फंक्शनल पॉवर इन्क्रीज झालेली असते म्हणून नॅचरल कोर्समध्ये.

सोसायटीमधील इकॉनॉमिकली आणि सोशल लोअर स्ट्राटामधील ग्रुप्स जर इमिटेशनच्या अर्जपायी लिंग्विस्टिक पर्व्हर्शनचे असे व्हिक्टिम्स होत असतील तर लँग्वेज प्युरिटी कशी काय सस्टेन होणार? पण अॅक्चुअली हा सिंपल लिंग्विस्टिक प्युरिटी किंवा प्रॉव्हिन्शिअल शोविनिझमचा प्रश्न नसून पीपल अॅज अ होल इन अ पर्टिक्युलर जॉग्रॅफिक पॅरेमिटर्स यांच्या इकॉनॉमिक, पॉलिटिकल, कल्चरल आणि अॅक्चुअली फिजिकल सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे. परंतु या अँगलमधून त्याकडे कोणी बघत नाही, कोणी बॉदर करत नाही. आपल्या पॉलिटिकल कंडिशन्स अशा सेन्सेटिव्ह झाल्या आहेत की, कोणी या इश्यूवर डिबेट रेज करण्याचा प्रयत्न केला तरी त्यावर इमिजिएटली पॅरोकिअल, शोविनिस्ट, रिअॅक्शनरी असा ब्रँड मारला जातो. ही आपली ट्रॅजेडी आहे.

एक पॉइन्ट क्लिअर केला पाहिजे. हा फक्त महाराष्ट्र स्टेटचा म्हणजे मराठी लँग्वेजचा इश्यू नसून साऱ्याच रिजनल लँग्वेजेसचा अॅडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शनल आणि कल्चरल लेव्हलवर जो डिक्लाइन सुरू आहे, त्याचा इश्यू आहे. जसा बंगालीचा तसाच गुजरातीचा आणि मराठीचाही. यामुळे यात काही पॅरोकिअॅलिझम वगैरे आहे, हा आपला प्रेज्युडिस ड्रॉप केला पाहिजे. हा सगळ्या देशाच्या लिंग्विस्टिक ओरिएन्टेशनचा प्रश्न आहे. लोकांचा जिनियस प्लॉवर होऊ द्यायचा की नाही असा रायडर आहे. स्टेटसचं लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन केलं त्यामागे काही डेफिनेट फिलॉसॉफी होती, रॅशनल आर्ग्युमेंट होतं म्हणून ते केलं. नॉट फार नथिंग. पण लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशनच्या मागील मोटिव्हज् आणि प्रिन्सिपल्स दोन्ही आपण म्हणजे आपल्या पॉलिटिशियन्सनी आणि इंटलेक्च्युअल्सनी डिफीट करून टाकली आहेत. म्हणून आपल्या मिडल क्लास इंटलेक्च्युअल्सना भाषेचा प्रश्न काढताना इन्फेरियर वाटतं, गिल्टी वाटतं.

दुसरीकडे या गिल्टला दुसरं डायमेन्शन असतं. त्यांना भाषेचा नोस्टाल्जिया असतो. मेन्टली आणि प्रॅक्टिकली त्यांनी केव्हाच इंग्लिश भाषेला सबमिट केलेलं असतं. पण त्या भाषेतील इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठेच उरणार नाही, हे त्यांना डॉन झालं की, मग आपल्या पुवर मटरचंगचा त्यांना पुळका येऊ लागतो. मग ते इंटरनॅशनल मराठी कॉन्फरन्स घेऊ लागतात, बाल्टिमोरला वगैरे जातात, पुलंच्या नावाने गहिवरून येतात. असा हा फ्युचरच्या दृष्टीने हा क्लास नुसताच अनरिलाएबल आहे. असं नसून ट्रेचरसही आहे. यांना फक्त लँग्वेजचा नोस्टाल्जिया आहे. मराठी ट्रॅडिशनल डेच्या दिवशी कॉलेजात मुली नऊवारी नेसतात किंवा मुलं धोतर घालतात तसा. अॅक्चुअली विचाराल तर यांचे आणि त्यांच्या मुलांचे लोकल लँग्वेजेसमध्ये काही स्टेक्स नाहीत.

स्टेक्स आहेत ते मराठी मीडियममधून शिकणाऱ्या रूरल यंग जनरेशनचे. खरं म्हणजे फ्युचरमध्ये मराठीचा फ्लॅग यांच्याच शोल्डर्सवर राहणार आहे. पण अनफॉर्च्युनेटली या तरुण वर्गाला या इश्यूची ग्रॅव्हिटी अजून रिअलाइज झालेली नाही. त्यांच्या व्होटसवर पॉवरमध्ये विराजमान होणाऱ्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हजनादेखील या प्रॉब्लेमचा पॉलिटिकल सिग्रिफिकन्स ध्यानात आलेला नाही. मिडल लेव्हल पॉलिटिकल लीडर्स आणि मराठी मीडियममधून शिकत फ्रेश यंग जनरेशन या दोघांचेही इंटरेस्टस मराठी लँग्वेजच्या इन्फर्मेशन कन्टेन्टवर आणि मल्टिपल लेव्हलसवर मराठीचा फंक्शनल यूज व्हावा हे इन्सिस्ट करण्यात आले आहेत. त्यातच त्यांची पॉलिटिकल, मटेरियल आणि कल्चरल ग्रोथ आहे. अर्धवट अँग्लिसाइज्ड हाय मिडल क्लासचं इमिटेशन करून ते स्वत:चं फ्युचर डॅमेज करीत आहेत, हे अनफॉर्च्युनेटली त्यांच्याही ध्यानात येत नाही.

नियर फ्युचरमध्ये इंडियामध्ये मल्टी-डायमेन्शनल कॉन्फ्लिक्स प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागणार आहेत. त्यातील हा एक एक्स्ट्रीम व्होलटाईल असलेला कॉन्फ्लिक्ट आहे. तो आपण इग्नोअर करता कामा नये.

(‘निश्चिततेच्या अंधारयुगाचा अंत’ या अरुण साधू यांच्या नवचैतन्य प्रकाशनाने जुलै १९९६मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकातून साभार.)

............................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......