ज्यांचे ‘अच्छे दिन’ आले असतील, त्यांनी खुशाल आनंद साजरा करावा…
पडघम - देशकारण
अमित इंदुरकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Fri , 22 February 2019
  • पडघम देशकारण अच्छे दिन Achhe din नरेंद्र मोदी Narendra Modi भाजप BJP काँग्रेस Congress

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मोदी सरकारने देशातील जनतेला विशेषतः युवकांना नोकरी आणि विकासाचे गाजर दाखवून त्यांचे लक्ष आणि मत आपल्या बाजूने वळवून घेतले. लोकांनीदेखील त्यावर विश्वास ठेवला. कारण काँग्रेसने लोकांच्या मनातून आपली विश्वासार्हता गमावली होती. देशात वाढणाऱ्या बलात्काराच्या घटना, वाढता भ्रष्टाचार, वाढती महागाई आणि महत्त्वाचे म्हणजे प्रदीर्घ काळ मिळालेली सत्ता. याच मुद्द्यावर नरेंद्र मोदींनी निवडणूक जाहीरनामा तयार करून आपली व आपल्या पक्षाची प्रतिमा उभारण्याचा प्रयत्न केला. वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेला युवक पहिल्यांदाच मतदान करणार होता. त्यामुळे त्यांना भाजप आणि संघाची विचारधारा आणि त्यात नरेंद्र मोदींचे गुजरात येथील राजकारण माहीत नसल्यामुळे आणि देशातील मीडियाने नरेंद्र मोदींचा नियोजनबद्ध प्रचार केल्यामुळे हा युवावर्ग त्यांच्या भूलथापांना बळी पडला.

‘विकास म्हणजे मोदी’ आणि ‘मोदी म्हणजेच विकास’ अशी समजूत ठेवून युवा मतदारांनी वर्तमान सरकारला बहुमताने सत्तेत बसवले. दोन कोटी रोजगार, १५ लाख रुपये, शेतकऱ्यांना हमी भाव, महिलांचा सन्मान यांसारख्या घोषणांच्या पायऱ्या तयार करून नरेंद्र मोदी संसदेपर्यंत पोहोचले. पण आपण दिलेल्या घोषणा पूर्ण करायचे बाजूला ठेवून त्यांनी गाय, पाकिस्तान, राम मंदिर, स्मार्ट सिटी, बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेन, आधार कार्ड, शौचालय आणि विशेष म्हणजे ‘मन की बात’ यावरच देश चालवण्याचा सपाटा लावला. आणि हे पूर्ण करण्यासाठी त्यांनी मतदाराला दिलेल्या घोषणांकडे पूर्णतः दुर्लक्ष केले.

या गोष्टींकडे देशातील सुजाण नागरिकांचे लक्ष जाऊ नये म्हणून ‘सर्जिकल स्ट्राईक’, भारत पाकिस्तान यांसारख्या मुद्द्यांचा बाऊ करून देशात राष्ट्रवादाची नवीन संकल्पना पेरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वी करण्यासाठी सत्य इतिहासाला बगल देऊन कधी न घडलेल्या कपोलल्पित कथांना इतिहासाचा मुलामा लावून तो मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमांतून जनमानसांच्या मनात पेरण्याचा प्रयत्न केला. आणि ते त्यात काही प्रमाणात यशस्वीही झाले.

...............................................................................................................................................................

या पुस्तकांच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://tinyurl.com/y3g5mf7t

...............................................................................................................................................................

या कपोलकल्पित इतिहासाला व त्यावर रोज होणाऱ्या चर्चेला सर्वसामान्य जनता बळी पडून नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन विसरू लागली आणि देशात जणू काही स्वातंत्र्ययुद्ध सुरू झाले. आणि आपण त्यातील एक स्वातंत्र्यसैनिक आहोत या भावनेने एकमेकांशी भांडू लागली.

‘मॉब लिंचिंग’ हा यातीलच एक प्रकार आहे. नरेंद्र मोदींनी अचानक केलेली नोटबंदी म्हणजे 'देशातील भ्रष्टाचार एका क्षणात खल्लास झाला!’ हा आविर्भाव काही समर्थकांमध्ये मिरवू लागली, पण रिझर्व्ह बँकेने ९९ टक्क्यांच्या वर पैसे परत आले, असे जाहीर करताच सरकार आणि त्यांचे समर्थक मूग गिळून गप्प बसले. आणि लागलीच दुसरा विषय तयार करून त्यावर चर्चा सुरू झाल्या.

सरकारने आपण दिलेल्या घोषणा लोकांना आठवू नये म्हणून नवनवीन पण अनावश्यक मुद्दे उकरून काढण्याचा सपाटा सुरू केला. शेतकऱ्यांना हमीभाव तर सोडाच, पण त्यांना त्यांच्या शेतात लागणाऱ्या खर्चाचे साधे उत्पन्नही मिळाले नाही. कोट्यवधी बेरोजगार युवकांना रोजगार देऊ म्हणणारे सरकार एका खासगी वाहिनीवर व संसदेतदेखील ‘पकोडे विकणे’ हादेखील एक रोजगाराचा भाग आहे, असे म्हणून रोजगाराच्या प्रश्नाला बगल देण्याचा पद्धतशीर प्रयत्न करतात. महाराष्ट्रात मेगाभरती करू म्हणणारे फडणवीस सरकार या ना त्या कारणाने ती भरती पुढे ढकलण्याचा पद्धतशीर प्रयत्न करत आहे.

आपल्या या त्रासदायक कामाकडे सामान्य जनतेचे लक्ष जाऊ नये वा त्याकडे कुणी लक्ष वेधू नये म्हणून या सरकारने जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली येथील काही विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे खटले टाकून त्या विद्यापीठाला बदनाम करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. देशातील गरीब, बेरोजगार विद्यार्थी आणि कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले.

आता उंबरठ्यावर असणाऱ्या लोकसभा निवडणुका आणि आपल्या विरोधात जाणारा जनमताचा कौल पाहून केंद्र सरकारने पुन्हा सर्वसामान्य जनतेला योजनांचे गाजर दाखवण्याचा प्रयत्न चालवला आहे. येणारी २०१९ ची लोकसभा निवडणूक प्रत्येक पक्ष युद्धपातळीवर लढणार आहे. आता जनतेचा भाषणांवरील विश्वास कमी झालेला आहे.

गेल्या साडेचार वर्षांत गौ रक्षकांचे, नेत्यांचे आणि माल्या, अंबानी, अडाणी, चौक्सी यांसारख्या उद्योगपतींचे ‘अच्छे दिन’ नक्कीच आलेत, पण देशातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचे ‘बुरे दिन’ आले आहेत. ज्या समर्थकांचे ‘अच्छे दिन’ आले असतील त्यांना नक्कीच पंधरा लाख रुपये आणि घरातील सदस्यांना नोकरी मिळाली असेल. त्यांनी खुशाल आनंद साजरा करावा, पण ज्यांचे ‘अच्छे दिन’ होते, तेदेखील हिरावून घेतले गेले. ते मात्र निश्चितच येणाऱ्या निवडणुकीत बदल घडवावण्याकरता सज्ज असतील.

.............................................................................................................................................

लेखक अमित इंदुरकर पत्रकार आहेत.

mr.amitindurkar@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 25 February 2019

ओ इंदुरकर भाऊ, जरा जागे व्हा. मोदी हिंदू मतांवर निवडून आलेत. हिंदू धर्माच्या आधारे उघडपणे मतं मागता येत नाहीत म्हणून मोदी विकासाच्या गप्पा मारताहेत. तसंही पाहता काँग्रेसच्या ६५ वर्षांच्या सत्तेत सामान्य माणूस स्वत:चा विकास स्वत:च करायला शिकलाय. मोदींकडून सामान्य माणसाच्या ज्या कः इअपेक्षा आहेत त्या अत्यंत किरकोळ आहेत. त्या पुऱ्या झालेल्या बघण्यासाठी कुठल्याही आकडेवारीची गरज नाही. कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे गावगन्ना उगवलेल्या भुरट्या तत्ज्ञांच्या तथाकथित विश्लेषणांची तर आजिबात नाही. हे झालं गावच्या मतदारांविषयी. शहरांत तर मोदींना याहून अधिक पाठींबा आहे. मी शहरी मध्यमवर्गीय आहे. माझा विकास करायला मी समर्थ आहे. मला कुठल्या मोदीबिदीनी भीक घालायची गरज नाही. मी मोदींना मत देतो, कारण की ते हिंदुहितदक्ष आहेत म्हणून. त्यामुळे मोदींच्या नावाने तुम्ही कितीही कंठशोष केला तरी लोकं ऐकणारे नाहीत. आपला नम्र, -गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......