अजूनकाही
मराठा सेवा संघाची युवक शाखा असणाऱ्या संभाजी ब्रिगेडने ३० नोव्हेंबर २०१६ला मुंबईत रंगशारदा सभागृहात या संघटनेचे राजकीय पक्षात रूपांतर केल्याचे जाहीर केले. प्रसारमाध्यमांनी या घटनेची दखल फारशा गांभीर्याने घेतलेली नसली, तरी ही राज्यातली महत्त्वाची ‘पोलिटिकल न्यूज’ आहे. या घटनेचे विश्लेषण करताना २५ वर्षे मागे गेले पाहिजे.
२५ वर्षांपूर्वी विदर्भातील पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली. संस्थापक अध्यक्ष ते स्वतःच होते. खेडेकर स्वतःला ‘कुणबी मराठा’ म्हणतात. सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत असताना त्यांनी सेवा संघ स्थापन केला. मराठा-कुणबी समाजातील सरकारी अधिकाऱ्यांना एका मंचावर आणून त्यांचे संघटन करत समाजाची सेवा करायची, प्रबोधन करायचे हा या संघटनेचा अजेंडा ठरवण्यात आला.
खेडेकर हे जहाल वक्ते आहेत. त्यांची भाषणे आणि पुस्तिका वादग्रस्त ठरल्या. त्यांनी भट-ब्राह्मण यांना टार्गेट केले. सर्व बहुजन समाजाने भटजींच्या विरोधात एकी करावी, हा त्यांचा अट्टाहास होता. त्यांच्या वाटचालीत त्यांनी बामसेफ ही संघटना मित्र म्हणून घोषित केली. बामसेफ आणि सेवा संघ यांनी व्याख्याने, मेळावे, परिषदा अशा मार्गांनी त्यांचा त्यांचा अजेंडा पुढे नेला. दोन्ही संघटनांनी काही वक्ते एकमेकांच्या मंचांवर फिरवले. या दोन्ही संघटनांच्या प्रबोधन कार्यक्रमातून संभाजी ब्रिगेडच्या तरुणांचे मनोविश्व घडले. २५ वर्षे पूर्ण केलेल्या सेवा संघाचे ३२ विभाग आहेत. त्याला ते ‘कक्ष’ म्हणतात. शिक्षण, सहकार, महिला, युवक असे ३२ विभाग. ‘जिजाऊ ब्रिगेड’ महिलांसाठी आणि ‘संभाजी ब्रिगेड’ युवकांसाठी.
या संभाजी ब्रिगेडचे आता राजकीय पक्षात रूपांतर झाले. ते सेवा संघाच्या परवानगीशिवाय झाले नसेल, हे स्पष्ट आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, सरचिटणीस सौरभ खेडेकर हे पुरुषोत्तम खेडेकरांच्या वैचारिक तालमीत घडलेले युवक नेते आहेत. तेव्हा हा नवा राजकीय पक्ष व्हावा, ही पुरुषोत्तम खेडेकरांचीच इच्छा असणार, हे उघड आहे.
सामाजिक चळवळींचे, संघटनांचे राजकीय पक्षात रूपांतर होणे हे काही आपल्याकडे नवीन नाही. शिवसेना ही पहिल्यांदा सामाजिक संघटना होती. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी लढत एक दिवस या संघटनेने २० टक्के राजकारण आणि ९० टक्के समाजकारण हे सूत्र मांडत स्वतःला राजकीय बनवले. आणि आता तो पक्ष स्वतःला देशातल्या हिंदूंचा कैवारी म्हणवून घेतो. हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षालाही धोबीपछाड देण्याची संधी तो सोडत नाही. एवढी हिंदुत्वाची बाधा त्या पक्षाला झाली आहे. मूळ मराठी लोकांना या संघटनेने किती न्याय दिला आणि हिंदू लोकांच्या कल्याणाचा काय अजेंडा आहे, हे कुणी विचारत नसले, तरी एका सामाजिक चळवळीचे पुढे काय होत जाते, हे सेनेकडे पाहताना कळते. आपल्या देशात राजकारण करणे, हे काही सरळ साधे काम नाही. अर्थात, संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांना हे सांगणे न लगे!
संभाजी ब्रिगेडने 'सामाजिक-ऐतिहासिक प्रश्नांवर सत्यशोधकाची भूमिका घेणारी आक्रमक संघटना' असे स्वतःला आजवर पेश केले आहे. जेम्स लेन आणि बाबासाहेब उर्फ ब. मो. पुरंदरे यांच्या वादग्रस्त पुस्तकांच्या निमित्ताने या संघटनेने केलेली आंदोलने वादग्रस्त ठरली. २००४मध्ये पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर महाराष्ट्राला हादरा बसला होता. मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांनी त्या वेळी संभाजी ब्रिगेडला ‘मराठी तालीबान’ म्हणून घोषित केले होते. पुस्तके आणि संशोधन संस्था जाळू पाहणारे हे लोक छत्रपती शिवरायांचे, छत्रपती संभाजीराजांचे नाव कसे घेऊ शकतात, असे प्रश्न विचारवंतांनी त्या वेळी विचारले होते.
सारी प्रसारमाध्यमे विरोधात असताना या संघटनेने स्वतःचा ब्राह्मणद्वेषाचा अजेंडा पुढे रेटला. बाबासाहेब पुरंदरे यांनी इतिहासकार म्हणून शिवराय आणि जिजाऊंची प्रतिमा विकृत केली, म्हणून त्यांच्या भाषणांमध्ये व्यत्यय आणणे, व्याख्यानांचे कार्यक्रम उधळणे हेही कार्य या संघटनेने ताकदीने केले. ‘आम्ही सत्यशोधक आहोत. खोटा इतिहास ना साहणार, ना ऐकणार!’ ही त्यांची भूमिका मराठा समाजातल्या ग्रामीण तरुणांना आकर्षित करणारी ठरली नसती तरच नवल! त्यातून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या संघटनेचा प्रभाव वाढला. मुंबई-कोकणात मात्र त्यांना पाय रोवता आले नाहीत.
संभाजी ब्रिगेडच्या अजेंड्याबद्दल तुमचे मतभेद असू शकतील, पण त्यांनी ज्या तरुणांना गोळा केले त्यांचे मनोविश्व समजून घेतले पाहिजे. दोन-पाच एकर शेती असणारा, शिक्षण घेण्याच्या अडथळ्यांनी वैतागलेला, नोकरी-रोजगार नसलेला 'नाही रे' वर्गातला शेतकरी मराठा समाजातल्या तरुणांना ही संघटना आपली वाटते. त्या 'नाही रे' तरुणांना ही संघटना शिवरायांसारखे लढायचे हे आवाहन करत होती. हे आवाहन भावलेले तरुण पुढे वेगवेगळ्या पक्षांमध्ये गेले. काही राष्ट्रवादीत, तर काही काँग्रेसमध्ये, काही शिवसेनेमध्ये, तर काही भाजपमध्ये. त्यातले काही आमदार झाले. काही वेगवेगळ्या भागांमध्ये नेतेही झाले.
मराठा क्रांती मोर्चाच्या संयोजकांमध्येही संभाजी ब्रिगेडवाल्यांची संख्या मोठी दिसते.
सध्या मराठा समाजात भयंकर अस्वस्थता आहे. ती सत्ताधारी भाजप, सेनेविरोधात आहे, तशी काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधातही आहे. जातीतल्या नेत्यांबद्दलही लोकांना राग आहे. हा राग संघटित करून त्याचे राजकियीकरण करणे हा संभाजी ब्रिगेडचा हेतू दिसतो. लोकशाही व्यवस्थेत असे राजकीय पर्याय निर्माण होणे साहजिक आहे. त्यामुळे ब्रिगेडच्या नेत्यांनी भटजी, शेटजी, लाटजी आणि बाटजी यांच्या विरोधात तुतारी फुंकलीय. यातले बाटजी म्हणजे बहुजनांचे राजकारण करत भट, शेट आणि लाटणारे लाट या तिघांना पोसणारे बाटगे. सेवा संघ, संभाजी ब्रिगेड यांना बाटजी विरोधात लढताना पहिली आडकाठी होणार ती राष्ट्रवादी काँग्रेसची. राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची सेवा संघाशी जवळीक यापूर्वी लपून राहिलेली नाही. तेव्हा स्वतःची ताकद वाढवताना, सत्ता शोधताना या सत्यशोधकांना पहिली लढाई राष्ट्रवादीशी करावी लागेल. या लढाईत ब्रिगेड यशस्वी झाली, तर ती पुढे सत्तेत जाऊ शकेल. हे जमले नाही, तर मात्र ब्रिगेडचा सत्ताशोध कठीण होईल.
लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.
rajak2008@gmail.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
ADITYA KORDE
Wed , 14 December 2016
"संभाजी ब्रिगेडने 'सामाजिक-ऐतिहासिक प्रश्नांवर सत्यशोधक भूमिका घेणारी आक्रमक संघटना' असं स्वतःला आजवर पेश केले आहे. जेम्स लेन आनि बाबासाहेब उर्फ ब. मो. पुरंदरे यांच्या वादग्रस्त पुस्तकांच्या निमित्ताने या संघटनेची आंदोलने लक्षवेधक झाली. २००४मध्ये पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्यानंतर महाराष्ट्राला हादरा बसला होता. मुख्य प्रवाहातल्या प्रसारमाध्यमांनी त्या वेळी संभाजी ब्रिगेडला मराठी ‘तालीबान’ म्हणून घोषित केले होते. पुस्तके आणि संशोधन संस्था जाळू पाहणारे हे लोक छत्रपती शिवरायांचे, छत्रपती संभाजीराजांचे नाव कसे घेऊ शकतात, असे प्रश्न विचारवंतांनी त्या वेळी विचारले होते. सारी प्रसारमाध्यमे विरोधात असताना या संघटनेने स्वतःचा ब्राह्मणद्वेषाचा अजेंडा पुढे रेटला. बाबासाहेब पुरंदरे या माणसाने शिवराय आणि जिजाऊंची प्रतिमा विकृत केली, म्हणून त्यांच्या भाषणांमध्ये व्यत्यय आणणे, व्याख्यानांचे कार्यक्रम उधळणं हेही कार्य या संघटनेने ताकदीने केले. ‘आम्ही सत्यशोधक आहोत. खोटा इतिहास ना सहणार, ना ऐकणार!’ ही त्यांची भूमिका मराठा समाजातल्या ग्रामीण तरुणांना आकर्षित करणारी ठरली नसती, तरच नवल! त्यातून पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात या संघटनेचा प्रभाव वाढला. मुंबई-कोकणात मात्र त्यांना पाय रोवता आले नाहीत." लाजिरवाण्या गोष्टीची कवतिके चालली आहेत ....छान आहे.
ADITYA KORDE
Wed , 14 December 2016
लोकमुद्रा सारख्या मासिकाच्या संपादकाने इतके अशुद्ध(व्याकरणदृष्ट्या) लिहावे? हे जाणून बुजून केले असावे असे गृहीत धरून लेखाच्या विषयाकडे वळतो. ह्यात नवीन काही बोलावे असे नाहीये विशेषत: श्री रामटेके. हरी नरके आणि संजय सोनवणी ह्यांसारख्या विचारवंतांनी ह्याची चिरफाड फार आधीच व्यवस्थित केली असल्यामुळे. त्यांच्या ब्लॉग वरील लेख इथे कॉपी करीत आहे . लिंक मुद्दाम देत नाही , लोक लिंक उघडून वाचायचे कष्ट घेतील न घेतील.... निषेध- खेडेकर म्हणतात जातीय व धार्मिक दंगली घडवा! (श्री. एम. डी. रामटेके यांच्या ब्लोगवरून जनहितार्थ साभार पुनर्प्रकाशित.) वाचा आणि क्रुतीशील निषेध करा. ब्रिगेडचे व मसेसं चे सर्वेसर्वा श्री. पुरुषोत्त्म खेडेकरांचे शिवरायांच्या बदनामीची केंद्रे नावाचं पुस्तक नुकतचं वाचण्यात आलं. त्यात त्यानी ब्रह्मणांवर अत्यंत खालच्या पातळीला जाऊन केलेले लिखान वाचुन मी अवाक झालो. ही लोकं आंबेडकर चळवळीच्या नावाखाली जे काही लिखान करीत आहेत त्यामुळे लवकरच आंबेडकर चळवळ आपला दर्जा गमावुन बसेल ही काळ्य़ा दगडावरची रेष आहे. संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघनी आपल्या आंबेडकर चळवळीत घुसखोरी तर केलीच पण आपल्या पवित्र चळवळीत शिरुन जो अश्लिल व अश्लाघ्य प्रकार चालविला आहे ते बघता मराठ्यांची(ब्रिगेडी) मानसिकता किती खालच्या पातळीची आहे हे लक्षात येईलच. आंबेडकर चळवळ नेहमी ब्राह्मणांशी वैचारिक पातळीवर विरोध करीत आली आहे. हक्कासाठी लढत आलेली आहे, समानतेचा अधिकार मागण्यासाठी आजवर झटत आलेली आहे. हे सगळं करताना पदोपदी तेजोभंग केल्या गेला, अत्यंत अमाणुषतेनी वागविले गेले तरी आंबेडकरी जनतेनी संयमानी व शालीनतेनी ही चळ्वळ आजवर पुढे आणली. पण जेंव्हा पासुन ब्रिगेड नावाची टपोरी संघटना आंबेडकरी चळवळीत शिरली तेंव्हापासुन आंबेडकरी चळवळीची शालीनता ढासळते आहे. ब्रिगेडनी जाणीवपुर्वक या चळवळीला सुरुंग लावण्याचे काम चालविल्याचे दिसते. त्यानी थेट ब्राह्मण स्त्रियाना अश्लिल भाषेत अगदी खालच्या पातळीवर जाऊन जे काही लिखान चालविले आहे व त्यांच्या चारित्र्यावर शिंतोळे उडविले आहे ते बघता अशा नालायक मराठ्यानी आंबेडकर चळवळीला मलिन करण्याचे रचलेले षडयंत्र आजच ओळखुन यांना लाथा घालून आंबेडकर चळवळीतुन हाकलुन दिले पाहिजे. ज्या बाबासाहेबानी सदैव संयमानी व मनाचा तोल ढासळु न देता वैचारीक उठाव करुन मनुवादाची तटबंदी फोडुन काढली अशा महामानवाचे नाव घेऊन ब्रिगेडनी आंबेडकरी चळवळीला अश्लिलतेची भाषा देऊन बदनाम करण्याचे कटकारस्थान रचलेले दिसते. पुरुषोत्तम खेडेकरानी त्यांच्या वर उल्लेखीत पुस्तकात काय लिहले आहे त्याची पान मी ईथे टाकलेली आहे ते वाचा. *********************************************** ते पुढे लिहतात "सगळे ब्राह्मण पुरुष हे नपुसक असतात, त्यांच्या बायका मात्र टंच असतात. ब्राह्मण पुरुष बायकांची शारिरीक गरज पुर्ण करु शकत नाही म्हणुन त्यांच्या बायका मराठा पुरुषांकडुन आपल्या शरीराची तहान भागवुन घेतात. अनेक ब्राह्मण घरात एकच मराठा-बहुजन पुरुष सासु-सुन-मुलगी अशा तीन पिढ्यातील स्त्रीयांचे लैंगिक समाधान करण्यात गुंतलेले असतात. परिणामत: ब्राह्मण पुरुष रिकामेच असतात. त्याना उघड्या डोळ्यानी आपली तरूण सुंदर बायको आपल्याच साक्षिने परपुरुषाच्या बाहुपाशात लैंगिक सुखाचा आनंद उपभोगता असल्याचे पहावे लागे. त्यातल्या त्यात चित्पावन ब्राह्मण पुरुष स्वत:ची आई, बायको, बहिण, मुलगी ह्या सर्वच स्त्रीयाना बजारातील वस्तू म्हणूनच पाहतो. त्यामुळे त्यांचा व्यापार करण्यात ते आजहि पुढे आहेत. ब्राह्मण पुरुष सहजतेने स्वत:ची बायको परपुरुषाच्या बाहुपाशात देतो." ************************************************ या पुढे जाऊन ते लिहतात, "ब्राह्मण स्त्रिया प्रजोत्पादनापेक्षा शारीरिक लैंगिक गरजेला जास्त महत्व देतात. तसेच सर्व ब्राह्मण स्त्रियांना कृतुकालात पुरुषसंबंध ठेवणे अवघड असते. याच मानसिक विकृतीतून ब्राह्मण पुरुष सतत दारु पिऊन नशेत असतात. बहुजन भांडवलदार चित्पावन स्त्रियांवर पैसे उधळतात. ब्राह्मण पुरुष मुळात थंड रक्ताचे असतात व नपुसक असतात. याउलट स्त्रीया अत्यंत कामुक व मदमस्त असतात." अशा प्रकारे स्त्रीयांवर शिंतोळे उडविणे म्हणजे चळवळीचा भाग आहे असा समज असणा-या या ब्रिगेडशी आंबेडकरी चळवळीने संधान बांधणे कितपत योग्य आहे हे ठरविण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जी आंबेडकरी चळवळ नेहमी नीतिमुल्ये जपुन आपल्या हक्कासाठी लढत आलेली आहे त्या चळवळीचा सोबती म्हणुन ब्रिगेड व मराठा सेवा संघ शेजारी उभं राहण्याच्याही लायकीचा नाही हे वरील उता-यावरुन सिद्ध होते. बाबासाहेबानी व्यक्ती विरोध कधीच केला नाही. त्यांचा विरोध होता विचारसरणीला. पण आज आमचा सोबती म्हणुन मांडिला मांडी लावुन बसणारा हा मराठा सोबती तर आंबेडकर चळवळीच्या खांद्यावर बंदुक ठेवुन ब्राह्मण स्त्रियांवर व त्यांच्या चारित्र्यावर शिंतोळे उडविण्यातच धन्यता मानत आहे. या कृत्यामुळे त्यांच्या सोबत आपली प्रतिमा मलीन होणार याचं कुणाला काही देणं घेणं नाही. ********************************************** दंगली करण्याची प्रेरणा: खेडेकरानी ब्राह्मण स्त्रियांच्या चारित्र्यावर यथेच्च शिंतोळे उडविल्यावर तरुणाना दंगली करण्याची प्रेरणा देणार लिखान केले आहे. ते लिहतात, "अशा अवस्थेत सुबुद्ध व प्रशिक्षित मराठा युवकांनाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी जाणिवपुर्वक मराठा समाजाला धार्मिक व जातीय दंगल घडवून आणावी लागेल. अशी सुनियोजीत धार्मिक व जातीय दंगल घडवुन आणण्यासाठी मराठा समाजाने इतर बहुजन समाजाला विश्वासात घेऊन काम फत्ते करावे. ब्राह्मण हाच एकमेव मानसिक, बौद्धिक व सामाजिक शत्रु असल्याचे मांडावे लागेल. हिटलरशाहीप्रमाणे मराठा व बहुजनांच्या मनावर ब्राह्मण हाच्व शत्रु व अतो नेस्तेनाबूत करणे हाच आमचा संकल्प ही प्रतिज्ञा करावी लागेल. सर्वच ब्राह्मण पुरुष कापुन वा जाळून मारावेच लागतील. हि दंगल केवळ ब्राह्मण पुरुषा विरोधात राबविली जाईल. भारत देश निब्राह्मणी करावा लागेल. मराठा समाजाने अशा दंगलींचे नेतृत्व केल्यास इतर समाजही त्याना सर्वत्र सहभाग देईल. ते सामाजीक व कायदेशीर मराठा कर्तव्य आहे" आत्ता बोला, अशी विचारधारा असणारा, जो लादेनलाहि लाजवेल अशी योजना आखणारा खेडेकर व त्यांची मराठा सेवा संघ अन ब्रिगेड हे खरेच आंबेडकरी चळवळीच्या सोबतीने चालण्याच्या लायकीचे आहेत का? बाबासाहेबांची पोरं म्हणवुन घेणा-या आमच्या दलित नेत्याना अशा लोकांची सोबत करताना लाज कशी वाटत नाही. हा खेडेकर नावाचा माणुस दंगली घडविण्याच्या बाता करतो, चक्क तसे करण्यासाठी पुस्तक लिहुन काढतोय तरी आंबेडकरी चळवळ आज त्यांच्या सोबत आहे हे मला न उलगडलेलं कोळं आहे. वरील पुस्तक वाचुन मलातरी ईतकं कळलय की मागे पुढे हि संघटना नुसती दहशत माजवीत फिरणार आहे. कत्तली करण्याची तयारी चालु आहे हे तर लिखीतच दिलं आहे. दंगे घडविण्याच्या प्राथमिक स्वरुपात असलेली ही संघटना कधी दंगली पुर्णत्वास नेईल माहीत नाही. पण अगदी नजिकच्या काळात हे झाल्यास त्यांच्या सोबत चालणारी आंबेडकरी चळवळ मलीन होईल हे मात्र निश्चीत. आंबेडकरी चळवळ हक्कासाठी लढा देणारी, समतेची मुल्ये जपणारी व सत्याग्रहाच्या मार्गानी प्रश्न निकाली काढणारी संघटना आहे. अगदी याच्या उलट ब्रिगेड व मसेसं कापा कापीची भाषा बोलणारी, मारझोड करणारी, दंगली घडविण्यासाठी तरुणाना प्रशिक्षीत करण्याचे मनसुबे रचणारी भविष्य काळात लवरच दहशतवादी संघटना म्हणुन नावा रुपाला येईल यातं तिळमात्र शंका नाही. भविष्यातील या दहशतवादी संघटनेशी वेळीच फारकत घेतली नाही तर उद्या आंबेडकर चळवळीवर सुद्धा हाच ठपका बसेल. महाराष्ट्र सरकारला निवेदन: मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा श्री. खेडेकरांचे "शिवरायांच्या बदनामीची केंद्रे" नावाचं पुस्तक नुकतच वाचलो. त्या पुस्तकातील एकंदरीत विचार, ब्राह्मण स्त्रियांवर उडविलेले शिंतोळे व पुरुषांवर वयक्तिक पातळीवर केलेली टीका, अपमानास्पद वाक्यं अत्यंत निंदणीय आहेत. त्यानी पुस्तकात वापरलेली अश्लाघ्य भाषा ही चळवळीच्या पुस्तकाला न शोभणारी तर आहेच, पण सगळ्यात महत्वाचं हे की नजीकच्या काळात दंगली घडविण्याचे कटकारस्तान ब्रिगेड रचत आहे या बद्दल त्या पुस्तकात स्पष्ट उल्लेख आलेला आहे. या संघटनेवर वेळीच बंदी न घातल्यास उदया महाराष्ट्रात रक्ताचे पाट वाहतील व त्यास जबाबदार असेल आजचे निष्क्रिय सरकार... म्हणुन माझी प्राथमिक मागणी अशी आहे की आजच या संघटनेवर बंदी घालावे अन महाराष्ट्राला रक्तपातापासुन वाचवावे. आजच जागे व्हा, अन ब्रिगेडला फाटा दया
203mogra@gmail.com
Wed , 14 December 2016
एकांगी विश्लेषण समाजिक संस्था व राजकीय संस्था यात फरक असतो आणि रा स्व संघा काॅपी करुन कक्ष कितीही काढले तरी काहीही होणार नाही बायको भाजप ची माजी आमदार