गेल्या काही वर्षांत ऑनलाईन मराठी पोर्टल्सची संख्या वाढते आहे. परिणामी ऑनलाईन मराठी दिवाळी अंकांची संख्याही वाढते आहे. अर्थात ही संख्या अजून २५चाही आकडा गाठू शकलेली नाही. पण भविष्यात ती २५हून ५० आणि त्यापलीकडेही जाईल अशी आशा करायला काहीच हरकत नाही. या वर्षीच्या निवडक ऑनलाईन मराठी दिवाळी अंकांची ही एक झलक...
.............................................................................................................................................
१) सिने मॅग्नेट
अक्षय शेलार, पवन गंगावणे यांसारख्या काही सिनेअभ्यासकांनी ‘सिने मॅग्नेट’ या नावानं यंदा पहिल्यांदाच दिवाळी अंक प्रकाशित झालाय. आठ लेख आणि तीन कथा एवढा मजकूर आतापर्यंत प्रकाशित झालाय. सिनेरसिकांसाठी मेजवानी असलेला हा अंक आहे.
अंकातील लेख : १) तारुण्यातला हॉलिवुडचा न पुसला जाणारा डीप इम्पॅक्ट— विवेक कुलकर्णी, २) करन शेरगिल आणि सिड मेहरा, एकाच नावेतील दोन प्रवासी— राज जाधव, ३) गोईंग होम— सानिया भालेराव, ४) चित्रपट, समीक्षक आणि प्रेक्षक— गणेश मतकरी, ५) चढ़ती लहरे लांघ ना पाए, क्यूँ हांफती सी नाव हैं तेरी— पवन गंगावणे, ६) आश्वासक तरुणाईचा आशयघन सिनेमा— आशुतोष जरंडीकर, ७) काळानुरुप बदलत जाणारी तरुणाई : ऑन स्क्रीन अँड ऑफ स्क्रीन— जितेंद्र घाटगे, ८) नकोशा वाटणाऱ्या वास्तवापासून दूर नेणाऱ्या स्वप्नांचा पाठलाग— अक्षय शेलार
कथा : १) ५९६० — इमॅन्युएल व्हिन्सेंट सँडर, २) कन्फेशन्स ऑफ अ प्रेडेटर — अभय साळवी, ३) नाईन्टीन नाईन्टी नाईन — पंकज भोसले
लेख वाचण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
२) मिसळपाव
‘मिसळपाव’ हे मराठीतलं एक वैविध्यपूर्ण पोर्टल आहे. त्यांचा यंदाचा दिवाळी अंकही त्यांच्या परंपरेला साजेसा, वैविध्यपूर्ण आहे. तब्बल ४२ लेखांचा या अंकात समावेश आहे.
अंकातील लेख : १) व्यंगचित्रे (amol gawali), २) क्रॅश लँडिंग (सौन्दर्य), ३) प्रसारमाध्यमे - एका बदलाचा प्रवास (शैलेन्द्र), ४) अनाहूत (अनन्त्_यात्री), ५) सहभागासाठी व प्रसारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर (मार्गी), ६) भारत-पाक हॉकी सामन्याचा थरार (रुस्तुम), ७) ११९ वर्षांचा वेदनारहित प्रवास (कुमार१), ८) आवाज आवाज... (सरनौबत), ९) सुषुम्ना (अनन्त्_यात्री), १०) खाली डोकं वर पाय! (स्वाती दिनेश), ११) घात (चॅट्सवूड), १२) हलेल तर शप्पथ.. (सविता००१), १३) ट्रायोपॉनिक्स : स्वयंपूर्ण अन्ननिर्मितीची गुरुकिल्ली (टर्मीनेटर), १४) क्षण कण कण.. (यशोधरा), १५) आल्प्समधील भटकंती - पास्टर्झे हिमनदीच्या संगे (निशाचर), १६) चकली (स्वाती दिनेश), १७) तो माझा सांगाती.. (यशोधरा), १८) प्रेम (MipaPremiYogesh), १९) राधा पुन्हा निघाली… (कलम), २०) डियर ममा… (डॉ सुहास म्हात्रे), २१) मुद्रणपूर्व साहित्यकाल (अलकनंदा), २२) ग्राहकहिताय सद्रक्षणाय (नूतन सावंत), २३) क्र क्रोएशियाचा! (अनिंद्य), २४) गुलाब पाक (जुइ), २५) इंद्रधनू (प्राची अश्विनी), २६) गुळपापडीच्या वड्या (पद्मावति), २७) ते आपलेच असतात... (निमिष सोनार), २८) अटक मटक, सारण चटक! (सविता००१), २९) आंबा काजूकतली (स्वाती दिनेश), ३०) मेजर मार्टिनचे युद्ध (अरविंद कोल्हटकर), ३१) जैविक व रासायनिक ब्रह्मास्त्रे (गुल्लू दादा), ३२) राँग वे पायलट (श्रीरंग_जोशी), ३३) गोरमिंट (आदूबाळ), ३४) आठवणीतली गाणी... नव्हे गाण्यांच्या आठवणी (सजन), ३५) प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते... (Jayant Naik), ३६) दक्षिण गोव्यात, वेताळांच्या राज्यात (प्रचेतस), ३७) गवत्या (मित्रहो), ३८) इझी, पिझी! नारळाची बर्फी! (पद्मावति), ३९) प्रजासत्ताक दिन परेड - दिल्ली - २६ जानेवारी २०१८ (मोदक), ४०) जॉर्जची कहाणी - George - Be Who you Are (मीअपर्णा), ४१) माझा संगीत प्रवास (सुबोध खरे), ४२) कर्ण आणि कृष्ण (शैलेन्द्र).
लेख वाचण्यासाठी क्लिक करा -
https://www.misalpav.com/diwaliank
.............................................................................................................................................
३) ऐसी अक्षरे
‘ऐसी अक्षरे’चा दिवाळी अंक ‘हटके’ असतो. या वर्षीचा अंक ‘इनोद इशेष अंक’ आहे. हा अंकही भरगच्च आहे. यावर एकंदर प्रकाशित झालेल्या लेखांची संख्या ४४ इतकी आहे. त्यात नंदा खरे, कविता महाजन, अवधूत परळकर, बब्रूवान रुद्रकंठवार, ज्युनियर ब्रह्मे, रमेश इंगळे उत्रादकर, राही अनिल बर्वे, वसंत आबाजी डहाके, उत्पल व. बा., शशिकांत सावंत यांसारख्या नामवंत व आश्वासक लेखकांचा समावेश आहे.
अंकातील लेख : १) नॉनव्हेज् जोक - संतोष गुजर, २) ब्रह्मे- एकोणिसाव्या शतकात! - ज्युनियर ब्रह्मे, ३) चूक की बरोबर - उज्ज्वला, ४) निनाद पवार यांच्या कविता - Ninad Pawar, ५) आमचं बायोमेट्रिक अस्तित्व! - उसंत सखू, ६) सिरिअस बिझनेस - गणेश मतकरी, ७) मिलिन्द पदकींच्या कविता – मिलिन्द, ८) एथिकल पॉर्न - शिरीन.म्हाडेश्वर, ९) गढवालचा राजा फतेशाह (१६६५ – १७१५) आणि शिवाजी : एक दृष्टिक्षेप - शैलेन, १०) अठ्ठी - नंदा खरे, ११) स्वतःची मुलाखत! - ज्युनियर ब्रह्मे, १२) दूरची दिवाळी - देवदत्त, १२) एनाराय व्हायचंय का तुम्हाला?- सृजन, १३) बैठकीची लावणी - प्रसन्न जी. कुलकर्णी, १४) या लोकगीतांचे करावे तरी काय?- स्वामी संकेतानंद, १५) 'माझा(पण) बेहद्द नाममात्र घोडा' - हेमंत गोविंद जोगळेकर, १६) मराठी विनोदी साहित्याची सफरप्रदीप कुलकर्णी, १७) इतिहासातील विनोद – शैलेन, १८) मालिका-बिलिका, सण-बिण - सोनल, १९) भोलारामचा जीव - हरिशंकर परसाई- कविता महाजन, २०) दत्तू बांदेकर : एक अलक्षित विनोदकार - कविता महाजन, २१) मराठेशाहीची सातासमुद्रापार मुत्सद्देगिरी बॅटमॅन, २२) उर्मिलाच खुनी आहे! - आदूबाळ, २३) आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास - संजीव खांडेकर, २४) आगामी कादंबरीतील काही भाग - रमेश इंगळे उत्रादकर, २५) "सरसकट उपरे असल्याची भावना पकड घेत गेली" - राही अनिल बर्वे - चिंतातुर जंतू, २६) मारा /साद - एक आधुनिक अभिजात नाट्यकृती - वसंत आबाजी डहाके, २७) बा विदूषका! -राजीव नाईक, २८) संगीतक आपल्या रक्तातच नाहीय! - चंद्रकांत काळे - अबापट, २९) पुणें भोजनगृह - चिन्मय दामले, ३०) खास रे : ट्रेंड बघून खास ब्लेंड - खास रे, ३१) भारतीय पुरुषांचा कुरूपपणा - मुकुल केसवन - मुक्तसुनीत, ३२) टोटल एकटं भजन - संतोष गुजर, ३३) रसगुल्ल्याचा हैदोसधुल्ला आणि हुम्मुसची धुसफूस - बॅटमॅन, ३४) अरे संसार संसार - सई केसकर, ३५) मुंबापुरी खाबूगिरी - १४टॅन, ३६) आपलं कामजीवन - उत्पल, ३७) लोकनाट्यातील विनोदाचे स्वरूप - बाळकृष्ण लळीत, ३८) प्रधानांचं घर - भ्रमर, ३९) मेंदूतला विनोद - तिरशिंगराव, ४०) फोटोफीचर - मिरजेतले सतारमेकर्स -इंद्रजित खांबे, ४१) माझा कपडे धुण्याचा छंद - शशिकांत सावंत, ४२) ...आणि अडगळीत गेले गाडगीळ - अवधूत परळकर, ४३) शाईचा ढब्बा आन् बारमाही मोगरा - बब्रूवान रुद्रकंठवार, ४४) कार्ल मार्क्स @ २०० - नंदा खरे.
लेख वाचण्यासाठी क्लिक करा -
http://aisiakshare.com/diwali18_tracker
.............................................................................................................................................
४) बिगुल
‘बिगुल’चा यंदाचा दुसरा दिवाळी अंक आहे. ‘महाराष्ट्राचं पहिलं ‘मत-PORTAL’ ’ अशी टॅगलाईन असलेल्या या पोर्टलवरील लेखही वैविध्यपूर्ण आहेत.
अंकातील लेख : १) जगाच्या कल्याणा विकिपिडिया - उदय कुलकर्णी, २) सुसंस्कृत शेजारी... - राही पाटील, ३) कभी खुद पे कभी हालात पे रोना आया - धनंजय कुलकर्णी, ४) दिवाळी अंक पाहावा काढून… - डॉ. उषा रामवाणी-गायकवाड, ५) ‘बाहेरचे’ आपले - स्मिता जोगळेकर, ६) पिटरमेरित्झबर्ग - अनिल गोविलकर, ७) संगीत विश्वातील अज्ञात प्रतिभावंत - दासू भगत, ८) मोबाइल, माणूस आणि झाड - राधिका कुंटे, ९) प्रो कबड्डी – एक जमलेली खिचडी - आदित्य गुंड, १०) नाणार रिफायनरी : पिक्चर अभी बाकी है… - सत्यजीत चव्हाण, ११) रडणारा कावळा अर्थात पुरुषाचे एकटेपण - शंतनू पांडे, १२) न्याय वेळेवर मिळणे कधी सुरू होणार? - अॅड. प्रभाकर येरोलकर, १३) कृष्णा : मानवी संस्कृतीचा समृद्ध प्रवाह - संपत देसाई, १४) टिमलखलख ते टिमलखलख - कुणाल प्रकाश रुद्राके, १५) असगर वजाहत यांच्या कथा- अनुवाद- श्रीधर चैतन्य, १६) कविता… कविता… संपादन- टीम बिगुल १७) दुसरी बाजू - मोहना प्रभूदेसाई जोगळेकर
लेख वाचण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
५) अक्षरनामा
‘मराठीतलं पहिलंवहिलं डिजिटल डेली फीचर्स पोर्टल’ अशी टॅगलाईन असलेल्या ‘अक्षरनामा’नं नुकतीच दोन वर्षं पूर्ण केली आहेत. यंदाचा ‘अक्षरनामा’चा तिसरा दिवाळी अंक आहे. या अंकाचे दोन विभाग आहेत. १. माणसं : कालची, आजची, उद्याची, २. संकीर्ण. दोन्ही विभागात मिळून ३० लेखांचा समावेश आहे.
माणसं : कालची, आजची, उद्याची - १) डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमिर पुतीन, क्षी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी! - भूषण निगळे, २) भरत, आम्ही तुझी वेदना समजू शकतो. पण आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे! - डॉ. अरुण गद्रे, ३) सॅम्युअल जॉन्सन : शब्दांच्या मागे पसरलेला मानवी संसार दाखवणारा शब्दकोशकार! - रवींद्र कुलकर्णी, ४) करण थापर : राजकारण्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारून अडचणीत आणणारे पत्रकार - संकल्प गुर्जर, ५) शहा मराई : अफगाणिस्तानची अक्षरश: युद्धभूमी पाहणारा फोटोग्राफर - मीना कर्णिक, ६) जॉन होम्स : जिवंतपणीच दंतकथा बनलेल्या अनभिषिक्त सम्राटाची शोकांतिका - विवेक कुलकर्णी, ७) डॉ. सुब्रमण्यम स्वामी : ‘अभ्यासोनी प्रकटावे’ ते ‘प्रगटोनी नासावे’ हा राणाभीमदेवी ताठा! - देवेंद्र शिरुरकर, ८) सुधीर फडके : मराठी गीत-संगीताच्या दुनियेत स्वत:चं युग निर्माण करणारा संगीतकार - जयंत राळेरासकर, ९) अजित डोभाल : भारताचे ‘जेम्स बॉण्ड’, ‘द ग्रेट डिटेक्टिव्ह’, ‘चाणक्य’, ‘द सुपरस्पाय’ इ.इ. - रवि आमले, १०) मणिशंकर अय्यर : दैव देते आणि वाचा घालवते! - देवेंद्र शिरुरकर, ११) (माजी) न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि (आजी) न्यायमूर्ती रंजन गोगोई - हर्षवर्धन निमखेडकर, १२) हार्दिक, जिग्नेश, कन्हय्या, चंद्रशेखर : सत्तेविरोधातल्या नव्या हाका! - राजा कांदळकर, १३) अस्माँ जहांगीर : बॉलिवुडच्या सिनेमातली हिरो! - अलका धुपकर, १४) न्या. राजिंदर सचर : मुस्लिमांच्या न्यायासाठी झटणारा हिंदू - अन्वर राजन, १५) मुनिश्री तरुण सागर : शांती व क्रांती यांना एकत्र आणणारा दुवा - डॉ. संतोष कोटी, १६) प्रतीक सिन्हा : भल्याभल्यांच्या पोटात गोळा आणणारा ‘अल्ट’ पत्रकार - नितीन ब्रह्मे, १७) कृष्णवर्णीय सेरेना विल्यम्स विरुद्ध मिश्रवर्णीय नाओमी ओसाका- सिद्धार्थ खांडेकर, १८) पु. ल. देशपांडे : मराठी साहित्यातले ‘महात्मा गांधी’! - मुकेश माचकर, १९) डॉ. हमीद अन्सारी : मोदी, मोदीभक्त आणि भाजपला न आवडलेले उप-राष्ट्रपती! - परिमल माया सुधाकर, २०) अटलबिहारी वाजपेयी : विरोधकांनाही प्रिय असलेलं व्यक्तिमत्त्व - स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ, २१) गजानन माधव मुक्तिबोध : आत्ममश्गुल प्रवृत्तीचा बुरखा फाडणारा कवी - आसाराम लोमटे.
संकीर्ण : १) दीडशे भिंती चित्रांच्या : चित्रकार म्हणून परिपक्व होता होता माणूस म्हणूनही रुजता आलं! -आभा भागवत, २) मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं माणसांचे स्वभावही लक्षात आले! - डॉ. दीपक पवार, ३) परंपरा ओलांडणारी संतपरंपरा - प्रकाश बुरटे, ४) खटाववाडीत आता ‘मौज’ राहिली नाही! - विकास परांजपे, ५) पहिलं महायुद्ध हे विसाव्या शतकातलं पहिलं संकट होतं, ज्यानं नंतर संकटांची साखळी निर्माण केली! - रवींद्र कुलकर्णी, ६) ‘इन अ फ्री स्टेट’ : नायपॉलची अंतर्मुख करणारी राजकीय कादंबरी - प्रा. अविनाश कोल्हे, ७) पाकिस्तान आणि इस्लाम व्हाया पुस्तकं -२ : पुस्तकं संपली नाहीत, संपणारही नाहीत, तसाच शोधही - नीतीन वैद्य, ८) स्त्री-मुक्ती चळवळीच्या खांद्यावर(च) उभी आहे ‘#MeToo’ मोहीम! - संजय पवार, ९) कॉ. शरद् पाटील : “अब्राह्मणी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना धर्माला विरोध करते. तिने जातिव्यवस्थेला, स्त्री-पुरुष विषमतेला विरोध केला पाहिजे, तरच या देशातील धर्मनिरपेक्षता सार्थ होऊ शकते!” - गणेश निकुंभ.
लेख वाचण्यासाठी क्लिक करा -
https://www.aksharnama.com/client/diwali_2016
.............................................................................................................................................
सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
६) कोलाज
गुडीपाडव्यापासून ‘कोलाज’ हे नवं पोर्टल सुरू झालं आहे. ‘थिंक. सेलिब्रेट’ अशी टॅगलाईन असलेल्या या पोर्टलचा यंदा पहिलाच अंक आहे.
अंकातील लेख : १) कृतीच त्यांची भाषा होती - डॉ. गणेश देवी, २) गांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं? - चंद्रकांत वानखडे, ३) डॅडी भेटे बापूंना - प्रतीक पुरी, ४) प्रमोशन (कथा) - प्रसाद शिरगांवकर, ५) दोनवेळा जेवायचं की दोन तासांनी? - सदानंद घायाळ, ६) थिंग्ज फॉल अपार्ट - चिनुआ अचेबे, अनुवाद : डॉ. ज्ञानेश्वर सूर्यवंशी, ७) शनिवारवाडा १८१८ : पेशवाई बुडाली त्याची गोष्ट - संजय सोनवणी, ८) कथाः पिकलेल्या आंब्याची उगवलेली झाडं - कृष्णात खोत, ९) तिची कविता, कवितेतली ती - शर्मिष्ठा भोसले, १०) कविता महाजन @ फेसबुक - टीम कोलाज.
लेख वाचण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
७) देशदूत-सार्वमत
‘देशदूत-सार्वमत’च्या डिजिटल दिवाळी अंकाचं यंदाचे दुसरं वर्ष. दैनिक किंवा माध्यमांच्या डिजिटल आवृत्तीच्या स्वतंत्र म्हणता येईल असा डिजिटल दिवाळी अंक ‘देशदूत’नं मागील वर्षी प्रथमच प्रकाशित केला होता.
अंकातील लेख : १) रंग बदलती इस दुनियामें… ना कुठ तेरा है ना कुठ मेरा है देख भाई देख – पंकज पाटील, २) शजर आशियाँ जिनका – तन्वी अमित देवडे, ३) अनुभव समृद्ध करणारा प्रवास – रुपाली भुसारी, ४) गावाकडची दिवाळी : बागलाणमधील निरपूरची : ‘अविस्मरणीय दिवाळी’ – रोहिणी सूर्यवंशी, ५) गावाकडची दिवाळी : तेव्हा बोचऱ्या थंडीने लागायची दिवाळी चाहूल – स्वप्निल लोटन पाटील, ६) ग्राउंड रिपोर्ट : एक उनाड दिवस – संकलन – अनिरुद्ध जोशी, पूजा ठुबे, मोहन कानकाटे, ७) गावाकडची दिवाळी : घरच्या घरी आमची सून, मग मुलगी – दिनेश सोनावणे, ८) गावाकडची दिवाळी : येउंद्यारे येउंद्या वाघ्याची भोई वाघे – गोकुळ पवार, ९) जेव्हा मुली मुक्तपणे जन्म घेतात – शिल्पा दातार-जोशी, १०) ओके गुगल! – भाग्यश्री केंगे, ११) पैठणीची ‘श्रीमंती’ जिवंत ठेवण्यासाठी – शिल्पा दातार-जोशी, १२) ‘मस्त’ की हो! – किरण बावीस्कर, १३) तिरंगा, राष्ट्रगीत आणि ‘गोल्ड’ – दत्तू भोकनळ, १४) प्रत्येक पंखात भरारी घेण्याचं बळ! – अमित काजळे\ शिल्पा दातार-जोशी, १५) दुग्धव्यवसायाचा ‘सूर्योदय’! – राजेंद्र कळमकर\ शिल्पा दातार-जोशी.
लेख वाचण्यासाठी क्लिक करा -
https://www.deshdoot.com/marathi-diwali-ank-digital-dipotsav-issue/
.............................................................................................................................................
‘बापलेकी’ या मौज प्रकाशन गृहाच्या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment