टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • जयललिता, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहनसिंग, नरेंद्र मोदी, शी जिनपिंग आणि डेव्हिड कॅमेरून
  • Thu , 08 December 2016
  • विनोदनामा Vinodnama टपल्या Taplya नरेंद्र मोदी Narendra Modi जयललिता Jayalalithaa अटल बिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee मनमोहनसिंग अमित शहा Amit ShahManmohan Singh

१. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर तामिळनाडूमध्ये सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला गेला असून त्यामुळे सोमवारी संध्याकाळपासूनच शोक व्यक्त करण्यासाठी तामिळनाडूनमध्ये अनेक दुकाने बंद करण्यात आली. पुढचे तीन दिवस राज्यातील दारूची दुकाने बंद राहणार असल्याचं जाहीर झाल्यामुळे तीन दिवसांची सोय करण्यासाठी नागरिकांनी दुकानांबाहेर लांबलचक रांगा लावल्या आहेत.

मुळात दूध, पाणी, वीज वगैरेंप्रमाणे दारू हीसुद्धा एक जीवनावश्यक वस्तू आहे, हे निर्दय सरकारांच्या लक्षात का येत नाही? दारूची दुकानं खरंतर डे नाइट मेडिकल शॉपप्रमाणे रात्रंदिवस सुरू असली पाहिजेत. शोकाकुल नागरिकांनी दु:ख काय आता नुसत्या थंड पाण्यात किंवा सोड्यात बुडवायचं का? दारूची दुकानं बंद ठेवली तर सगळं राज्य, अगदी द्रमुकचे कार्यकर्तेही त्या शोकसागरात बुडून जातील.  

………………………………

२. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग गेल्या वर्षी ब्रिटन दौऱ्यावर गेले असताना ब्रिटनचे माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी त्यांना एका पबमध्ये नेलं होतं. दोन्ही नेत्यांनी मैत्रीपूर्ण गप्पा मारत बिअर प्यायली होती. या भेटीमुळे पब रातोरात प्रसिद्ध झाला आणि सिनो फोर्टोन या चिनी कंपनीने तो २६ लाख डॉलरला विकत घेतला आहे.  

शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर आले, तर त्यांना कुठे न्यायचं ते ठरवायला हवं आतापासूनच. त्यांना गोशाळा दाखवायला नेलं आणि ती त्यांना पसंत पडली तर काही दिवसांनी एखादी चिनी कंपनी गोशाळा विकत घ्यायची आणि पिवळसर रंगाच्या, मिचमिच्या डोळ्यांच्या, आखूडउंची आणि बहु(पाणीदार)दुधी चिनी गायींच्या दुधाने, गोमूत्राने बाजार भरून जायचा.

………………………………

३. मुंबईत पश्चिम रेल्वेच्या भाईंदरहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये, लोकल कुठून कुठे जाणार, कुठे थांबणार वगैरे सांगितल्यानंतर उद्घोषकाने ‘जय हिंद, जय मोदी’ अशी उद्घोषणा केली. ती ऐकून डब्यात हास्याचा एकच कल्लोळ झाला. मात्र, काही प्रवाशांनी रेल्वेकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

त्यात तक्रार करण्यासारखं काय आहे? पंतप्रधानांच्या करिश्म्याने जर मुकेश अंबानींसारखा सरकारशी काहीही संबंध नसलेला उद्योगपती (हसू नका हो, खरंच) प्रभावित होऊन देशाच्या सेवेसाठी (किती हसाल?) एक डिजिटल सेवा सुरू करू शकतो, तिची जाहिरात पंतप्रधानांचं छायाचित्र विनापरवानगी वापरून करू शकतो, तर रेल्वे तो वैसेभी 'अपनी दुकान' है!

………………………………

४. निश्चलनीकरणामुळे निवडणुकांमधून काळा पैसा बाहेर गेला असून आता सगळ्या पक्षांसाठी खेळाचे नियम बदलले आहेत. : अमित शाह

मुळात अमित शाह काही बोलू लागले की, राष्ट्रीय सत्ताधारी पक्षाचे हे तडीपार अध्यक्ष पाहूनच हसू येऊ लागतं, त्यात ते काळा पैसा वगैरे बोलू लागले की अतोनात हसू येऊ लागतं… खेळाचे नियम बदलले आहेत, हे खरंच आहे… पण, ते सगळ्यांसाठी सारखे नाहीत… सत्ताधारी पक्षाने आधीच आपल्याकडच्या काळ्या पैशांची सुयोग्य विल्हेवाट लावलेली आहेच… बाकीच्यांची अवस्था बिकट झाली आहे. पण, ते या खेळातले फार जुने खेळाडू आहेत, हे लवकरच शाहकाकांना कळेलच.

………………………………

५. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीत आठ टक्के विकासदर होता, तो अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंहांच्या काळात चार टक्क्यांवर आला. मग एकेकाळच्या चहावाल्याने ७.६ टक्क्यांवर नेला. : अमित शाह

फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपमुळे रातोरात जे अर्थतज्ज्ञ निर्माण झाले, त्यातले एक राष्ट्रीय अध्यक्षही झाले? कमाल आहे? पूर्वीच्या काळी 'ग्यानबाचं अर्थशास्त्र' अशी एक संकल्पना होती. त्यातला ग्यानबा नेमका कसा दिसत असेल, असा प्रश्न पडायचा. आता तो सुटला?

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......