अजूनकाही
प्रति,
माननीय श्री० देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
विषय – दिनकर मनवर यांच्या कवितेवरून निर्माण केला गेलेला विद्वेष व वाद मिटवण्याबाबत
माननीय महोदय
स० न० वि० वि०
मुंबई विद्यापीठाच्या कला शाखेतील तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेल्या कवी दिनकर मनवर यांच्या ‘दृश्य नसलेल्या दृश्यात’ या कवितासंग्रहातील ‘पाणी कसं अस्तं’ या कवितेतील एका ओळीचा चुकीचा अर्थ लावून काही तथाकथित आदिवासी संघटना व विद्यार्थी संघटना यांनी हेतूपुरस्पर माजवलेला वादंग आणि कवी दिनकर मनवर यांना अर्वाच्य भाषेत दिलेल्या अश्लाघ्य धमक्या, त्यांच्या विरोधातली दलित अत्याचारविरोधी कायद्याचे हत्यार वापरून कारवाईची मागणी, या गोष्टी आम्हाला अत्यंत चिंतनीय आणि धोकादायक वाटतात. कवीची भूमिका आणि कवितेचा आशय समजून न घेताच सर्वसामान्य लोकांच्या भावना भडकवण्याच्या या कृती कवीच्या लेखन व नागरी स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहेत.
कवी-लेखकाला केवळ तत्कालिक पोलिस संरक्षण देऊन या प्रश्नाची जटीलता तात्पुरती कमी करता आली तरी लेखक पहाऱ्यात आणि त्यांना धमकवणारे मात्र मोकाट, असे चित्र महाराष्ट्राला शोभा देणारे नक्कीच नाही असे आम्हाला वाटते.
आम्ही, महाराष्टातील जबाबदार साहित्यिक या नात्याने आपणांस विनंती करतो की, या परिस्थितीत हस्तक्षेप करून लेखक-कवींचे धोक्यात येऊ पाहाणारे अभिव्यक्ती-स्वातंत्र्य जपावे. कवी दिनकर मनवर यांच्या कवितेसंदर्भात निर्माण झालेला हा वाद मिटवावा आणि समाजमाध्यमात संघटितपणे चालणारे विद्वेषी ट्रोलिंग थांबवण्यास शासकीय यंत्रणांच्या अधिकारात उपाययोजना करावी व राज्यात लेखक कवींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करावे, अशी आमची अपेक्षा आहे.
प्रतिसादाच्या आणि कार्यवाहीच्या अपेक्षेत.
आपले नम्र
रामदास भटकळ, निशिकांत ठकार, रंगनाथ पठारे, वसंत आबाजी डहाके, हरिश्चंद्र थोरात, नागनाथ कोत्तापल्ले, हेमंत दिवटे, जयंत पवार, येशू पाटील, मंगेश नारायणराव काळे, दा० गो० काळे, प्रवीण बांदेकर, गणेश विसपुते, प्रफुल्ल शिलेदार, संतोष पद्माकर पवार, प्रज्ञा दया पवार, निरजा, सुमती लांडे, अभय सरदेसाई, दा. गो. काळे, अविनाश गायकवाड, बाबा भांड, इग्नेशियस डायस, श्रीकांत साहेबराव देशमुख, मंगेश बन्सोड, वर्जेश सोळंकी, महेंद्र कदम, नीतीन रिंढे, महेंद्र भवरे, रणधीर शिंदे, रफीक सुरज, अजय कांडर, पी. विठ्ठल, गोविंद काजरेकर, वीरधवल परब, शरयू आसोलकर, रेखा शहाणे, आशुतोष पोतदार, संजीव खांडेकर, चिन्मयी सुमित राघवन, सचिन केतकर, सलील वाघ, मन्या जोशी, दिलीप लाठी, सतीश तांबे, सुधाकर गायधनी, रवींद्र इंगळे-चावरेकर, आसाराम लोमटे, महाश्वेता कुबल, संघजा भुजंग मेश्राम, ज्योत्स्ना राजपूत, नेहा भांडारकर, संघमित्रा खंडारे, रमेश इंगळे-उत्रादकर, दिनकर दाभाडे, अविनाश कोल्हे, अनिल धाकू कांबळी, किशोर कदम (सौमित्र), श्रीधर नांदेडकर, चंद्रकांत बाबर, विजय चोरमारे, रवींद्र लाखे, ना. धों. महानोर, चंद्रकांत पाटील, सतीश काळसेकर, कृष्णा किंबहुने, किरण येले, प्रमोद मुनघाटे, नारायण लाळे, अशोक थोरात, उषा परब, दिपक बोरगावे, निखिलेश चित्रे, उदय रोटे, संकेत म्हात्रे, विनायक येवले, महेश लोंढे, फेलिक्स डिसोजा, मोहन शिरसाट, श्रीधर पवार, महेश लीला पंडित, प्रा. मनोहर, प्रणव सखदेव, सुदाम राठोड, गणेश कनाटे, स्वप्निल शेळके, प्रियंका तुपे, अजित अभंग, मोहन कुंभार, प्रशांत चौगले, अतुल दोडीया, प्रबोध पारिख, प्रशांत वंजारे, नानासाहेब काणे, शरद कुंभार, सचिन चव्हाण, भास्कर पाटील, युवराज चंदुरे, विकास कांबळे, रमेश सावंत, अनिल जाधव, वैभव साटम, प्रदीप पाटील, दत्ता घोलप, मधुकर मातोंडकर, अनिल फराकटे, अशोक बागवे, महेंद्र मुंजाळ, सुनील अभिमान अवचार, रमजान मुल्ला, शेषराव पिराजी धांडे, संध्या शाहपुरे, संजय शिंदे, कुणाल गायकवाड, विलास गावडे, सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत, सिद्धार्थ गोपाळ तांबे, ऋषिकेश देशमुख, जुई कुलकर्णी, कविता ननवरे, प्रिया जामकर, अनुजा जोशी, बाळासाहेब घोंगडे, गणेश वसईकर, संगिता अरबुने, संतोष शेणई, महादेव गोरख कांबळे, प्रज्ञा सुधाकर भोसले, स्वप्नील चव्हाण,नामदेव कोळी, श्यामल गरुड, अस्मिता मापारी, विजय तांबे, प्रेमानंद शिंदे, संध्या दानव, अर्चना डावखरे, विद्या देशमुख, सुनिल तांबे, राजीव जोशी, गितेश शिंदे, जगदिश पाटील, प्रकाश नागोलकर, दयानंद कनकदंडे, अनिल साबळे, अरविंद सुरवाडे, कल्पना दुधाळ, कल्पना मलये, सुनीता डागा, वैशाली नारकर, प्रकाश मोगले, विठ्ठल कदम, प्रकाश तेंडोलकर, राहुल कोसंबी, केशव वाघमारे, वीरा राठोड, अभय दानी, इक्बाल मिन्ने, सुनिल उबाळे, रामप्रसाद वाव्हळ, समाधान इंगळे, रमेश रावळकर, निलेश चव्हाण, रमेश ठोंबरे, धम्मपाल जाधव, कैलास अंभुरे, गणेश घुले, सचिन तायडे, संदिप देशपांडे, सुशीलकुमार शिंदे, जीजा शिंदे , योगिनी सातारकर-पांडे, मोतीराम कटारे, मनोज कुलकर्णी, आश्लेषा महाजन, समीर दळवी, अमृत तेलंग, प्रा. गंगाधर अहिरे, काशिनाथ वेलदोडे, ॲड. अशोक बनसोडे, विजया गायकवाड, एकनाथ गायकवाड, नामदेव गवळी, शालिनी मोहळे, विजय ठाकर, अभिजित देशपांडे, श्रीरंजन आवटे, प्रदीप आवटे, सुनिल हेतकर, योगिनी राऊळ, आल्हाद भावसार, केशव खटींग, विष्णू जोशी, समीर भोळे, दुर्गेश सोनार, कविता मोरवणकर, राजेश कदम, सरीता पवार, संजय गोडघाटे, भगवान निळे, प्रवीण दामले, अनुराधा नेरूरकर, अंजली कुलकर्णी, चित्रा क्षीरसागर, शोभा रोकडे,प्रकाश क्षीरसागर, किशोर काळे, जितेंद्र लाड, मनिष पाटील, शिवाजी काळे, विद्या बयास ठाकूर, देवा झिंजाड, जनार्धन देवरे, किरण काशिनाथ, हेमंत राजाराम, रश्मी कशेळकर, खलील मोमीन, अन्वर मिर्झा, शशिकांत कोळी, मंदाकिनी पाटील, नीलिमा कुलकर्णी, संजिव चांदोरकर, किरण गुरव, राजीव नाईक, सतीश वाघमारे, मुकुंद कुळे, नरसिंग इंगळे.
.............................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
.............................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment