जेव्हा एखादा जीवघेणा अपघात होतो, तेव्हा सांधे, हाडं आणि शरीरातील soft tissuesना देखील इजा पोहोचते. याचबरोबर शरीरात स्पर्श, वेदना, तापमान या गोष्टी ज्या पेशींद्वारे नियंत्रित होत असतात, त्या पेशींनादेखील अशा अपघातात गंभीर इजा पोहोचते. एकदा, खांद्याच्या खुब्याच्या आसपासच्या दुखावलेल्या पेशी बऱ्या करण्यासाठी उपचाराच्या नवीन पद्धतीचा मी अभ्यास करत होते. या पेशी दुखावल्यामुळे बाहू आणि हातांचं संवेदन गेलं होतं आणि त्यांच्या हालचालीदेखील अनियंत्रित होत होत्या. पेशींच्या उपचाराची नवी पद्धत तपासणं आणि त्या पद्धतीची आधीच्या पद्धतींशी तुलना करून पाहणं हा आमचा हेतू होता.
या पद्धतीच्या यशापयशाबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट आमच्या समोर आली. शरीराच्या संदर्भात ‘स्वायत्तता’ नावाच्या संकल्पनेशी माझा परिचय झाला. ही स्वायत्तता म्हणजे एक प्रकारचं स्वघोषित बंड आहे. हे बंड पुकारलं जातं शरीरातील दुखावलेल्या पेशींविरुद्ध. यामुळे काय होतं की, हात हा जरी शारीरिकदृष्ट्या संपूर्ण शरीराचा भाग असला, तरी या दुखावलेल्या पेशींमुळे मेंदूकडे हाताकडून कुठलीच संवेदना किंवा माहिती जात नाही. संवेदना आणि माहितीच्या अभावामुळे मेंदू आपल्या हात या अवयवाचं जैविक अस्तित्व नाकारतो आणि त्याला एखाद्या बाह्य अवयवाप्रमाणे वागवू लागतो. संवेदनात्मक प्रतिसाद मिळत नसलेल्या भागाचे कडाडून चावे घेणं किंवा कधी कधी जाणूनबुजून तो भाग कापून टाकणं इथपर्यंत याची मजल जाते. हात आणि मेंदू यांच्यातील देवाणघेवाण थांबल्यामुळे मेंदूमध्ये या दुखावलेल्या अवयवाबद्दल एक ‘रिकामी जागा’ तयार होते. त्यात अत्यल्प प्रतिसादामुळे मेंदूत गोंधळ उडतो. यामुळे हातामध्ये विचित्र, वेदनादायी आणि असुखकारक संवेदना तयार होऊ लागतात. आणि अंतिमतः मेंदूद्वारे हे बंड पुकारलं जातं.
स्वघोषित बंड पुकारणं आणि आपल्याच शरीराच्या अवयवाचं जैविक अस्तित्व नाकारणं, याचं समांतर उदाहरण आज आपल्याला भारतीय राजकारणात-समाजकारणात दिसतं आहे. देशाच्या शरीराचा भाग असलेले अल्पसंख्याक आज केंद्रीय नेतृत्वाला धोका वाटू लागलेले आहेत. फरक इतकाच की, इथं कुठलाही जीवघेणा अपघात घडलेला नाही आणि गोंधळाचे संदेश म्हणजे धार्मिक आणि आर्थिक असुरक्षितता आहेत, ज्या कल्पित आहेत आणि मुद्दाम पसरवल्या जात आहेत. याचा अंतिम परिणाम म्हणून नागरिक नाहीसे केले जात आहेत. म्हणजेच स्वयंघोषित बंडाद्वारे त्यांची जमावहत्या करण्यात येते आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
‘आपला मूळ भाग खरं तर परका आहे, आपल्याहून वेगळा आहे आणि आपलं मूळ शारीरिक स्वरूप राखण्यासाठी तो भाग नष्ट करणं आवश्यक आहे’, ही जाणीव निर्माण करून मेंदू आपल्याला का फसवत असेल?
जमावहत्या ही कृती शारीरिक इजा वा खून यापेक्षा वेगळी आहे. हल्लेखोर, बघे आणि अल्पसंख्य पीडित; जमावहत्येकरता हे तीन घटक एकत्र यावे लागतात. यामध्ये बळी जाणाऱ्यांची सार्वजनिक विटंबना केली जाणं आवश्यक ठरतं. हल्लेखोरांच्या भावना कुठल्याही सरकारच्या वा कायद्याच्या कैक योजने पुढे असतात, याचं प्रात्यक्षिक जमावहत्येत दिसतं. जमावहत्येला तर्काच्या कसोटीवर तोलायचं असेल तर त्यामध्ये सहभागी असणाऱ्या (यात बघेही आलेच!) घटकांचा मेंदू कसा काम करतो, हे समजून घेणं गरजेचं आहे. उदा. जमावहत्या करणाऱ्यांची आणि ती घडवणाऱ्यांची विचारप्रक्रिया आणि कृती वेगवेगळी असणार.
एक किंवा त्याहून अधिक लोकांना धमकावणं, एकटं पाडणं, त्यांची विटंबना करून त्यांच्यावर हल्ला करणं, या सर्व गोष्टींमध्ये एक उत्कंठा आहे. या उत्कंठेतूनच जमावाचं मानसशास्त्र तयार होतं. ‘Frankenstein’ हा सिनेमा याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. यामध्ये शेतीची अवजारं आणि बॅटऱ्या घेऊन गावकरी राक्षसाच्या निर्दालनास सिद्ध होतात. आजचा आपला समूह हा व्हॉटसअॅपसारख्या समाजमाध्यमांद्वारे पसरलेल्या अफवांवर तयार होतो. याचीच पुढची पायरी म्हणजे अफवांचं खंडन करणाऱ्या कुठल्याही प्रतिवादावर विश्वास ठेवणं, हा जमाव साफ नाकारतो. आता यातील सहभागी घटक पाहू.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
बळी
जमावहत्येतील पीडित भले जगोत किंवा मरोत, ते आपल्याला कायम एका झुंडीसमोर गुडघे टेकून बसलेले दिसतात. त्यांना जमीनदोस्त केलं गेलेलं असतं. रक्तबंबाळ झालेले हे पीडित हात जोडून दयेची भीक मागत असतात. आणखी आघात होऊ नये म्हणून ते काय वाटेल ते करायला तयार होतील, असं त्यांच्या हावभावांवरून वाटतं. आपल्या आदर्शांशी, विचारांशी, राजकारणाशी ते अशा वेळी क्वचितच टिकून राहिलेले दिसतात. पवित्र मरणाची, हौतात्म्याची कल्पना त्यांच्या मनात येत नाही. आपल्या बचावाकरिता ते कोणाचाही जयजयकार करायला तयार असतात.
जेम्स कॅमेरोन हा एक काळा लेखक. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत झालेल्या वांशिक जमावहत्येतून बचावलेल्या एका पीडिताची गोष्ट त्यानं लिहिली. प्रत्यक्ष हल्ल्यावेळची पीडिताची भावस्थिती, मानसिकता आणि मेंदूची निर्णयक्षमता यांवर या गोष्टीतून प्रकाश पडतो.
प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी मेंदू अतिव भीतीनं जणू लुळा पडतो. हा मेंदू सर्व हालचाली थांबवतो आणि पीडिताला बचावासाठी पळून जाण्याचीदेखील अनुमती देत नाही. आपल्यावर झालेला हल्ला समजून घेण्याचा प्रयत्न आणि त्यात येणारं अपयश हे पीडिताला एका वेगळ्याच मनोवस्थेत घेऊन जातं. त्याच्या आठवणींची सरमिसळ होऊ लागते. आत्ताच्या गर्दीत त्याला आपले पूर्वीचे गर्दीचे अनुभव आठवू लागतात. हल्ल्याच्या सुरुवातीचा काही काळ पीडिताकडे चेहरे ओळखण्याची क्षमता असते. ओळखीचे चेहरे त्याला लक्षात येतात. “गर्दीत त्याचे शाळेतले मित्र होते, त्यानं ज्यांच्याकडं बागकाम केलं होतं, ज्यांचे जोडे त्यानं पॉलिश केले होते ती लोकं होती. हे सर्व लोक जेलबाहेर जमले आणि त्यांनी दारावर हातोड्यांनी घाव घालायला सुरुवात केली. बाहेर पोलीस त्यांच्याबरोबरच थट्टामस्करी करत उभे होते,’’ असं कॅमेरोन आपल्या गोष्टीत लिहितो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
फरपट आणि मारहाण सुरू असताना मात्र शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या प्रचंड आघात सहन करत असणारा मेंदू कोण खरंच उपस्थित आहे ते विसरतो आणि स्वतः देखील या जमावहत्येत सहभागी होतो. कॅमेरोनच्या गोष्टीतला माणूस श्रद्धाळू कॅथॅलिक आहे. आपल्याला समूहापासून वाचवायचा प्रयत्न करणाऱ्या एका स्त्रीचा आवाज त्याला आठवतो. पण नंतर त्याला वाटतं की, ती स्त्री म्हणजे व्हर्जिन मेरी असणार. म्हणजेच हल्ल्याच्या ऐन धुमाळीत त्याला वेगवेगळे भ्रम होत असतील.
समूहाच्या हल्ल्यातून बचावलेल्या लोकांचं पुनर्वसन फारच अवघड असतं. त्यांची कुटुंबं आणि घरं बहुतांश वेळी उदध्वस्त झालेली असतात. पीडितांनी पुन्हा समाजात मिसळणं त्यांच्याकरता धोकादायकही असतं. १९४६मध्ये जेव्हा पोलंडमध्ये ज्यू परतले, तेव्हा रहिवाशांना वाटलं की, ते आपल्या मालमत्तेवरचा जुना हक्क पुन्हा सांगू लागतील. या असुरक्षिततेतून ज्यू विरोधी दंगल पेटली. ख्रिश्चन रक्ताचा बळी मागणारी ज्यूंची कालबाह्य धार्मिक रीत या वेळी पद्धतशीरपणे उकरून काढण्यात आली. यामुळे आणखी ज्यू मारले गेले आणि अंतिमतः आपल्याला पोलंडमध्ये भवितव्य नाही, असा निष्कर्ष काढण्यासाठी ज्यूंना भाग पाडलं गेलं.
बचावलेले लोक जर तरुण असतील तर कधी कधी मानसिक भीती त्यांना अधिकच कृतिशील बनवते. त्यांना दुर्बलतेचा परिणाम त्यांच्या लक्षात आलेला असतो. मग आपली ओळख आणि पौरुष जपेल अशा एखाद्या गटात ते सामील होतात आणि आपली नियती बदलू पाहतात.
हल्लेखोर
हे लोक जमावहत्येचे नेतृत्व करतात. ते भाडोत्री असू शकतात, पण बहुतांश वेळेस ते स्वयंप्रेरित असतात. हल्लेखोर म्हणजे कोणी एकटा माणूस नसतो. हा एक गट असतो. एकसंधपणे, समान लक्ष्यासाठी काम करणारा गट. यात व्यक्तिगत अस्तित्व गौण असतं. या गटामध्ये सहभागी लोकांप्रती विश्वास, ओळख, वैधता आणि अनामिकता असते. या गटाचा प्रत्येक विचार आणि प्रत्येक कृती एका सामूहिक उद्दिष्टाच्या प्राप्तीकरता बांधील असते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
शब्द, घोषणा, अविर्भाव आणि हालचाली यांच्या एकतानतेमुळे गर्दीमध्ये एक भावनिक संसर्ग पसरतो. या संसर्गामुळे मुळे गर्दीत एक उन्मादी भावनिक बंध तयार होतो. हा प्रतिक्षिप्त प्रतिसाद कुठल्याही सदसदविवेकबुद्धी आणि विश्लेषणाचा परिणाम नसतो. तो सूक्ष्म आणि स्वयंप्रेरित असतो. शब्दांच्या माध्यमातून निर्माण होणारा बाह्य प्रतिसाद आणि शब्दविरहित संपर्कातून निर्माण होणारा आंतरिक प्रतिसाद या दोन्हीतून व्यक्तीच्या मनात एक भावबंध तयार होतो. माणसाच्या भावना, आठवणी आणि उत्तेजना यांवर प्रक्रिया करणाऱ्या मेंदूच्या limbic cortex मध्ये ही सर्व माहिती साठवली जाते. त्यावर तिथे प्रक्रियादेखील होते. मेंदूतील mirror neurons हे दुसऱ्यांच्या वेदनांबद्दल सहानुभूती निर्माण करणारी प्रक्रिया करतात आणि बरोबर त्याउलट अशा जमावहत्येच्या या लक्ष्यभेदी कृतीचं अनुकरण करण्यास सिद्ध होतात. कुठल्याही कृतीसाठी माणसाचे स्नायू सिद्ध करणारा मेंदूतील premotor cortex हा भाग या वेळी कार्यान्वित झालेला असतो. सहानुभूतीशी संबंधित असलेला मेंदूतील amygdala हा भाग प्रत्यक्ष कृतीशी संबंधित premotor cortex बरोबर संगनमत करून शारीरिक कृतीसाठी आवश्यक असलेली जमाव प्रतिक्रिया तयार करतो.
अशा रीतीनं संपूर्ण जमावाचं मिळून एक शरीर तयार होतं. यामुळे हल्लेखोरांच्या मन:स्थितीचं अनुकरण करणं आणि कृतीच्या शेवटापर्यंत ती मन:स्थिती टिकवणं गर्दीला शक्य होतं. आक्रमकतेच्या मानसिकतेचा अभ्यास करताना असं समोर येतं की, असा शारीरिक हल्ला एक प्रकारची दगाबाज अंतःप्रेरणा आहे. यामध्ये इतर सर्व घटकांकडे दुर्लक्ष करून शरीर हत्येसाठी तयार होतं. दुसऱ्याला दुखावणं किंवा मारून टाकणं याच्या विरोधात असलेल्या सर्व प्रेरणा बाजूला सारून मनुष्यहत्या हे निश्चित अंतिम लक्ष्य बनतं. हल्लेखोरांची नैतिकता त्यांना वैधता आणि अभिमान मिळवून देते. या हत्येचा कोणालाही पश्चाताप होत नाही. आणि या हत्येमध्ये ज्यानं अखेरचा घाव घातलेला असतो, अशा ‘धीरोदात्त’ नायकाला त्या त्या गटाची अनामिकता आपसूकच वाचवते.
चिथावणीखोर
हे हल्लेखोरांना मदत करणारे लोक असतात. कधी ते हल्लेखोरांना हल्ला करण्याची साधनं उपलब्ध करून देऊन हल्ल्यात प्रत्यक्ष सहभागी होतात किंवा पीडितांविरुद्ध भाष्य करून हल्लेखोरांना आवश्यक मानसिकता तयार करून हल्ल्यात अप्रत्यक्षपणे सहभागी होतात.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
सरकारचे टीकाकार आणि अल्पसंख्याक यांच्याविरुद्ध पूर्वग्रहदूषित आणि हिंसक भावना सध्याच्या काळात वाढलेल्या दिसतात. यात वर्तमानपत्रांपेक्षा मोठा वाटा व्हॉटसअॅपसारख्या माध्यमांचा आहे. बहुतांश वेळी खोट्या बातम्यांचा प्रसार करून भावना भडकावणारा मजकूर इथं पसरवला जातो. भारतात किंवा परदेशात घडलेल्या असंबद्ध घटनांचे फोटो मिळवून, ते विरूप करून या घटना जणू आत्ताच घडलेल्या आहेत, असा आभास निर्माण करणं ही पद्धत याकरता वापरली जाते. उदा. बंगालमध्ये घडलेल्या दंगलींच्या वेळी सिनेमातील दंगलींची आणि पूर्वीच्या काळात घडलेल्या दंगलींची छायाचित्रं वापरली गेली.
जमावहत्येच्या बहुतांश घटनांमागे किमान एक प्राथमिक चिथावणीखोर असतोच. हा चिथावणीखोर आक्रमकतेचा मूळ स्त्रोत असतो. हत्येच्या वेळी जर चिथावणीखोर प्रत्यक्ष हजर असतील तर शक्यतो ते गर्दीत असतात. हत्येपासूनदेखील ते दूरच राहतात. पण पीडितांच्या विरुद्ध भडकवणाऱ्या घोषणा देऊन ते हल्ल्याला उत्तेजन मात्र देतात.
हल्लेखोरांची आणि चिथावणीखोरांची संख्या कधीही समान नसते.
बघे
जमावहत्या होत असताना ती पाहणारे, त्यात भाग न घेणारे, पण ती हिंसा थांबवण्यासाठी कोणताही प्रयत्न न करणारे लोक म्हणजे बघे. सामान्यतः यांची संख्या हल्लेखोरांपेक्षा आणि चिथावणीखोरांपेक्षा जास्त असते. जमावहत्येला यातील सर्वांचा पाठिंबा असतोच असं नाही, पण बहुतांश वेळी ते अतिव घाबरलेले किंवा साशंक तरी असल्यामुळे यात हस्तक्षेप करत नाहीत. Greg Marinovich या दक्षिण आफ्रिकी पत्रकारावर जमावहत्येचा साक्षीदार होण्याची एकदा वेळ आली. हा प्रकार एका स्थलांतरितांच्या वसतिगृहात घडला. पंधरा ते वीस जणांनी मिळून एका माणसाला फरपटवलं, भोसकलं आणि मारून टाकलं. Greg नं या थरकाप उडवणाऱ्या प्रसंगाची छायाचित्रं काढली. “पत्रकार म्हणून जरी माझी प्रतिक्रिया योग्य असली तरी एक माणूस म्हणून मी स्वत:च्या नजरेतून उतरलो. माझा भ्याडपणा जाणवून मी अतिव निराश झालो,” असं यावर Greg म्हणतो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
James Ellen याच्या ‘Without Sanctuary : lynching photography in America’ या पुस्तकात १८९२ ते १९५० या काळात अमेरिकेत घडलेल्या काळ्या लोकांच्या जमावहत्येची छायाचित्रं आहेत. या काळात जमावहत्येच्या किमान ३४३६ घटना घडल्या, पण त्यातल्या बहुसंख्य घटनांची कुठेही नोंद केली गेली नाही. या पुस्तकात हल्लेखोरांची आणि बघ्यांची छायाचित्रं आहेत. एके काळी ही छायाचित्रं अभिमानानं postcards म्हणून पाठवली जात असत. यातलं एक छायाचित्र Ellenला विशेष जाणवलं. या छायाचित्रामधल्या बघ्याला असं वाटत होतं की, ‘जमावहत्येचा उत्सव’ आपल्या मैत्रिणीसोबत पाहणं, ही एक फारच मनोरंजक संध्याकाळ ठरेल.
अनेक बघ्यांनी दगडफेक, भोसकाभोसकी यांसारख्या सार्वजनिक आणीबाणीच्या घटना यात वर्णन केलेल्या आहेत. यात कौटुंबिक हिंसाचाराच्यादेखील काही घटनांच्या आठवणी आहेत. पण या सर्व आठवणी घटना घडून गेल्यानंतरच्या आहेत. घटना प्रत्यक्ष घडत असताना आपण काही करावं हेच बहुसंख्य लोकांच्या डोक्यात येत नाही, मग स्वतःचा जीव धोक्यात घालणं तर दूरच. पण याचबरोबर ellenच्या पुस्तकातल्या photographersचे अनुभव मात्र जवळपास सारखे आहेत. घडून गेलेली घटना पुन्हा आठवताना त्यातला प्रत्येक जण आपण हल्लेखोरांच्या विरोधात उभं रहायला हवं होतं असं म्हणतो. आणि तसं न केल्यामुळे निर्माण झालेली अपराधीपणाची भावना पुढचं सबंध आयुष्यभर त्यांना सतावते आहे असं दिसतं.
बचावकर्ते
स्वतःचा जीव धोक्यात घालून पीडितांच्या संरक्षणाकरता धावून जाणारे हे लोक यांची संख्या कायम अत्यल्प असते.
स्वत्वाच्या त्यागामागे घडणारी प्रक्रिया
जमावहत्येसाठी थेटपणे फक्त एकच व्यक्ती जबाबदार नसते, हे तर आपण पहिलंच. मग यातल्या पीडितांना न्याय कसा मिळणार, या प्रश्नाच्या निवारणाचा काही सिद्धान्त असेल का? या गोष्टींच्या उत्तरांसाठी आपल्याला द्वेषाचं शास्त्र जाणून घेणं महत्त्वाचं आहे. खरा अपराधी कोण, हे कळण्यासाठी याची मदत होईल. जमावातील एका व्यक्तीनं केलेल्या शेवटच्या वारामुळेच फक्त मृत्यू होतो का? की चिथावणीखोर हे खरे अपराधी असतात? की खुन्यांना शिक्षा करू न शकणारं सत्ताधारी सरकार हेसुद्धा जमावहत्येच्या कटातला एक साथीदार असतं असं म्हणता येईल?
एका छोट्या फायद्यासाठी आपल्या देशबांधवाचं अस्तित्व नाकारून त्याला परकं ठरवणाऱ्या आणि त्याकरता जवळजवळ दिशाहीन आणि अनुत्पादक कृती करायला तयार होणाऱ्या मेंदूची निर्णयप्रक्रिया समजणं आपल्या हिताचं आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
‘आपल्यातला भले एक भाग कापावा लागला तरी चालेल, पण काहीतरी अत्यंत महत्त्वाचं आहे, जे वाचवलंच पाहिजे’ असा विचार करताना महत्त्वाचं काय आहे, याचा निर्णय मेंदूकडून कसा घेतला जातो? ‘संपूर्ण शरीराचा’ विचार न करता घेतलेला निर्णय शरीर आणि मेंदू दोन्हीकरता घातकच ठरणार हे निश्चित.
स्वघोषित बंड करणारे हात एक वेळ सोडून देऊ, पण लोकांना स्वयंप्रतिकारामुळे होणारे RHEUMATOID ARTHRITIS आणि LUPUS सारखे त्वचारोग तर माहीतच असतात. रोगप्रतिकारक शक्ती जिवंत राहण्याचं प्रमुख कारण म्हणजे संसर्ग होय. त्यामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती कार्यक्षम राहणं आपण समजू शकतो. आपल्या शरीरातील T CELLS आपल्यावर बाहेरून होणाऱ्या संसर्गहल्ल्याला योग्य प्रतिसाद देऊन आपली शक्ती शाबूत ठेवतात. काही विशेष प्रकारचे T CELLS आपल्यातल्या स्वयंप्रतिकारावर नियंत्रणदेखील ठेवत असतात. काही दुर्मीळ प्रसंगी मात्र ही यंत्रणा कोलमडते. मग निरोगी शरीरात दाह वाढू लागतो. काहीही कारण नसताना. आणि याची अखेर स्वयंप्रतिकाराच्या रोगांत होते.
भारतात घडणाऱ्या जमावहत्येच्या सर्व घटनांमधून हा स्वयंप्रतिकाराचा रोग आपल्याला दिसतो. हा रोग आपल्याच नागरिकांना रोग पसरवणारे जीवाणू मानून बहुसंख्याकांना वांशिक कत्तलींसाठी उद्युक्त करतो आहे. यामुळे आपलं समूहशरीर जर्जर आणि व्याधीग्रस्त झालेलं आहे.
आपला संपूर्ण अवयव कापला गेल्यानंतरच आपल्या पेशी पुन्हा वाढायला सुरुवात होते, आपली वेदना पुन्हा जाणवू लागते आणि आपण आपल्या हाताबरोबर काय केलं आहे, हे मेंदूला लक्षात येतं. हे दुर्दैवी नाही काय?
.............................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख ‘The Wire’ या ऑनलाईन पोर्टलवर १८ जुलै २०१७ रोजी प्रकाशित झाला आहे. मूळ लेखासाठी क्लिक करा -
.............................................................................................................................................
अनुवाद : ओंकार गोवर्धन
govardhanomkar30@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment