अब्राहम लिंकन यांच्या ‘हेडमास्तरांस पत्र’ या कवितेचं सुंदर विडंबन - ‘पुढाऱ्याचे हेडमास्तरांस पत्र’
पडघम - सांस्कृतिक
प्रा. जी. व्ही. बोरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 05 September 2018
  • पडघम सांस्कृतिक जी. व्ही. बोरकर पुढाऱ्याचे हेडमास्तरांस पत्र Political Leader's Letter to Headmaster शिक्षक दिन Teachers' Day ५ सप्टेंबर 5 September

या कवितेला अमेरिकेसून भारतापर्यंत अनेक संदर्भ आहेत. त्यात २०१९च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. पण खरं तर कुठल्याही काळातल्या भारतातल्या आणि जगातल्याही राजकीय नेत्यांना लागू पडेल अशी ही कविता आहे. अब्राहम लिंकन यांनी लिहिलेल्या ‘हेडमास्तरांस पत्र’ या कवितेचं इतकं सुंदर विडंबन आजवर कुणाला करता आलं नसावं. असो. कविता वाचावी. तिचा अनुभव आपल्याला ऐकायला\ वाचायला\ पाहायला\ अनुभवायला येेतो की नाही हे ताडून पाहावं. तसा तो आला तर उत्तमच. (नाही आला तरीही उत्तमच) पण या कवितेला विद्यमान राजकीय संदर्भ चिकटवताना मात्र थोडासा विचार नक्की करा. ही कविता काही काल-परवा लिहिली गेलेली नाही. ती २०००-२००१ साली लिहिली गेलेली आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रिय मास्तर,

सगळीच माणसं पुढारी होत नसतात

नसतात सगळीच मंत्री,

हे शिकेलच माझं पोरगं कधी ना कधी.

मात्र त्याला हेदेखील शिकवा,

जगात प्रत्येक चांगला माणसागणीक

असतो एक पैशासाठी काहीही करणारा.

स्वार्थी राजकारणी असतात जगात;

त्यांचा नीट अभ्यास कर म्हणावं,

पण असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेतेही;

त्यांच्या वाटेला जाऊ नको म्हणावं.

असतात पाडायला टपलेले वैरी,

तसेच पाठिंबा देणारे मित्रही.

मैत्री करून लोक जमवायला शिकवा त्याला.

पण प्रसंगी खुर्चीसाठी

कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसायला,

घाबरू नकोस म्हणावं

वेळ आल्यावर स्वत:चं पिलू पायाखाली घेऊन

जिवंत राहणाऱ्या माकडिणीची गोष्ट सांगा त्याला.

सगळ्याच गोष्टी झटपट नाही शिकवता येत.

तरीही जमलं तर शिकवा त्याला,

घाम गाळून माझ्यासारखे बंगले नाही बांधता येत.

त्यापेक्षा आयतं मिळालेलं घबाड फार मौल्यवान.

हार कशी स्वीकारावी, हे त्याला शिकवू नका;

कारण राजकारणात हरणाऱ्याला किंमत नाही.

साम, दाम, दंड, भेद वापरून फक्त

विजय मिळवायला शिकवा त्याला

कोठेही भ्रष्टाचार करायला मागेपुढं पाहू नको म्हणावं.

आणि शिकवा तरीही उजळ माथ्यानं वावरायला.

लोकांच्या समोर भाषण करायला शिकवा त्याला;

पण त्यांच्यासमोर खोटं बोलायला कचरू नकोस म्हणावं.

कारण लोकांना फसवणं फार सोपं असतं.

आणि आश्वासनं देताना विचार करू नको म्हणावं.

कारण आश्वासनं ही पुरी करण्यासाठी नसतात,

हे त्याला कळू दे!

निवडणुकीत अपयश मिळण्यापेक्षा

फसवून आलेलं यश महत्त्वाचं आहे.

लोकांच्यावर पैसा खर्च करायला शिकवा त्याला;

पण त्याच्या पाचपट पैसा वसूल करण्याची कला

त्याच्या अंगी बाणवा.

त्याला हेही सांगा,

लहान स्वप्न बाळगू नकोस म्हणावं;

पण मोठ्यांना तोंडावर विरोध करू नकोस

काट्यानं काटा काढून प्रतिस्पर्ध्याला

संपविण्याची कला शिकवा त्याला.

तसंच मनासारखं झालं तरी

जगाला दाखवू नकोस म्हणावं.

शाळेच्या अभ्यासात जास्त वेळ घालवू नकोस म्हणावं.

त्याला पास करायला तुम्ही आहातच.

कुठेही वेळेवर जात जाऊ नकोस म्हणावं,

अगदी शाळेतसुद्धा,

त्यामुळे आपली किंमत कमी होते, हे सांगा त्याला.

कुठेही चांगलं घडो अथवा वाईट;

त्याचा फायदा उठवायला शिकवा त्याला

जनतेत फूट पाडायला मागंपुढं पाहू नकोस म्हणावं

कारण फूट पडली तरच तुला मतं मिळतील,

कुणालाही तोंडावर नाही म्हणू नकोस म्हणावं;

पण फक्त उपयोगाच्या माणसांची कामे करत जा,

आणि त्यांचा उपयोग संपला, की

त्यांना लाथ मारून हाकलून द्यायचं धैर्य

त्याच्या अंगी बाणवा.

आणखीही सांगत रहा त्याला

कोणावरही पूर्ण विश्वास ठेवू नकोस;

अगदी सख्ख्या बापावरही,

कारण राजकारणात विश्वास ठेवणं हाच गुन्हा आहे.

प्रत्येकाकडे संशयानं बघायला हवं त्यानं.

आणि धीर धरायला शिकवा त्याला;

कारण चांगली माणसं जास्त दिवस राजकारणात

टिकत नाही म्हणावं.

इतरांच्या दोषावर कावळ्यासारखी नजर ठेवावी

कारण त्यामुळे आपले गुण वाढतात म्हणावं,

चोर, गुंडांना नावे ठेवू नकोस म्हणावं;

कारण निवडणुकीत हीच माणसं खरी मदत करतात

पोलिस, पत्रकार, इन्कमटॅक्सवाले

यांच्याशी वैर करू नको म्हणावं.

त्यांचा चांगला पाहुणचार करायला शिकवा त्याला

कारण पाण्यात राहून माशाशी वैर करू नये.

मास्तर, खूप काही बोलतोय,

खूप काही मागतोय

पण एवढं कराच तुम्ही (नाहीतर तुमची बदली करीन.)

मग फार मोठा पुढारी होईन बघा तो!

कारण माझं पोरगं,

माझ्यासारखंच नाठाळ कार्ट आहे हो ते!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......