शिवरायांचे तेरावे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना अनावृत पत्र!
पडघम - राज्यकारण
एक सातारकर
  • उदयनराजे भोसले
  • Wed , 29 August 2018
  • पडघम राज्यकारण उदयनराजे भोसले Udyanraje Bhosle सातारा Satara संभाजी भिडे Sambhaji Bhide भिडे गुरुजी Bhide Guruji शाहू-फुले-आंबेडकर Shahu-Phule-Ambedkar छत्रपती शिवाजीमहाराज Chhatrapati Shivaji Maharaj

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना,

सादर दंडवत आणि सप्रेम नमस्कार विनंती विशेष!

गेल्या एक-दोन वर्षांपासूनच तुम्हाला पत्र लिहिण्याचा विचार करत होतो, शेवटी आज लिहिण्याचा योग आला. माझ्या लहानपणापासून मी तुम्हाला बघत आहे. तुमचा संघर्ष आम्ही सातारकरांनी बघितला आहे. प्रतापसिंह महाराजांनंतर तुम्ही स्वकष्टानं, हिमतीनं नगरसेवक ते खासदार अशी मजल मारली आहे. याबद्दल मला एक सातारकर म्हणून कायमच अभिमान वाटत आला आहे.

मात्र गेल्या काही दिवसांपासून काही गोष्टींमुळे एक सातारकर म्हणून मी अस्वस्थ आहे. त्याच कारणामुळे या पत्राचा प्रपंच!

राजे, तुम्हास तर ठाऊक आहेच की, आपला पश्चिम महाराष्ट्र ही शिवरायांची कर्मभूमी, जन्मभूमी; त्याचबरोबर लोक राजा राजश्री शाहू महाराज महात्मा फुले ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची भूमी आहे. त्यांच्याच विचारांवर इथली जनता चालली म्हणून इथं बऱ्यापैकी सुबत्ता आली. इथला युवक शिवरायांचं नाव जरी ऐकलं तरी उत्साहित होतो, बेभान होतो. इतका जबरदस्त पगडा आहे शिवरायांचा. आणि हेच हेरून काही विघातक शक्तींनी शिवरायांच्या नावावर इथल्या मातीत हळूहळू विष कालवायला सुरुवात केली. शिवराय ‘मुस्लिमविरोधी’ होते, अशी त्यांची प्रतिमा रंगवून युवावर्गाचं ब्रेनवॉश करण्यात येतंय. त्याचंच फलित म्हणून कोरेगाव भीमा इथं आंबेडकरी जनतेवर हल्ला करण्यात आला. 

राजे, तुम्ही ज्यांना गुरुजी मानता ते सांगलीतले मनोहर भिडे उर्फ भिडे गुरुजी हे त्यामागे आहेत, असा आरोप होतोय. आणि गेल्या काही दिवसांतली त्यांची वक्तव्यं पाहिली तर त्या आरोपांमध्ये तथ्य असावं, असं वाटतं. 

ज्या ‘मनुस्मृती’मुळे शिवरायांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला, शिवरायांना अमाप पैसा देऊन राज्याभिषेक करावा लागला, ज्यांनी संभाजी महाराजांची बदनामी केली, त्याच ‘मनुस्मृती’चा गौरव करणाऱ्या मनोहर भिडेंना तुम्ही ‘गुरु’ मानता! हा शिवरायांचा ‘अपमान’ नव्हे काय? 

गेल्या काही दिवसांत सुधन्वा गोंधळेकर या युवकाला अटक करण्यात आली. सनातन प्रभात या कट्टर धार्मिक संघटनेचं नाव त्यात समोर आलंय. ही तीच संघटना आहे ज्यांच्यावर सातारच्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खूनाचा आरोप आहे. जो बहुतेक थोड्या दिवसांत योग्य पुरावे मिळवता आले तर सिद्धही होईल कदाचित. साताऱ्यात सुधन्वा गोंधळेकरच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. मी स्वतः तो मोर्चा बघितला. युवक, आठवी-नववीची मुलं, महिला त्यात होत्या. ज्या कर्मवीरांनी रयतचं रोपटं लावून वटवृक्ष केला, तिकडेच होता हा मोर्चा! कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांची भेट झाली होती त्याच ठिकाणी. त्यात बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलण्याची भाषा होती. आणि तीसुद्धा शिवरायांचा वारस हयात असताना! इथल्या युवकांच्या डोक्यात जो मुस्लिमद्वेष पेरला जातोय, तो थांबला पाहिजे. किंबहुना तो तुम्हीच थांबवला पाहिजे. शिवरायांचे वंशज म्हणून तुमची ती नैतिक जबाबदारी आहे. ती पार पाडण्यासाठी तुमच्याकडे ताकद आणि धमकसुद्धा आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
 

.............................................................................................................................................

राजे, शिवराय निजामशहा, आदिलशहा हे मुस्लिम आहेत म्हणून केवळ त्यांच्याविरुद्ध लढले नाहीत. त्यांची लढाई होती ती एका ‘स्वराज्याची’! तसं असतं तर त्यांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नसते आणि जावळीच्या मोऱ्यांसोबत त्यांना लढाई करावी लागली नसती! 

सांगलीचे भिडेगुरुजी रायगडावर बत्तीस मण सोन्याचं सिंहासन बसवण्यासाठी आवाहन केलं जात आहे. वर्षातून अनेकदा गडकोट मोहिमा काढल्या जातात. त्यात युवकांचा किती वेळ वाया जातो! शिवरायांची लढाई ही तलवारीची होती, पण आजची लढाई पेनाची आहे. त्या युवकांची जी ऊर्जा तिकडे वाया जात आहे, ती जर स्पर्धा परीक्षा आणि बाकीच्या विधायक कामात लागली, तर येणारा काळ वेगळा असेल.

राजे, साताऱ्यात तुमची गाडी समोरून येत असली तर लोक आदरानं जागीच थांबतात. परवा जो मोर्चा काढला त्याकडे तुम्ही नुसते डोळे वटारून पाहिलं असतं तर निम्म्या पोरांची चड्डी ओली झाली असती. आणि ते घरी गेले असते. माझी तुम्हास मनापासून कळकळीची विनंती आहे की, या शक्तींपासून आपला साताऱ्याला आणि महाराष्ट्र्राला रोखा.  

माझ्यासारखे सातारचे जे हजारो युवक कामासाठी पुण्या-मुंबईत आहेत, ते तुमच्याकडे आशा लावून आहेत, की कधीतरी तुम्ही फुले-शाहू-आंबेडकर आणि शिवराय यांच्या विचारधारेसाठी उभे राहाल. आणि शिवरायांचे वंशज म्हणून स्वतःला सिद्ध कराल.

राजे, तुम्ही आता मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे ही दिलासादायक गोष्ट आहे. त्या निमितानं मराठा युवक तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे, ही एक योग्य संधी आहे तुमच्याकडे. त्यांना पुरोगामी विचारधारा समजून सांगा. फुले-शाहू-आंबेडकर-शिवराय कोण होते, त्यांनी काय केलं, हे सांगा. (बहुतांश लोकांनी त्यांचं लेखन वाचलं आहे, पण एक मोठा समूह त्यापासून वंचित आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी कॉलेजमधून शिकलेला एक सातारचा युवक कर्मवीरांना गुरू मानत नाही, पण भिडेगुरुजींना ‘गुरू’ मानतो! ही किती मोठी शोकांतिका आहे?)

राजे, लोकसभेच्या निवडणूक जवळ येत आहेत. गेल्या काही दिवसांत ‘जात’ नको इतकी अधोरेखित झालीय. सामाजिक एकता तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इथल्या जनतेला आर्थिक विकास नसला तरी चालेल एकवेळ, पण सामाजिक एकता पाहिजे असते. तुमच्याजवळ एक वर्षाच्या कालावधी आहे. तुम्ही पुरोगामी विचारांची मशाल हाती घेऊन सनातनी, कट्टर विचारधारेला रोखा. आणि दाखवून द्या स्वतःला आणि समस्त जगाला की, तुम्ही कुणा ऐऱ्यागैऱ्याचे वारसदार नाही, रयतेचा राजा असणाऱ्या ‘शिवरायां’चे वारस आहात!

राजे, तुम्हाला मानाचा मुजरा!

कळावे!

तुमच्यावर प्रेम करणारा एक सातारकर

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

Post Comment

Sagar Pansare

Wed , 29 August 2018

खासदार उदयन भोसले हे नक्की खुलं पत्र वाचतील का? अपेक्षा खूप साध्या आणि सरळ आहेत त्या त्यांना झेपतील का?लेखकाच्या मनाची घालमेल त्यांना समजेल का? त्यांच्या कडून सकारात्मक प्रतिसाद मिळवा आणि हा खेळ थांबावा हि अपेक्षा.


Sagar Patil

Wed , 29 August 2018

मुळात लेखक महाशय नाव दडवून लिहितात यातूनच त्यांच्या मनात उदयन भोसले यांच्या बद्दलची दहशत दिसते आणि असल्या अपेक्षा पूर्ण करणारे उदयन भोसले आहेत का हा मुख्य प्रश्न आहे.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......