विरोधी पक्ष विरुद्ध सत्ताधारी अर्थात महत्त्वाकांक्षांना ‘वास्तवाची’ टाचणी विरुद्ध महत्त्वाकांक्षांना ‘स्वप्नाचं’ खतपाणी!
पडघम - देशकारण
देवेंद्र शिरुरकर
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sat , 11 August 2018
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress भाजप BJP राहुल गांधी Rahul Gandhi नरेंद्र मोदी Narendra Modi

संयुक्त जनता दलाचे नेते हरिवंश नारायण सिंग यांना राज्यसभेच्या उप-सभापतीपदाच्या शर्यतीत विजय मिळवून देत सत्ताधाऱ्यांनी आपण प्रत्येक कुरघोडीत सरस ठरल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. लोकसभेत मिळालेल्या अजस्त्र बहुमताच्या जोरावर सत्तेवर विराजमान उजव्यांची वाटचाल प्रारंभी मंदगतीने होती. पण राज्यसभेतील बदलत्या समीकरणानंतर त्यांची गती वाढली. राज्यसभेच्या उप-सभापतीपदाच्या शर्यतीत आपल्याच मित्र पक्षाच्या नेत्याची वर्णी लावल्यानंतर ही गतिमानता निर्धोक असल्याचे स्पष्ट झाले आहे. २०१९ पर्यंत संसदीय आयुधांसाठी झालेल्या सर्वच लढायांत आपण किती उजवे आहोत, हे उजव्यांनी सिद्ध केले आहे. लोकसभा सभापती, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यसभा उपाध्यक्षपद अशा सर्वच महत्त्वाच्या निवडणुकीत विरोधकांना शह देण्यात मोदी-शहा जोडगोळी यशस्वी ठरली आहे.

येत्या लोकसभेच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून या सर्व घडामोडी महत्त्वपूर्ण ठरतात. सत्ताधारी आघाडीला पडणारी खिंडारे बुजवण्याची घाई करत भाजपने संयुक्त जनता दल या मित्रपक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सन्मान देण्याची संधी तर साधलीच, शिवाय बिजू जनता दल या नितीशकुमार यांच्या पक्षासारखाच तोंडवळा असलेल्या कुंपणावरच्या पक्षालाही साद घातली आहे.

जयप्रकाश नारायण यांच्या जनआंदोलनाचा वैचारिक वारसा सांगणारे हे दोन्ही समविचारी पक्ष तूर्तास तरी आपल्याकडे असल्याचा संदेश भाजपने विरोधी पक्षांच्या मनोमीलनास उत्सुक धुरिणांना दिला आहे. ‘तू तिथे मी’ अशी गत असलेली शिवसेना, पहिले प्रेम असलेली तेलंगणा राष्ट्र समिती सत्ताधारी आघाडीसोबतच आहेत.

हरिवंश नारायण यांच्या निवडीनंतरचा अंक बिहारमधील लोकसभेच्या जागावाटपाच्या बोलणीत पुरा केला जाईल. तर नवीन पटनाईकांच्या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालण्यात येईल. ओडिशात विधान परिषद स्थापन करण्याचा त्यांचा इरादा आहे. लोकसभेपूर्वी भाजपकडून आणखी काही मित्र गोळा केलेले असणारच. कदाचित वायएसआर काँग्रेस, अद्रमुक त्यांच्यासोबत जातील.

याउलट देशातील सर्व विरोधी पक्षांच्या ऐक्याची नांदीही अद्याप पाहावयास मिळत नाही. उप-सभापतीपदाच्या शर्यतीसाठी उमेदवार घोषित करण्यास झालेला विलंब अथवा द्रमुकच्या तिरुची सिवा, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांच्या नावांबाबतीत एकमत न होई शकल्यामुळे ऐनवेळी काँग्रेसच्या बी. के. हरिप्रसाद यांना मैदानात उतरवण्यात आले.

२०१९ साली सर्वाधिक जागा काँग्रेसच्या असतील तर आपण पंतप्रधानपदाचे दावेदार असू, या राहुल गांधी यांच्या वक्तव्यानंतर सर्वच विरोधी पक्षांत निर्माण झालेली अस्वस्थता आणखी कशी वाढेल, कुंपणावरचे खेळगडी आणखी कसे वाढतील यासाठी सत्ताधारी आघाडीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत.

समविचारी पक्षांचे ऐक्य महत्त्वाचे आहे, पंतप्रधानपदाच्या दावेदारीचे नंतर बघू, असा राहुल गांधी यांचा खुलासा आल्यानंतरही तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची सुप्त महत्त्वाकांक्षा बळावत जातानाच दिसते आहे. ममतांशिवाय पंतप्रधानपदाचे वेड असलेले डझनांहून अधिक नेते रिंगणात आहेत. त्यात नव्यानं दाखल झालेल्या चंद्राबाबूंसह अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेक जुन्या जाणत्यांचाही समावेश आहे.

भाजपच्या विचारपूर्वक खेळल्या जाणाऱ्या कृतींना प्रत्युत्तर देण्यासाठी, देशासमोर सत्ताधाऱ्यांना एक सशक्त पर्याय आहे हे दाखवून देण्यासाठी विरोधकांकडून कसल्याच हालचाली होताना दिसत नाहीत. काँग्रेसला अद्याप सूर गवसलेला नाही आणि ममतांनाही तो गवसण्याची शक्यता नाही. संभाव्य मित्र जमवताना त्यांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची ग्वाही द्यावी लागते. आघाडी धर्म पाळताना त्यांच्या कुवतीनुसार मान-सन्मानही द्यावा लागतो.

आजघडीस काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी गत संयुक्त पुरोगामी आघाडीतील रीतीनुसार संभाव्य मित्रांना अशी हमी दिलेली आहेच; पण अद्याप या मित्रांमध्ये म्हणावी तेवढी विश्वासार्हता निर्माण झालेली दिसत नाही. कर्नाटकात काँग्रेसनं बिनशर्थ म्हणून धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या कुमारस्वामी यांना संख्याबळाचा टेकू दिला आहे. त्या संख्याबळाचं ओझं असह्य होत असल्याची तक्रार कुमारस्वामी अधूनमधून करत असतात. त्यामुळे संभाव्य मित्रांच्या जवळ येण्यातील कालावधी वाढत चालला आहे, ही काँग्रेससमोरील मोठी समस्या आहे.

यापूर्वी काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचा हिस्सा असलेल्या मित्रांना समविचारी पक्षांची संयुक्त आघाडी तर हवी आहे, पण त्यांना ती काँग्रेसप्रणीत असायला नको आहे. संसदेत सर्वाधिक सदस्यसंख्या असणाऱ्यांना केंद्रीय महत्त्वाकांक्षा खुणावत आहेत. अशा वेळी त्यांच्या महत्त्वाकांक्षांना वास्तवाची टाचणी लावत ऐक्य साधण्याचं आवाहन प्रमुख विरोधी पक्षासमोर आहे, तर या महत्त्वाकांक्षांना खतपाणी घालणं, ही सध्याच्या सत्ताधाऱ्यांसमोरील अनिवार्य गरज बनली आहे.

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......