आजवरचे पाक सत्ताधीश लष्कराच्या तालावर नाचणारे कळसुत्रे बाहुलेच ठरले, नवा ‘पोस्टरबॉय’ही तसाच असणार!
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
देवेंद्र शिरुरकर
  • इमरान खान
  • Mon , 30 July 2018
  • पडघम राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय इमरान खान Imran Khan पाकिस्तान Pakistan

कधीकाळी क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीमुळे आणि त्यानंतरच्या काळात अतरंगी करामतीमुळे प्रकाशझोतात आलेले इम्रान ऊर्फ तालिबान खान आता पाकिस्तान या इस्लामिक देशाचे पंतप्रधान झाले आहेत. जगभरात सर्वत्र लोकशाही सुखनैव नांदायला हवी खरी. पण प्रत्यक्षातील वस्तुस्थिती वेगळी आहे. काही देशांत लोकशाही दैनंदिन जीवनात प्रतिबिंबित होताना दिसते, तर काही गैरलोकशाही देशांत (नॉन डेमॉक्रॅटिक रिजिम्स) हुकूमशहांची अनिर्बंध सत्ता चालते. 

या दोन्हींच्या संमिश्रणाचा देखावा करणारी  एक व्यवस्था असते. ज्यात भारताच्या सख्ख्या शेजाऱ्याचा नामोल्लेख करावा लागतो. पाकिस्तानची खरी सत्ता लष्कराच्या हातात सामावलेली आहे. १९४७ सालापासून सुरू असलेली ही परंपरा अद्याप एकदाही खंडित झालेली नाही. लोकशाही  संरचनेच्या चौकटीतून सत्ताधीश झालेले राजकारणी हे लष्कर आणि आयएसआयच्या तालावर नाचणारे कळसुत्रे बाहुले ठरलेले आहेत.

केवळ धार्मिक आधारावर निर्माण झालेल्या राष्ट्राच्या वाटचालीच्या दिशा आणि दशा कशा होतात? याचे जिवंत उदाहरण म्हणूनच आज जग पाकिस्तानकडे अंगुलिनिर्देश करते.

पाकिस्तानच्या अंतर्गत घडामोडींसाठी एक बोलका पोपट लागतो. हा पोपट आणि त्याचा बोलविता धनी जगाला ज्ञात असला तरी भारताला त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. इतर अनेक नेत्यांप्रमाणेच लष्कराचे प्रणयाराधन करत आणि राजकारणाचे गांभीर्य नसल्यासारखी फुटकळ विधाने करत इम्रान खान व त्यांचा पाकिस्तान-तहरीक-ए-इन्साफ हा पक्ष सत्तेवर आला आहे.

१९९७ साली प्रथमच निवडणुकीच्या आखाड्यात उतरून सुरू केलेल्या सत्ताप्राप्तीच्या प्रयत्नांची सांगता २२ वर्षांनंतर होत आहे. नवाज शरीफ आणि बिलावल भुत्तो या प्रस्थापितांच्या प्रभावाला आव्हान देत इम्रान आता पाकिस्तानचे वजिर-ए-आझम बनले आहेत. नव्या पाकिस्तान उभारणीचे स्वप्न दाखवतानाच इम्रान यांनी कायदे आझमच्या स्वप्नातल्या पाकिस्ताननिर्मितीचा उद्घोषही केला आहे. निवडणूकपूर्व जाहीरनाम्यातील विकासवाद, प्रगती, शांतता, स्थैर्य असल्या पोकळ बडबडीसोबतच लष्कराला आवडतील अशी धोरणे राबविण्याची मनीषा बोलून दाखवली आहे. त्याशिवायच का त्यांना पाकिस्तानची सेवा करण्याची संधी मिळाली आहे?

 सार्वत्रिक निवडणुकीतून बहुमत मिळवत ते सत्ताधीश झाले आहेत. आता पाकिस्तानात लोकशाही चळवळींना बळ मिळेल अशा भ्रामक समजुतीत असणाऱ्यांचा कळवळा किती निरर्थक आहे, हे येत्या काळात उघड होईलच. आपले अनिर्बंध वर्चस्व अबाधित राखण्यासाठी कळसुत्री बाहुले नाचवणाऱ्या लष्कराला प्रसन्न करण्यासाठी आजवर तिथल्या सत्ताधीशांना काय यातायात करावी लागलेली आहे, हे या आशावादी लोकांना कसे कळणार?

धर्मांधता, दहशतवाद, सार्वजनिक व्यवहारातील भ्रष्टाचार जोपासणाऱ्या लष्कराला लोकशाही चौकटीसाठी कोणीतरी कुंकवाचा धनी लागतो. आपल्या देशातल्यासारखे घुसखोरी करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तिथे लष्कराला लोकप्रतिनिधीगृहाची, सत्ताधारी पक्षाची संमती घ्यावी लागत नाही. कारण तिथे लष्करच या संस्था चालवते. अशा संस्थांचा चेहरा म्हणून आपल्याला हवा तसा व्यक्ती गादीवर बसवायचा आणि दहशतवादविरोधी कारवायांच्या नावाने अमाप पैसा बाहेर काढायचा उद्योग पाकिस्तानी लष्कराने अव्याहतपणे सुरू ठेवला आहे.

जेव्हा कळसुत्री बाहुले अथवा हा नावापुरती धनी याबाबत आक्षेप घ्यायला लागतो, त्यानंतर ठराविक काळाने हा कुंकवाचा धनी बदलला जातो, एवढाच या बदलाचा मतितार्थ आहे. हा धनी गरजेपेक्षा जास्त अधिकार गाजवायला लागला की, त्याची गत भुत्तो, शरीफ यांच्याप्रमाणेच होते.

म्हणूनच लष्कराने यावेळी इम्रान खान या तालिबानसमर्थक नेत्याला सर्वोच्च नेतृत्वाची संधी दिली आहे. देशांतर्गत विकासाचे स्वप्न जागवताना इम्रान यांनी स्वच्छ, पारदर्शक व विश्वासार्ह सरकार देण्याची ग्वाही दिली आहे. त्यांची ही घोषणा आपल्या ‘सबका साथ सबका विकास’ आणि केजरीवालांनी झाडूरूपी प्रतीकाने निर्माण केलेल्या पारदर्शकतेसारखीच आहे.

पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपैकी ४६ दशलक्ष मतदाते हे वय वर्षे १८ ते ३५ यादरम्यानचे आहेत. सनातनी आणि आधुनिक, शहरी आणि ग्रामीण अशा सर्वांसाठी सर्व काही देण्याची इच्छा इम्रान यांनी व्यक्त केली आहे. शिक्षण, आरोग्य अशा क्षेत्रात सुधारणा करण्याचेही वचन मतदात्यांना दिले आहे. या सगळ्या अंतर्गत क्षेत्रातील सुधारणा ते करतील, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही. पण परराष्ट्र धोरण हा विषय त्यांच्या अखत्यारीतील निश्चितच नाही. व्यक्तिगत पातळीवर दिसायला जरी इम्रान उदारमतवादी भासत असले तरी प्रत्यक्ष धोरणात हिंसाचाराचे समर्थक असलेल्या इम्रान यांच्या हाती सत्ता जाणे भारतासाठी डोकेदुखीचाच विषय आहे.

पाकिस्तानसाठी क्रिकेटचा विश्वचषक आणणारे आक्रमक धर्मवीर अशी त्यांची प्रतिमा आहे. या प्रतिमेला साजेसा आक्रस्ताळेपणा आजवर त्यांनी जाणीवपूर्वक जोपासला, तेव्हा कुठे या पदावर बसण्याची संधी त्यांच्या हाती लागली आहे. बरे त्यांचे समर्थक दावा करतात त्यानुसार इम्रान उदारमतवादी कसे असतील? ज्यांच्या निवडीतच तालिबान, लष्कर आणि आयएसआयचे आशीर्वाद आहेत असा व्यक्ती नंतर स्वतंत्र बुद्धधीने प्रश्न हाताळेल? पाकिस्तानच्या राजकीय चौकटीला आणि दहशतीच्या सावटाला छेद देण्याचे धाडस दाखवेल, ही अपेक्षाच मुळात व्यर्थ आहे. व्यक्तीगत आयुष्यात जोडीदार बदलण्याएवढे सोपे नाहीच ते!

या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर नवाज शरीफ आणि बिलावल भुत्तो यांचे कार्यकर्ते निवडणूक प्रक्रियेबाबत संशय व्यक्त करत आहेत, कारण इम्रान यांच्या विजयात तालिबान, लष्कर आणि आयएसआय यांचा हस्तक्षेप असल्याचे वास्तव त्यांना ज्ञात आहे. तालिबानविरोधी कारवायांना उघड विरोध करणारा आणि भारताच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’नंतर नवाज शरीफ यांची भ्याड अशी निर्भर्त्सना करणारा नेता दहशतवाद्यांसह सर्वांचाच लाडका ‘पोस्टरबॉय’ झाल्याशिवायच का हे सत्तापरिवर्तन घडले आहे? 

असा धर्मांध नेता भारतासोबत शांततेचे संबंध प्रस्थापित करू शकतो, यावर कोण विश्वास ठेवणार? असा नेता भारतासाठी डोकेदुखीच ठरेल. कदाचित पाकिस्तानसोबतच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या घडामोडी अधिकच रेंगाळतील. सत्तास्थापनेपूर्वीच प्रथेप्रमाणे इम्रान यांनी भारतासोबतचे संबंध सुधारण्यास प्राधान्य असा उच्चार केला आहे. मात्र काश्मीर प्रश्नाबाबत जुना सूर आळवण्यास ते विसरलेले नाहीत.

जमात उद दवाह, जैश-ए-मोहम्मद अशा अनेक राज्यपुरस्कृत संघटनांची हिंसाचाराची दुकाने आता तेजीत चालायला लागतील. कारगिल विजय दिनाच्या दिवशी पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल घोषित व्हावेत हा योगायोग आहेच. पण इम्रान यांनी भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्याची इच्छा प्रदर्शित करावी, त्याच्या दुसऱ्याच दिवशी ‘जैश’ आणि ‘लष्कर’चे दहशतवादी भारताच्या राजधानीत घुसल्याचे वृत्त गुप्तचर यंत्रणांनी उघड करावे, हा योगायोग कसा असू शकेल? 

.............................................................................................................................................

लेखक देवेंद्र शिरुरकर मुक्त पत्रकार आहेत.

shirurkard@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Nikkhiel paropate

Mon , 30 July 2018

अत्यंत सुरेख व योग्य मांडणी..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......